सोमवार, 10 मई 2010

व्यक्तिगत स्वच्छता

आपण खात असलेलं अन्न, आपण ज्याप्रकारे आपलं शरीर स्वच्छ ठेवतो, शारीरिक व्यायाम आणि सुरक्षित लैंगिक संबंध, हे सर्व शरीराचं आरोग्य उत्तम राखण्यात फार मोठी भूमिका बजावतात. आपल्या खेड्यांमधे अनेक रोग हे शारीरिक स्वच्छता न पाळल्यामुळं निर्माण होतात. परजीवी जंतू, कृमी, खरुज, फोड, दात किडणे, अतिसार आणि हगवण हे विकार व्यक्तिगत स्वच्छता न पाळल्यानं होतात. स्वच्छतेचं पालन केल्यानं हे सर्व रोग टाळता येऊ शकतात.

डोक्याची स्वच्छता

    आठवड्यातून एकदा किंवा दोनवेळा शाम्पू किंवा अन्य एखादा घटक वापरुन (शिकाकाई) डोक्यावरुन अंघोळ करणे

    डोळे, कान आणि नाक स्वच्छ करणे 1. दररोज स्वच्छ पाण्याने आपले डोळे धुवावेत 2. कानांमधे मळामुळं हवेचा मार्ग अडतो. त्यामुळं वेदना होतात. त्यामुळं आठवड्यातून एकदा कापसाच्या स्वच्छ बोळ्यानं कान साफ करावेत 3. नाकातील स्त्राव वाळून तो कडक होतो ज्यामुळं नाक बंद होतं. त्यामुळं आवश्यक तेव्हा नाक स्वच्छ करावे. मुलांना जेव्हा थंडी वाजून नाक वाहायला लागतं तेव्हा त्यांचं नाक मऊ कपड्यानं स्वच्छ करावे.


डोळे, कान आणि नाक स्वच्छ करणे

       1. दररोज स्वच्छ पाण्याने आपले डोळे धुवावेत
       2. कानांमधे मळामुळं हवेचा मार्ग अडतो.  त्यामुळं वेदना होतात.  त्यामुळं आठवड्यातून एकदा कापसाच्या स्वच्छ बोळ्यानं कान साफ करावेत
       3. नाकातील स्त्राव वाळून तो कडक होतो ज्यामुळं नाक बंद होतं.  त्यामुळं आवश्यक तेव्हा नाक स्वच्छ करावे. मुलांना जेव्हा थंडी वाजून नाक वाहायला लागतं तेव्हा त्यांचं नाक मऊ कपड्यानं स्वच्छ करावे.



त्वचेची निगा

       1. त्वचा ही संपूर्ण शरीराला आवरण देते, शरीरातील अवयवांचे रक्षण करते आणि शरीराचं तापमान राखण्यात मदत करते.
       2. त्वचा ही घामाव्दारे शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यात मदत करते.  एखाद्या खराब त्वचेत, घामाच्या ग्रंथी बंद होतात आणि परिणामी फोड, चट्टे आणि मुरुमं तयार होतात.
       3. आपली त्वचा स्वच्छ राखण्यासाठी दररोज साबण आणि स्वच्छ पाणी वापरुन अंघोळ करा.



तोंडाची स्वच्छता

        * दात घासण्यासाठी दातांची मऊ पावडर आणि पेस्ट चांगली असते.  दिवसातून दोनवेळा दात ब्रशने घासा – सकाळी, बिछान्यातून उठल्यानंतर लगेचच आणि रात्री झोपी जाण्यापूर्वी.  कोळशाची पावडर, मीठ, खरखरीत दाताची पावडर, इत्यादी घासण्यासाठी वापरल्यानं दातांच्या बाह्य आवरणावर चरे पडतात.
        * कोणताही खाद्य पदार्थ खाल्ल्यानंतर स्वच्छ पाण्यानं चुळा भरुन टाका.  त्यामुळं अन्नकण दातांच्या फटीमधे अडकून बसत नाहीत, अन्यथा तोंडाला दुर्गंधी येते, हिरड्या खराब होतात आणि दात किडायला लागतात.
        * पोषणयुक्त आहार घ्या.  मिठाई, चॉकोलेट्स, आईसक्रीम आणि केक कमी प्रमाणात खावे.
        * आपल्याला दात किडण्याची लक्षणं आढळून आल्यास तत्काळ दंतवैद्यांचा सल्ला घ्या.
        * दांत काढण्यामुळं डोळ्यांचं कुठल्याही प्रकारे नुकसान होत नाही.

    त्वचेची निगा

       1. त्वचा ही संपूर्ण शरीराला आवरण देते, शरीरातील अवयवांचे रक्षण करते आणि शरीराचं तापमान राखण्यात मदत करते.
       2. त्वचा ही घामाव्दारे शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यात मदत करते.  एखाद्या खराब त्वचेत, घामाच्या ग्रंथी बंद होतात आणि परिणामी फोड, चट्टे आणि मुरुमं तयार होतात.
       3. आपली त्वचा स्वच्छ राखण्यासाठी दररोज साबण आणि स्वच्छ पाणी वापरुन अंघोळ करा.



हातांची स्वच्छता

       1. आपण आपल्या हातांनी अन्न खाणे, शौचानंतर धुणे, नाक स्वच्छ करणे, शेण गोळा करणे यांसारखी सर्व कामं करतो.  ती करत असताना, अनेक रोगकारक जंतू नखांच्या फटीत आणि त्वचेवर राहतात.  प्रत्येक काम केल्यानंतर आणि विशषतः स्वयंपाक करण्यापूर्वी आणि जेवण घेण्यापूर्वी साबणाने हात धुतल्यानं अनेक रोग टाळण्यात मदत होते.
       2. आपली नखे नियमितपणे कापावीत.
       3. मुलं चिखलामधे खेळतात.  जेवण्यापूर्वी त्यांना हात धुण्याची सवय शिकवा.



शौच आणि मूत्र विसर्जनाची स्वच्छता

    शौच आणि मूत्र विसर्जनानंतर, संबंधित अवयव स्वच्छ पाण्यानं मागून-पुढून धुवावेत आणि ते नेहमी स्वच्छ ठेवावेत.  आपले हात साबणाने धुण्यास विसरु नका.

    संडास, नहाणीघर आणि आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा.  उघड्यावर शौचास बसू नये.



अन्न शिजविताना घ्यावयाची काळजी

    अन्न शिजविताना घेतलेली थोडीशी काळजी कुटूंबाला अन्नातून होणा-‍या विषबाधेपासून, आजारांपासून दूर ठेऊ शकते.

        * अन्न ज्या ठिकाणी शिजविले जाते तो भाग व अन्न तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी भांडीे स्वच्छ असावीत.
        * शीळे किंवा दुषित अन्न खाणे टाळावे.
        * जेवायला बसण्यापूर्वी व जेवण वाढायला घेण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत.
        * भाज्या वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवाव्यात.
        * अन्न योग्य पद्धतीने साठवून ठेवावे.
        * तयार खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यांच्या वेष्टणावरील वापरण्याची मुदत तपासावी व मुदत संपली नसेल तरच तो पदार्थ खरेदी करावा.
        * स्वयंपाकघरातील कचर-‍याची योग्य विल्हेवाट लावावी.



औषधोपचार करताना घ्यावयाची काळजी

        * जखमांवर नियमीत योग्य मलमपट्टी करावी.
        * औषधे खरेदी करताना त्यांची मुदत तपासावी, मुदतबाह्य औषधे खरेदी करू नयेत.
        * नको असलेल्या औषधांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी.
        * डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly