बुधवार, 19 अक्तूबर 2011

मराठी उखाणे 10






------रावांच्या डोक्यावरती मोत्यांची छत्री.
चोहोकडे चार लावल्या समया मध्यें आंथरलें आसन
------राव बसले पुजेला तर लक्ष्मी झाली प्रसन्न.
गंधानीं भरले कचोळे त्यांत पडली मसूर त्यांच्या घराण्यांत
------राव चतूर.
आवळीच्या झाडावर पंचरंगी पक्षी
------रावांचं नांव घेतें चंद्र्सूर्य साक्षी.
रत्नजडित सिंहासन भोंवताली मरवा
------राव बसले पुजेला मी देतें दुवा.
समोर होतें तळें, त्यांत होतीं कमळें, त्यावर होता भुंगा, माझा निरोप
------रावांना सांगा.
रंगीत पाट, चांदीचे ताट
------रावांचं नांव घेतें सोडा मला वाट.
विष्णूला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी
------रावांचं नांव घेण्यास अशीच यावी संधी.
सोन्याची वाटी, चांदीचा चमचा
------रावांचं नांव घेण्यास आग्रह फार तुमचा.
हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे
------रावांचं नांव घेतें सत्यनारायणापुढें.
फुलांची वेणी गुंफीतो माळी
------नांव घेतें हळदीकुंकवाच्या वेळीं.
तुळशीची करतें पूजा विष्णूची करतें शांति
------राव दीर्घायु व्हावेत अशी माझी विनंति.
मथुरेच्या कुंजवनांत कृष्ण वाजवितो बासरी
------रावांच्या जिवावर सुखी आहे मी सासरीं.
मंद वाहे वारा, चंद्र्भागेंत स्थिर चाले होडी
------रावांची व माझी सुखी आहे जोडी.
जन्म दिला मातेनं, पालन केलें पित्यानं
------रावांचं नांव घेतें पत्नी या नात्यानं.
हिंदमातेच्या हातांत रत्नजडावाचे तोडे
------रावांचं नांव घेतें वडील माणसांच्या पुढें.
जाईजुईच्या झाडाखालीं फुलांचा विणला शेला
------रावांचं नांव घेतें दिवस अस्ताला गेला.
लक्ष प्रदक्षणा घालतें उंबराला
------रावांचं नांव घेतें पहिल्या नंबराला.
नऊ दिवस नवरात्र, दहाव्या दिवशीं दसरा
------रावांचं नांव घ्यायला नंबर माझा दुसरा.
शंकराच्या पिंडीवर बेलाचें पान
------रावांचं नांव घेऊन राखतें तुमचा मान.
चांदीच्या ताटांत बर्फीची चवड
------रावांच्या नांवाची सर्वांना आवड.
संध्येच्या पळीवर नागाची खूण
------रावांचं नांव घेतें ------सून.
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी
------रावांचं नांव घेतें ------दिवशीं.
रत्नजडीत सिंहासनावर उभा दत्तराज

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly