बुधवार, 19 अक्तूबर 2011

मराठी उखाणे 12

------रावांची जोड हीच जीवनाची पूर्ती.
स्वराज्याच्या बागेमध्यें गांधी झाले माळी
------रावांचं नांव घेतें वरातीचे वेळीं.
वसंत ऋतूंमध्यें जशी येते कोकीळेची चाहूल तशीच मी टाकीतें
------रावांच्या घरामध्यें पाऊल.
जिजाईनीं केला शिवादेवीला नवस,
आज ------चा आला भाग्याचा दिवस.
नमस्कार फुकाचा, आशिर्वाद मोलाचा
------रावांचा संसार करीन मी सुखाचा.
श्रीकृष्णाची राधा, शंकराची पार्वती
------च्या जोडीला आशीर्वाद देती.
गणपतीला दुर्वा, शंकराला बेल
------रावांच्या घरीं वाढेल वंशवृक्षाचा वेल.
आंबाच्या वनांत कोकीळा करी कूजन
------रावांचें नांव घेतें झालें लक्ष्मीपूजन.
माहेरच्या परिसरांत वेंचले मी ज्ञानकण
------रावांचें नांव घेऊन सोडतें मी गुंफलेलं कंकण.
शंकराचा सोमवार, गणपतीची चतुर्थी, माझ्या ह्रुदयांत कोरली
------रावांची सुंदर मूर्ती.
संसाररुपी सागरांत देहाची केली होडी
------रावांच्या घरांत शोभते ------ची जोडी.
भारतीय युद्धांत कृष्णांनीं सांगितली गीता
------रावांचं नांव घेतें मी ------त्यांची कांता.
मृग नक्षत्रांत आनंदानं नाच करतो मोर
------रावांच्या जिवावर लावीन कुंकवाची कोर.
हिंदमातेच्या गळ्यांत स्वातंत्र्यफुलांची जाळी
------रावांचं नांव घेतें बारशाचे वेळीं.
पेटी तबला शिकतां शिकतां वाजवली सतार
------रावांच्या संसारांत धन्य झालें मी फार.
ज्योतिबा फुले यांनीं घेतला स्त्रीशिक्षणाचा कैवार
------रावांच्या घरीं मन रमवितो माझा संसार.
नको मोतीं, नको चंद्रहार
------रावांचं नांव हाच माझा अलंकार.
चंद्रोदयाला येती समुद्राला भरती
------रावांना बघून सारे श्रम हरपती.
गोदावरी कांठची मुलगी कृष्णाकांठीं आली
------रावांच्या नांवाचं मंगळसूत्र ल्याली.
चांदीच्या कढईंत कढविलं तूप
------रावांचं दिसतं त्यांत कृष्णासारखं रुप.
वासांत वास घ्यावा केशराचा
------रावांच्या नांवाचा आग्रह आहे फुकाचा.
आंब्याच्या झाडावर कोकिळा करितें कुंजन
------रावांच्या मूर्तीचें माझ्या अंतरीं चाले पूजन.
पुण्यापासून मुंबईपर्यंत लावल्या आगगाडीच्या तारा
------रावांना मागतें औक्ष देवापाशीं शंभरावर सतरा.
आंत जाते, बाहेर येतें, घडयाळ्यांत वाजला एक

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly