बुधवार, 19 अक्तूबर 2011

मराठी उखाणे 14

 












नीलवर्ण आकाशांत चमकतो शुक्राचा तारा
------रावांच्या सहवासांत मला लागतो सुखाचा वारा.
काशीच्या तांब्याला रामेश्वचराची खूण
------नांव घेतें ------सून.
गोट केले, पाटल्या केल्या, मध्यें लेतें केरवा
------रावांच्या जीवावर शालू नेसतें हिरवा.
चंदनाच्या पाटाला रुप्याचे ठसे
------राव पाटावर बसे तर चंद्रसूर्य हंसे.
गुलाबाचं फूल माळ्याच्या मळ्यांत
------रावांचं नांव घेतें सवाष्णींच्या मेळ्यांत.
अंजिरी चोळीला मिर्याचयेवढी गाठ
------रावांचं नांव घेतें हळदी कुंकवाचा थाट.
काळी निळी घोडी मुंबईच्या बाजारीं
------रावांची खुर्ची वकिलाशेजारी.
चांदीच्या ताटांत खडी साखरेचे काजू
------राव निघाले कचेरीला फौजदार देती बाजू.
पैठणी नको, शालू नको, नको भरजरी शेला
------रावांच्या ह्रुदयांत जागा आहे मला.
सहस्त्र कमळामध्यें वास आहे लक्ष्मीचा, मला आहे अभिमान
------रावांच्या नांवाचा.
अहमदाबादी चंद्रकळा, तिला मोत्यांचा पदर
------रावांच्या जिवावर हळदीकुंकवाचा गजर.
रुप्याचा चौफुला त्याला लवंगा वेलदोडयांचा सांठा
------रावांच्या विडयांत माझा आहे वांटा.
गंगेची वाळू चाळणीनं चाळूं, घरीं गेल्यावर
------राव आपण सारीपाट खेळूं.
सोन्याच्या सोंगटया, रुप्याचे फांसे, जज्यांच्या कचेरींत
------राव खासे.
वाटल्या डाळीचं केलं पिठलं, त्यांत खोबरं घातलं किसून
------राव गेले रुसून तेव्हां सावित्रीनं तें खाल्लं चाटून पुसून.
कोर्याा घागरींत ठेवला लिंबांचा सार
------रावांच्या राणीच्या गळ्यांत मोत्यांचा हार.
रुप्याच्या ताटांत रायपुरी साखर
------रावांना भूक लागली आतां जाऊं द्या मला लवकर.
पिवळ्या पितांबरामध्यें सोडले सोगे
------राव गणपतीच्या पुजेला उभे.
रत्न-खचित डबी, त्यांत मोत्यांचा दाणा
------रावांच्या स्वारीबरोबर सरस्वतीचा आला मेणा.
प्रभातकाळीं निळ्या आभाळांत उगवतो सूर्यकांत, मनाचा लागत नाहीं थांग पण
------राव दिसतात शांत.
कुरुंदाची सहाण, चंदनांचं खोड
------रावांचा शब्द अमृतापेक्षां गोड.
चंद्राची जशी चंद्रिका वशिष्ठांची अरुंधती तशीच मी आहें
------रावांची आवडती.
पुण्यास जन्मलें, मुंबईस शिकलें

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly