मंगलवार, 25 अक्तूबर 2011

चांदी गुंतवणुकीची सोनेरी संधी




चांदीला औद्योगिक मागणी वाढत असून, मागणी-पुरवठ्यात तफावत आहे. मार्च २०१२ पर्यंत चांदीचा भाव प्रति किलो ७०-80 हजार रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नजीकच्या काळात चांदीत करेक्शन येऊन खरेदीची संधी मिळणार आहे. त्यामुळे चांदी रूपी गुंतवणुकीचे सोने करून घ्याची संधी मिळणार आहे.

औद्योगिक मंदीनंतर (२००७-०८) विविध देशांनी दिलेल्या आर्थिक सवलतीच्या 'बूस्टर डोसा'मुळे जागतिक अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत झाली. औद्योगिक उत्पादनात चांदीचा वापर केला जातो. अर्थव्यवस्था सुधारल्याने उत्पादनांना बाजारपेठेतून मागणी येण्यास सुरू झाली. परिणामी औद्योगिक क्षेत्रातून चांदीची मागणी वाढली. मागणी पुरवठा यांचे प्रमाण व्यस्त झाले. त्यामुळे चांदीने २०१०-११ मध्ये नवे उच्चांक गाठले. चांदीने जानेवारी ते मार्च या दरम्यान वीस टक्क्यांपेक्षा (८० वार्षिक) अधिक परतावा दिला आहे. चांदीने देशात प्रति किलो ५७ हजार रुपयांची उच्चांकी पातळी, तर जागतिक पातळीवर २४ मार्च रोजी चांदी प्रति औंसाला ३८.१० डॉलरवर गेली होती. मात्र, त्यानंतर त्यात घट झाली. चांदी चांगला परतावा देत असल्याने सामान्य गुंतवणूकदार या धातूत गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित होत आहेत. चांदीतील तेजीमुळे चांदीत गुंतवणूक करण्याचा कल वाढत आहे. पूवीर् बुलियन- तयार वस्तू यांचे प्रमाण १०:९० होते. पंरतु, यातील गुंतवणुकीतील चांगल्या परताव्यामुळे ते आता ३०:७० वर पोचले आहे.

' चलनवाढ आटोक्यात ठेवण्यासाठी बँक ऑफ चायनाने प्रमुख व्याजदरात नुकतीच वाढ केली. त्यामुळे चीनमध्ये चांदीची मागणी घटणार आहे. बँक ऑफ चायनाकडून चलनवाढ नियंत्रणाला दिले जाणारे प्राधान्य पाहता नजीकच्या काळात चांदीला मागणी येण्याची शक्यता नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या चांदी प्रति औंस ३६ ते ३८ डॉलरच्या दरम्यान आहे. मात्र, जागतिक परिस्थिती लक्षात घेता त्यात १५ ते २० टक्के करेक्शन येऊ शकते. मार्च २०१२ पर्यंत चांदी प्रति औंसाला ४० डॉलर जाण्याची शक्यता आहे,' असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. चांदी प्रति अैंासाला २८ ते ३० डॉलरच्या दरम्यान आल्यावर यात गुंतवणूक करण्यास हरकत नाही, असे कमॉडिटी बाजार तज्ज्ञ अमित मोडक यांनी सांगितले. चीनमधील परिस्थिती तात्पुरती राहील, असेही त्यांनी नमूद केले.

गुंतवणूक तज्ज्ञ सुहास राजदेरकर म्हणाले की, चांदीच्या भावातील तेजी पाहता आणि जागतिक परिस्थिती यामुळे चांदीत पंधरा टक्क्यांपर्यंत करेक्शन अपेक्षित आहे. त्यानंतर चांदी खरेदी करण्याची योग्य संधी आहे. वर्षभरात सुमारे मार्च २०१२ च्याअखेरपर्यंत चांदी प्रति किलो ७० हजार रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

पीएनजीचे भागीदार सौरभ गाडगीळ म्हणाले, की चांदीचा मागणी आणि पुरवठा यात तफावत आहे. सोलर, ऑटो, चीपमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होते. चांदीतील तेजी ही औद्योगिक मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीमुळे आहे. सध्या चांदी प्रति औंसाल ३४ डॉलरच्या आसपास आहे. त्यात थोडेसे करेक्शन येऊ शकते. एक वर्षाचा कालावधी लक्षात घेता चांदी ७०-80 हजार रुपयांच्या पुढे देखील जाईल.

.............

चांदी कशी खरेदी कराल?

चांदीतील तेजीमुळे फिजिकल स्वरूपात चांदी खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, चांदीची फिजिकल स्वरूपात खरेदी करण्याऐवजी डीमॅट खात्यात युनिटच्या रूपाने देखील करता येऊ शकते. चांदीची अशा प्रकारची खरेदी नॅशनल स्पॉट एक्स्चेेंजवर (एनएसई) करता येते. यासाठी नॅशनल स्पॉट एक्स्चेंजचे मेंबर असणाऱ्यांकडे खाते उघडावे. त्यानंतर मेंबरच्या मार्फत चांदीची खरेदी विक्री करता येते. एक्स्चेंजवर किमान शंभर ग्रॅम आणि त्या पटीत पुढे चांदी खरेदी करता येते. चांदीची फिजिकल डीलेव्हरी घेण्यापेक्षा डीमॅट स्वरूपात ती खात्यावर जमा करणे हिताचे ठरते. यामुळे तिची विक्री करणे सोपे होते तसेच हातळणी खर्च आणि खरेदी विक्रीतील तफावत कमी होऊ शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly