मंगलवार, 25 अक्तूबर 2011

बिझिनेसमनचे व्यक्तिमत्व



चांगला बिझिनेसमन होणे यामध्ये व्यवहाराचे जे आवश्यक गुण असतात, त्याचप्रमाणे चांगल्या मनाचा माणूस असणे, दुस-यांना/ सहकारी/ कर्मचारी यांना सतत प्रोत्साहन देणे इत्यादी गुण अत्यावश्यक असतात. त्यासाठी काही विशेष बाबी ‘व्यक्तिमत्व’ या सदरात देण्यात येणार आहे.

स्तुती / तारीफ करणे

१) एखाद्याची स्तुती तत्काळ करा.
२) त्यांनी कसे काम करावे हे तुम्ही त्यांना सांगणार आहात, हे आधीच सांगून ठेवा. चांगले काम झाल्यावर कुशलतेने आवश्यक सूचना द्या/ दुरुस्त्या सुचवा.
३) चांगले काम केले असेल तर तसे कबुल करून संबन्धित व्यक्तीला लगेच तसे सांगून स्तुती करा.
४) त्यांना सांगा की, त्यांच्या चांगल्या काम करण्याने तुम्हाला किती आनंद होतो. त्यामुळे संस्थेला व तेथे काम करणा-या अनेकांना किती मदत होते ते आवर्जून सांगा.
५) बोलताना थोडे क्षण थांबा, म्हणजे तुम्हाला मनस्वी आनंद झाला आहे, हे समोरच्याला तुमच्या चेह-यावर आणि बोलण्यातून जाणवू द्या.
६) असेच काम पुन्हा पुन्हा करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या.
७) त्यांच्याशी मनमोकळेपणे हात मिळवा किंवा खांद्याला-पाठीला स्पर्श करा. त्यामुळे तुम्ही मनापासून अभिनंदन करताय हे समजेल व अधिक काम करण्याची प्रेरणा मिळेल.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly