सोमवार, 8 अप्रैल 2013

SBI BANK चे फ्री इन्शुरन्स कव्हर बंद

नवी दिल्ली : होम आणि कार लोनवर मिळणारे मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स कव्हर बंद करण्याचा निर्णय स्टेट बँकेने घेतला आहे . कार आणि होम लोनवर मिळणारे ग्रुप पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरन्स कव्हर ( मृत्यू फक्त ) एक जुलै २०१३ नंतर मिळणार नाही , असे बँकेने स्पष्ट केले असून याचे कारण मात्र दिलेले नाही .

कर्जाच्या लायब्लिटीसाठी ( जोखीम कमी करणे ) कोणतेही इन्शुरन्स कव्हर नसणारे ग्राहक स्टेट बँकेच्या इन्शुरन्स कंपनीतर्फे दिल्या जाणाऱ्या पॉलिसीचा विचार करू शकतात , असे बँकेने नमूद केले . सध्या एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी स्टेट बँकेच्या सेव्हिंग बँक अकाउंटधारकांना वर्षाला शंभर रुपये प्रीमियम घेऊन चार लाख रुपयांचे अॅक्सिडेंट इन्शुरन्स प्रीमियम कव्हर देत आहे .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly