रविवार, 19 मई 2013

कथा

कथा
सरबते
होळी, धुळवड म्हणजे रंगांचे सण. आपल्या आयुष्यात रंगांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आहारसुद्धा विविध रंगांनी भरलेला असतो. या धुळवडीनिमित्त फळांची रंगीबेरंगी आणि मनमोहक सरबते थंडावाही देतील आणि जिभेला चवही आणतील. भाविक आराध्ये काश्‍मिरी शहाळे सरबत साहित्य ः सहा सफरचंद, अर्धा किलो बीविरहित द्राक्षे, तीन इंच आले, पाणी असलेले शहाळे, पिठीसाखर, भाजलेल्या जिऱ्याची पूड. कृती ः 1. सफरचंदाच्या बिया काढून त्याच्या पातळ फोडी करा. 2. द्राक्षेही स्वच्छ धुवून चिरून घ्यावीत. 3. मिक्‍सरमधून दोन्ही फळांचा ज्यूस काढून घ्यावा. 4. ज्यूस भांड्यात काढून त्यात पिठीसाखर घालावी. 5. सर्व्ह करताना ग्लासमध्ये तयार ज्यूस घालावा. वरून शहाळ्याच्या पाण्याचा थर द्यावा, बर्फ घालावा. 6. वरून जिरे पावडर भुरभुरून ज्यूस द्यावा. 000 केशरी थंडाई सरबत साहित्य ः प्रत्येकी अर्धा किलो गाजर व बीट, पुदिन्याची 10-15 पाने, 50 ग्रॅम खडीसाखर, चार इंच आले, चाट मसाला. कृती ः 1. गाजर, बीट व आले चिरून अर्धवट उकडून घ्या व थंड करा. 2. उकडलेले गाजर, बीट, आले, पुदिना, खडीसाखर घालून ज्यूस करून घ्या. 3. तयार ज्यूस फ्रिजमध्ये ठेवा. 4.
Read More »

कॉमिक्‍सची दुनिया
कॉमिक्‍स न वाचणारा मुलगा शोधून सापडणे कठीणच. गेल्या सहा दशकांत भारतीय कॉमिक्‍समध्ये आमूलाग्र बदल झाले, पात्रे बदलली, कथा बदलल्या एवढेच काय तर कॉमिक्‍स वाचणाऱ्या पिढ्या बदलल्या पण कॉमिक्‍सची क्रेझ टिकून राहिली. बदलत्या काळाची कास धरत ई-कॉमिक्‍सच्या रूपाने पौराणिक आणि लोककथा वाचकांपर्यंत पोहोचत आहेत. अरविंद रेणापूरकर ए खाद्या पाहुण्याला बस स्टॅंडवर किंवा रेल्वेस्थानकावर सोडायला गेलो, तर तेथील बुकस्टॉलवरील कॉमिक्‍स विकत घेतल्याशिवाय घरी जायचेच नाही, असा हेका धरणारी मुले आपल्या सभोवताली नेहमीच दिसतात. असे काय आहे या कॉमिक्‍समध्ये, की त्याची जादू मुलांना भुरळ पाडते. मुलेही बोजड किंवा अवघड साहित्य वाचण्यापेक्षा कॉमिक्‍सलाच प्राधान्य देतात. सहज आणि सोपी असणारी कॉमिक्‍सची भाषा मुलांचा शब्दसंग्रह वाढविण्यासही हातभार लावते. लोककथा, पौराणिक कथा, जातक कथा, दंतकथा, साहसी कथा आणि जादुई कथांनी नटलेले कॉमिक्‍सचे साहित्य मोठ्यांनाही बालपणात घेऊन जाते. चाचा चौधरी असो, की टिंकल, बॅटमन, चंदामामा या प्रकारच्या कॉमिक्‍सने भारताच्या कानाकोपऱ्यात आपले जाळे पसरवले आहे.
Read More »

ओलेता चंद्रस्पर्श
मृग बरसून गेलेला. मृगाच्या धसमुसळेपणानं धरतीमाय तृप्तो-तृप्त झालेली. ग्रीष्मदाहात पोळलेलं आसमंताचं, धरतीचं सर्वांग हिरव्या स्पर्शात फुलू फुलू आलेलं. वावराची काकरं गर्भार झाल्यानं कास्तकारी सचेतन झालेली. काकराच्या हिरव्या रेषा ठळक उमटायला लागलेल्या. वावराचा उदीम उतरण, निंदण सुरू झालेलं. आपल्यासोबत आमराई, धुऱ्यावरचा निंब तटस्थतेनं ग्रीष्मदाहाची शीतल झालेली लय हिरव्या तृप्ततेनं अनुभवत आहेत. मृगामध्ये मधूनच ताडताड पाय वाजवत येऊन धिंगाणा घालणाऱ्या पावसानं आपली लय बदलवलेली. त्यानं आता एका संथ लयीत अविरत बरसणं सुरू केलेलं. मृगाच्या पहिल्याच जल्लोषात दुथडी भरून वाहिलेली रायघोळ पहिल्या एक दोन पुरांतच तृप्त झालेली. ग्रीष्मातील तिचं क्षीण पात्र झऱ्यांनी उतू आलेलं. अविरत बरसणाऱ्या पावसानं तिला खळाळतं केलेलं. या ओलेत्या फुलनोत्सवात पावसाची अखंड रिपरिप सुरू झालेली. या रिपरिपीत सृष्टी आपल्या चिंतनात मग्न झालेली. नदीकाठच्या बाभूळबनाचा हडकुळेपणा पिवळ्या फुलांनी झाकून टाकलेला. बाभूळबनाच्या हिरवेपणात फुलारलेला ओलेता पिवळा गंध बाभूळबनाच्या डोलणाऱ्या लयीत विखरून जाणारा.
Read More »

मीठ
"हातानं नाही, भाकरीनं नाही, नमक से मारूंगा, मिठानं मारीन !' उत्तमचंद बनिया म्हणाला होता. तोच गावचा बनिया आणि तोच सावकार. काही पिढ्यांपासून त्याच्या घराण्याचंच या झुझार बेल्टवर शासन चालू होतं. तिथले स्थानिक उरांव आणि कोल आदिवासी कधीतरी आपल्याला उलट उत्तर देतील, आपली अवज्ञा करतील असं उत्तमचंदच्या मनातही कधी आलं नव्हतं. पण ती अपवादात्मक घटना घडली या सरकारच्या अमलात. याआधी सरकारं आली आणि गेली पण असं कधीही घडलं नव्हतं. पलामू अभयारण्यात इथले आदिवासी गायी-म्हशी-बकऱ्यांना चरायला सोडतात, इथल्या झाडांच्या वाळूत खाली पडलेल्या फांद्या जळणासाठी नेऊ शकतात. घरं शाकारण्यासाठी झाडांची पानंही घेऊ शकतात. त्याव्यतिरिक्त ते बांबूची कांडं, वनातले कंद आणि तेंदूपत्तासुद्धा चोरून नेतात. वन विभाग त्याकडं डोळेझाक करतो. आदिवासी ससे, साळिंदर, पक्षी यांची शिकार करतात. या सगळ्या प्राण्यांची आणि पक्ष्यांची खानेसुमारी अचूक नाही. त्यामुळं या संदर्भातही वन विभाग डोळेझाक करतो पण शिकार करून मांस खाणं हा प्रकार आदिवासी क्वचित करतात. कारण आता जंगलांतले प्राणीही सावध झाले आहेत, हुशार झाले आहेत. ते चटकन जाळ्यात सापडत नाहीत.
Read More »

गदाळा
कानात किडं पडल्यागत झालंय. चार गावांत म्हाजूरबी हाय आनि आपल्या तोंडानंबी सांगतोय बापय. त्या बयलान योक गडी, मागं लागून मारलाय. त्येला सोडतानं दोन हाडस माणसं लागत्यात. दोन दाव्याबिगार त्येला पाण्यावबी न्याला ईत न्हाई. आता दरात मिळालाय म्हणून घेटलाय! उद्या ह्यो दर केवढ्याला पडायचा? आस्सेल मारका बयल हाय म्हणं त्यातला योक. रेड्याची दावी गुतपिळणारा ह्यो मानूस, आता ह्यातल्या या आसल्या बयलाला दावं लावयचं, सोडायचं म्हंजे त्येला वाघाचंच काळीज पायजे का न्हाई? बायना गोठ्यात खराटा मारीत होती. बयलांना गहाण चालत नाही. सगळं कसं चकचकीत लागतंय. नाही तर ती वैरण खाईत नाहीत का धड खाली बसत नाहीत. तिला सांगून म्हादबा बैलं आणायला दिवस उगवायला गेला होता. रेड्याचं औत हाणणारा म्हादबा बरेच दिवस ठरवून होता यक ना यक दिवस बयलाचं आवूत हाणणारंच! तसं ठरवण्याचं कारण घडलं होतं. ते नांगरटीचे दिवस होते. सगळा शिवार औतांनी फुलून गेला होता. जो तो आपली घात बघत होता. ऊन-तान न बघता औत हाणत होता. म्हादबाचं औतही रेड्याचं चाललं होतं. तो नांगरत असणारा वापा मोठा होता. निम्मा वापा नांगरून झाला. उन्हानं झेंडू फुटाय लागला.
Read More »

सुटका
भा. ल. महाबळ शिक्षण - एम. ई. सिव्हिल इंजिनिअरिंग व्ही. जे. टी. आय, मुंबई येथून प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून निवृत्त लेखनविषयक उपक्रम - कथा, कादंबरी, लेखसंग्रह, एकांकिका, विनोदी चुटके असे वैविध्यपूर्ण लेखन प्रकाशित झाले आहे. त्यात सतरा कथासंग्रह, एक कादंबरी, सहा लेखसंग्रह आणि आठ चुटके संग्रह यांचा समावेश आहे. पुरस्कार - महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र सरकार, सार्वजनिक वाचनालय, नाशिक, पुणे मराठी ग्रंथालय, खानदेश स्मिता पाटील स्मृती ललितगद्य पुरस्कार &nbsp बकुळनं मागचा पुढचा विचार न करता सगळे दागिने भराभरा काढून रणदिवे व कराड यांच्यासमोर ठेवले व विनवून सांगितलं, ""काहीही करा व हे प्रकरण मिटवा. लाख रुपयांच्या ऐवजी दीड लाख गेले तरी चालतील पण माझ्या कौस्तुभला काहीही होता कामा नये.'' कराड व रणदिवे, दागिने व पंधरा हजार रुपये घेऊन थेट शैलेशजवळ पोहोचले. शै लेशनं घरात शिरल्या शिरल्या बकुळच्या हातात पाच हजार रुपये ठेवले. बकुळचा चेहरा उजळला. तिनं शैलेशकडं पाहत चिमुकल्या कौस्तुभचा पापा घेतला आणि डोके फडफडवले. तिला काय सुचवायचं आहे, हे शैलेशला समजलं. तो कुजबुजला, ""मला पापा पोचला.
Read More »

पिशवी
अरुणा गोखले शिक्षण - विज्ञान शाखेच्या पदवीधर, शिक्षणशास्त्राच्या द्विपदवीधर स्वेच्छानिवृत्त माध्यमिक शिक्षिका लेखनविषयक उपक्रम ः "अलगुज गाणे' हा प्रातिनिधिक कवितासंग्रह दिवाळी अंकात कथा प्रकाशित मुलांच्या मासिकासाठी नियमित लेखन वृत्तपत्रीय लेखन कवितावाचनाचे कार्यक्रम पुरस्कार ः दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कथास्पर्धा, साहित्य संघ, पुणे कथापूर्ती स्पर्धा, जी. ए. कुलकर्णी कथास्पर्धा, राज्य निबंध स्पर्धा, संस्कारभारती काव्यस्पर्धा &nbsp त्याच नादात तो प्रवेशद्वाराजवळ कधी आला, त्याचं त्यालाच कळलं नाही. आत पाऊल टाकताच, तो थक्कच झाला. प्रचंडपणा, रेखीवपणा, कोरीव काम, प्रमाणबद्धता, सगळं काही एकत्र! अतिविशाल! यक्ष, किन्नर, देवी-देवता, झाडं, वेली, फळं, फळांचे घोस, फुलं! सगळं काही अति प्रचंड प्रमाणात त्या शिळांमध्ये जणू सजीव झालं होतं. एवढी अप्रतिम, अवाढव्य पण प्रमाणबद्ध शिल्पं, दुनियेपासून लपलीच कशी? त्याचं भान सुटत चालंलं होतं. धक्‍क्‍यातून सावरत त्यानं समोर पाहिलं. अप्रतिम सौंदर्याची, सात्विकतेची, सोज्वळ, विलक्षण हसरी मुद्रा घेऊन देवीची मूर्ती समोर उभी होती.
Read More »

अश्‍शी माझी सासू गं
सुमेधा वझे शिक्षण - वाणिज्य शाखेच्या पदवीधर ट्रान्सफॉर्मर पार्टसच्या उत्पादन व विक्री व्यवसायात पतीला मदत सामाजिक कार्याची आवड "स्त्री सखी मंडळा'च्या संस्थापक सदस्य सावरकर प्रतिष्ठान संचलित शाळा तसेच वाचनालयात काम पुरस्कार - नगर वाचनालय सांगली आयोजित कथालेखन स्पर्धेत पुरस्कार अनेक ठिकाणी कथाकथनाचे कार्यक्रम --------- एक दिवस काकू ताटातून नुसता भातच घेऊन आल्या. मी विचारलं,""का हो काकू, तब्येत ठीक नाही का? आज नुसता भातच आणलाय?'' काकू म्हणाल्या,""काय सांगू बाई, मानसीनं आज दोघांच्या डब्यापुरत्याच पोळ्या केल्या होत्या. मी आपलं रोजच्याप्रमाणं वरणभात लावला. ताटं वाढताना पाहिलं तर पोळ्याचा डबा रिकामा. निदान जाताना सांगायचं तरी. केल्या असत्या चार पोळ्या मी. पण मी स्वयंपाकघरात लुडबूड केलेली तिला चालत नाही.'' मी उठले. आतून चार पोळ्या आणल्या. काकांना वाढून या म्हटलं. नंतर बऱ्याचदा माझ्याकडच्या भाज्या, चटण्या याबरोबरच त्यांचं जेवण व्हायला लागलं. बिच्चाऱ्या काकू! पं धरा-वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा वाडे पाडून अपार्टमेंट बांधण्याची लाट मोठ्या प्रमाणावर आली होती.

Read More »

जीवनाचे व्हावे सोने !
&nbsp कालिदास कानगो शिक्षण - डिप्लोमा इन सिव्हिल, अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी राज्य सार्वजनिक बांधकाम विभागात 41 वर्षे नोकरी नोकरी सोडून ओरिसा येथे आदिवासींसाठी साडेतीन वर्षे काम लेखनविषयक उपक्रम - वृत्तपत्रीय विश्‍वात संपादकीय विभागात काम, नियमित लेखन, कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. पुरस्कार - कथालेखन स्पर्धांमधील बक्षिसे &nbsp एका ऍल्युमिनिअमच्या सतरा ठिकाणी चेपलेल्या भांड्यात खूप पाणी अन्‌ त्यातच जेमतेम अर्धा वाटी भात वाढला होता. कोणत्यातरी झाडाचा हिरवा पाला भाजी म्हणून वाढला होता. मी भद्यालाही माझ्याबरोबर जेवायला म्हटलं तर तो म्हणाला "मी नंतर जेवेन.' वसंता म्हणाला, माझ्याही लक्षात आलं होतं, की त्याच्याकडे दोनच भांडी होती. एकात भात शिजवला अन्‌ दुसरं मला दिलं होतं. त्यामुळे मीही आग्रह न करता हसतखेळत त्याच्या मुलाबायकोशी बोलत, थट्टामस्करी करत ते जेवण संपवलं. हे पाहून त्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर मात्र आनंद ओसंडत होता. "थां बा भावजी, आहात तिथेच थांबा, घरात येऊ नका!' गंगा वहिनी वसंताशी कधीच या स्वरात अन्‌ या शब्दात बोलली नव्हती. तो जिथल्या तिथे थबकला.
Read More »

समुद्र
"या समुद्राला रोखणारं कुणी नाही', या जाणिवेनं अमोघ उदास झाला. "मनातही असंच प्रदूषण, असंच इंधन असतं का? मनातला समुद्र काळाभोर तेलकट होऊन जातो, तेव्हा काय करायचं? कुणाला टाहो फोडून बोलवायचं? दुरून ऐकणारं, मग ढग खाली उतरावा तसं आपल्यासाठी येणारं कोण आहे?...अमोघला तसं कधी कुणी "जाणवलं' नाही. खरा खरा, नेहमी सोबतीला असलेला समुद्रही असा नासून गेला होता. &nbsp स मुद्र काळा वाटत होता नव्हे काळा पडलाच होता. तरीही तो "फणा' काढत होता. पुढे पुढे सरकत होता. डांबरानं माखल्यागत खारपुटीचे जंगलही पूर्ण काळवंडले होते. ते मरून जाणार होते आणि तिथे नव्याने कुणी जन्मही घेणार नव्हते. खेकडे नि मासोळ्या मरून पडत होत्या. प्रदूषणाचा. वाहून आलेल्या इंधनाचा दाट थर, कोडगा तवंग सर्वत्र पसरला होता. दिशा ुजळूनही अंधार संपत नव्हता. "या समुद्राला रोखणारं कुणी नाही', या जाणिवेनं अमोघ उदास झाला. "मनातही असंच प्रदूषण, असंच इंधन असतं का? मनातला समुद्र काळाभोर तेलकट होऊन जातो, तेव्हा काय करायचं? कुणाला टाहो फोडून बोलवायचं? दुरून ऐकणारं, मग ढग खाली उतरावा तसं आपल्यासाठी येणारं कोण आहे?...अमोघला तसं कधी कुणी "जाणवलं' नाही.
Read More »



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly