रविवार, 19 मई 2013

नाते बॅंकींगशी

नाते बॅंकींगशी
बॅंकेशी मैत्री वाढवा
बॅंकिंग क्षेत्रात खूप क्रांती झाली. घरबसल्या आर्थिक व्यवहार करणे शक्‍य झाले पण अजूनही यापासून समाजाचा मोठा गट वंचित आहे. त्याला कारणीभूत म्हणजे बॅंकांच्या व्यवहारांविषयी लोकांमध्ये असलेले अज्ञान हे आहे. बॅंकेच्या व्यवहारात स्त्रियांनीही सहभाग वाढविला पाहिजे. बॅंकिंग व्यवहारांची व्याप्ती काळाबरोबर अतिशय विस्तृत होत आहे. तरीसुद्धा खेदाने नमूद करावे लागते, की आज घटकेला आपल्या देशात फक्त 55 ते 60 टक्के लोकांचेच बॅंक खाते आहे आणि कर्ज घेणाऱ्यांची संख्या जास्तीत जास्त 20 ते 25 टक्के आहे. याचाच अर्थ बरेच जण बॅंकेत जात नाहीत, बॅंकिंग त्यांना समजत नाही आणि जे कोणी जात असतील ते ठराविक बॅंकिंग प्रॉडक्‍टसचाच वापर करतात. त्याचे प्रमाण वाढले पाहिजे. भारतातील बॅंकिंग इंडस्ट्रीमध्ये मागील 10-12 वर्षांत आमूलाग्र बदल झाला. जागतिक स्तरावर भारतीय बॅंकांची प्रतिमा उजळली. सर्व बॅंकांच्या सर्व शाखांचे नेटवर्किंग पूर्णपणे कार्यरत होऊन CBS बॅंकिंग यशस्वीरीत्या कार्यरत आहे. ज्या गतीने बॅंका बदलल्यात. त्या प्रमाणात समाज बॅंकाभिमुख झाला नाही.
Read More »

व्यावसायिक कर्ज
लघु, लहान किंवा मध्यम स्वरूपाच्या व्यवसायांना कर्ज देण्यासाठी बॅंका प्रयत्नशील असतात. त्यासाठी बॅंकांमध्ये वेगळे विभागही सुरू करण्यात आले आहेत. शहरीच नाही, तर ग्रामीण भागातील व्यावसायिकांसाठीही काही योजनांद्वारे अर्थसाह्य केले जाते. लघू, लहान, मध्यम व्यवसायाचे मुख्यतः दोन भाग पडतात एक विनिर्माण उद्योग आणि दुसरा सेवा उद्योग. या दोन्हीचेही उपप्रकार आहेत तसेच वेगवेगळ्या सेक्‍टरनुसारही भाग पडतात. दोन्हींमध्ये भरपूर वैविध्य आहे. दोन्हींसाठी कर्ज प्रपोजल करताना अर्जही वेगवेगळे असतात. जेथे कशापासून तरी काहीतरी बनवले जाते, काही निर्मिती होते ते विनिर्माण क्षेत्र होय. सेवा उद्योगांमध्ये एखादी सेवा दुसऱ्याला दिली जाते. भिन्नभिन्न सेवा देऊन गरज भागवणारा व्यवसाय म्हणजे सेवा क्षेत्र होय. दोन्ही प्रकारच्या MSMEना बॅंकेकडून कर्ज मिळू शकते.
Read More »

लघु, लहान आणि मध्यम व्यवसाय
पूर्वीच्या व आताच्या लहान उद्योगांचा समावेश आता "एमएसएमई'मध्ये होतो. या उद्योगांसाठी काही विशेष योजनाही राबविल्या जातात. "एमएसएमईडीए' कायद्यातही या उद्योगांच्या मर्यादा विस्तृत करण्यात आल्या आहेत. &nbsp पूर्वी गावात बारा बलुतेदारी व्यवस्था होती. आता जमाना बदलला. "बारा'ची जागा बाराशे, बारा हजार व्यवसायांनी घेतली. गरजांमध्ये वैविध्य आले. नवीन गोष्टींची आवश्‍यकता वाढली. नावीन्याचा शोध घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढला. संगणकाच्या एका क्‍लिकवर माहितीचा खजिना उपलब्ध असल्याने त्याचा वापर करून आपल्याला व्यवसायातील त्रुटी भरून काढणे, नवीन माहिती मिळवून काही तंत्र पद्धती अमलात आणणे, वस्तूचा दर्जा उंचावणे, कमी किंमतीत जादा माल उत्पादन करणे अशा गोष्टी सर्वसामान्य उद्योजक करायला लागला. मार्गदर्शक तत्त्वांचा उपयोग वाढला आणि त्याबरोबर व्यवसायही. अशा या व्यवसायांसाठी काही उत्तम योजना आखल्या गेल्या. लघु, लहान व मध्यम व्यवसाय (Micro, small and medium enterprises, MSME) अर्थव्यवस्थेचा कणा आहेत.
Read More »

शैक्षणिक कर्ज
शैक्षणिक कर्ज लगेच मिळाले असे होत नाही, तर दुसरी, नाहीतर तिसरी बॅंक, असे बऱ्याचदा करावे लागते. कर्जाचा पाठपुरावा केला नाही तर पूर्णविराम संभवतो. सर्वच बॅंका शैक्षणिक कर्ज देतात. बॅंकेत भेटणाऱ्या व्यक्तीची मानसिकता, तसेच त्या बॅंकेची योजना, त्यांच्या समस्या, तुमचे गुण, तुमची गरज पटवण्याची क्षमता हे सारे जमायला हवे. सरकारच्या विविधांगी योजनांबरोबरच बॅंकांची शैक्षणिक कर्ज योजना सर्वत्र उपलब्ध आहे. ती जाणून घेऊन त्याचा फायदा घ्यावा. या योजनेसाठी महत्त्वाची अट म्हणजे कर्ज घेण्याची मानसिकता हवी. विद्यार्थ्याने शिक्षणानंतर कर्ज फेडायचे असते. सलग शिक्षण घेऊन कर्जफेडीची तयारी ठेवावी. बरेचदा पालक कर्जापासून मुलांना दूर ठेवतात. पालकांची पुरोगामी मानसिकता "कर्ज' या शब्दालाच घाबरते. कर्ज घेतल्याने घरच्या परिस्थितीवर बोजा येत नाही, शिवाय आई-वडिलांनाही त्रास न देता शिक्षण घेणे सुलभ होते. तेव्हा मुलांनी घरच्यांना पटवून द्यावे आणि शैक्षणिक कर्ज घ्यायला बॅंकेची पायरी चढावी. कर्ज घेऊन पूर्णतः व्यवस्थितपणे ते फेडायची सवय विद्यार्थिदशेत असतानाच लागली, की आपोआप उत्तम क्रेडिट इतिहास तयार होतो.
Read More »

वस्तुखरेदी कर्ज
आजकाल गरजेव्यतिरीक्त चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे बऱ्याचदा या वस्तू खरेदीसाठी कर्ज काढले जाते किंवा क्रेडीट कार्डद्वारे खरेदी केली जाते. या प्रकारची कर्ज थोड्या मुदतीसाठी घेतलेली, कमी किमतीची कर्ज असतात. बऱ्याच लोकांच्या मनात बॅंक, कर्ज, परतफेड, व्याज, हप्ता याबद्दल खूपच शंका असतात आणि त्यामुळे त्यापासून लांब राहणे पसंत केले जाते. बॅंक ही अलिबाबाची गुहा आहे. वारंवार तिथे गेले, मनातले बोलले, बॅंकेचे ऐकले, चर्चा केली, कागदपत्रे हलली, की त्यातून बरेच काही बाहेर येते आणि घरात येऊन बसते. गृहकर्ज डोक्‍यावर असते. त्याचा हप्ता सुरू झालेला. अशा वेळी इतर कशासाठी पैसा कसा आणायचा? दोघेही कमवत आहेत. विचार करतात, थोडे थोडे बाजूला टाकू आणि हळूहळू एक-एक घेऊ... जसे जमेल तसे. अशीच शक्कल बरेच जण लढवतात परंतु कर्ज फेडायची क्षमता असेल, गृहकर्जाव्यतिरिक्तही दरमहा एखादा हप्ता देणे जमणार असेल, तर मग यादीच्या पूर्ततेसाठी परत कर्ज काढायचे. यादीपैकी आधी कशाला प्राधान्य द्यायचे ते ठरवावे. त्या सर्व वस्तूंच्या किमती, आपला आवाका, असा हिशेब करून कर्ज प्रपोजल करावे.
Read More »

वैयक्तिक, वाहन कर्ज
पूर्वी कर्ज घेणे कमीपणाचे समजले जायचे पण आता परिस्थिती बदलली. बॅंकांच्या कर्ज योजना या ग्राहकांच्या गरजेनुसार असल्याने बरेच जण या योजनांकडे आकृष्ट होतात. वैयक्तिक आणि वाहन कर्जासाठी जवळजवळ सारख्याच कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. प्र त्येक व्यक्तीने बॅंकेत खाते काढायला हवे, तसेच प्रत्येकाने गरजांनुसार कर्जही घ्यावे. व्यक्तिगत आयुष्य समाधानाने, सर्व सुखसोयींनी युक्त असे घालवताना बॅंकेची मदत जरूर घ्यावी. पूर्वी कर्ज घेणे, कर्जबाजारी असणे हे कमीपणाचे समजले जाई. काळ बदलला तशी मानसिकता बदलली. आता जास्तीत जास्त कर्ज मला कसे मिळेल आणि ते कर्ज फेडायची माझी आर्थिक व मानसिक तयारी किती आहे, याचा हिशेब केला जातो. बॅंकांच्या कर्ज योजना समाजाच्या गरजेनुसार असल्याने लोकही त्याकडे आकृष्ट होतात. वैयक्तिक कर्ज ः Personal Loans - हे कर्ज दोन प्रकारे घेता येते. 1) मुदत कर्ज (Term Loan) : एकदम सर्व कर्जरक्कम घेऊन हप्त्याने कर्ज फेडणे 2) ओव्हरड्राफ्ट ः कर्जाची मर्यादा मंजूर करून ओव्हरड्राफ्ट खाते वापरणे.
Read More »

कर्ज आणि व्याजदर
आजच्या जमान्यात कर्जाची आवश्‍यकता खूपदा पडू शकते. घर खरेदी असेल, गाडी खरेदी असेल किंवा इतर कसलीही खरेदी असेल- कर्जाला प्राधान्य दिले जाते. अशा वेळी कर्जे आणि त्यांचे व्याजदर याबद्दल माहिती असणे आवश्‍यक ठरते. त्या अनुषंगाने केलेले मार्गदर्शन. वंदना धर्माधिकारी बॅं कांच्या माध्यमातून पैसा सतत फिरत असतो. त्याची गतिमानता बदलत असते. बॅंकिंगद्वारा अर्थव्यवस्थेत बदल होतात. सुधारणा होत राहते. कर्जाची गरज, उपलब्धता व कर्जपुरवठा (credit demand in economy) यावर चलनगती बदलत राहते, तसेच लोकांकडून होणारा बॅंकिंग सुविधांचा जास्तीत जास्त वापर तोही रोखीच्या व्यवहारांपेक्षा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटच्या मध्यस्थीतून होणारा जास्त वापर यावरही पैशाच्या फिरतीचा वेग वाढला जातो. बॅंकिंगद्वारा उत्पन्नात वाढ होते. व्यवसायवृद्धी होते, नोकऱ्यांची उपलब्धता होते. राहणीमान उंचावते आणि अर्थव्यवस्था सुधारते. बॅंकिंग सेक्‍टरशिवाय इतर कुठलाही सेक्‍टर काम करू शकत नाही.
Read More »

गुंतवणुकीत "टायमिंग' महत्त्वाचे
युरोपमधील खराब आर्थिक स्थिती, निराशाजनक अर्थसंकल्प, पेट्रोलचे भडकलेले भाव यामुळे शेअर बाजारातील अस्थिरता संपण्याची चिन्हे नाहीत मात्र दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली असेल, तर ती कायम ठेवावी. पाच विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजले, की बाजारातील स्थिती बदलेल. डॉ. वसंत पटवर्धन "न कटीच्या लग्नाला विघ्नेच फार' ही म्हण सध्या आपल्या शेअर बाजाराला लागू पडते आहे. आधी युरोपमधली खराब आर्थिक स्थिती, नंतर निराशाजनक अर्थसंकल्प, मग पेट्रोलचे जागतिक स्तरावर भडकणारे भाव, भरीला इजिप्त-लीबियातली अराजकता आणि आता जपान व दक्षिण आशियातली सुनामी भरीला आली आहे. एकेकमप्यनर्थाय किमुयत्र चतुष्ट्यम।। अशा या परिस्थितीत निर्देशांक 18100-200 च्या मध्ये व निफ्टी 5400-5460 च्या दरम्यान घोटाळत आहे. पण तो घसरलेला नाही, हीच समाधानाची गोष्ट आहे. कारण दूरदर्शनवरचे "शुभ बोल नाऱ्या' तऱ्हेचे सूत्रसंचालक 16000 निर्देशांकाची व 5200 निफ्टीची भाषा सतत बोलतच आहेत. सोमवारी तरी निर्देशांक 18439 होता.
Read More »

बॅंक, कर्ज आणि आपण
आपल्याकडे कर्ज घेण्याबद्दलची लोकांची मानसिकता अजूनही बदललेली नाही. खरे तर बॅंकांद्वारे कर्जासाठी विविध स्कीम्स राबवल्या जातात. ग्राहकांना पुरेशी माहिती देऊन कर्ज घेण्याची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. ग्राहकांना याचा पुष्कळ फायदा होईल. वंदना धर्माधिकारी आ पल्याला हव्या असलेल्या अनेक गोष्टी पैसे साठवून साठवून घेता येतात. विकत घ्यावयाच्या वस्तूची किंमत, बचतीचा वेग व आवाका यांचा ताळमेळ बसविताना बराच काळ जातो. अशा वेळी बॅंकेची कर्जसुविधा घेऊन पाहिजे ती वस्तू आणणे, आवश्‍यक ती तरतूद करणे आणि फायदा करून घेणे, सोय बघणे केव्हाही चांगले. त्यासाठी बॅंकेचे कर्जदार व्हायला हवे. कर्ज घेतल्यावर बॅंक व ग्राहक यांच्यातील नाते खऱ्या अर्थाने दृढ होते. जास्तीत जास्त बॅंक सुविधा, प्रॉडक्‍ट्‌स यांचा वापर करणे व्यक्तीच्या हिताचे असते. आपले राहणीमान सुधारते व पतवृद्धी होते. प्रगतीच्या दिशेने पाऊल बॅंकेने ग्राहकांना दिलेली कर्जे म्हणजे बॅंकेच्या ताळेबंदातील बॅंकेची मालमत्ता असते. बॅंकेकडून कर्ज घेऊन ग्राहक आपली मालमत्ताच वाढवत असतो. कर्ज घेणे ही ग्राहकाच्या दृष्टीने जबाबदारी वाढवणे असते.
Read More »

नाते बॅंकिंगशी - बॅंकिंग लोकपाल योजना
बॅंकेतर्फे देण्यात येणाऱ्या सुविधांची पूर्तता न झाल्यास बॅंकेविषयी तक्रार करण्याचा अधिकार ग्राहकाला असतो. मात्र ही तक्रार कुठे आणि कशा प्रकारे करायची, याची माहिती प्रथम ग्राहकाला असणे आवश्‍यक आहे. तक्रार करण्यासाठी "बॅंकिग लोकपाल योजना' कशी वापरता येते, याची माहिती बॅंक आणि ग्राहक यांचे नाते विश्‍वासाचे असले तरी काही कारणाने एखादी चूक घडणे शक्‍य असते. विशेषतः बॅंकेच्या व्यवहारासंदर्भात कुठलीही चूक झाल्यास ग्राहकाला बॅंकेविरुद्ध तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार असतो. मात्र, आपली तक्रार कशी, का, कुठे करायची, हे माहिती असणे आवश्‍यक आहे. आर्थिक व्यवहारांच्या संदर्भातील हा मामला असल्याने त्याचे महत्त्वही मोठे असते. ग्राहकाने आपली तक्रार प्रथम लिखित स्वरूपात शाखाधिकाऱ्याकडे करावी. कधी कधी त्याआधी नुसते शब्दाने सांगितले तरीही काही तक्रारी वा चुका तिथल्या तिथेच सोडवता येतात. अनेकदा बऱ्याच तक्रारींचे निवारण ती शाखा, प्रादेशिक कार्यालय यामार्फतही सोडविली जाते. मात्र कधी तरी त्याही पुढे जायची वेळ येते आणि त्यासाठी "बॅंकिंग लोकपाल योजना' (Banking Ombudsman Scheme) अस्तित्वात आहे.
Read More »



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly