भेगा त्रास tacha लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
भेगा त्रास tacha लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

सोमवार, 19 अप्रैल 2010

पायाला पडणाऱ्या भेगा

थंडीच्या दिवसांमधे ज्या काही शारीरिक समस्या असतात त्यात पायाला पडणाऱ्या भेगांची समस्या जास्त त्रासदायक असते. टाचच जर दुखायला लागली तर चालणंही मुष्कील होतं. त्यासाठी टाचांच्या सौंदर्याकडहे तितकंच लक्ष द्यायला हवं जितकं लक्ष आपण इतर सौंदर्याकडे देतो.

नैसगिर्करीत्याच राठ आणि कडक असलेल्या तळपायाच्या त्वचेचा वारंवार जमिनीशी संपर्क येत असतो. परिणामी तिची जास्तच झीज होत असते. अती ड्रायनेसमुळे तळपायाच्या पेशी लवकर मरतात. यामुळेच टाचेची सालं निघून तिथे भेगा पडत असतात. सौंदर्याच्या दृष्टीने बघायचं झालं तर पाय या भेगांमुळे फार विदूप दिसू लागतात. पायाला जेव्हा भेगा पडायला सुरुवात होते तेव्हा केसात कोंडाही वाढतो.

तळपायाचं सौंदर्य वाढवण्यासाठी

* पायांचा जर सतत धूळ आणि मातीशी संपर्क येत असेल, तर पाय तीन ते चार वेळा पाय स्वच्छ धुऊन पायात मोजे घालावेत.

* रात्री झोपवण्यापूवीर् तीळतेल पायांना चोळावं.

* गरम पाण्यात जाडं मीठ घालून पाय झोपण्यापूवीर् स्वच्छ घासून घ्यावेत.

* टाचांना भेगा पडून रक्त येत असेल तर लोणी आणि हळद एकत्र करून त्याने तळपायांना मसाज करावा.

* १५ दिवसातून एकदा तरी पेडिक्युअर करून घ्यावं.



( ब्युटी थेरपिस्ट तसंच हेअरआणि त्वचा सल्लागार)

पायांना भेगा पडल्या अथवा पायांची आग होत असल्यास झोपण्यापूर्वी थंड पाण्यात आपले पाय बुडवून ठेवावेत. त्यानंतर पायाना तूप लावावं. यामुळे पाय नरम राहतात आणि भेगा पडत नाहीत.
आहार
टाचांना भेगा:
टाचांना भेगा पडण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील कॅल्शिअम आणि स्निग्धतेची कमतरता होय. पायाची त्वचा जाड असते. त्यामुळे शरीरात तयार होणारे सिबम (तेल) पायाच्या बाहेरच्या भागांपर्यंत पोहचत नाही. शिवाय पौष्टिक घटक व योग्य स्निग्धता न मिळाल्यामुळे टाचा खडबडीत होतात. व त्यावर भेगा पडू लागतात. टाचांच्या भेगांमुळे आग होणे, दुखणे हा त्रास होतो. शिवाय कधीकधी त्यातून रक्तही येते.

भेगांचा त्रास असा कमी करा.
* दीड चमचा व्हॅसलीन व एक लहान चमचा बोरीक पावडर चांगल्या प्रकारे कालवा व भेगांवर हा जाड लेप लावा (आतपर्यंत त्याचा ओलावा जाणवेल) काही दिवसातच फुटलेल्या टाचा भरू लागतील.
* टाचा जास्तच फुटलेल्या असतील तर मिथिलेटेड स्पिरीटमध्ये कापसाचा बोळा भिजवून फुटलेल्या टाचेवर ठेवा. असे दिवसातून 3-4 वेळेला करा. त्यामुळे टाचा बर्‍या होऊ लागतात.
* कोमट पाण्यात थोडा शाम्पू व एक चमचा सोडा आणि काही थेंब डेटॉल टाका. त्या पाण्यात 10 मिनीटे पाय बुडवून ठेवा. त्वचा मऊ झाल्यावर मिथिलेटेड स्पिरीट लावून टाचांना प्युमिक स्टोनने किंवा मऊसर घासणीने घासून तिथली त्वचा साफ करा. त्यामुळे टाचेवरील माती निघून जाईल. नंतर टॉवेलने पुसून कोमट तेलाने मालीश करा.
* पाय स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी पॅडीक्यूअरचा अवश्य वापर करा. कारण पायाची नखे, टाच यांच्या स्वच्छतेचा हा एक चांगला उपाय आहे.
* या सर्व उपायांचा अवलंब केल्यास गुलाबी थंडीतही तुम्ही तुमच्या पायाच्या नैसर्गिक सौंदर्याचे रक्षण करू शकता.

पॅडिक्यूअर
* पॅडिक्यूअर एक सोपा प्रकार आहे. त्याला आपण घरी सुध्दा करू शकतो. पण पायाची अवस्था जास्तच खराब असल्यास पॅडीक्युअर चांगल्या ब्यूटी स्पेशालिस्टकडून करून घेणे चांगले.
* पॅडिक्यूअरसाठी साहित्य: छोटा टब, कोमट पाणी, शाम्पू, हायड्रोजन पेरॉक्साईड, नेलपॉलीश, रिमूव्हर, नेलकटर, ऑरेंज स्टीक, क्यूटीकल पुशर, नेल फायलर, प्यूमिक स्टोन, कोल्ड क्रिम, कापूस व टॉवेल.

पॅडिक्यूअरची पध्दत:
पहिल्यांदा नेलपेंट रिमूव्हरने पायावरची जुनी नेलपेंट काढा. नेलकटर किंवा छोट्या कात्रीने वाढलेली किंवा वाकडी झालेली नखे कापा. पायाची नखे नेहमी सरळच कापावीत. नेलफायलरने नखांना चांगला आकार द्यावा.

टबात कोमट पाणी घेऊन त्यात थोडा शाम्पू व एक चमचा हायड्रोजन पेरॉक्साइड टाकून मिसळा किंवा कोमट पाण्यात 3 चमचे मीठ, अर्धा लिंबाचा रस, व एक छोटा चमचा गुलाबपाणी टाकून मिक्स करा. त्यात पाय 5-10 मिनिटे भिजवून ठेवा. त्यामुळे मृत त्वचा ओलसर होते. 8-10 मिनिटानंतर प्यूमिक स्टोन किंवा घासणीने (नरम) घासून घाण साफ करा. पायापासून मळ निघाल्यावर स्वच्छ टॉवेलने पाय पुसा. त्यानंतर पायाच्या नखांवर क्रिम लावून चांगल्या‍ र‍ितीने मालीश करा. मालीश केल्यावर ऑरेंज स्टिकवर थोडा कापूस लावून नखाच्या आतला मळ साफ करा. क्युटीकल पुशरच्या सहाय्याने नखाच्या जवळचा भाग आतल्या बाजूला ढकला. त्यामुळे नखाचा आकार चांगला दिसू लागेल.

पायांवर कोल्ड क्रिमने 10-15 मिनिटे मालीश करा. त्यामुळे पायाची त्वचा मुलायम होईल. कापसाच्या बोळ्यानी नखे व त्वचेवरचे क्रिम पुसून टाका. पॅडिक्यूअर नंतर पायांना धुळ, घाणीपासून वाचवा. आणि कमीतकमी 4 दिवस मोजे वापरावेत. मोज्यांचा वापर तुम्ही पुर्ण हिवाळाभरही करू शकतात.


* पायांना भेगा पडलेल्या असल्यास बाहेर जाताना सॉक्स घाला. रोज रात्री झोपण्यापूवीर् पाय साबणाने स्वच्छ धुवा. पायांना व्हॅसलीन आणि ग्लिसरीन लावा. झोपताना पायात कॉटन सॉक्स घाला.

हिवाळ्यात आंघोळ केल्यानंतरही त्वचेचा कोरडेपणा जात नाही. या दिवसात वातावरणात त्वचा अधिक कोरडी पडते. म्हणूनच हिवाळ्यात आंघोळ करताना त्वचेची विशेष काळजी घ्यावी.

हिवाळ्यात आंघोळीसाठी दुधात सुगंधी उटणे भिजवून त्याचा वापर करावा. या दिवसांत शक्यतो साबणाचा वापर टाळावा, शक्य झाल्यास ग्लिसरीनयुक्त साबणाचा वापर केला तर चालेल. त्यामुळे त्वचा मऊ राहते. आंघोळीनंतर संपूर्ण अंगाला ग्लिसरीन किंवा मॉईश्चरायझर लावावे, पण हे लावल्यानंतर टाल्कम पावडर लावण्याचे टाळावे.

हिवाळ्यात सर्वांत जास्त काळजी पायांची घ्यावी लागते. कारण या दिवसांत पायांना भेगा पडतात. भेगा कमी करण्यासाठी आंघोळ झाल्यानंतर लगेचच तळपाय प्युमिक स्टोन किंवा वझरीने रगडून घासावे. पाय वाळण्यापूर्वीच त्यावर कोल्ड क्रीम किंवा मॉईश्चरायझर लावावे. पाय जास्त कोरडे पडू नये म्हणून हिवाळ्यात मोज्यांचा वापर करावा.

fly