शुक्रवार, 28 अप्रैल 2023

🎯 अपेंडीक्स म्हणजे काय ? 🎯

 ━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━

      🎯  अपेंडीक्स म्हणजे काय ?  🎯

━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━


अपेंडीक्स हा शब्द टॉन्सिल प्रमाणेच आपल्या परिचयाचा झालेला असतो आणि ऑपरेशन करून काढून संदर्भात तो येतो, त्यामुळे वरील प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. अपेंडीक्स हा पचनसंस्थेचा एक भाग आहे. मोठ्या आतड्याचा बारीक शेपटी सारखा वा करंगळी प्रमाणे दिसणारा हा भाग मोठ्या आतड्याशी लहान आतडे जिथे जुळते त्याजवळ असतो. 

तसे पाहता मानवामध्ये हा अवयव निरुपयोगीच. काही तज्ज्ञांच्या मते रोगप्रतिबंधक शक्ती निर्माण करण्यास याचा उपयोग होतो. जिवाणूंना अटकाव करण्याच्या याच्या कार्यामुळे यास पोटातील टॉन्सिल असेही म्हणतात. गायी-म्हशी सारख्या गवत खाणाऱ्या प्राण्यांमध्ये अपेंडीक्स बरेच मोठे असते व सेल्यूलोज पचन त्यात होते.


अपेंडीक्सच्या आतील पोकळीत अन्नकण अडकल्याने, पोटातील जंतांमुळे (बंद झाल्यास) त्यात जंतुसंसर्ग होऊन अपेंडीक्सला सूज येते. त्यास अपेंडीसायटीस असे म्हणतात. यात पोटात बेंबी खालील उजव्या भागात दुखते. ही वेदना तीव्र असते. सामान्यपणे उलटी सुद्धा होऊ शकते. पोटाचा तो भाग ताठर व दुखरा होतो. त्या व्यक्तीस बराच तापही असतो. 


त्यामुळे या व्याधीचे निदान झाल्यावर ते काढून टाकणे श्रेयस्कर ठरते. कारण असा त्रास रुग्णास वारंवार होऊ शकतो व त्याचा परिणाम म्हणून गंभीर गुंतागुंती होऊ शकतात. परंतु पोट दुखत असल्यास अपेंडीसायटीस असेल, असा गैरसमज करून घेणे योग्य नाही. पोटात दुखण्याची बरीच कारणे आहेत. पोटातील जंत, आमांश अशी कारणे आपल्याकडे बहुतांशी आढळतात. आजकाल अपेंडिक्स काढण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. विनोदाने अपेंडिक्स शल्यचिकित्सक यांची रोजीरोटी म्हटले जाते. 


वैद्यकीय क्षेत्रातही धंदेवाईकपणा वाढत चालल्याने रुग्णाने असे ऑपरेशन करून घेण्यापूर्वी २-३ तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास अनावश्यक शस्त्रक्रिया टळू शकेल.

❀ जेवताना पाणी पिण्याची सवय ❀

 ━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━

     ❀ जेवताना पाणी पिण्याची सवय ❀

━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━

 


पाणी प्यायल्यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. पण चुकीच्या वेळेस आणि चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्यास अनेक समस्याही उद्भवू शकतात. जर तुम्हाला जेवताना किंवा काही खाताना मध्येच पाणी प्यायची सवय असेल तर त्यामुळे होणारे नुकसान जाणून घेऊया.


पाणी हे आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेटेड राहतेच, शिवाय अनेक आजारांपासून आपण दूर राहतो. पण हेच पाणी काही वेळेस आपल्यासाठी हानिकारकही ठरू शकते. चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे हे आरोग्याला हानी पोहोचवू शकते.खरंतर बऱ्याच लोकांना काही खाताना किंवा जेवताना मध्येच किंवा जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. मात्र याच सवयीमुळे अनेक त्रास होऊ शकतो. तुम्हालाही अशी सवय असेल तर यामुळे काय नुकसान होते, हे जाणून घेऊया.


पचन क्रियेवर पडतो प्रभाव

जेवताना किंवा नंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनावर परिणाम होतो. खरे तर आपण जेव्हा अन्न खातो, तेव्हाच पचनक्रिया सुरू होते. अशा परिस्थितीत जेवणाच्या मध्येच पाणी प्यायल्याने या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे एकतर अन्न पचायला बराच वेळ लागतो किंवा कधी कधी अन्न नीट पचत नाही.

इन्सुलिनची पातळी वाढते

शरीरातील इन्सुलिन नावाचे हार्मोन स्वादुपिंडाद्वारे सोडले जाते. शरीरातील साखरेच्या प्रवाहात इन्सुलिनची महत्त्वाची भूमिका असते. पण जेवताना किंवा नंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. म्हणूनच जेवताना मध्येच पाण्याचे सेवन टाळणे चांगले ठरते.

ॲसिड रिफ्लेक्सचा त्रास होऊ शकतो

अन्नासोबतच पाणी प्यायल्याने ॲसिड रिफ्लेक्सची समस्या देखील उद्भवू शकते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, अन्न खाताना पाणी प्यायल्याने पोटात ॲसिडचे प्रमाण वाढते, त्यामुळे अनेक वेळा आंबट ढेकर येऊ लागतात. या समस्येलाच ॲसिड रिफ्लेक्स म्हणतात. एवढेच नाही तर जेवताना पाणी प्यायल्याने छातीत जळजळ होऊ शकते.

वजन वाढू शकते

जेवता पाणी प्यायल्याने लठ्ठपणाचा धोका संभवतो. खरंतर जेवताना पाणी प्यायल्याने पचनावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत अन्नाचे पचन नीट होत नाही, आणि जे अन्न पचत नाही त्यापासून तयार होणारे ग्लुकोज लठ्ठपणात बदलते. अशा परिस्थितीत जेवताना किंवा त्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीरातील साखर तर वाढतेच पण वजनातही वाढ होऊ शकते.

पोषक तत्वांची कमतरता

जर तुम्हाला जेवताना पाणी पिण्याची सवय असेल तर शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. अन्नातील पोषक तत्व शोषून घेणे हे आपल्या पचनसंस्थेचे काम असते. पण जेवताना मध्येच पाणी प्यायल्यास या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो, त्यामुळे आपल्या शरीरात पोषक तत्वांचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही.

fly