मंगलवार, 18 अप्रैल 2023

पेनकिलर आणि हार्टऍटॅक

 



आजकालच्या तरुणांमध्ये सहनशक्ती अजिबात राहिलेली नाही. कारण जरा काही दुखायला लागलं की ही मंडळी लगेच पेनकिलरला पसंती देतात. त्यांना डॉक्‍टरांकडे जायचाही कंटाळा येतो. दुखण्यावर कुठलंही मलम लावण्यापेक्षा ते पेनकिलरलाच अधिक पसंती देतात. या पेनकिलरमुळे आपल्याला तत्काळ बरं वाटतं; यामुळेच या गोळ्यांची सवय होते.


सवय याचा अर्थ असा की या गोळ्या आपण वारंवार घेतो. अशा रीतीने या पेनकिलरची हळूहळू सवय होते आणि आपण प्रत्येक वेळी या गोळ्या घेतो. मात्र, या गोळ्या हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक असतात. केवळ हृदयाचं आरोग्यच नव्हे तर ब्रेन स्ट्रोकचादेखील धोका यामुळे संभवतो. कारण या गोळ्यांमध्ये आयब्रूफेन आणि डाइक्‍लोफेनैकसारखी केमिकल्स असतात. ही केमिकल्स हृदयाची गती अनियमित करतात. यामुळे ऑट्रियल फिब्रिलेशनचा धोका वाढतो.


या स्थितीत हृदयाचे ठोके इतके वाढतात की हार्टऍटॅकचा धोका अधिक असतो. या पेनकिलर शरीरात साइक्‍लोऑक्‍सिजन नामक इंझाइमला बाधित करतं. त्यामुळे रक्तदाब वाढतो जेणेकरून ठोक्‍यांची अनियमितता वाढते. म्हणूनच सातत्याने पेनकिलर घेतल्यामुळे हार्टऍटक येण्याचा धोका तीन टक्‍क्‍यांनी वाढतो. म्हणून शक्‍य असेल तितकं या गोळ्यांपासून लांबच राहा. तुमच्या दुखण्यापासून तुम्हाला लांब राहायचं असेल तर तुम्ही योगधारणा, ध्यान, योग्य आहार आणि नियमित दिनचर्येचा अवलंब केला पाहिजे.


आयुष्यभर माफक प्रमाणात व्यायाम करणे हितकारक असते. प्रमाणापेक्षा अधिक व्यायाम केला तर हृदयाच्या ठोक्‍यांच्या लयीमध्ये अडथळा निर्माण होऊन अट्रिअल फायब्रिलेश (विकंपन) होऊ शकते. त्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो आणि अशक्‍तपणा येऊ शकतो किंवा धाप लागू शकते. या कारणांमुळे व्यायाम मर्यादित करायला हवा आणि अति व्यायाम केल्यास हृदयाला लाभ होण्याऐवजी हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर त्याचा विपरित परिणाम होऊ शकेल, याची जाणीव होणे आवश्‍यक आहे.


इष्टतम व्यायाम पातळी.

दररोज साधारण 45-50 मिनिटे व्यायाम करावा. यात 30% अंगमेहेनतीचा व्यायाम असावा. या व्यायामामुळे तुम्हाला घाम येणे अपेक्षित आहे. 2015 साली प्रकाशित झालेल्या काही अहवालांनुसार ज्या व्यक्ती दर आठवड्याला 450 मिनिटे व्यायाम करतात त्यांना दीर्घकालीन आयुष्याचा संदर्भ लक्षात घेता व्यायाम न करणाऱ्यांच्या तुलनेत 39% लाभ होतो; परंतु ज्या व्यक्ती दिवसाला तीन तास व्यायाम करतात त्यांना हा लाभ केवळ 30% होतो. म्हणजेच आठवड्याला 150 मिनिटे व्यायाम करणाऱ्यांइतकाच तो असतो. ज्यांना हृदयविकार अनुवंशिक असलेल्या व्यक्ती लांब अंतर धावल्या तर त्यांना अहिदमियास, डायास्टॉलिक डिसफंक्‍शन इत्यादी हृदयविकार जडू शकतात. हे एन्ड्युरन्स ऍथलिट्‌समध्ये आढळणारे विकार आहेत.


अति व्यायामाचे परिणाम.

बहुतेक पेशींमध्ये मायटोकॉन्ड्रिअन आढळते आणि पेशींच्या चयापचयास मदत करणारे रसायन त्यात असते. व्यायामादरम्यान मायटोकॉन्ड्रिया अधिक कष्ट करतात आणि त्यामुळे आरोग्य सुदृढ राहते आणि दीर्घायुष्य लाभते. औषधांप्रमाणेच व्यायामाचा सुद्धा सुयोग्य डोस घेणे आवश्‍यक असते. अति व्यायामामुळे विकार जडण्याची आणि लवकर मृत्यू येण्याची शक्‍यताही अधिक असते. जेव्हा तुम्ही अतिपरिश्रम करता तेव्हा हृदय वहन यंत्रणेवर ताण पडतो.


त्यामुळे असाधारण लय निर्माण होते आणि दीर्घकाळाचा विचार करता हृदय बंद पडू शकते. प्रत्येक व्यायामाच्या शेड्युलनंतर स्नायूंचे मायक्रोस्कोपिक नुकसान होत असते आणि तुम्ही किती तीव्र स्वरूपाचा व्यायाम केला आहे, त्यावर त्याला ते नुकसान भरून काढण्यास सुमारे 24 ते 48 तासांचा अवधी लागतो. अलीकडेच ऑस्ट्रेलियातील क्रीडा नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार अति व्यायामामुळे गट लायनिंक कमकुवत होते आणि घातक विषारी घटक आणि जीवाणूंना रक्‍तप्रवाहात येणे शक्‍य होते. तुम्ही बऱ्याच काळापासून अति व्यायाम करत असाल तर तुमच्या शरीरातील संप्रेरकांवरही परिणाम होतो.


कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. त्यामुळे तुमच्या शरीरावर प्रतिकूल परिणाम होतात. त्याचप्रमाणे दोन व्यायामाच्या शेड्युलदरम्यान किमान आठ तासांची झोप घेणे आवश्‍यक आहे. त्यामुळे तुमचे शरीर आपोआप झीज भरून काढते. त्याचप्रमाणे आहार व्यवस्थित असावा. आहारामध्ये मासे, त्वचारहीत चिकन, फळे, पालेभाज्या, शेंगा, तृणधान्ये इत्यादींचा समावेश असावा.


पोषक गरजा पूर्ण केल्या गेल्या नाहीत तर शरीराची झीज व्यवस्थित भरून काढली जात नाही. प्रतिकारक यंत्रणा कमकुवत होते आणि त्यामुळे तुम्ही वारंवार आजारी पडता. तुमच्या शरीरावर ताण पडत असेल तर तुम्ही चिडचिडे होता, नैराश्‍य येते, राग येतो. त्याचा तुमच्या मनावरही परिणाम होतो. कॉलेस्टेरॉलची पातळी खूप जास्त काळ वाढलेली असेल तर शरीर चरबी साठवून ठेवयाला लागते. त्यामुळे चरबी कमी करण्याच्या उद्दिष्टाने व्यायाम सुरू केला असला तर अतिव्यायामाने उलटा परिणाम होतो.

✨🌺✨ धारासांज✨🌺✨

 ✨🌺✨ धारासांज✨🌺✨ 

प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच पर्याय ठेवले आहेत, एक तर देऊन जा, नाही तर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करुन ठेवलेली नाही.

नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं, मनापासून जे सांभाळलं जातं ते खरं नातं असतं. जवळीक दाखवणारा हा जवळचांच असतो असं नाही, हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो...

चांगल्या व वाईट अनुभवाची शाळा म्हणजे आयुष्य, जिथं प्रत्येक अनुभव एक नवीन शिकवण देऊन जातो..!


कधी हसावं कधी रडावं, कधी बोलावं कधी शांत रहावं, कधी थांबावं कधी चालावं, कधी सोपं कधी कठीण, कधी आशा कधी निराशा, कधी स्वप्न कधी आठवणी, कधी नवीन कधी जूने, कधी विश्वास कधी अविश्वास, कधी विचार कधी कुविचार, माणूस एक चालती फिरती मशीन, कधी प्रेम कधी शिक्षा आयुष्यच एक परीक्षा...

माणसाचा आदर्श मित्र म्हणजे प्रामाणिक कर्तव्य आहे जे कधीच धोका देत नाही आणि धैर्य हे असे कडवट रोपटे आहे ज्याला नेहमी गोड फळे येतात... समोरच्यामध्ये वाईटपणा दाखवणे सामान्य माणसाची ओळख असते आणि वाईटपणातचं चांगले शोधणे हे मात्र खास माणसाची ओळख असते...!!

 प्रत्येक फुलाचं भाग्य नसतं देवाच्या चरणी अर्पण व्हायचं. म्हणून इतर फुलं उमलायचं सोडत नाहीत. उपेक्षित राहिलं म्हणून रानावनातली डोंगरदऱ्यातली फुलं जगण्याची जिद्द कधीही सोडत नाही..! माणसानं ही असंच जगावं.

जे राहून गेलं, ते राहणारच होतं. कारण, काय करायचं? हे ठरवणारा मी नव्हतो. आजही जे करावंसं वाटत आहे, ते तरी हातून कुठं होतंय..? म्हणूनच, 'जो तुझे मंजूर, वो हमे मंजूर' म्हणत वैचारिक पातळीवरच शांत आहे. मानसिक पातळीवर 'नवी लाकडं' रचली जात आहेत.

 

 

   ओळख होण्याआधी, सगळेच अनोळखी असतात. मनं एकदा जुळली की, सहज आपले होतात. यालाच आपले जिवलग म्हणतात...! कमावलेली नाती आणि जिंकलेले मन ज्याला सांभाळता येते, तो आयुष्यात कधीच हारत नाही.!!

 

"कात्रीची" धार गेली तर कापड एक वेळ कापलं जात नाही. पण "खात्रीची" धार गेली की "नातं " मात्र कापलं जातं..!

सुख क्षणभर गोष्टीमध्ये लपलेलं असतं फक्त ते मनभर जगता आलं पाहिजे...!

अंधारात सोबत असणारा काजवा उजेडात सोबत असणाऱ्या सूर्यापेक्षा जास्त मोलाचा असतो...! 

fly