शनिवार, 8 अगस्त 2009

शाळेचा पहिला दिवस आज पहिलाच दिवस .

शाळेचा पहिला दिवस आज पहिलाच दिवस .
नवीन वह्या पुस्तके, नवे दप्तर घेऊन विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवसासाठी सज्ज झाले असून, शाळांनीही विद्यार्थ्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि फूल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत.
उन्हाळी सुट्टीनंतर सोमवारपासून शाळा उघडणार आहेत. त्यामुळे गुरुवारी शहरातील स्टेशनरी दुकानांवर शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची गर्दी झाली होती. विद्यार्थ्यांना पसंत पडणाऱ्या स्कूलबॅग, वॉटरबॅग, शूज, वह्या खरेदी करण्यास पालक प्राधान्य देत होते. उन्हाळी सुटी संपली असून पुन्हा एकदा बालगोपाळांचा किलबिलाट शाळांच्या परिसरामध्ये ऐकू येईल. शाळेचा पहिला दिवस जवळ आल्याने शालेय साहित्याची जमवाजमव सुरू झाली आहे. बाजारपेठेमध्ये साहित्य खरेदीसाठी बच्चे मंडळीसह पालकांची गर्दी झाली होती. शिक्षण विभागाने शाळांना सूचना दिल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी सकाळी ८ ते ९ या वेळेत शाळेचा परिसर स्वच्छ करावा. सकाळी ७ ते ७.३० या वेळेत गावात प्रभात फेरी काढावी. त्यानंतर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि फुल देऊन त्यांचे स्वागत करावे. सकाळी १० वाजता परिपाठ घेण्यात यावा. त्यानंतर अध्यापनास सुरुवात करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
शाळेचा पहिला दिवस. शाळा व वर्गाच्या प्रवेशद्वारावर फुलांसह आंब्यांच्या पानांचे बांधलेले तोरण.. वर्गाच्या बाहेरच मिकी-माऊस, डोरो मन, छोटा भीमसह आलेली मंडळी.. कुठे विद्यार्थ्यांचे औंक्षण तर कुठे
गणवेश खरेदी करण्यासाठी कापडबाजारामध्ये गर्दी झाली होती. ग्रामीण भागातून आलेल्या पालकांची संख्याही लक्षणीय होती. कापड घेऊन गणवेश शिऊन घेण्यापेक्षा रेडीमेड गणवेश खरेदी करण्यासाठी पालकांची पसंती दिली. गणवेशासोबतच नवे बूट, नवे मोजे खरेदी केले जात आहे.

fly