गुरुवार, 30 दिसंबर 2021

कर्जबाजारी औरंगजेब आणि त्याला भिकेला लावणारे मराठे.

कर्जबाजारी औरंगजेब आणि त्याला भिकेला लावणारे मराठे.

(खूप हसायचे असेल, आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा सोहळा पाहायचा असेल, आणि अभिमानाने छाती फुगवायची असेल तर हा लेख वाचाच.)

मुघल सल्तनतीला अक्षरशः भिकारी करून सोडले ते मराठ्यांनी. 

औरंगजेबाच्या बाप-जाद्यांनी कमवलेली सगळी धन दौलत औरंगजेबाने दक्खनला येऊन खर्च केली. 

अत्यंत हट्टी स्वभाव माणसाला दिवाळखोर बनवतो ह्याच हे उत्तम उदाहरण आहे.

फ्रेंच इतिहासकार मनुची औरंगजेबाच्या दरबारात काही काळ नोकरीला होता. 

हा दक्षिणेत आल्यावर शिवाजी महाराजांना भेटलाही होता.  

हा मनुची म्हणतो कि “दक्खनला आल्यापासून औरंगजेबाच्या मोहिमेत दर साल एक लाख माणसे व तीन लाख जनावरे मरत असत.” 

ह्या मनुचीच्या बोलण्यात अतिशयोक्ती आहे असे क्षणभर जरी समजले तरीही लढाईत मेलेले, मराठ्यांनी छापा घालून मारलेले, पुरात वाहून गेलेले, चिखलाने, उपासमारीने, रोगराईने, अपघाताने, हाल अपेष्टांनी, आणि उपासतापासाने मेलेले मोगल सैनिक आणि बाजारबुणगे यांची मरायची संख्या स्मितीत करणारे अशीच आहे.

आता माणसांची हि स्थिती तर जनावरांच्या बाबतीत तर बोलायलाच नको. धोधो कोसळणाऱ्या पावसाने आणि त्यामुळे अचानक आलेल्या पुरात अशी असंख्य जनावरे वाहून जात असत, त्यात बुडून मरत असत.

माणूस आणि जनावरे यांच्या प्रमाणेच मुघलांचे असंख्य सामान व सरंजाम पावसाने भिजून निकामी होत असे. त्यात भर म्हणजे मराठे अचानक धाडी घालून हा सरंजाम, खजिना, हत्ती, घोडे, उंट जे जे  हाताला लागेल ते ते लुटून नेत असत.

मराठ्यांच्या हाताला काही लागू नये म्हणून मुघल ह्यातील बराचश्या गोष्टी जाळूनही टाकत असत. मराठे मुघलांच्या फौजेतून तोफा, दारुगोळा, बंदुका, दमदम्याला लागणारी लाकडे, ( दमदमा म्हणजे लाकडी मनोरा ) ही लाकडे तोडणारे बेलदार, गवंडी, ह्यांनाही लुटून आपल्याबरोबर नेत असत.

मराठ्यांच्या आणि निसर्गाच्या अव-कृपेने मुघलांच्या फौजेत इतका दुष्काळ पडे कि एक शिपाई, एक तंबू, एक उंट, एक बैल, एक घोडा, एक हत्ती, एक तलवार, आणि एक बंदूक बक्कळ पैसे मोजल्याशिवाय विकत मिळतच नसे. मराठ्यांच्या सततच्या छाप्यांमुळे औरंगजेबाच्या छावणीत नेहमीच दुष्काळ असे. रुपयाला दोन शेर तीन शेर असे धान्य मिळत असे. 

(रुपयाची किंमत तेंव्हा फारच मोठी होती. आजच्या सारखं नाही. )

औरंगजेबाच्या सैन्याला महिनो-महिने पगार मिळत नसे. त्यात पुन्हा भर म्हणजे मुघलांच्या एखाद्या सरदाराला मराठ्यांच्या किल्लेदाराकडून जर किल्ला हवाच असेल तर त्याला पन्नास हजारांपासून दोन लाखांपर्यंत रक्कम औरंगजेबापासून लपवून गुपचूप द्यावी लागत असे.  

मग हे मुघल सरदार ‘आम्ही किल्ला जिंकला’ असे खोटेच औरंगजेबाला सांगून त्यापासून शाबासकी आणि आणि इनाम मिळवत असत.

खाफीखान म्हणतो कि , "शहाजहान बादशहाने साठविलेला सगळा खजिना औरंगजेब बादशहाने रिकामा केला." 

खाफीखानाच्या ह्या शब्दांत फार मोठा अर्थ आहे. मोगल सल्तनतीचे सुवर्ण युग जे होते ते ह्या शहाजहाँच्याच काळात होते.  

शहाजहानचा खजिना किती होता? 

शहाजहानच्या राज्यातील २२ सुभ्यांचा वसूल दर साल ३६ कोटी रुपये इतका होता.

८६ लाख रुपयांची रत्ने रत्न शाळेतून निवडून काढून आणि एक कोटी रुपये खर्च करून त्याने मयूरसिंहासन बनविले होते. 

३० करोड २ लाख रुपये खर्च करून ताजमहाल बनविला होता. 

हे ३० करोड २ लाख म्हणजे आजच्या काळातले ६८०० कोटी रुपये. 

असे अजूनही इतर हौस मौजेचे खर्च करूनही शहाजहानने मरताना २४ कोटी रुपये शिल्लक ठेवले होते.

शिवाय सोन्या चांदीची नाणी, दागदागिने आणि हिने-मानके तर निराळीच. ह्यांचा तर हिशोबच नाही इतकी ती अगणित संख्येने होती. 

शहाजहानच्या मंत्र जपायच्या दोन माळांची किंमतच २० लाख रुपये इतकी होती. 

बापाच्या मृत्यू नंतर हा सगळा खजिना औरंगजेबाला मिळाला.

शहाजहान बादशहाच्या मृत्यूनंतर औरंगजेब जेंव्हा बादशहा झाला तेंव्हा त्याने १४ गाड्यांवर हा सगळा प्रचंड खजिना लादून आग्र्याहून दिल्लीला आणला होता.

हा सर्व पिढीजात चालत आलेला खजिना औरंगजेबाने मराठ्यांच्या स्वारीत ओतला. 

फ्रेंच इतिहासकार मनुची तर पुढे असेही म्हणतो कि, " येव्हढ्याने भागले नाही म्हणून औरंगजेबाने अकबर, जहांगीर, व नूरजहाँ यांनी साठविलेले प्रचंड खजिने बाहेर काढले व तेही वापरले. अखेर तर आपल्या घरातील चांदीची भांडीही औरंगजेबाने वितळविली."

ह्यावरून असे दिसते कि मराठ्यांवरील मोहिमांवर औरंगजेब किती आतोनात खर्च करत असे. ह्यामुळेच औरंगजेबाला पैसे हे पुरतच नसत.

पन्हाळ्याच्या स्वारीत औरंगजेबाच्या फौजेतील 'नॉरीसला' म्हणून जो युरोपियन गोलंदाज ( तोफ चालविणारा) होता त्याला तर १४ महिन्यांपासूनचा पगार मिळालेला नव्हता.

विशाळगडाच्या स्वारीत मुघल सैनिकांचा १५-१६ महिन्यांचा पगार थकला होता. 

हा सैनिकांचा पगार चुकविण्यासाठी औरंगजेबाने सक्तीने फौजेतील सावकारांकडून पाच लाखांचे कर्ज काढण्याचा जेंव्हा विचार केला तेंव्हा सर्व सावकारांनी मिळून औरंगजेबाला विरोध केला आणि त्याची छावणी सोडून जाण्याची धमकीच दिली.

त्यातल्या त्यात बंगालचा सुभेदार मुर्शिद कुलीखान दरसाल १४ लाख रुपये वसूल औरंगजेबाला नियमितपणे पाठवीत असे. त्यामुळे औरंगजेबाला कसेबसे खायला तरी मिळत असे. 

काही अभ्यासकांच्या मते औरंगजेबाने २० वर्षांत मराठ्यांच्या मोहीमे विरोधात कमीत कमी ४० कोटी रुपये (म्हणजे साधारण १२ ते १४ हजार कोटी रुपये ) 

२० लाख माणसे, आणि तितकीच गुरे ढोरे खर्ची घातली.

मराठ्यांच्या विषयी असलेला परकोटीचा द्वेष आणि अत्यंत हट्टी स्वभाव ह्या मुळे औरंगजेबाचे महाराष्ट्रातील राहिलेले दिवस अत्यंत कष्टमय आणि गरिबीत गेले.

मराठ्यांच्या विरोधातील दक्खनच्या ह्या औरंगजेबाच्या मोहिमेत फक्त एकच सैनिक होता आणि फक्त एकच सेनापती. आणि तो म्हणजे खुद्द औरंगजेब.

औरंगजेब सोडला तर बाकी कुणालाही या वीस वर्ष चाललेल्या मराठ्यांच्या विरोधात चाललेल्या मोहिमेत काडीचाही अर्थ वाटत नव्हता. 

दिवस रात्र मराठ्यांच्या विरोधात मोहिमा करून मुघलांचे सैन्य पार दमून गेले होते. प्रचंड हाल सोसून मुघलांचे ठाणे असलेल्या बहादूरगडासारख्या (श्रीगोंद्याजवळील) ठिकाणी फौजेने मुक्कामाला येऊन जरा कुठे श्वास टाकावा; तोच पुढे फौजेला दुसऱ्या किल्याकडे निघण्याचा हुकूम व्हायचा. 

ह्या विषयी खाफीखानाची वाक्य फार बोलकी आहेत. तो म्हणतो, " औरंगजेबाकडून मोहिमेवर निघण्याचा हुकूम ऐकूनच लष्कराच्या हृदयात धडकी भरत असे.  लष्कराच्या कष्टी हृदयावर दुःखाचा डोंगर कोसळत असे."

खाफीखान जे काही बोलला ते काही खोटे नाही. 

अक्षरशः थकलेल्या बैलाला पेरणी टोचून उठवावे, तसा औरंगजेब आपल्या लष्कराला चालवीत असे.

भीमसेन सक्सेनाने  ह्याचे फारच हृदयद्रावक वर्णन केलेले आहे. तो म्हणतो, " औरंगजेब बादशहा गादीवर बसल्यापासून तो ( म्हणजे भीमसेन सक्सेना) एखाद्या शहरात राहिला आहे असे कधीच झाले नाही. सारख्या मोहिमा चालूच असतात. ह्या मोहिमांमुळे कित्येक सैनिकांना, सरदारांना एकाकी जीवन कंठावे लागते. त्यामुळे ते बेजार होतात. 

सैनिकांनी - सरदारांनी आता त्यांची बायका-मुले आणी नोकर चाकरच लष्करात बोलावून घेतली आहेत आणि लष्करातच त्यांनी आपला संसार थाटला आहे. तेथेच त्यांना मुले बाळे झाली. लष्करातच ती लहानाची मोठी झाली आणि लष्करातच म्हातारीही झाली, आणि लष्करातच मरणही  पावली. दगड मातीच्या घरांची तोंडे काही त्यांच्या दृष्टीस पडली नाहीत. त्यांना हेच वाटे कि जगात सर्वात उत्तम निवासस्थान म्हणजे लष्करातील आपला तंबू आहे."

औरंगजेबाच्या फौजेत मिळणारी सर्व सुखे, खाणेपिणे, दारू, बायका, नाचगाणी, कुटुंब-कबिला, नोकर चाकर,  असा सारा काही ऐषोआराम तेंव्हा जगजाहीर होता. आता इतके सुख जर फौजेत राहून मिळत असेल तर मग मराठ्यांच्या विरोधात लढायला कोण जाईल?

दर साल उत्तर हिंदुस्थानातून ताज्या दमाची नवीन फौज भरती करण्याचा शिरस्ता औरंगजेबाच्या फौजेत असला तरीही लोक स्वखुशीने फौजेत भरती होत नसत.  जोरजबरदस्ती केल्याशिवाय, खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याचा धमकी दिल्या शिवाय लोक फौजेत भरतीच होत नसत. 

‘मुहम्मद मुराद’ सारखे स्वखुशीने फौजेत भरती होणारे लोक फारच दुर्मिळ होते. 

गुजराथ मधील ‘गोध्रा’ ह्या भागाचा फौजदार असताना  ह्या मुहम्मद मुरादने स्वतः औरंगजेबाकडे येण्याची तयारी दाखविली आणि त्याला पत्र लिहिले कि, "ह्या वेळी हजरत पातशहा दख्खन मध्ये जिहादची लढाई करत आहेत. काफरांचे किल्ले ( म्हणजे मराठ्यांचे) जिंकून घेण्यासाठी तुम्ही मेहनत घेत असताना इकडे आम्ही सुखचैनीत जगावे हे आम्हाला आवडत नाही.  मला आपल्याजवळ नेमण्यात आले तर मी तुम्हाला काफरांचा ( म्हणजे मराठ्यांचा) सर्वनाश करून दाखवील."

अशी स्व-खुशीने भरती होणारी पत्रे औरंगजेबाला मिळाली कि औरंगजेबाचे आनंदाश्रूच निघत असत.  

मुहम्मद मुरादचे हे पत्र पाहून औरंगजेबाला मोठे कौतूक वाटले. औरंगजेबाने ताबडतोब  मुहम्मद मुरादला पत्र पाठवून 'सहा महिन्यांचा प्रत्येक स्वाराला ६० रुपये असा पगार ठरवून हजार स्वार बरोबर आणण्याचा आदेशच दिला.'

पण सगळेच असे नव्हते. गुजराथचाच सुभेदार ‘शुजाअतखाना’ सारखे रडतराव कामचुकार लोक औरंगजेबाच्या फौजेत  अनेक होते.

( इथून पुढे महत्वाचे: कारण ह्यात औरंगजेबाची महत्वकांक्षा आणि प्रचंड धर्मवेड दिसून येते. )

पन्हाळा किल्याकडे जात असताना औरंगजेब सैन्याची जमवा जमाव करण्यासाठी मुद्दाम मिरजेला थांबला होता. 

हिंदुस्थानातील प्रत्येक प्रांताच्या सुभेदाराने ताबडतोब प्रत्येकी हजार स्वार इकडे पाठवून द्यावेत असा हुकूम औरंगजेबाने काढला. 

ह्या हुकुमाप्रमाणे गुजराथचा सुभेदार  ‘शुजाअतखानाने’ आपला दत्तक पुत्र ‘नजरअली खान’ याच्याबरोबर हजार स्वार पाठवावेत असे त्यालाही कळविण्यात आले.

ह्या  ‘शुजाअतखानाने’ औरंगजेबाच्या पत्राला केराची टोपली दाखवत उलट औरंगजेबालाच असे लिहिले कि, "  आमचे अहमदाबादचे लोक तुमच्या जिहादच्या मोहिमेवर येण्यास तयार नाहीत. 

मराठ्यांना ते फारच घाबरतात. 

पण तुमच्या काफरांच्या विरुद्ध सुरु असलेल्या लढाईला मदत म्हणून माझ्याकडून २ लाख रुपये तुम्हास पाठवीत आहे."

शुजाअतखानाच्या ह्या चुकारतट्टू  स्वभावाचा औरंगजेबाला अतिशय संताप आला.

आणि त्याने अत्यंत कडक शब्दात पत्र लिहिले कि, " तुला मी शहाणा समजत होतो. तुझ्या बुद्धिमत्तेचे कौतुक  करत होतो. तुझ्यावर मोठे उपकार करून मी तुला लहानश्या हुद्द्यावरून थेट सुभेदाराच्या  हुद्द्यावर बसविले. या वेळी मी जिहाद करत आहे. ( जिहाद म्हणजे धर्मयुद्ध.) 

दुष्ट काफरांचा नायनाट करण्याकरिता मी अखंड परिश्रम घेत आहे. धर्माचा अभिमान असलेल्या प्रत्येक मुसलमानाने ह्या वेळी जिहादच्या युद्धात गुंतलेल्या ह्या इस्लामच्या बादशहाला मदत केली पाहिजे. 

सरकारी खजिन्यातून पैसे खर्च करून १ हजार स्वार पाठवा म्हणून मी हुकूम केला होता. पण या कामात तू टाळाटाळ केलीस. निरनिराळी करणे दाखविलीस. 

आमच्या रागाची काळजी केली नाही. 

ह्यात तुझे फुटके नशीब, दुसरे काय... तुला एक हजार सुद्धा स्वार पाठविता आले नाही म्हणून अल्प रक्कम आम्हास पाठवतो काय?  

तुझी ही रक्कम म्हणजे सूर्याला धूळ दाखविण्यासारखे किंवा समुद्रात एक पाण्याचा थेंब टाकण्यासारखे आहे. 

आमचे हिंदुस्थानचे साम्राज्य म्हणजे अथांग समुद्र आहे. प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक महिन्यात कोट्यवधी रुपये दाखल होतात आणि खर्चही होतात.

मी तुला निष्ठावंत सेवक समजत होतो. तू हे पत्र मिळाल्याबरोबर ताबडतोब तुझ्या दत्तक मुलाबारवर तुझी फौज घेऊन येणे."

औरंगजेब हे पत्र पाठवूनच थांबला नाही तर त्याने ताबडतोब आपला अत्यंत कडक आणि क्रूर स्वभावाच्या गुर्जबदाराला  ह्या शुजाअतखान आणि  नजरअलीखान यांना गचंडी पकडूनच घेऊन येण्यास सांगून पाठविले.

हे म्हणजे  रडतरावाला बळबळ घोड्यावर बसवून आणण्यासारखे होते.

मराठ्यांचा दराराच इतका होता कि शुजाअतखानाला कळून चुकले कि आता आपण काही परत जिवंत येत नाही.  

शेवटी हा शुजाअतखान पंढरपूरजवळील ब्रम्हपुरीस औरंगजेबाच्या छावणीच्या ठिकाणी आला. तिथं येऊन त्याने औरंगजेबाचा वजीर आसदखानाला सपाटून लाच खाऊ घातली. उद्देश असा कि  ‘आसदखानाने औरंगजेब बाद्शहापाशी जोरदार शिफारस करून मला ब्रम्हपुरीसच राहण्याची परवानगी मिळवून द्यावी.’

पण ऐकेल तो औरंगजेब कसला.

औरंगजेबाने आता शुजाअतखान त्याचा दत्तक पुत्र  नजरअलीखान आणि त्यांची शिफारस करणारा वजीर आसदखान ह्यांना  ब्रम्हपुरीच्या रंग महालातून, रंडीबाजीच्या नाचगाण्यातून, दारूच्या पेल्यांतून, बायकांच्या गराड्यातून दरादरा  फरफटत ओढीतच बाहेर काढले आणि खेळणा किल्याच्या आपल्या मोहिमेत आपल्याबरोबर चालविले.

खेळणा किल्याच्या प्रवासात असताना अचानक आलेल्या वादळी वाऱ्याच्या पावसात उडालेल्या तंबूचे लाकडी मोठे दांडकेच वजीर आसदखानाच्या टाळक्यावर जोरदार आदळले आणि जागीच त्याचा मृत्य झाला. 

जिथे वजीर आसदखाना सारख्या बड्या धेंडांची ही स्थिती तिथे हा  शुजाअतखान आणि त्याचा दत्तक पुत्र  नजरअलीखान किस झाड कि पत्ती....

हा सगळं औरंगजेबाच्या धाकाचा आणि भीतीचा मामला होता. फणा काढून टवकारत पाहणाऱ्या नागापुढे उभे असलेल्या माणसाप्रमाणे औरंगजेबापुढे सारे लोक थरथर कापत असत. 

दूर काबूलला असलेला औरंगजेबाचा मुलगा मुअज्जमच्या पोटात बापाच्या नुसत्या पत्रानेच पोटात गोळा उठत असे.

आता इथून पुढे फार गमतीशीर आहे. वाचा..

पण असा दरारा, असा कसलेला जिद्दीचा सेनापती, असे हुकमात वागणारे सैन्य, असा हा पाण्यासारखा ओतलेला पैसा, मराठ्यांचे एका मागून एक किल्ले जिंकून घेण्याचा लावलेला असा सपाटा... 

ह्या सगळ्या गोष्टींचा मर्द मराठ्यांच्या आक्रमकपणाला पायबंद घालण्याच्या दृष्टीने काहीही उपयोग झाला नाही.

उलट मराठे अजूनच आक्रमक झाले. 

औरंगजेब हताशपने पन्नास-पन्नास हजार फौज घेऊन सहा-सहा महिने एकाच किल्याला वेढा देऊन बसू लागला. 

ह्या अश्या भानगडीत औरंगजेबाचे तर्बीयत खान, हमीदुद्दीन खान, फतेउल्लाह खान, बहरामखान असे कित्येक नामांकित सरदार अडकून पडू लागले.

उरले सुरले सरदार मराठ्यांच्या मागे धावू लागले. पण धावणार तरी किती?....हाताला लागतील ते मराठे कसले?... अलिमर्दानखान, रुस्तुमखान खुदाबंदखान, हसनलिखान असे कित्येक सरदार मराठ्यांचा पाठलाग दिवसरात्र करीतच असत. 

पण मराठे त्यांना खिजगनतीलाही मोजतही नसत. 

असा हा प्रकार सहा वर्ष सतत चालला. 

मराठ्यांनी उत्तरेतील ‘उज्जयनी’ पासून थेट दक्षिणेतील ‘मछलीपट्टन’ पर्यंतच्या प्रदेशात नुसता धुराळा उठवून दिला. मराठे ऐकेनातच. 

'कुठं कुठं आवरू ह्या काफिर मराठ्यांना???' असे ओरडत औरंगजेब नुसता हताशपणे हे सगळे पाहतच राहिला.

१६९९ च्या ऑकटोबर महिन्यात औरंगजेब वसंतगडाला वेढा घालून बसला असता संताजी घोरपडेंचा मुलगा राणोजी घोरपडे आणि भाऊ बहिर्जी उर्फ हिंदुराव यांनी कर्नाटकात धामधूम उडवून देऊन हुबळीच जिंकून घेतली.

इकडे उत्तरेत नेमाजी शिंदे, कृष्णराव सावंत ह्या सरदारांनी नर्मदा पार करून थेट मावळ्यातच प्रवेश केला. आणि प्रचंड धामधूम मांडली.

अत्यंत महत्वाचे: मराठ्यांनी नर्मदा ओलांडली हे मोघल साम्राज्याच्या दृष्टीने भविष्यात येणाऱ्या अरिष्टाचे पूर्व लक्षण होते. 

भीमसेन सक्सेना म्हणतो कि, " हिंदुस्थानातील आजवर झालेल्या सगळ्या मुसलमान सुलतानांच्या काळापासून आजपर्यंत मराठे कधीच नर्मदापार झाले नव्हते." औरंगजेब मराठ्यांच्या किल्ल्यात शिरला म्हणून मराठे आता औरंगजेबाच्या घरातच घुसले. ह्या मराठ्यांनी औरंगजेबाला बेघर केले आणि नर्मदेच्या पार हाकलून दिले."

औरंगजेबाने पन्हाळा किल्याला वेढा दिला तेंव्हा राणोजी घोरपडे ह्यांनी गुलबर्ग्याकडे धामधूम सुरु केली. 

त्याच्यावर औरंगजेबाने ‘फिरोजजंग’ नावाच्या सरदाराला पाठविले. पण  ‘फिरोजजंग’ गुलबर्ग्याकडे जाऊन पोहचण्याचा आधीच हा राणोजी घोरपडे आपल्या २० हजार फौजेसहित पुन्हा पन्हाळ्याच्या परिसरात येऊन औरंगजेबाच्या छावणीतच शिरून मोगलांची कत्तल करू लागला आणी त्याची छावणी लुटू लागला.

पण हे काहीच नव्हते. 

खरा तडाखा औरंगजेबाला पुढच्या वर्षी बसला. 

त्या वर्षी १७०२ मध्ये औरंगजेबाने खेळण्याला वेढा घातला. 

भीमसेन सक्सेना म्हणतो कि, " जसा बादशहाने खेळण्याला वेढा घातला तसा  मराठ्यांचा जोर सर्वत्र तुफान वाढला. मराठ्यांनी ठीक ठिकाणच्या सर्व वाटा बंद करून टाकल्या आणि मुघलांची ते लूटमार करू लागले. ह्यात मराठ्यांना अगणित संपत्ती मिळाली." 

"मी तर असे ऐकले आहे कि औरंगजेब बादशहाला उत्तम आरोग्य लाभावे म्हणून हे मराठे दर आठवड्याला त्यांच्या देवाकडे प्रार्थना करून प्रसाद आणि लाडू वाटतात. मराठ्यांना असे वाटते कि जितका हा ‘म्हातारा’ जिवंत राहील तितके आपल्याला यश आणि त्याची संपत्ती मिळेल आणी मराठ्यांचं स्वराज्य हे साम्राज्यात रूपांतरित होईल.."

खेळण्याला औरंगजेब वेढा घालून बसला असताना मराठ्यांनी मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुरावरच हल्ला चढविला.

मराठ्यांनी हे सगळे शहर उध्वस्त केले आणि तेथील सुभेदार ‘बेदरबख्तला’ आणि सुभेदार ‘अलिमर्दानखानाला’ कैद केले.  

ह्या दोघांकडून मराठ्यांनी अक्षरशः फक्त त्यांच्या अंगावरचे कपडे सोडून असेल नसेल ते सर्व खंडणीच्या रूपात घेऊनच त्यांची सुटका केली. 

त्या नंतर मराठे तिथून गोवळकॊंड्याकडे गेले आणि तिथल्या सुभेदाराला धमकावून त्याच्यापासूनही सपाटून खंडणी घेतली. 

डिसेंबर १७०२ ला औरंगजेब जसा सिंहगड जिंकायला निघाला तसे ३० हजार मराठे गुजराथवर चालून गेले. 

खानदेश मार्गे  तापीच्या खोऱ्यातून कूच करून मराठे थेट सुरतेजवळच येऊन धडकले. मराठे परत सुरतेवर चालून आलेत ह्या नुसत्या बातमीनेच सुरतेची लोक सगळं जिथं आहे तिथंच सोडून जीव वाचवून पळतच सुटले.. 

(मराठ्यांचा मागचा अनुभव. मराठ्यांनी दिलेल्या ढुंगनावरच्या फटक्यांचे ओळ आजून उतरलेले नव्हते. )

तिथून खंडणी गोळा करून मराठ्यांनी ह्या निमित्ते संपूर्ण गुजराथेत आपले पाऊल ठेवले.

औरंगजेब केवळ निमूटपणे हे पाहतच होता. कोणाला ह्या काफर मराठ्यांवर पाठवावे? कोणीही जायला तयार होतच नसत. काय करणार...

परसोजी भोसले त्याच प्रमाणे पवारांच्या घराण्यातील काळोजी आणि संभाजी व त्यांचे चुलते केरोजी व रायाजी पवार ह्यांच्या नेतृत्वाखाली  मराठ्यांनी वऱ्हाडात प्रवेश केला.  

५० हजार घोडदळाची जंगी फौज घेऊन हे मराठे वऱ्हाडात घुसले होते.

वऱ्हाडची सुभेदारी ‘गाजीउद्दीन फिरोजजंग’ याच्याकडे होती. 

त्याचा सरदार ‘रुस्तुमखान विजापुरी’ हा मराठ्यांवर एलिचपूर येथे चालून आला. मराठ्यांनी ह्या लढाईत त्याची २ हजार माणसे कापून काढली. सुभेदारी गाजीउद्दीन फिरोजजंगचा जावई ठार केला आणि  सरदार ‘रुस्तुमखान विजापुरी’ ह्याला कैद केले. 

सर-सेनापती संताजी घोरपडे ह्यांनी बरोबर १३ वर्षांपूर्वी असेच ह्या  सरदार ‘रुस्तुमखान विजापुरी’ ह्याला कैद केले होते. 

मागच्या सिलसिल्याप्रमाणे मराठ्यांनी ह्या वेळीही त्याच्याकडून भर भक्कम खंडणी घेऊन त्याची मुक्तता केली.

वऱ्हाडातून मराठे आता माळव्यात घुसले. 

माळव्यात शिरल्यावर मराठ्यांनी आपल्या ५० हजार फौजेचे दोन भाग केले.

एक फौज उज्जयनीवर चालून गेली. आणि दुसऱ्या फौजेने सिरोंजला वेढा दिला. 

मराठ्यांच्या फौज नरवर ते सिरोंज  ह्या मार्गावरील कालाबाग पर्यंत पसरल्या होत्या. 

शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन स्वतःचे स्वराज्य स्थापलेल्या माळव्यातील छत्रसाल बुंदेल्याशी हातमिळवणी करून मराठ्यांनी औरंगजेबाचा मलिदा असलेला सगळा  माळवा प्रांतच स्वतःच्या घशात घातला आणि औरंगजेबाचे उत्तरेतून दक्षिणेकडील जाणारे सगळे रस्तेच बंद करून टाकले.

माळव्यावर ह्या वेळी मामा शाहिस्तेखानाचा मुलगा ‘अबूनसर खान’ हा सुभेदार होता.

छत्रपती शिवाजी राजाचे हे ‘मराठे’  काय प्रकरण आहे याचा त्याला बापाच्या तोडलेल्या बोटांच्या प्रकरणामुळे चांगलाच अनुभव होता. 

वऱ्हाडातील सरदार ‘रुस्तुमखान विजापुरी’ ह्याला पराभूत करून मराठे आता आपल्याकडे येत आहेत हे पाहून भीतीने त्याची गाळणच उडाली.

हा पठ्या जिवाच्या भीतीने उज्जयिनी शहरातील एका घरामध्ये चक्क लपूनच बसला. 

सार शहर पालथं घातलं तरी मराठ्यांना तो काही सापडेना.

ह्या उज्जयनीजवळच मांडवगडचा किल्लेदार ‘नवाजीश खान’  म्हणून होता त्याने ताबडतोब मराठ्यांशी लढायची तयारी सुरु केली. 

त्याने तातडीने ह्या शाहिस्तेखानाचा मुलगा ‘अबूनसर खान’ सुभेदार याच्याकडे अतिरिक्त फौजेची मदत मागितली.

तेंव्हा ह्या पळपुट्या सुभेदार साहेबांनी ५० हजार मराठ्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी म्हणून त्याच्याकडे थोडीथोडकी नव्हे तर ६० स्वारांची प्रचंड कुमक पाठवून किल्लेदार ‘नवाजीश खानाचे’  हात बळकट केले. 

आपल्या सुभेदाराची हे सहकार्य पाहून किल्लेदार नवाजीश खानाची घाबरगुंडीच उडाली आणि तो सगळं आहे तिथं मराठ्यांसाठी सोडून जीव वाचवून ‘धार’ ला पळून गेला.

धनधान्याने समृद्ध माळवा आणी गुजराथचा संपूर्ण प्रदेश मराठ्यांच्या हाती सापडला. 

इकडे महाराष्ट्रात औरंगजेब ऊन वारा आणी धोधो कोसळणाऱ्या पावसात हाल अपेष्टा सोसून एकदा ह्या किल्ल्याला वेढा तर, दुसऱ्यांदा त्या किल्ल्याला वेढा देतच बसला. काहीही हाताला लागले नाही त्याच्या.. 

औरंगजेब दुसऱ्या किल्याकडे गेला कि मागे मराठे परत पहिला किल्ला जिंकून घेत. हा सिलसिला असाच चालू होता. 

माळवा मराठ्यांकडे गेलेला पाहून औरंगजेब मोठा चिंताक्रांत झाला. 

आता ही मराठा भुते आग्ऱ्यावरच जाऊन कोसळतील कि काय? अशी त्याला भीती वाटली.  

त्याने तातडीने मराठ्यांना माळव्यातून हुसकून काढावे म्हणून थोड्याच दिवसांपूर्वी मराठ्यांकडून मार खाल्लेल्या वऱ्हाडचा सुभेदार ‘गाजीउद्दीन फिरोजजंग’ याला आज्ञा केली.

हा ‘फिरोजजंग’ मराठ्यांच्या मागावर जात ‘सिरोंज’ ला पोहचला. पण त्याने तिथं मराठ्यांशी युद्धच केले नाही. 

उलट ‘आपण मराठ्यांना हरविले. मराठे आपल्याला बघूनच पळून गेले’ अशी खोटीच बातमी औरंगजेबाला पाठविली. 

कोल्हापुरात असलेल्या औरंगजेबाने आनंदून जाऊन फिरोजजंगच्या ह्या कर्तृत्वात खुश होऊन त्याला ' सिपाह सालार' अशी पदवी देऊन त्याचा गौरव केला.

पण लवकरच खरी वस्तूथिती काय आहे हे औरंगजेबाला कळली.. 

मराठ्यांनीच ह्या फिरोजजंगला परत चांगले चोपून काढले आणी  फिरोजजंग जीव वाचवून पळाला.. ही खरी बातमी जेंव्हा औरंगजेबाला काळजी तेंव्हा तर त्याने डोक्यावर हातच मारून घेतला. 

अत्यंत संतापून लालेलाल झालेल्या औरंगजेबाने चिडून जाऊन

फिरोजजंगला दिलेली   ' सिपाह सालार' पदवी काढून घेतली. फिरोजजंगला ज्या बढत्या दिल्या होत्या त्याही औरंगजेबाने जप्त केल्या.

मामा शाहिस्तेखानाचा मुलगा ‘अबूनसर खान’ ह्याने उज्जयनीत मराठ्यांना घाबरून जाऊन आपले तोंड काळे केले म्हणून त्याची तिथून उचलबांगडी केली आणि त्याच्या जागेवर ‘नवाजीशीखान’ ह्याला बसविले.

ह्या सगळ्या माळव्यातील धामधुमीत मराठ्यांची दुसरी फौज हैदराबादहून पुढे जाऊन मछली पट्टणला जाऊन पोहचली. ह्या फौजेत १२ हजार घोडदळ आणि १० हजार पायदळ होते.

ह्या सगळ्या प्रदेशात मराठ्यांनी सक्तीने चौथाई वसूल केली. जून महिन्यात गोवळकोंडा लुटले आणि घाबरून किल्यात लपून बसलेल्या सुभेदाराकडून भलीमोठी रक्कम मराठ्यांनी वसूल केली.

ह्यावेळी औरंगजेबाची स्वारी शिवाजीराजांच्या तोरणा किल्याच्या खणपटीला बसली होती.  

ढगांत हरविलेल्या तोरण्याच्या उंच उंच बुरुजांकडे एकटक नजर लावून...

औरंगजेब मराठेशाही बुडवायला दक्षिणेत आला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श पुढे संभाजी महाराज छत्रपती, राजाराम महाराज छत्रपती ह्यांनी नेटाने चालविला. ही सगळी तेंव्हाची हकीगत आहे.

लेख आवडल्यास शेअर करा.

कारण कि,

या भुमंडळाचे ठाई | धर्मरक्षी ऐसा नाही || महाराष्ट्र धर्म राहिला काही |

तुम्हा कारणे ||

लेख समाप्त.

श्री भवानी शंकर चरणी तत्पर

निरंतर

सोमवार, 6 दिसंबर 2021

*👑वावर हाय तर पावर हाय

 *👑वावर हाय तर पावर हाय

१२ वीतल्या दोन मुली पेपर देण्यासाठी चालल्या होत्या 

सोनाली : - स्वाती तु अभ्यास का करत नाही?

स्वाती : - जाऊदे बाई! पास झाले तर परत १३, १४, १५वी चे पेपर, मग नोकरीवाला नवरा,

सोनली : - मग चांगल आहे की...

स्वाती : - काय चांगलं आहे?...  नोकरी 12 तास आणि पगार 50 - 60 हजार, मग मुंबई - पुण्या सारख्या शहरात राहायला जा, तिथे भाड्यान फ्लॅट घ्या आणि त्यात अर्धा पगार घालावा, मग स्वतःचे घर पाहिजे तर कर्ज काढून हवेत ४ - ५व्या मजल्यावर बंद घरात रहा आणि त्या घराच्या कर्जाची परतफेड पुढचे १५-२० वर्ष करा, म्हणजे काटकसरीने संसार करा, ना सणाला सुट्ट्या ना उन्हाळ्याला आणि सगळ्यात भेसळ आणि आजाराला आमंत्रण, original च्या नावाखाली ३ - ४ पटीने सगळे खाण्याचे पैसे द्या... आणि शेवटी तो नोकरी करणारा नोकरच ना...! हिशोब लाव बाई कळेल तुला... !

नापास झाले तर शेतकरी नवरा    कष्ट आहेत पण तो खरा मालक आणि मी मालकीण पैसा थोडा कमी जास्त पण tax नाही सगळे सण पण मजेत, सगळं नैसर्गिक, original पिकवणार आणि तेच खाणार म्हणजे, आजाराचे टेन्शन नाही... आणि नवरा २४ तास आपल्या सोबत राहणार.. 

सोनाली  : - मी पण नापासचं होते बाई

जोक आहे पण खरा आहे.

🤣🤣🤣🤣🤣🤣

शेतकरी असल्याचा अभिमान वाटत असेल तर द्या पुढं ढकलून😄.                              

👌👌👌👌🍎🍋🍋🍎🤸🏾‍♂🤸🏾‍♂🤸🏾‍♂🤸🏾‍♂🤸🏾‍♂🤸🏾‍♂👌👌👌👌

गुरुदक्षिणा

 ★ गुरुदक्षिणा ★

गुरुदक्षिणा मराठी

गुरु दक्षिणा की परंपरा पर एक लेख

गुरु दक्षिणा का अर्थ

गुरु दक्षिणा का महत्व

गुरु दक्षिणा पर बौद्धिक

गुरु दक्षिणा में क्या देना चाहिए

गुरुदक्षिणा शब्द के सही समास विग्रह का चयन कीजिए

गुरु दक्षिणा की कथा 

मुग्धा गाडीतून उतरली.शाळेची इमारत बघून ऊर भरून आला. खूप बदल झाला होता.पंचवीस वर्षानंतर ती आज शाळेत येत होती.बाहेर शाळेपाशी नवीन दुकान झाली होती.ओळखू न येण्याइतका बदल.रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून,आज काही माजी विद्यार्थ्यांचा सत्कार होणार होता,त्यासाठी खास ती सगळी कामं बाजूला सारून मुंबईहून आली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नावाचे छोटेसे गाव,जिथे तिचं शालेय शिक्षण झालं होतं.ती शाळेच्या आवारात आली.ती आल्याची माहिती शाळेतील शिपायाने मुख्याध्यापकांना दिली.मुख्याध्यापक,शाळेतले शिक्षक,सगळेच तिच्या स्वागताला बाहेर आले.

   "मुग्धाताई, आपण आमच्या विनंतीला मान देऊन आलात यासाठी आपले मनःपूर्वक आभार."मुख्याध्यापकांनी पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत केले.

  "अहो,आभार कसले मानता. ज्यांनी मला घडवलं,जिथे मी घडले त्या वास्तूत परत येण्याचं भाग्य मला मिळालं,अजून काय हवं.खर तर मीच तुमची ऋणी आहे.तुम्ही मला बोलावून माझा सन्मान केला.

मी एक विनंती करू का?" मुग्धाने विचारलं.

  "अहो,आज्ञा करा ताई.तुमच्यासारखी उच्चशिक्षित व्यक्ती आमच्या शाळेची माजी विद्यार्थिनी आहे,हा आमचा अभिमान आहे."

  "मला माझ्या वर्गात थोडा वेळ बसायचं आहे,तुमची हरकत नसेल तर." मुग्धा भावुक होऊन म्हणाली.

    "जरूर ताई,अजून काही निमंत्रित यायचे आहेत.कार्यक्रमाला अवकाश आहे.पांडुरंग तुम्हाला वर्गात घेऊन जाईल.अरे पांडुरंग,ताईंना जरा शाळा बघायची आहे."

  "जी सर,ताई मी वर्गाची चावी घेऊन येतो."पांडुरंग पळतच ऑफिसच्या दिशेने गेला.

    पांडुरंगने वर्गाचं दार उघडलं, "निवांत बसा ताई.कार्यक्रमाची वेळ झाली की तुमास्नी बोलवायला येतो."

   मुग्धाने हळुवार सगळ्या वर्गातून नजर फिरवली.आणि ती बसायची त्या दुसऱ्या बेंचवर येऊन बसली.तिने डेस्क वरून हळूच हात फिरवला.तिचे वाळलेले अश्रू तिथे दिसतात का,उगाच बघू लागली.

-----------------------------------------------

प्रगती पुस्तक क्लासटिचरने दिलं आणि मुग्धाला रडू आलं.ह्या चाचणीतही गणितात ती नापास झाली होती.आता घरी गेल्यावर आईचा कांगावा,बाबांची बोलणी ह्या सगळ्याला तोंड द्यावं लागणार होतं.गणित हा विषय तिचा शत्रू झाला होता. सातव्या वर्गापर्यंत कशीबशी पास व्हायची पण आता आठवीत तिला तो विषय खूप जड जात होता.शाळा सुटल्याची बेल वाजली आणि एकेक करून मुलं बाहेर जायला लागली.मुग्धा जागेवरच बसून होती.प्रीती तिच्याजवळ आली, " मुग्धा,शाळा सुटलीय. चल न घरी."

    "तु पुढे हो,मी येईन नंतर."मुग्धा तिच्याकडे बघायचं टाळत म्हणाली.

     प्रीती गेली आणि मुग्धा डेस्कवर खाली मान घालून रडायला लागली.तिला घरी जावसच वाटेना.शाळा बंद करायची वेळ आली तसा शिपाई वर्गाला कुलूप लावायला आला.त्याला मुग्धा खाली मान घालून बसलेली दिसली. 

  "ताई,काय झालं ग,बरं नाही वाटत का?"त्याने विचारलं.

   "नाही काका,मी ठीक आहे." असं म्हणत मुग्धाने दप्तर उचललं आणि वर्गाच्या बाहेर आली.घरचा रस्ता रोजच्यापेक्षा आज खूप लवकर संपला असं तिला वाटलं.

   घरी आल्यावर प्रगती पुस्तकावर सही घ्यायची म्हणून तिने वडिलांना दाखवलं.ते बघितल्यावर त्यांची नेहमीप्रमाणेच मुग्धावर आगपाखड सुरू झाली.

  "मंदबुद्धीची मुलगी आहेस तू.गणित विषयात नापास?आत्तापर्यंत काठावर का होईना पास तरी होत होतीस.आता खरी महत्वाची वर्षे आणि तू हे दिवे लावलेस.तुझ्याकडून काय अपेक्षा करणार?" त्यांनी रागारागाने ते प्रगती पुस्तक भिरकावून दिलं.

   आईने पण तिच्यावर भरपूर तोंडसुख घेतलं.

   "अग, काय हे?अभ्यास करतेस का काय करतेस.तुझ्यामुळे मला ऐकून घ्यावं लागतं.तुझ्याकडे माझं लक्ष नाही,मुलगी आईसारखी निर्बुद्ध आहे,ही वाक्य मला ऐकावी लागतात.जरा तरी लाज बाळग ग.पुढच्या परिक्षेत हे असेच गुण उधळले तर तुझं शिक्षण बंद."

      रडून थकलेली मुग्धा सुजलेल्या डोळ्यांनी आईकडे बघत होती.एका क्षणी तिला वाटलं,खरंच मी परत नापास झाले तर बरंच आहे.मला पुढे शिकायचंच नाही.त्या रात्री न जेवताच ती झोपली.

  दुसऱ्या दिवशी प्रगती पुस्तकावर आईची सही घेतली आणि शाळेत निघाली.वर्गात कोण काय शिकवतय,ह्याकडे आज लक्षच नव्हतं.कालच आठवून सारखे डोळे भरून येत होते.संस्कृतचा पिरेड सुरू झाला.मुग्धाच्या आवडीचा विषय.ती जरा खुलली.संस्कृतचे शिक्षक; देशमाने सर वर्गात आले.

त्यांनी एक पेपर काढला आणि म्हणाले,"मुग्धा साने ह्या विद्यार्थिनीचा हा पेपर आहे.पूर्ण गुण मिळवले आहेत.पेपर कसा सोडवावा ह्याचं उत्तम उदाहरण.तुम्ही सर्वांनी हा पेपर एकदा बघावा."

   सरांचं ते बोलणं ऐकून मुग्धा एकदम संकोचली.तिला अशा कौतुकाची सवयच नव्हती.खरंच की,ह्या गणिताच्या नादात मला संस्कृतमधे पैकीच्या पैकी गुण आहेत हे मी विसरलेच. पण आईबाबांना पण हे दिसलं नाही ह्याचं तिला वाईट वाटलं.

  "मुग्धा,शाळा सुटल्यावर टीचर्स रुममधे ये, जरा तुझ्याशी बोलायचं आहे."देशमाने सर म्हणाले.

   "सर,आत येऊ का?" मुग्धा टीचर्स रुमच्या बाहेर उभी होती.

  "हो ये. तुझं प्रगती पुस्तक दाखव जरा."सरांनी सांगितलं.

    मुग्धाला आता भीती वाटायला लागली.सरांनी गणिताचे मार्क्स बघितले तर त्यांचं माझ्याबद्दल मत वाईट होईल.तिने खोटंच सांगितलं,"सर,मी आज आणलं नाही.घरी विसरले."

    "मुग्धा,मला माहितीय तु गणितात नापास झाली आहेस.माझं तुमच्या क्लास टिचरशी बोलणं झालंय."

   ते ऐकून मुग्धा परत रडायला लागली.

   "मुग्धा,रडणं थांबव.रडणं हा कमकुवतपणा आहे.मला सांग,तुला संस्कृत आवडतं न?"

    "हो सर,खूप आवडतं "मुग्धा मुसमुसतच बोलली.

   "संस्कृत ह्या विषयात तुला खूप शिकायचं असेल,पुढे यायचं असेल तर अजून तीन वर्षे तुला गणितावर लक्ष द्यावं लागेल.दहावीपर्यंत गणित हा विषय कंपलसरी असतो, तुला माहितीय.दहावीनंतर  तु आर्टस् घेऊ शकते.तुला हेच सांगायला मी बोलावलं आहे की तुझा आत्मविश्वास ढळू देऊ नकोस.असतो एखादा विषय कच्चा पण म्हणून तु बुद्धिमान नाहीस असं नाही.माझ्या विषयाची तु एक हुशार विद्यार्थिनी आहेस. मला तुला खूप शिकलेली,संस्कृतची अभ्यासक म्हणून बघायचं आहे.तेव्हा गणिताकडे थोडं लक्ष दे.संस्कृतवर लक्ष द्यायला मी आहेच.कळलं?"

   "हो सर,थँक्स,मी जाते."

मुग्धा टीचर्स रूमच्या बाहेर आली आणि तिला एकदम ओझं उतरल्यासारखच वाटलं.इतक्या सुंदर शब्दात सरांनी समजावलं.तिचा न्यूनगंड कमी झाला.हेच आईबाबा का करू शकले नाहीत?तिने ठरवलं,सरांच्या शब्दाला मान द्यायचा.

   मुग्धा नियमित गणिताचा अभ्यास करू लागली.आठवी,नववीत गणितात,खूप नाही तरी निदान पन्नास टक्के गुण तिला मिळाले.संस्कृतचा तर प्रश्नच नव्हता.त्यात पैकीच्या पैकी गुण ठरलेले होते.दहावी आली आणि मुग्धाने गणिताची शिकवणीच लावली.मनापासून अभ्यास करून एकूण नव्वद टक्के गुण मिळवून पास झाली.आणि संस्कृत ह्या विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवून शाळेची शान वाढवली.शाळेने तिला बक्षीस देऊन तिचे कौतुक केले.

आईवडिलांनाही प्रथमच मुलीचे कौतुक वाटले.

    वडिलांची मुंबईला बदली झाली म्हणून मुग्धाला भद्रावती सोडावं लागणार होतं.निघायच्या आधी ती देशमाने सरांच्या घरी गेली.

   "मुग्धा,तु माझी विद्यार्थिनी आहेस ह्याचा मला अभिमान वाटतो."सर म्हणाले.

   मुग्धाला काय वाटलं कुणास ठाऊक,ती एकदम सरांच्या पाया पडून रडायला लागली.सरांनी तिला उठवलं.

  "सर,मी पूर्णपणे खचले होते.तुमच्या शब्दांनी मला बळ दिलं."

   "मुग्धा,मला वचन दे,ह्यापुढे तु स्वतःला कमी लेखून रडणार नाहीस.अशा वेळेस मला आठव आणि डोळ्यातलं पाणी परतून लाव.खूप शीक,मोठी हो.तुझा आदर्श सर्वांपुढे ठेव."सरांनी तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं.

   "हो सर,मी नक्की प्रयत्न करेन.तुमचा आशीर्वाद, तुमचे मोलाचे शब्द मला आयुष्यभर प्रेरणा देतील."तिने वाकून सरांच्या पायावर डोकं ठेवलं.

    मुंबईत एका चांगल्या कॉलेजमधे मुग्धाने ऍडमिशन घेऊन आर्टस् घेतलं.शिक्षणाचा एकेक पल्ला गाठत,संस्कृत मधे एम ए,पी एच डी केलं.सगळ्या परीक्षांमधे मुग्धा सर्वात अधिक गुण मिळवून यशस्वी झाली.विद्यापीठात नोकरी लागून थोड्याच दिवसात ती संस्कृतची हेड ऑफ द डिपार्टमेंट झाली.देशमाने सरांशी ती संपर्क ठेऊन होती.कुठलीही अडचण आली की त्यांना फोन करायची.तिच्या बुद्धीची जाणीव त्यांनी तिला करून दिली होती.

   काळ पुढे सरकत होता.मुग्धाची चाळीशी उलटली होती.आयुष्य व्यस्त झालं होतं.आणि अचानक एक दिवस शाळेतून फोन आला,माजी विद्यार्थ्यांचा सत्कारासाठी मुग्धाला आमंत्रण आलं.तिने लगेच जायचं ठरवलं.तिला वृद्ध झालेल्या,थकलेल्या सरांना भेटायचं होतं. त्यांचा थरथरता हात डोक्यावर घेण्यासाठी ती आसुसली होती.

-----------------------------------------------

   पांडुरंग बोलवायला आला तशी मुग्धा आठवणीतून जागी झाली.ती बाहेर आली.निमंत्रित सगळे आले होते.तिची नजर देशमाने सरांना शोधू लागली.आणि तिने सरांना ओळखलं.तिला अगदी भरून आलं.ती झपाट्याने त्यांच्या दिशेने येऊ लागली.त्यांच्या जवळ जाणार इतक्यात मुख्याध्यापक म्हणाले, "मुग्धाताई,देशमाने सरांची वृद्धत्वामुळे दृष्टी अधू झालीय.ते तुम्हाला ओळखणार नाहीत."

  "मी बघते प्रयत्न करून."मुग्धा सरांजवळ आली,त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि उभी राहून त्यांचे हात हातात घेतले.

    "मुग्धा" सरांनी हाक मारली आणि मुग्धाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.ती काही न बोलता सरांजवळ उभी होती.

   "मुग्धा,डोळे पूस.मला वचन दिलं होतंस न, रडणार नाहीस म्हणून."सर म्हणाले.

   "हो सर, पण हे अश्रू तुमच्यासाठी आहेत. ते तसेच वाहू द्या.माझी गुरुदक्षिणा समजा हवं तर" मुग्धा रडतच म्हणाली.

   "तुझं यश,तुझी कीर्ती ऐकली तेव्हाच मला माझी गुरुदक्षिणा मिळाली बाळा.तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा."

   मुग्धाने सरांना हात धरून स्टेजवर आणलं. मुख्याध्यापकांना ती विनंती करणार होती की सत्कार तिचा नाही तर तिच्या श्रद्धास्थानाचा करावा,ज्यांच्यामुळे ती आज इथवर पोहोचली होती........

उस्ताद बिस्मिल्लाह खान आणि भगवान श्रीकृष्ण!!🧵

 उस्ताद बिस्मिल्लाह खान आणि भगवान श्रीकृष्ण!!🧵

खालील थ्रेड हा सत्य घटनांवर आधारित आहे. उस्ताद बिस्मिल्लाह खान यांनी इल्लूस्ट्रेटेड विकली ऑफ इंडियाच्या संपादकाला पुढील घटनांबद्दल सांगितलेले आहे.

दररोज सकाळी बिस्मिल्लाह खान यांचे मामा अली बक्ष हे शेजारी असलेल्या जडौ श्री बालाजी म्हणजेच महा-विष्णु मंदिरात जात होते. त्यावेळी त्यांना दिवसभर शहनाई वाजवल्यानंतर महिन्याला चार रुपये मिळायचे. बिस्मिल्लाह सुद्धा कधी-कधी सकाळी त्यांच्या मागे जायचे, त्यांचे संगीत ऐकायचे, मोहित व्हायचे आणि गोंधळून जायचे.

मामा आणि भाचे हे दोघे सकाळच्या सत्रातील काम पूर्ण झाल्यानंतर जडौ मंदिरातील बालाजी मंदिरात जायचे. तेथे अली बक्ष यांच्यासाठी एक खोली नेमून दिली होती. दिवसभर जवळपास पाच तास ते तिथे सराव करित असे आणि ज्यावेळी अली बक्ष यांचा सराव संपायचा त्यावेळी त्यांना दिसायचं की, बिस्मिल्लाह हे त्यांच्यासमोर बसलेले आहेत आणि एका भुकेल्यासारखे ऐकताहेत.

बिस्मिल्लाहनी कधीही आपल्या मामांना त्रास दिला नाही. परंतु बिस्मिल्लाह नेहमी गोंधळून जायचे की, त्यांचे मामा हे बालाजी मंदिराच्या खोलीत सराव करण्यासाठी का जातात? कारण तोच सराव ते घरी सुद्धा करू शकतात आणि त्यांना कोणीही त्रास सुद्धा देणार नाही. याचे कारण जाणून घेण्याची उत्सुकता त्यांना नेहमीच असायची आणि एकेदिवशी न राहवून त्यांनी मामांना याबद्दल विचारले.

मामांनी आपल्या कुलपावर शेवटचा हात मारला आणि उत्तर दिले, 'एकदिवस तुम्हाला ते नक्की कळेल'. बिस्मिल्लाहने पटकन विचारले, 'पण मामू मी शहनाई कधी वाजवणार?' आणि मामू म्हणाले, 'कधी वाजवणार? ही काय विचारायची गोष्ट आहे का? तू आजपासूनच सुरुवात करीत आहेस'.

लगेच मामा अली यांनी त्या संध्याकाळी बिस्मिल्लाह यांना जडौ महाविष्णू मंदिरात घेऊन गेले आणि त्यानंतर बालाजी मंदिराच्या 'त्या' खोलीत घेऊन गेले ज्या खोलीत त्यांनी रात्रीच्या शहनाई वादनानंतर जवळजवळ 18 वर्षे सराव केला होता. शेवटी मामू अली यांनी बिस्मिल्लाह खान यांना तिथे सराव करण्याची परवानगी दिली. ती परवानगी देत असताना मामू अली यांनी त्यांना एक 'ताकीद' दिली की, या मंदिरात जर तुला काही वेगळा अनुभव आला किंवा काही वेगळे दिसले? तर कोणाला काहीही सांगायचे नाही.

बिस्मिल्लाह खूप आनंदित झाले आणि त्यांनी त्या खोलीत चार ते सहा तास सराव केला, चार भिंतीच्या बाहेर होणार्‍या बदलांकडे दुर्लक्ष करून त्यांनी संगीताच्या सुर-तालाची नवीन उंची आणि खोली शोधून काढली, आपले संगीत सुधारण्याच्या इच्छेने बिस्मिल्लाह यांना झपाटून टाकले होते.

एकेदिवशी बिस्मिल्लाह खान हे पहाटे चारच्या सुमारास बालाजी मंदिराच्या आवारात एकटेच होते आणि ते त्यांच्या शहनाईच्या सरावात मग्न होते. त्यावेळी अचानक त्यांना आपल्या शेजारी कोणीतरी बसले असल्याची जाणीव झाली आणि जेव्हा त्यांनी बघितले तर ते दुसरे कोणी नसून 'भगवान बालाजी' होते.

'भगवान बालाजी' आपल्या शेजारी बसलेले असलेले बघून बिस्मिल्लाह हे स्तब्ध झाले आणि अवाक राहिले. त्यांचा अवाकपणा बघून भगवान बालाजीनी हसत हसत म्हटले की, 'वाजवा'. परंतु बिस्मिल्लाह हे अजूनही आश्चर्याच्या धक्क्यातून सावरू शकले नव्हते आणि त्यामुळे भगवान बालाजी हसले आणि तिथून निघून गेले.

बिस्मिल्लाह खान हे त्यादिवशी लगेच आपले गुरु आणि मामा अली बक्ष यांच्याकडे गेले आणि घडलेला प्रसंग त्यांना सांगितला. तो प्रसंग ऐकताच मामा अली यांनी बिस्मिल्ला यांच्या गालफडात लावली आणि त्यांना सांगितले की, तुला मी सांगितलं होतं की काहीही वेगळे दिसले किंवा अनुभव आला तर कोणाला काहीही बोलायचे नाही. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की, शहनाईवादक उस्ताद बिस्मिल्लाह खान यांची  व भगवान श्रीकृष्णाची प्रत्यक्ष भेट झालेली होती.

मुस्लीम श्रद्धा असूनही प्रसिद्ध उस्ताद बिस्मिल्ला खान हे भगवान श्रीकृष्णाबद्दल प्रचंड आदर बाळगतात. ज्यामुळे दयाळू असलेला परमेश्वर श्रीकृष्ण हा त्यांच्यासमोर स्वतः प्रकट झाला असावा.

वरील कथा ही उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या मुलाखतीवर आधारित आहे. जी 'मल्याळम मनोरमा'मध्ये डॉक्टर मधु वासुदेवन यांनी प्रकाशित केली होती.

बर्‍याच वर्षापूर्वी उस्ताद बिस्मिल्लाह खान एकदा 'जमशेदपूर ते वाराणसी' असा रेल्वेने प्रवास करीत होते. उस्ताद हे कोळशावर चालणार्‍या पॅसेंजर ट्रेन मध्ये थर्ड क्लासच्या डब्यात प्रवास करीत होते.

एका मध्यम ग्रामीण रेल्वे स्थानकावरून ज्या बोगीत उस्ताद बसले होते त्याच बोगीत एक तरुण गोरक्षक आला. तो दिसायला सावळा आणि हडकुळा असलेला तरुण होता व तो बासुरी वाजवत होता.

उस्ताद असलेले बिस्मिल्ला त्या तरुणाच्या उत्तम दर्जाच्या संगीताने थक्क झाले. कारण तो तरुण कोणता 'राग' वाजवित आहे? याची सुद्धा त्यांना कल्पना येत नव्हती. उस्ताद बिस्मिल्लाह यांच्या म्हणण्यानुसार, 'हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात 'भगवान श्रीकृष्ण' होते जे स्वतः 'परमात्मा' आहेत'.

तरुणाच्या (कृष्णाच्या) बासरीतून वाहू लागलेल्या या नाद-ब्रम्हातील (संगीताच्या रूपातील ब्रह्म) अमृततुल्यामुळे उस्तादांचे हृदय आनंदाने भरले आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. 

त्या तरुणाच्या (कृष्णाच्या) या अतुलनीय बासरीवादनानंतर उस्तादांनी त्या तरुणाला (कृष्णाला) जवळ बोलावले आणि त्याला आपल्याजवळ असलेल्या रोख रकमेतून एक चतुर्थांश भाग दिला व त्याला पुन्हा तोच 'राग' वाजवण्यास सांगितले. तो तरुण म्हणजे 'भगवान कृष्ण' बासुरीवादन करण्यास खुशीने तयार झाला आणि उस्ताद बिस्मिल्लाह यांच्याकडील सर्व रोख रक्कम संपेपर्यंत असेच चक्र सुरू राहिले आणि जेव्हा हे चक्र थांबले. त्याच्या पुढच्याच रेल्वे स्टेशन तो तरुण (कृष्ण) उतरला आणि गायब झाला.

खरं म्हणजे उस्ताद बिस्मिल्लाह खान हे कुंभमेळ्याशी संबंधित एका संगीत मैफलीत भाग घेण्यासाठी जात होते. त्या मैफिलीत उस्ताद यांनी नवीन 'राग' जो त्यादिवशी त्यांनी कृष्णाकडून शिकला होता. तो शहनाईवर वाजवला. श्रोत्यांना त्यांचा हा नवीन सुरेल असा 'राग' इतका आवडला की उस्तादांना तो पुन्हा पुन्हा वादन करण्याची लोकांनी विनंती केली.

तिथे असलेल्या अनेक संगीत अभ्यासकांना त्या 'रागा'ला काय म्हणतात? हे समजू शकले नाही म्हणून त्यांनी बिस्मिल्लाह खान यांना याबद्दल विचारले. उस्ताद यांच्या म्हणण्यानुसार या रागाचे नाव  'कान्हारीरा' होते.

दुसर्‍या दिवशीच्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या या नवीन मधुर 'रागा'बद्दलच्या बातम्या छापल्या गेल्या.

ते वाचून प्रसिद्ध संगीतकार (बासरीवादक) हरिप्रसाद चौरसिया यांनी बिस्मिल्ला खाँ यांच्याकडे 'कान्हारीरा'  रागाच्या गुंतागुंतीबद्दल विचारपूस केली.

उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांनी त्यांच्याकडे 'सत्या'ची कबुली दिली आणि 'कान्हारीरा' राग गाऊन दाखवला. तो ऐकल्यानंतर जगातील सर्वात महान बासरीवादक हरिप्रकाश चौरसिया यांच्या डोळ्यातून सुद्धा आनंदाश्रू निघाले. 

'कान्हारीरा' हा  भारतीय संगीतातील एक पवित्र 'राग' आहे. कारण ते 'श्री' कडून आलेले आहे.  देवांचे देव कृष्णाच्या 'कमलरुपी' ओठांतून ते आलेले आहे.

जेव्हा त्यांच्या शिष्याचा सन्मान करण्याचा विचार भगवान   श्रीकृष्णाच्या मनात येतो तेव्हा त्यांच्या सन्मानाच्या पद्धती या खूप रहस्यमय असतात. भगवान श्रीकृष्ण हे जात, पंथ किंवा धर्मावर आधारित भेदभाव करत नाहीत. फक्त आणि फक्त 'भक्ती' इतकीच एक अट त्यांची असते.

सर्वं श्रीकृष्णार्पणम्‌ !

धन्यवाद!

शनिवार, 19 जून 2021

बाॅसने एक स्पर्धा लावली

 बाॅसने एक स्पर्धा लावली. "शेकडो मगरी असलेल्या त्या तळ्यात जो कोणी एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत सुरक्षित पोहून जाईल त्याला 50 लाखाचे बक्षीस मिळेल. आणि जर का यात तो मगरींकडून मारला गेला तरी  त्याच्या वारसाला 10 लाख मिळतील".

      तिथे आलेल्या स्टाफपैकी एकही माणूस हे आव्हान स्विकारायला तयार नव्हता.

 पण काही वेळेनंतर अचानक एकाने तळ्यात उडी मारली. त्याला पकडायला आलेल्या मगरींचा 🐊🐊🐊🐊 जीवघेणा पाठलाग पाहून जिवाच्या आकांताने पोहून कसेबसे तळ्याचे दुसरे टोक गाठलेच आणि शर्यत जिंकला.

   भीतीमुळे थरथर कांपत थोडावेळ किना-यावर बसल्यावर तो एकदम रागाने ओरडला, 

"कोणी मला मागून तळ्यात ढकललं होतं?".

बघतो तर काय, ज्या व्यक्तीने त्याला तळ्यात ढकलले,ती खुद्द त्याचीच बायको होती. 

जिंकले तर 50 लाख , हरले तर 10 लाख होतेच.

आणि तेव्हापासूनच ही म्हण अस्तित्वात आली 👇👇👇

यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो

!!!😜🤣😢😢😢😢

टिळक सुटले १६ जून

 आपण विसरलो का १६ जूनला? आज १६ जून आनंदाचा क्षण, पुण्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला।

टिळक सुटले

१६ जून १९१४ मध्यरात्री पुणे शहरातील एकही घर झोपले नव्हते, कारणचं तसं होतं, लोकमान्य टिळक सहा वर्षांची कठिण शिक्षा भोगून परत आले होते.

साधारणपणे मे महिन्याच्या शेवटाला जेलरने  टिळकांना सामानाची बांधाबांध करावयास सांगितले. टिळकांच्या शिक्षेचे काही दिवस बाकी होते त्यामुळे पावसाळ्यापूर्वी आपल्याला येथून हलवणार व दुसऱ्या तुरूंगात  ठेवणार असं टिळकांना वाटत होतं. मंडाले तुरूंग, मंडाले किल्ल्याच्या आत आहे. मंडाले किल्ल्यापर्यंत एक रेल्वे लाईन इंग्रज सरकारने  टाकली होती. जूनच्या पहिल्या आठवड्यात  अतिशय गुप्तता पाळून तुरूंगातूनच एक इंजिन व एक डब्याच्या बंद गाडीतून टिळकांना बंदरावर आणले गेले.  लगोलग त्यांना बंद बोटीत बसवले गेले. ८ दिवसांचा प्रवास झाल्यावर टिळकांचे पाय मातृभूमीला लागले. ( तो क्षण त्यांचेसाठी अवर्णनीय असेल) मद्रास (चेन्नई) इथल्या गोदीतून पुन्हा दोन डब्यांची  बंद गाडी पुण्याच्या दिशेने निघाली.  

        १६ ता. रात्री ती गाडी पुणे स्टेशनापर्यंत न नेता अलिकडेच हडपसरला थांबली . चिटपाखरूही नसलेल्या त्या स्टेशनातून टिळकांना बंद चारचाकीमधे बसवले व पुण्याकडे रवाना केले. तरीदेखील आपल्याला येरवड्यात पाठवतील असे टिळकांना वाटत होते पण गाडी उजव्या हाताला बंडगार्डनच्या पुलाकडे न वळता शहराच्या दिशेने जाऊ लागल्यावर आपली नक्की सुटका झाली याची त्यांना खात्री पटली. गाडी गायकवाडवाड्यापाशी आल्यावर सामानासकट त्यांना उतरवले व धुरळा उडवत गाडी निघुन गेली. 

            टिळकांनी वाड्याच्या बंद दरवाजाची कडी वाजवली. देवडीवर झोपलेल्या भैय्याने विचारले 

“ कौन हो? “

“ मी आहे. या वाड्याचा मालक.”

त्याने दिंडी दरवाजा उघडला, समोर कोणीतरी माणूस बघून पुन्हा बंद केला व घाईघाईने धोंडोपंतांना(टिळकांचे भाचे) उठवायला गेला. कंदीलाच्या प्रकाशात त्यांनी दार उघडले.  

साक्षात दादा. संशयाची जागा आता आनंदाश्रूंनी घेतली. 

सहा वर्षांनंतर टिळक स्वत:च्या घरात पाऊल टाकत होते. लगोलग जवळपासच्या मंडळींना निरोप पाठवले गेले. हा हा म्हणतां ही बातमी पुण्यात वाऱ्यासरशी पसरली . लोक रस्त्यावर आले. झुंडीच्या झुंडी गायकवाडवाड्याकडे धावू लागल्या . लोकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. कोतवाल चावडीवर असलेल्या काका हलवाई मिठाईवाले यांनी दुकान उघडून मिठाई वाटण्यास सुरवात केली. पलिकडचे दगडूशेठ हलवाईंनी गर्दीवर बत्तासे ऊधळले.  गर्दीचा उत्साह पाहुन पोलिसांना देखील काय करावे ते समजेना. 

लोक टिळकांच्या दर्शनास येऊ लागले. त्यांना डोळे भरून पाहू लागले . हा सगळा प्रकार पहाटेपर्यंत चालला. शेवटी टिळकांना घरात नेले तरीही लोक रांगा लावून बसले होते. पुढचे दोन तीन दिवस दर्शन देणे हाच एक कार्यक्रम होऊन बसला. पत्रे व तारांचा खच केसरीच्या कार्यालयात पडला. संपादक मंडळाची उत्तरे देताना धावपळ होऊ लागली. जेवढी अभिनंदनाची पत्रे होती तेवढीच त्याच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करणारी पत्रे होती. हळूहळू संपूर्ण हिंदुस्थानात  ही वार्ता पसरली. मरगळलेल्या जनतेला पुन्हा  उभारी आली.  

विस्मृतीत गेलेले हे क्षण पुन्हा वाचकांसमोर आणले इतकेच.

🙎 एक तरी मुलगी असावी

 ज्यांना मुली आहेत त्यांनी ही कविता नक्कीच वाचावी 

👤 पुरुषांनाही रडण्यासारखी एक कविता

🙎 ||  लेक माझी || 🙎

.................................................

🙎 अशी कशी लेक, देवा,

माझ्या पोटी येते

नाव सुद्धा माझं ती

इथेच ठेऊन जाते।।🙎

.

🙎 पहिला घास, देवा, ती

माझ्या कडून खाते

माझाच हात धरुन ती

पहिलं पाऊल टाकते।। 🙎

.

🙎 माझ्याकडूनच ती

पहिलं अक्षर शिकते

तिच्यासाठी सुद्धा मी

रात्र रात्र जागतो।।🙎

.

🙎 कुशीत माझ्या झोपण्यासाठी

ती गाल फुगवुन बसते

मी आणलेला फ्रॉक घालून

घर भर नाचते।।🙎

.

🙎 अशी कशी लेक, देवा,

माझ्या पोटी येते

असे कसे वेगळे हे

तिचे माझे नाते।। 🙎

.

🙎 एक दिवस अचानक, ती,

मोठी होऊन जाते

बाबा , तूम्ही दमला का, ?

हळूच मला विचारते॥ 🙎

.

🙎 माझ्या साठी कपडे, चप्पल,

खाऊ घेऊन येते

नव्या जगातील नविन गोष्टी

मलाच ती शिकवते।। 🙎

.

🙎 तिच्या दूर जाण्याने

कातर मी होतो

हळूच हसून मला ती

कुशीत घेऊन बसते।।🙎

.

🙎 कळत नाही मला, देवा,

असे कसे होते

कधी जागा बदलून ती

माझीच आई होते।।🙎

.

🙎 देव म्हणाला, ऐक, पोरी

तुझे, तिचे नाते विश्वाच्या ह्या साखळीची

एक कडी असते।। 🙎

.

🙎🙎 तुझ्या दारी फुलण्यासाठी

हे रोप दिले असते

सावली आणि सुगंधाशी तर

तुझेच नाते असते।।🙎🙎

.

🙎🙎 वाहत्या प्रवाहाला, कोणी,

मुठीत कधी, का, धरते ?

मार्ग आहे ज्याचा, त्याचा

पुढेच असते जायचे।।🙎

.

🙎 तुझ्या अंगणातली धारा ही

"जीवनदात्री" होते

आणि वाहती राहण्यासाठीच

"गंगा" ''सागराला" मिळते।

एक तरी मुलगी असावी

उमलताना बघावी

नाजूक नखरे करताना

न्याहाळायला मिळावी 🙎🙎

.

🙎 एक तरी मुलगी असावी

साजिरी गोजिरी दिसावी

नाना मागण्या पुरवताना

तारांबळ माझी उडावी 🙎🙎

.

🙎 एक तरी मुलगी असावी

मैचींग करताना बघावी

नटता नटता आईला तिने

नात्यातली गंमत शिकवावी 🙎🙎

.

🙎🙎 एक तरी मुलगी असावी

जवळ येऊन बसावी

मनातली गुपितं तिने

हळूच कानात सांगावी 🙎🙎

.

😊😊एक तरी मुलगी असावी

गालातल्या गालात हसावी

कधीतरी भावनेच्या भरात गळ्यात मिठी मारावी......!

🙎 एक तरी मुलगी असावी 🙎

dedicated to all beautiful daughters  😊 खरच ज्यांना मुलगी आहे ते खुप भाग्यवान आहे...🙏

म्हातारपणात मिळालीय व्हाट्सपची आधारकाठी !

 म्हातारपणात मिळालीय व्हाट्सपची आधारकाठी ! 

🥸😎🤓🧐👴🏻👨🏻‍🦰🧔🏼

म्हातारपणी मिळाली 

व्हाट्सपची आधारकाठी !

कपाळावरची मिटली 

आपोआप आठी !!  

वेळ कसा जातो आता 

हेच कळत नाही ! 

वर्तमान पत्राच पान सुद्धा 

हल्ली हलत नाही !

चहा पिताना लागतो 

व्हाट्सप हाताखाली !

डाव्या बोटाने हलके हलके 

मेसेज होतात वरखाली !

कुणाचा वाढदिवस आहे ?

कोण आजारी आहे ?

कोण चाललंय परदेशात 

अन काय घडतंय देशात ?

कधी लताची जुनी गाणी तर 

कधी शांताबाई ची कविता ! 

बसल्या बसल्या डुलकी लागते

कधी एखादी गझल समोर येते !  

टीव्ही वरचं चॅनेल सुद्धा 

हल्ली बदलत नाही 

व्हाट्सप शिवाय आमचं पान

 जरा सुद्धा हलत नाही !!

वय जरी होत चाललं

हातपाय जरी *थोडे थकले !

तरी व्हाट्सपच्या औषधाने

मन मात्र रिलॅक्स झाले !! 

आता फार काळजी *करत नाही

आता चिडचिड सुद्धा *होत नाही !

व्हाट्सप चा मित्र भेटल्या पासून

आता मनात सुद्धा रडत नाही !! 

आनंदी कसे  जगायचे याचे 

आता कळले आहे तंत्र !!

व्हाट्सप च्या या जादूच्या

काठी ने दिला सुखाचा *मंत्र !!

म्हणुनच म्हणतो,मला मिळालीय,हाॅटसपची आधारकाठी

  🤨😊👍🤨😊👍🙏

 अहो कुठे आहात? फोन का उचलत नव्हता एवढा वेळ? 

अगं माझी गाडी घाटात उलटली आहे..

झालं! म्हणजे डब्यातली पातळ भाजी गेली का वाया?

श्री सियाराम बाबां

  संत श्री #सियाराम #बाबा

....नर्मदेच्या किनारी अजूनही वास्तव्य करणारे ११०+ वय वर्षाचे विलक्षण अवलिया संत श्री #सियाराम #बाबा.....

भारत हि संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. इथे अनेक संत महात्म्यांनी जन्म घेतले. असेच एक अवलिया संत नर्मदे किनारी तेलिया भाटियाण (मध्यप्रदेश) गावात राहतात.

नर्मदा परिक्रमा करणारा प्रत्येक परिक्रमवासी त्यांचा आश्रमात येऊनच जातो तेव्हा त्यांची सेवा खुद्द सियाराम बाबा करतात.परिक्रमावासींना जेवण देऊन अनेक वस्तू देतात.येणाऱ्या प्रत्येक माणसाला चहा चा प्रसाद दिला जातो एका छोट्या पातेल्यात कायम चहा उकळत ठेवलेला असतो आणि विशेष म्हणजे कितीही भक्त आले तरी त्यातला चहा पुरतो.

सियाराम बाबा कायम लंगोटी वर असतात भलेही कितीही थंडी ऊन पाऊस असुदेत.

सियाराम बाबांचा चेहरा हनुमानासारखा आहे. त्यांचा चेहऱ्यात हनुमानाची झलक खूप भक्तांना होते.

सियाराम बाबांचे वय अंदाजे ११० ते १३० सांगितले जाते.स्वातंत्र्य पूर्व काळात भारतात इंग्रज शासन चालू होते त्यांचे वय १३-१५ होते त्याच दरम्यान त्यांना साधूचे दर्शन  होऊन कडकडीत वैराग्य प्राप्त झाले आणि संसाराचा त्याग करून ते हिमालयात तप करण्यास निघून गेले एवढीच माहिती त्यांचा पूर्व आयुष्या बद्दल माहिती.ते स्वतः कोण त्यांचे गुरू कोण ते हिमालयात किती वर्ष राहिले तप साधना कोणती केली कोणी शिकवली सगळ्या गोष्टी म्हणजे खूप मोठे रहस्य आणि गूढ आहेत श्री सियाराम बाबानी आज पर्यंत ह्या गोष्टी कोणालाही सांगितल्या नाहीत ....आजही त्यांना विचारले की ते एकच गोष्ट बोलतात की "माझे काय आहे,  मी तर फक्त मज्जा बघतो ."

तेलीया भाटीयाण मध्ये आल्यावर श्री सियाराम बाबानी एक छोटी कुटी बांधलेली आणि तिथेच राहू लागले. तिथे त्यांनी हनुमानाची मूर्ती स्थापन केली.रोज सकाळ पासून संध्याकाळपर्यंत "राम" नामाचा जप आणि तुलसीदास रचित "रामचारीतमानस" रामायण नित्य पाठ केले ,असे त्यांनी हे १२ वर्षाचे कठीण तप केले.१२वर्षात त्यांनी मौन व्रत धारण केले. कोणाशी काही बोलले नाहीत गाववाल्याना काही कळत नव्हते बाबाजी कोण आहेत कुठून आले १२ वर्षांनी त्यांनी मौन व्रत तोडल्यावर त्यानी पाहिले शब्द बोलले ते "सियाराम"... तेव्हापासून गाव त्यांना सियाराम बाबा म्हणून संबोधित करू लागले.

खूप वेळा नर्मदा मय्याला पूर येतो तेव्हा सगळं गाव पाण्यात बुडवून जाते संपूर्ण गाव एका सुरक्षित स्थळी हलवले जाते पण श्री सियाराम बाबा आपला आश्रम आणि मंदिर सोडून कधीच जात नाहीत.नर्मदा माई चा पुरात ते "रामचरितमानस" रामायणचा पाठ करतात. पूर ओसरल्यावर जेव्हा गाववाले गावात परत येतात आणि बाबांना भेटतात तेव्हा सियाराम बाबा त्यांना म्हणतात की " माँ नर्मदा भेटायला आलेली तिनी दर्शन आणि आशीर्वाद घेऊन देऊन परत गेली, आईला काय घाबरायचय ती तर मैय्या आहे."

बाबानी नंतर १२वर्षे खडेश्वरी साधना केली त्यात त्यांनी प्रत्येक काम झोपणे खाणे सगळं उभेराहूनच केले, नर्मदेला पूर आल्यावर पाणी बाबांचा नाभी पर्यंत आले पण तिथून ते हटले नाहीत आश्रमतच राहून आपली साधना पूर्ण केली.

श्री सियाराम बाबांचा आश्रमात माकड कुत्री मांजर उंदीर बाबांबरोबर एकत्र राहतात आणि त्यांचा बरोबरच जेवतात आणि झोपतात.

श्री सियाराम बाबांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बाबा १०रुपयेचा वर प्रसादि (दक्षिणा) घेत नाहीत ५००,१००० कितीही दिले तरी ते  त्यातले १० रुपये घेतात आणि उरलेले त्या व्यक्तीला पारत देतात.

त्यांचा जुना आश्रम धरण पाणी क्षेत्रात गेला आहे म्हणून त्यांना सरकारनी २ कोटी ५१ लाख रूपये दिले पण त्यांनी ते सर्व पैसे नागलवाडी मधील नागदेवताचे भव्य मंदिर बांधायला दान देऊन टाकले.

एकदा तरी त्यांचे दर्शन घेऊन यावे...🙏🏻🙏🏻

जय शंकर..!!

नर्मदे हर..!!

नर्मदे हर..!!

आम्ही मध्यमवर्गीय

 आम्ही मध्यमवर्गीय

साधारण 20-25 वर्षांपूर्वी  "मध्यमवर्गीय" ही जमात अस्तित्त्वात होती. तसं तर संपूर्ण भारतभर ती पसरली होती. पण महाराष्ट्रात तिचा स्वतः चा असा 'ब्रँड' होता.

घरात एक कमावता पुरुष, दोन-तीन भावंडं, नवरा-बायको, कुठे कुठे आजी-आजोबा, क्वचित प्रसंगी भाचा-पुतण्या शिकायला अशी एकूण कुटुंबसंस्था होती. एक कमावता आणि खाणारी तोंड 5-6  हे चित्र सगळीकडे सारखंच होतं. काही ठिकाणी महिलावर्ग नोकरीसाठी बाहेर पडला होता. पण आजच्याइतका नाही.  म्हणूनच की काय घर, कीचन ह्यावर स्त्रीवर्गाची सत्ता होती.....एकहाती सत्ता. पण तिथलं तिचं स्वतःचं एक गणित होतं...पक्कं गणित. त्यावरच सगळे हिशोब जुळत होते.

अन्नाच्या बाबतीत"पोटाला खा हवं तेवढं, पण नासधूस नको" असा शिरस्ता होता. माझी आजी नेहमी म्हणायची,"खाऊन माजावं, पण टाकून माजू नये".

कढी, डाळभाजी करायची त्या दिवशी वरण कमी लावायचं. आंब्याचा रस असेल तर भाजी कमी करायची. रवी लावली की, त्या ताकाची कढी करायची. त्याच तुपाच्या भांड्यात दुसऱ्या दिवशी पोळ्या टाकायच्या... अशी साधी-साधी समीकरण असायची. घरातली पुरूष माणसांची आणि मुलांची जेवणं आधी करून घेतली की, बायका मागून जेवायच्या. उरलंसुरलं त्या खावून घ्यायच्या. त्यांच्या पंगतीला पुरवठा म्हणून खमंग थालीपीठ किंवा गरमागरम पिठलं असायचं. इतकंही करून पोळी-भात उरलाच तर दुसऱ्या दिवशी त्याचा व्हायचा 'कुचकरा' किंवा 'फोडणीचा भात'. जगातले सगळ्यात चविष्ट पदार्थ आहेत हे. सकाळच्या नाश्त्याचा प्रश्न परस्पर मिटायचा.

मुलांची शाळा म्हणजे 'टेन्शन'चा विषय नव्हता. आपली साधी मराठी शाळा. 200-300 रू. वर्षाची फी. पण युनिफॉर्म, पुस्तके आपले आपल्याला घ्यावे लागायचे. जरा मोठा-धाटा युनिफॉर्म घेतला की, सहज 2 वर्ष जायचा. 

पुस्तकांचा जरा 'जुगाड' असायचा. म्हणजे समजा 'अ' ने दुकानातून कोरी-करकरीत पुस्तकं विकत घेतली असतील, तर तो ती पुस्तकं वर्ष संपल्यावर 'ब' ला 70% किमतीत विकायचा. अन् मग 'ब' तीच पुस्तकं  'क' ला 40% मधे विकायचा.

Purchase Cost, Selling Cost, depreciated Value हे कामापुरतं "अर्थशास्र"  सगळ्यांनाच येत होतं. एकदा विकत घेतलेली पुस्तकं तीन वर्षं सर्रास वापरली जायची.

पुस्तकाच्या या 3 वर्षाच्या प्रवासात कधी कधी बेगम हजरत महल, अहिल्याबाई अशा "दूरदृष्टी च्या" व्यक्तिमत्त्वाला चष्मा लागायचा. कोणाला दागिने मिळायचे. तर कोणाला दाढी -मिशी यायची आणि हे असे उद्योग अ, ब, क पैकी कोणी तरी नक्कीच करत होतं.

बंगालच्या उपसागरात हमखास दोन-तीन जहाजं फिरत असायची. पण शाळेत असतांना ते मॉरिशस, अंदमान निकोबार, केरला बॅकवाॅटर अशी Destinations मला नकाशात सुद्धा कधी भेटली नाहीत.

पुस्तकातल्या रिकाम्या जागा भरा, जोड्या जुळवा, अशी बिनडोक कामे सहसा 'अ' करून मोकळा व्हायचा. म्हणूनच की काय त्यानंतर ब आणि क ह्यांना फक्त  चित्रकलेतच "स्कोप" उरलेला असायचा आणि त्याचा प्रत्यय पुस्तकाच्या पाना-पानावर यायचा.

शाळेचा युनिफॉर्म असल्यामुळे खूप कपडे लागत नसत. मोठ्या भावा-बहिणींचे कपडे घालणं, त्यांचे दप्तर- स्वेटर वापरणं, ह्यात ' इगो बिगो' कोणाचा आड येत नव्हता. स्वेटरचा तर मोठा प्रवास असायचा. त्यातही लहान बाळाचं स्वेटर, कपडे, दुपटे, झबले इतके फिरायचे की, त्याचा मूळ मालक कोण हेही कोणाला आठवायचं नाही.

पण आमच्या आधीच्या पीढीने शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. त्यामुळे अभ्यास सगळ्यांना करावाच लागायचा. मुलींना "यंदा नापास झालीस किंवा कमी मार्क्स मिळाले तर तुझं लग्न लावून देवू आणि मुलांना, "तुला रिक्षा घेवून देवू चालवायला" अशी  "जागतिक" धमकी मिळायची.

12 वी नंतर कुठल्या शाखेकडे जायचं. कोणता कोर्स करायचा. घरातल्या मोठ्या दुरुस्त्या, उपवर-उपवधू ह्यांना आलेली स्थळं ....Proposals.. हे आजच्या काळातले  "Highly Personal Issues"  त्या काळात बिनदिक्कतपणे गोलमेज परिषद भरवून चर्चिले जात. हातपाय पसरायला लागते तेवढीच काय ती प्रत्येकाला घरात Space.. ...बाकी सगळा 'लेकुरवाळा' कारभार.

आठवडी बाजारातून भाज्या आणणे, किराणा आणणे, लांबच्या लग्नाला हजेरी लावणे हा 'बाबा' लोकांचा प्रांत होता. प्रत्येक बाबांच्या तीनचार तरी  RD , LIC काढलेल्याच असायच्या आणि  त्यासुद्धा बहुतेक वेळा एजंटवरील प्रेमापोटी. बाकी शेअर्स, Mutual Fund वगैरेचा 'एजंट' त्या काळी उदयाला आलेला नव्हता आणि कोणी काही वेगळ्या स्कीम आणल्याच तर अगदी पाचच मिनिटात त्याच्या उत्साहाला अन् पर्यायानं त्याच्या कमिशनला सुरुंग लागायचा. Share market म्हणजे जुगार हा 'समज' अगदी पक्का होता.

' फॅमिली डॉक्टर' हा एक जिव्हाळ्याचा विषय होता. प्रत्येक कुटुंबाचा वेगळा डॉक्टर असायचा. आजीच्या दम्यापासून ते बाळाच्या तापापर्यंत सगळ्या व्याधीवर त्याच्याकडे औषध असायचे. तसे ते डॉक्टर पण 'नीतिमत्ता' वगैरे बाळगून होते. उगाचच आजच्या सारखं भारंभार टेस्ट अन् सोनोग्राफी करायला सांगायचे नाहीत. गरज असेल तरच करूया टेस्ट. पेशंटला परवडेल आणि ह्यांचा दवाखाना पण चालेल असा त्यांचा 'व्यावहारिक' पवित्रा असायचा.

जसा 'फॅमिली डॉक्टर' तशीच एक फॅमिली 'बोहारीण' पण असायची. पण ती फक्त आईची मैत्रीण. बाकी कोणी तिच्या वाट्याला जात नसत. आई सगळे जुने कपडे एका गाठोड्यात बांधून ठेवी. मग ही  'बोहारीण' एका दुपारी अवतरायची. आधीच दुपारच्या झोपेचं खोबरं झाल्याने आई  जरा वैतागलेली असायची. भलं मोठं कपड्यांचं गाठोडं विरुद्ध चहाची गाळणी अशी 'तहा' ला सुरवात व्हायची. तिची गाळणी खपवायची घाई तर आईचा मोठ्या पातेल्यावर डोळा. खूप घासाघीस करून  'Deal' चहाच्या पातेल्यावर फिक्स व्हायची. ह्या  कार्यक्रमात 2-3 तास आरामात जायचे. शेजारच्या सगळ्या आत्या, मावशी, काकू ह्या वाटाघाटीत सक्रिय सहभाग घ्यायच्या. शेवटी त्या नवीन चहाच्या पातेल्यात चहा व्हायचा आणि मगच सगळं महिला मंडळ परागंदा व्हायचं..

खरं सांगू का.. ...मध्यमवर्गीय ही काही 'परिस्थिती' नाहीये. ती  "वृत्ती" आहे. साध्या, सरळ, कुटुंबवत्सल, पापभीरू माणसांची. मध्यमवर्गीयच आहेत ह्या समाजाचा 'कणा'.. ते आहेत म्हणून तर ह्या समाजात चांगल्या वाईटाची चाड आहे. आम्हीच आहोत नियमित 'कर' भरणारे, वाहतुकीचे काटेकोर 'नियम' पाळणारे आणि प्रत्येक निवडणुकीत 'मतदान' करणारे.

असे आम्ही सगळेच मजेत होतो बघा. अचानक 1990-91 मध्ये जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. ते आमच्या पर्यंत यायला 10-12 वर्षे गेली. पण तोपर्यंत त्या वाऱ्याच,' वादळ ' झालं होत. अन् मग त्या वादळात उडून गेलं आमचं मध्यमवर्गीयपण.

प्रेमळ, मिळून-मिसळून राहणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे आम्ही......अचानक 'प्रोफेशनल' झालो. माणसा-माणसातलं आपलेपण कोरडं झालं. कालांतराने ते भेगाळलं.

पुढे पुढे त्या भेगांच्याच भिंती झाल्या. Busy Schedule, Deadlines, Projects Go Live अश्या 'गोंडस' नावाखाली आम्ही ते स्वीकारलं. गलेलठ्ठ  Packages  मधे गुंडाळल्या गेला आमच्यातला चांगुलपणा. प्रेमळपणा आणि आपलेपणा सुद्धा.

मिल्खा सिंग यांचे विक्रम

 मिल्खा सिंग यांचे विक्रम

मिल्खा सिंग यांचा जन्म २० नोव्हेबर १९२९ रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला. त्यावेळेस भारत-पाकिस्तान फाळणी झाली नव्हती. १९५८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील २०० आणि  ४०० मीटर प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले. मिल्खा सिंग यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मॅल्कम स्पेन्सला हरवून ४६.६ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. तर २०० मीटर शर्यतीत त्यांनी पाकिस्तानच्या अब्दुल खालिकचा पराभव केला. मिल्खा यांनी ही धाव केवळ २१.६सेकंदात पूर्ण केली. १९६२मधील जकार्ता एशियन गेम्समध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर आणि ४x४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. १९५९मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मंगलवार, 20 अप्रैल 2021

मोक्षपट

 मोक्षपट!

        गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना आणि कोरोना या माहामारी शिवाय दुसरे काही ऐकले,बघितले,विचार केले असेल तर नवलच.कोरोनामुळे एकीकडे शाळा,कॉलेज,ट्यूशन,क्लासेस,बंद तर ऑफिसेस वर्क फ्रॉम होम झालेत.वर्षभरापासून घरी राहून घरच्यांसोबत क्कालिटी टाईम घालवणे सगळ्यांना अनिवार्य झाले आहे.त्यासाठी घरबैठे खेळ खेळणे हा पर्याय सर्वांसाठी सोयीस्कर आहे.त्यातूनच पत्ते,UNO,सापसिडी,ल्यूडो,लपंडाव,बुध्दीबळ,काचकांग-या असे अनेकविध जुने खेळ समोर आले.आपल्या लहानपणी उन्हाळ्याच्या,दिवाळीच्या सुट्टीत तर हे सगळे  खेळ म्हणजे दिवस यात कधी संपायचा कळायचेच नाही.

          सापसिडी खेळाची मूळ  संकल्पना,शोधकर्ते,इतिहास,याचा अभ्यास करायचे ठरवले तर कळाले-

       "सापसिडीचा शोध महाराष्ट्रात लागलाय,  तो ही संत ज्ञानेश्वरांनी लावलाय."

          संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली,भगवद्गीतेचे मराठीत भाषांतर केले,पसायदान लिहिले,अनेक अनिष्ट रूढी व परंपरांवर प्रहार केला, त्याच माऊलींनी सापसिडी खेळाचा शोध लावला हे नवलच ऐकावयास मिळाले. 

           डेन्मार्क येथील डॅनिश रॉयल सेंटरचे संचालक डॉ.एरीक सँड यांचे विद्यार्थी असलेले जेकॉब यांना' इंडिया कल्चरल ट्रेडिशन' या संकल्पने अंतर्गत,मध्ययुगीन काळात भारतात खेळल्या जाणा-या विविध खेळांविषयी संशोधन केले.त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की,13व्या शतकातील संत ज्ञानेश्वर यांनी सापसिडीचा शोध लावलेला असू शकतो.पुढील काही संशोधनात त्यांनी ज्ञानेश्वरांचे चरित्र अभ्यासले पण त्यात कुठे उल्लेख काही नव्हता.अखेरीस जेकॉब यांनी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व संशोधक वा.ल.मंजूळ यांच्या सहाय्याने डेक्कन कॉलेजमध्ये तशा प्रकारचे संदर्भ शोधले व त्यातून "मोक्षपट"चा उलगडा झाला. 

           मोक्षपट,हा पहिला सापसिडीपट होता.असे सांगितले जाते की,संत ज्ञानेश्वर व त्यांचे ज्येष्ठ बंधू संत निवृत्तीनाथ जेंव्हा भिक्षा मागायला जात तेंव्हा घरात लहानग्ये सोपानदेव व मुक्ताई यांचे मन रमावे म्हणून या खेळाचा-मोक्षपटाचा शोध लावला.

         लहान मुलांना खेळातून चांगले संस्कार लागावेत म्हणून या खेळाची निर्मिती केली गेली असावी.

           ज्ञानदेवांनी 13 व्या शतकात कवड्या व फाश्यांच्या मदतीने खेळावयाच्या या खेळाचा शोध लावला.मोक्षपटाचे दोन्ही पट 20 बाय 20 इंचाचे असून त्यात 50 चौकोनी घरे आहेत.पहिले घर जन्माचे तर शेवटचे घर मोक्षाचे आहे.यातील शिडी म्हणजे सद्गुणांचे प्रतिक व साप म्हणजे दुर्गुणांचे प्रतिक.सत्कृत्याने शिडीमार्गे मोक्षप्राप्ति तर दुष्कृत्याने साप असलेल्या आकड्यांवर गेल्यावर पुन्हा सुरूवात करावी लागते म्हणजे पुनः पुन्हा जन्म चक्रात अडकणे असा त्यांचा गर्भित अर्थ आहे.निवृत्तिनाथ,ज्ञानदेव,सोपानदेव व मुक्ताई ही सर्व भांवंडे हा खेळ खेळत.पुढे भारतभरात या खेळाचा प्रसार झाला.

          पुढे इंग्रज भारतात आले,त्यांना हा खेळ खूप आवडला व त्यांनी बुध्दिबळ,ल्यूडो सह हा खेळ सुध्दा इंग्लंड ला नेला व त्याच्या खेळण्याच्या पध्दतीत बदल केले त्याचे नवे नामकरणही - 'स्नेक ऍण्ड लॅडर' असे केले व आजतागायत आपण तिच नवीन स्वरूपातील सापसिडी खेळतो.

         सहा कवड्यांचे पालथे पडणे म्हणजे मोक्षपट मिळते असे प्रतिक आहे. मोक्षपटात सुध्दा सापसिडीसारखेच साप असतात,त्यात काम,क्रोध,मोह मत्सर,लोभ,मद अशा षडरिपुंचे नावे त्यांना दिली होती.केवळ गंमत म्हणून सापसिडी खेळणा-या लहानग्यांना त्यांचे आई वडिल,आजी आजोबा मोक्षपटाचा आधार घेत माणसाने आयुष्य कशाप्रकारे जगावे याचे तत्वज्ञान सांगत असणार.

कोरोनो के साईड इफेक्टस...

 कोरोनो के साईड इफेक्टस...

गेल्या एक दीड महिन्यांपासून केवळ घरात आणि घरात बसून असल्यामुळे घरातील समोर आलेलं ढळढळीत सत्य...

१. आमच्या घरात गरजेपेक्षा कितीतरी वस्तू जास्त आहेत... ज्यांना घरात का घेतलं आणि अजूनही घरात त्या का आहेत हा एक मोठा प्रश्नच आहे...

२. आमच्या घरात ऐकून चारशे बेचाळीस भांडी असून त्यातील केवळ दोनशे बहात्तर भांडी वापरात असतात...( रोज मी भांडी घासतो त्यामुळे ज्ञानात पडलेली माहिती )

३. आमच्या घराचं एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचे अंतर हे साधारणपणे पंचवीस मीटर असून जवळपास ऐंशी चकरा मारल्या की चार किमी चालणं होतं...

४. आमच्या घरात दोन-तीन वाट्या अशा आहेत की ज्या अतिक्रमण केल्यासारख्या घरात ठाण मांडून आहेत...त्यावर दुसऱ्याच कोणाचतरी नाव टंकलिखित केलेलं असून बायकोने बहुदा त्या वाट्या पाकिस्तानने बळकावलेल्या कश्मीरप्रमाणे आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत...लॉकडाऊन संपला की  सर्जिकल स्ट्राइक करून त्या ताब्यात घेऊन ज्याच्या त्याला परत करण्यात येतील...

५. या बायकोकडे आणि पोरीकडे इतके कपडे आहेत, इतके कपडे आहेत, इतके कपडे आहेत की या त्या त्यांच्या साड्या, सलवार, पॅंट शर्ट यांची एकमेकांची गाठ बांधून लांब केले तर पृथ्वीला वेढा मारून त्याची गाठ घालून तिला आकाशात टांगता येईल...

६. आमच्या घरात असाही काही दुर्गम भाग आहे जेथे माणूस आणि झाडू कधीही पोहोचलेला नाही...

७. घरात तीस टक्के जिन्नस, पदार्थ, वस्तू अशा आहेत की ज्या बायकोला 'कोठेय?' असं विचारल्यावर ती त्या वस्तू घरात असूनही 'नाही आहेत' असं उत्तर देते...

८. बायकोने बोललेल्या प्रत्येक वाक्याला अर्थ असतोच असं नाही आणि आपण उगाचंच आपला मेंदू फ्राय करून त्याचा अर्थ लावून त्याला प्रत्युत्तर द्यायचे नसते हे याकाळात अजून ज्ञानदात पडलेली भर...'शांती' खूप गोड असते...

९. मनात आणलं तर घरातल्या घरात एक तास व्यायाम सहज करता येऊ शकतो...

१०. आमच्या घरातील भांडे घासणाऱ्या मावशी का टिकतं नाही याचा शोध लागला असून घरात तयार केलेला प्रत्येक पदार्थ चोवीस तासात तीन वेळा आपले कपडे सॉरी भांडे बदलत असतो...

११. आमच्या घरातील एका बेडशीटवर दोनशे बेचाळीस फुले असून एकशे बहात्तर पानं आहेत...

१२. घरात टीव्ही असूनही तो जराही न बघता दिवस काढता येऊ शकतो...

१३. आपला मोबाईलचा टॉक टाईम ( एका दिवसात फोन वर बोलण्याचा कालावधी ) हा बायकोच्या मोबाईल टॉकटाईमचे वर्गमुळ काढून त्याला तृतीयांशने गुणल्यावर जो येतो आकडा येतो त्याच्या निम्मा असतो...

सध्या एवढे बास...अजून बरंच काही आहे पण ते पुढच्या भागात...

रामरक्षा स्तोत्राचं सामर्थ्य

 ॥श्री राम समर्थ ॥

रामरक्षा स्तोत्राचं सामर्थ्य आणि त्यातल्या प्रत्येक श्लोकाचं महत्व आजपर्यंत अनेकदा अनेकांच्या वाचनात आलं असेल. 

रोजच्या जीवनात कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हंटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते. खरं तर जी स्पंदने रामरक्षेतून जागृत होतात, ती दाखविण्यासाठी कुठलाही चष्मा किंवा भिंग उपलब्ध नाही, परंतु "स्वानुभव" ह्या एकमेव साधनेतून काहींना त्याची प्रचीतीही आली असेल. 

म्हणूनच ...

या रामनवमीला म्हणजेच बुधवार २१ एप्रिल रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता किमान  १ वेळा आणि शक्य असल्यास  ११ वेळा अत्यंत शांतपणे पण शक्य तितक्या मोठ्या आवाजात सगळे एकत्र रामरक्षा म्हणूया.

रामरक्षेतल्या प्रत्येक मंत्राची vibrations या चराचरात घुमु देत. 

एकाच दिवशी एकाच वेळेस हजारो लाखो लोकांनी हा रामरक्षा पठणाचा संकल्प केला तर वातावरणात एक प्रचंड मोठी सकारात्मक   उर्जा निर्माण होईल.

काही वाईट शक्तीना मारण्यासाठी जशी यंत्राची गरज असते तसच काही वाईट कोरोनारूपी अदृश्य शक्तीचा नायनाट करण्यासाठी आज मंत्राची गरज आहे.

दिवसेंदिवस मनुष्य आणि  विज्ञान या विषाणूपुढे हतबल होताना दिसतोय आणि म्हणूनच त्याच्या जोडीला त्याचं सामर्थ्य व मनोबल वाढवण्यासाठी रामरक्षे सारख्या प्रभावी मंत्र पठणाची गरज आहे.  

ज्यांचा विश्वास आहे ते तर करतीलच परंतु इतरांनीही

नकारात्मक विचार थोड्या वेळापुरते बाजूला ठेऊन संपूर्ण सकारात्मक भावनेने , मनापासून त्या प्रभू रामचंद्राला शरण जाऊया. त्या जगन्नियंत्याला तळमळीने हाक मारू आणि मनुष्य जातीवर आलेलं संकट दूर करण्यासाठी साकडं घालू. 

अहो ज्याने अनंत कोटी ब्रम्हांड निर्माण केली या विश्वनिर्मात्याला हे संकट दूर करणं अवघड आहे का हो ? 

खात्री बाळगा लक्ष लक्ष मुखातून एकाच वेळी निघालेल्या या स्तोत्राचे सकारात्मक परिणाम निश्चित दिसतील. काहीतरी चांगल निश्चित घडेल.

अनेक जण रामरक्षेचे नित्यपठण करतही असतील त्यांनी आणि इतरांनीही या बुधवारी २१ एप्रिल रोजी  रामनवमीला संध्याकाळी ठीक ७ वाजता किमान १ ते ११ वेळा रामरक्षा म्हणावी. आपापल्या घरी वा जिथे असाल तिथे रामरक्षेच पठण करा.

ज्यांना पाठ नसेल त्यानी record लावा.

विश्वास असो वा नसो पण विश्वकल्याणासाठी , मानवजातीच्या रक्षणासाठी केलेला हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी .....

कृपया हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवून साथ द्या. 

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

पारसी , पर्शिया ,झोराष्ट्रीयन

 नुसतं माझा धर्म भारी आणि माझी जात भारी म्हणून चालत नसत

बाहेरून आलेल्या पारसींनी पुण्यात हॉस्पिटल्स उभारली आणि अख्खं गाव जगवलं.*

मुळचे पर्शियाचे म्हणून त्यांना आपण पारसी म्हणतो. पर्शिया म्हणजे आजचे इराण. तिथेच झोराष्ट्रीयन हा समाज जन्माला आला. या धर्माला हजारो वर्षांची परंपरा आहे.

पण हे पारसी भारतात कसे आले याची एक कथा सांगितली जाते.

अस म्हणतात की शेकडो वर्षापूर्वी मुस्लीम अरब टोळ्यांनी पर्शियावर आक्रमण केले. धर्मांतर करू लागले. जुलमी आक्रमकांना तोंड देण्याएवढी ताकद या झोराष्ट्रीयन समाजाकडे नव्हती. यातूनच मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले.

अशीच एक जहाजात भरून निघालेल्या पारशी कुटुंबांची नौका गुजरातला नवसारी इथल्या किनाऱ्यावर येऊन पोहचली. तिथल्या राजा समोर त्यांना उभं करण्यात आलं. त्यांचा म्हातारा प्रमुख समोर आला. राजाला व त्याला एकमेकांची भाषा येत नव्हती.

राजाने एक दुधाने काठोकाठ भरलेला पेला मागवला आणि त्या पर्शियन लोकांच्या प्रमुखाला सुचवलं की आमचा देश असा काठोकाठ भरलेला आहे आता आम्हाला आणखी माणसे नकोत.

तेव्हा तो पारसी माणूस हसला. त्याने त्या दुधात थोडासा मध टाकला. त्याचा अर्थ होता की आम्ही इथे दुधात मध मिसळल्या प्रमाणे राहू व या देशाची गोडी वाढवू. राजा खुश झाला. त्याने पारसी लोकांना भारतात राहण्याची परवानगी दिली.

पारसी लोक बुद्धिमान होते, उद्यमी होते. ते गुजरात बाहेर पडले, देशभर पसरले. इथल्या मातीशी एकरूप झाले.

ब्रिटीश भारतात आले तेव्हा पारसी लोकांनी त्यांची भाषा शिकून घेतली. याचा त्यांना प्रचंड फायदा झाला. ब्रिटीशांच्या मुंबईसारख्या महानगरात त्यांनी बस्तान बसवलं. आधुनिक शिक्षणपद्धतीचा स्वीकार केला. अनेक पारसी कुटुंबांनी आपल नाव कमवल. पैसा कमावला.

पण पारसी फक्त पैशांच्या मागे लागलेले नव्हते. हजारो वर्षांपूर्वी आपल्यावर झालेला अन्याय, हालअपेष्टा ते विसरले नाहीत. आपल्या इतिहासाची जाणीव ठेवली त्यामुळे जिथे जातील तिथे आपल्या कमाईतला वाटा समाजाला काही तरी देण्यासाठी वापरला.

पुण्यात ब्रिटीशांनी लष्करी छावणी उभारली तेव्हा त्यांच्या मदतीसाठी इंग्रजी भाषा जाणनारे स्थानिक कर्मचारी लागणार होते. त्यांनी उच्चशिक्षित पारसी लोकांना पुण्यात आणलं. बऱ्यापैकी कॅम्पच्या भागात हे पारसी वसले. इथले आल्हाददायक हवामान त्यांना मानवल.

त्यामुळे अनेक पारसी कुटुंबांनी आपले बिऱ्हाड पुण्यात कायमच हलवलं.

पारसीप्रमाणेच आपला देश सोडून परागंदा झालेले बगदादचे ज्यू डेव्हिड ससून हे देखील भारतात आले होते. व्यापारात त्यांनी व त्यांचे पारसी पार्टनर जमशेदजी जीभॉय यांनी प्रचंड पैसा कमावला होता. यातूनच पुण्यात पहिले हॉस्पिटल उभे राहिले. त्याला त्यांचे नाव देण्यात आले, डेव्हिड ससून रुग्णालय.

पुण्यात १८६७ साली डेव्हिड ससून रुग्णालय उभे राहिले. हे हॉस्पिटल उभे राहत असताना एक पारसी उद्योजक बैरामजी जीजीभोय हे मुंबईहून पुण्याला आले होते. त्यांनी मुंबईत अनेक शिक्षण संस्था उभारल्या होत्या. जीजीभोय यांनी पुण्यात ससून रुग्णालयाच्या शेजारी एक छोट वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र उभ केलं. त्याला त्यांचच नाव देण्यात आलं.

१८७१ साली स्थापन झालेलं हे वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र पुढे जाऊन पुण्याचे सुप्रसिद्ध बी.जे.मेडिकल कॉलेज बनलं.

एकोणिसाव्या शतकात पुण्याला प्लेग सारख्या रोगराईने चांगलंच सतवलं होत. इंग्रजांच्या राज्यात पुण्यात आरोग्य सेवा म्हणाव्या तशा सुधारलेल्या नव्हत्या. अजूनही लोक वैद्य, हकीम यांच्यावर अवलंबून असायचे. ससून सोडले तर मोठे रुग्णालय नव्हते.

याकाळात छोटी छोटी पारसी रुग्णालये उभी राहत होती. असाच एक दवाखाना चालवणाऱ्या एडलजी कोयाजी यांनी एक हॉस्पिटल बांधायचं ठरवलं. पारसी समाजातील उद्योगपती पुढे आले. वाडियांनी त्यांना पैशांची मदत केली. तर सर कोवासजी जहांगीर व लेडी हिराबाई या दांपत्याने जागा दिली अत्याधुनिक हॉस्पिटल उभारून दिल.

या हॉस्पिटलला त्यांच्या मुलाचं जहांगीरच नाव देण्यात आलं.

१९४६ साली त्या काळच्या सर्वोत्तम सेवा सर्वसामान्य रुग्णांना अत्यल्पदरात  उपलब्ध करून देण्याचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये प्रयत्न करण्यात आला होता.

याच जहांगीर हॉस्पिटलमध्ये हृद्यरोगावर उपचार करायला केकी बैरामजी हे सुप्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांनी अमेरिकेतून हृद्यरोगावरील विशेष उपचाराचा प्रशिक्षण घेतलं होतं. पण तिथेच स्थायिक होण्याऐवजी आपल्या मूळ गावी पुण्याला परत आले. जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांचे काही कारणांनी एडलजी कोवासजी यांच्याशी मतभेद झाले. यामुळे केकी 

बैरामजी यांनी स्वतःच फक्त चार खाटांच एक हॉस्पिटल सुरु केलं. त्यावेळच्या गव्हर्नरने त्यांना जागा दिली होती. या गव्हर्नरच्या बायकोच्या स्मरणार्थ हॉस्पिटलचं नाव रुबी हॉल क्लिनिक असे करण्यात आले. एकेकाळी ४ बेडचे हॉस्पिटल पुढे जाऊन ७५० बेडचे पुण्यातले सर्वात अत्याधुनिक रुग्णालय बनले.

अशीच कथा केईएमची.

पुण्याच्या रास्ता पेठेत सरदार मुदलियार यांचं एक छोट प्रसूतीगृह होतं. सर्वसामान्य गरीब रुग्णांचा आधार असलेले हे हॉस्पिटल चालवणे सरदार मुदलियार यांना अवघड चालले होते. त्यांनी जहांगीर हॉस्पिटलच्या एडलजी कोयाजी यांना एखादा तज्ञ डॉक्टर व चांगला प्रशासक मिळवून देण्याची मागणी केली. त्यावेळी

एडलजी यांनी प्रसूतीशास्त्रात उच्च पदवी घेतलेल्या आपल्या वहिनीकडे म्हणजेच बानू कोयाजी यांच्याकडे ही जबाबदारी दिली.

काही महिन्यांसाठी लक्ष द्यायचं म्हणून डॉ.बानू कोयाजी यांनी ही जबाबदारी उचलली खरी मात्र केईएम हे पुढच्या आयुष्यभराच हे मिशन बनलं.

बानू कोयाजी यांनी केईएमचा कार्यक्षेत्र पुण्याच्या ग्रामीण भागापर्यंत वाढवल. त्यांचं कार्य फक्त वैद्यकीय सेवेपुरत मर्यादित राहिलं नाही तर कुटुंब नियोजनासारखे समाजहिताचे कार्यक्रम जनजागृती अशा अनेक उपक्रमांची जोड दिली.

डॉ. बानू कोयाजी हे पुणेकरांसाठी एक आदराच आणि आपलेपणाचं नाव बनलं. 

आजही ही जहांगीर पासून ते केईएमपर्यंत अनेक रुग्णालये पुंण्यात तितक्याच कार्यक्षमतेने कार्य करत आहेत. वेळोवेळी येणाऱ्या संकटात मेडिकल इमर्जन्सीमध्ये या हॉस्पिटलनी पुण्याला जगवल आहे.

 सायरस पूनावाला यांच्यासारखे उद्योगपती औषधनिर्मितीच्या क्षेत्रात जगभरात ओळखले जातात.

प्रत्येक समाज पिढ्यानपिढ्या आपापल्या परंपरा जपत असतो पण पुण्याच्या पारसींनी वैद्यकीय क्षेत्रात छाप पाडून एक वेगळीच ओळख निर्माण केली एक अजरामर पायंडा पाडला.

टिपः नुसतंच गर्व से कहो असं म्हणून माणसं जगत नसतात... प्रत्येक धर्मियांचा आदर हेच भारतीयत्व.... Live & Let Live

रतन टाटा .,आदर पुनावाला..डाॕ.बानू कोयाजी...डाॕ.ग्र्ँट...होमी भाभा अशा अनेक पारसी धर्मियांनी देशासाठी सर्वस्व अर्पण करुन भारताचा नावलौकिक वाढवला आहे. 

आणि कोणत्याही जाती धर्माचा द्वेष हे महान लोक करत नाहीत....बघा जमलं तर विचार करा

साभार

शुक्रवार, 5 मार्च 2021

1सुविचार मराठी छोटे

 1सुविचार मराठी छोटे

ज्याप्रमाणे जीवनात प्रत्येक गोष्ट महत्वाची असते त्याच प्रमाणे आणि त्यापैकी एक गोष्ट म्हणजे मोटिवेशन, कधी कधी आपण कठीण परिस्थितीचा सामना करताना हतबल होऊन लगेच हार मानतो पण अश्या परिस्थिती मध्ये जर आपल्याला उत्साह निर्माण करणारे काही विचार कानावर पडले तर किंवा आपल्या वाचनात काही उत्साह पूर्वक विचार आलेत तर.

आपण हार न मानता एखादी गोष्ट करण्यासाठी आपले प्राण पणाला लावतो. आणि त्या कार्याला पूर्णत्वास घेऊन जातो, जीवनात उत्साह खूप महत्वपूर्ण असतो, कारण उत्साहामुळे आपल्या जीवनात आपण कोणतेही कार्य करण्यास प्रवृत्त होतो. जीवनात उत्साह असणे खूप आवश्यक आहे. मग ते जीवनातील कोणतेही कार्य का असेना.

आम्ही आपल्यासाठी असेच काही उत्साह निर्माण करणारे Motivational Quotes घेऊन आलेलो आहोत, तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत उत्साह निर्माण करणारे काही Motivational Quotes ज्या आपल्याला जीवनात पुढे जाण्यासाठी उपयोगी येतील. आशा करतो आपल्याला आवडतील. तर चला पाहूया..

101+ जबरदस्त प्रेरणादायक सुविचार – Best 101 Motivational Quotes in Marathi

Motivational quotes in Marathi for success

Motivational quotes in Marathi for success

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.

आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.

Inspirational Quotes in Marathi with Images

Motivational Msg

Motivational Msg

न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.

Motivational Quotes in Marathi with Images

एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला सकारात्मक विचार प्रवृत्त करत असतात आणि या सकारात्मक विचारांमुळे च तर आपल्यात उत्साह निर्माण होतो. आणि या उत्साहाच्या बळावर आपण एखादे अशक्य वाटणारे कार्य सुध्दा पूर्ण करतो. जीवनात उत्साह जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत माणसाला कोणत्याच गोष्टीची भीती राहत नाही, तो त्या उत्साहाच्या जोरावर जीवनात खूप मोठी कामगिरी पूर्ण करतो. कारण एका दृष्टिकोनातून पाहिले असता माणसाचे जीवन हे आशा आकांक्षांवर अवलंबून आहे जीवनात आशा असणे खूप महत्वाचे आहे. कधीही हार न मानता समोर चालत राहणे म्हणजेच आयुष्य होय.

त्यासाठी आपल्याला जीवनात कधी हताश,उदास, निराश न होता समोर चालत राहणे हा आयुष्याचा नियम आहे, आणि जो या नियमांचं पालन करत आयुष्य जगतो त्याला जीवनात कमी प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागतो. आयुष्यात एका ठिकाणी कधीही अडकून न राहता नेहमी चालत राहावे ज्याप्रमाणे पाणी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहत राहते, तेच पाणी जर एका ठिकाणांवर थांबले तर त्या पाण्यात जीव जंतू निर्माण होऊन ते पाणी खराब होते. अश्याच प्रकारे आपल्यात उत्साह निर्माण करणारे आणखी काही Quotes खाली दिलेले आहेत. तर चला पाहूया..

Inspirational Quotes in Marathi with Images

Inspirational Quotes in Marathi with Images

 जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.

बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.

जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे, हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.

Inspirational Quotes in Marathi

Inspirational Quotes in Marathi

Inspirational Quotes in Marathi

शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”

स्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.

Marathi Inspirational Quotes Images

Marathi Inspirational Quotes Images

Marathi Inspirational Quotes Images

 आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो, त्याला कुणीही हरवू शकत नाही .

नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.

खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.

Marathi Inspirational Quotes On Life Challenges

Marathi Inspirational Quotes on Life Challenges

Marathi Inspirational Quotes On Life Challenges

ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही, त्या इतरांसोबत करू नका.

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.

Marathi Inspirational Quotes on Life

Marathi Inspirational Quotes on Life

Marathi Inspirational Quotes on Life

 तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही , त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात.

स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि! बदला तुमचे आयुष्य.

Marathi Inspirational Quotes

Marathi Inspirational Quotes

Marathi Inspirational Quotes

 प्रामाणिकपणा  हि शिकवण्याची बाब नाही, तर तो रक्तातच असावा लागतो, त्यात टक्केवारी नसते ,तो असतो किंवा नसतो.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

“यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इछा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे”.

Motivational Quotes in Marathi for Students

Motivational Quotes in Marathi for Students

Motivational Quotes in Marathi for Students

खऱ्या विद्यार्थ्यांला कधीच सुट्टी नसते, सुट्टी हि त्याच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते.

ज्याला संधि मिलते तो नशीबवान. जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान. आणि जो संधिचे सोने करतो तो विजेता.

Prernadayak Suvichar in Marathi

Prernadayak Suvichar in Marathi

Prernadayak Suvichar in Marathi

 आपल्या नियतीचे मालक बना परंतु परिस्थितीचे गुलाम होवू नका. 

स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.

रस्ता सापडत नसेल तर…स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.

Prernadayak Status

Prernadayak Status

Prernadayak Status

 “कोणीही पाहत नसताना आपले काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा”

ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.

स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.

Prernadayak Suvichar

Prernadayak Suvichar

Prernadayak Suvichar

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही  तर, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

Marathi Motivational Quotes Images

Marathi Motivational Quotes Images

Marathi Motivational Quotes Images

माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडतात.

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.

तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या.

Marathi Motivational Quotes

Marathi Motivational Quotes

Marathi Motivational Quotes

हार पत्करण माझ ध्येय नाही कारण मी बनलोय जिंकण्यासाठी.

“जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.”

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.

Marathi Motivational Shayari

Marathi motivational Shayari

Marathi Motivational Shayari

कुणी तुमच्यासोबत नसेल तर घाबरू नका कारण उंच उडणारे गरुड खु कमी असतात.

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

स्वत:वर विश्वास ठेवता पण हा यशस्वी होण्याच्या मर्गातला पहिला टप्पा आहे.

Marathi Motivational Status for Whatsapp

Marathi Motivational Status for Whatsapp

Marathi Motivational Status for Whatsapp

यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्या हि अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे.

भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती..

माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.

Marathi Motivational Thoughts Images

Marathi Motivational Thoughts Images

Marathi Motivational Thoughts Images

जर मला झाड तोडायला 6 तास दिलेत तर मी 4 तास कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी खर्च करेल.

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.

अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात. तेव्हा आपन यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते.

Marathi Motivational Thoughts

Marathi Motivational Thoughts

Marathi Motivational Thoughts

जिंकण्याची मजा तेव्हाच येते….जेव्हा सर्वजन तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात….

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.

स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते….

Marathi SMS Motivational

Marathi SMS Motivational

Marathi SMS Motivational

100 लोकांच्या शर्यतीत पाहिलं येण्यासाठी 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळ करावं लागतं.

जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असालं तर, तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि, तुम्ही किती असामान्य आहात.

Marathi Status for Motivation

Marathi Status for Motivation

Marathi Status for Motivation

आपली खरी स्वप्न तीच आहे जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास आई सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

काहीही झाल तरी प्रयत्न सोडू नका.

Marathi Suvichar for Whatsapp

Marathi Suvichar for Whatsapp

Marathi Suvichar for Whatsapp

खंबीरपणे उभे रहा जग तुमचे काही बिघडवू शकत नाही.

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.

यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकाठीन, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.

Motivation Marathi Status

Motivation Marathi Status

Motivation Marathi Status

आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.

सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि, जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळत, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.

व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खूप फरक असतो.

Motivation Thought in Marathi

Motivation Thought in Marathi

Motivation Thought in Marathi

तुमच्या धेय्यावरून जग तुम्हाला ओळखत असतं.

मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.

प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्क्की गाढतात.

Motivational Images in Marathi

Motivational Images in Marathi

Motivational Images in Marathi

“यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजुन एकदा प्रयत्न करने होय”.

आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.

उठा आणि संघर्ष करा!

Motivational Marathi Status

Motivational Marathi Status

Motivational Marathi Status

 दुनिया आपल्याला तो पर्यंत हरवू शकत नाही जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही.

स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.

कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.

Motivational Marathi Suvichar

Motivational Marathi Suvichar

Motivational Marathi Suvichar

 परिश्रम हे जीवनाच्या साफल्याचे रहस्य आहे.

विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!

Motivational Msg in Marathi

Motivational Msg in Marathi

Motivational Msg in Marathi

 उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते झोपून स्वप्न पाहत राहा, किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा.

सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते!

Motivational Quotes in Marathi for Students

Motivational Quotes in Marathi for Students

Motivational Quotes in Marathi for Students

 काहीही झालं तरी प्रयत्न करणे सोडू नका.

नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल.

अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधात बसू नका. नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.

Motivational Quotes in Marathi for Success

Motivational Quotes in Marathi for Success

Motivational Quotes in Marathi for Success

गणितात कच्चे असाल तरी चालेल पण हिशोबात पक्के रहा.

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

कोणत्याही संकाटाशिवाय मिळणारे यश हा “विजय” ठरतो; पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो.

सुविचार मराठी मध्ये छोटे

जीवन सुविचार मराठी

शालेय सुविचार मराठी छोटे

कर्तव्य सुविचार मराठी

सुंदर सुविचार मराठी

सुविचार मराठी सुविचार

सुविचार मराठी छोटे 50

सुविचार मराठी छोटे photo

2लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

3मराठी बात में

4लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

5ट्रान्सलटे इंग्लिश तो मराठी

fly