उस्ताद बिस्मिल्लाह खान आणि भगवान श्रीकृष्ण!!🧵
खालील थ्रेड हा सत्य घटनांवर आधारित आहे. उस्ताद बिस्मिल्लाह खान यांनी इल्लूस्ट्रेटेड विकली ऑफ इंडियाच्या संपादकाला पुढील घटनांबद्दल सांगितलेले आहे.
दररोज सकाळी बिस्मिल्लाह खान यांचे मामा अली बक्ष हे शेजारी असलेल्या जडौ श्री बालाजी म्हणजेच महा-विष्णु मंदिरात जात होते. त्यावेळी त्यांना दिवसभर शहनाई वाजवल्यानंतर महिन्याला चार रुपये मिळायचे. बिस्मिल्लाह सुद्धा कधी-कधी सकाळी त्यांच्या मागे जायचे, त्यांचे संगीत ऐकायचे, मोहित व्हायचे आणि गोंधळून जायचे.
मामा आणि भाचे हे दोघे सकाळच्या सत्रातील काम पूर्ण झाल्यानंतर जडौ मंदिरातील बालाजी मंदिरात जायचे. तेथे अली बक्ष यांच्यासाठी एक खोली नेमून दिली होती. दिवसभर जवळपास पाच तास ते तिथे सराव करित असे आणि ज्यावेळी अली बक्ष यांचा सराव संपायचा त्यावेळी त्यांना दिसायचं की, बिस्मिल्लाह हे त्यांच्यासमोर बसलेले आहेत आणि एका भुकेल्यासारखे ऐकताहेत.
बिस्मिल्लाहनी कधीही आपल्या मामांना त्रास दिला नाही. परंतु बिस्मिल्लाह नेहमी गोंधळून जायचे की, त्यांचे मामा हे बालाजी मंदिराच्या खोलीत सराव करण्यासाठी का जातात? कारण तोच सराव ते घरी सुद्धा करू शकतात आणि त्यांना कोणीही त्रास सुद्धा देणार नाही. याचे कारण जाणून घेण्याची उत्सुकता त्यांना नेहमीच असायची आणि एकेदिवशी न राहवून त्यांनी मामांना याबद्दल विचारले.
मामांनी आपल्या कुलपावर शेवटचा हात मारला आणि उत्तर दिले, 'एकदिवस तुम्हाला ते नक्की कळेल'. बिस्मिल्लाहने पटकन विचारले, 'पण मामू मी शहनाई कधी वाजवणार?' आणि मामू म्हणाले, 'कधी वाजवणार? ही काय विचारायची गोष्ट आहे का? तू आजपासूनच सुरुवात करीत आहेस'.
लगेच मामा अली यांनी त्या संध्याकाळी बिस्मिल्लाह यांना जडौ महाविष्णू मंदिरात घेऊन गेले आणि त्यानंतर बालाजी मंदिराच्या 'त्या' खोलीत घेऊन गेले ज्या खोलीत त्यांनी रात्रीच्या शहनाई वादनानंतर जवळजवळ 18 वर्षे सराव केला होता. शेवटी मामू अली यांनी बिस्मिल्लाह खान यांना तिथे सराव करण्याची परवानगी दिली. ती परवानगी देत असताना मामू अली यांनी त्यांना एक 'ताकीद' दिली की, या मंदिरात जर तुला काही वेगळा अनुभव आला किंवा काही वेगळे दिसले? तर कोणाला काहीही सांगायचे नाही.
बिस्मिल्लाह खूप आनंदित झाले आणि त्यांनी त्या खोलीत चार ते सहा तास सराव केला, चार भिंतीच्या बाहेर होणार्या बदलांकडे दुर्लक्ष करून त्यांनी संगीताच्या सुर-तालाची नवीन उंची आणि खोली शोधून काढली, आपले संगीत सुधारण्याच्या इच्छेने बिस्मिल्लाह यांना झपाटून टाकले होते.
एकेदिवशी बिस्मिल्लाह खान हे पहाटे चारच्या सुमारास बालाजी मंदिराच्या आवारात एकटेच होते आणि ते त्यांच्या शहनाईच्या सरावात मग्न होते. त्यावेळी अचानक त्यांना आपल्या शेजारी कोणीतरी बसले असल्याची जाणीव झाली आणि जेव्हा त्यांनी बघितले तर ते दुसरे कोणी नसून 'भगवान बालाजी' होते.
'भगवान बालाजी' आपल्या शेजारी बसलेले असलेले बघून बिस्मिल्लाह हे स्तब्ध झाले आणि अवाक राहिले. त्यांचा अवाकपणा बघून भगवान बालाजीनी हसत हसत म्हटले की, 'वाजवा'. परंतु बिस्मिल्लाह हे अजूनही आश्चर्याच्या धक्क्यातून सावरू शकले नव्हते आणि त्यामुळे भगवान बालाजी हसले आणि तिथून निघून गेले.
बिस्मिल्लाह खान हे त्यादिवशी लगेच आपले गुरु आणि मामा अली बक्ष यांच्याकडे गेले आणि घडलेला प्रसंग त्यांना सांगितला. तो प्रसंग ऐकताच मामा अली यांनी बिस्मिल्ला यांच्या गालफडात लावली आणि त्यांना सांगितले की, तुला मी सांगितलं होतं की काहीही वेगळे दिसले किंवा अनुभव आला तर कोणाला काहीही बोलायचे नाही. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की, शहनाईवादक उस्ताद बिस्मिल्लाह खान यांची व भगवान श्रीकृष्णाची प्रत्यक्ष भेट झालेली होती.
मुस्लीम श्रद्धा असूनही प्रसिद्ध उस्ताद बिस्मिल्ला खान हे भगवान श्रीकृष्णाबद्दल प्रचंड आदर बाळगतात. ज्यामुळे दयाळू असलेला परमेश्वर श्रीकृष्ण हा त्यांच्यासमोर स्वतः प्रकट झाला असावा.
वरील कथा ही उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या मुलाखतीवर आधारित आहे. जी 'मल्याळम मनोरमा'मध्ये डॉक्टर मधु वासुदेवन यांनी प्रकाशित केली होती.
बर्याच वर्षापूर्वी उस्ताद बिस्मिल्लाह खान एकदा 'जमशेदपूर ते वाराणसी' असा रेल्वेने प्रवास करीत होते. उस्ताद हे कोळशावर चालणार्या पॅसेंजर ट्रेन मध्ये थर्ड क्लासच्या डब्यात प्रवास करीत होते.
एका मध्यम ग्रामीण रेल्वे स्थानकावरून ज्या बोगीत उस्ताद बसले होते त्याच बोगीत एक तरुण गोरक्षक आला. तो दिसायला सावळा आणि हडकुळा असलेला तरुण होता व तो बासुरी वाजवत होता.
उस्ताद असलेले बिस्मिल्ला त्या तरुणाच्या उत्तम दर्जाच्या संगीताने थक्क झाले. कारण तो तरुण कोणता 'राग' वाजवित आहे? याची सुद्धा त्यांना कल्पना येत नव्हती. उस्ताद बिस्मिल्लाह यांच्या म्हणण्यानुसार, 'हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात 'भगवान श्रीकृष्ण' होते जे स्वतः 'परमात्मा' आहेत'.
तरुणाच्या (कृष्णाच्या) बासरीतून वाहू लागलेल्या या नाद-ब्रम्हातील (संगीताच्या रूपातील ब्रह्म) अमृततुल्यामुळे उस्तादांचे हृदय आनंदाने भरले आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
त्या तरुणाच्या (कृष्णाच्या) या अतुलनीय बासरीवादनानंतर उस्तादांनी त्या तरुणाला (कृष्णाला) जवळ बोलावले आणि त्याला आपल्याजवळ असलेल्या रोख रकमेतून एक चतुर्थांश भाग दिला व त्याला पुन्हा तोच 'राग' वाजवण्यास सांगितले. तो तरुण म्हणजे 'भगवान कृष्ण' बासुरीवादन करण्यास खुशीने तयार झाला आणि उस्ताद बिस्मिल्लाह यांच्याकडील सर्व रोख रक्कम संपेपर्यंत असेच चक्र सुरू राहिले आणि जेव्हा हे चक्र थांबले. त्याच्या पुढच्याच रेल्वे स्टेशन तो तरुण (कृष्ण) उतरला आणि गायब झाला.
खरं म्हणजे उस्ताद बिस्मिल्लाह खान हे कुंभमेळ्याशी संबंधित एका संगीत मैफलीत भाग घेण्यासाठी जात होते. त्या मैफिलीत उस्ताद यांनी नवीन 'राग' जो त्यादिवशी त्यांनी कृष्णाकडून शिकला होता. तो शहनाईवर वाजवला. श्रोत्यांना त्यांचा हा नवीन सुरेल असा 'राग' इतका आवडला की उस्तादांना तो पुन्हा पुन्हा वादन करण्याची लोकांनी विनंती केली.
तिथे असलेल्या अनेक संगीत अभ्यासकांना त्या 'रागा'ला काय म्हणतात? हे समजू शकले नाही म्हणून त्यांनी बिस्मिल्लाह खान यांना याबद्दल विचारले. उस्ताद यांच्या म्हणण्यानुसार या रागाचे नाव 'कान्हारीरा' होते.
दुसर्या दिवशीच्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या या नवीन मधुर 'रागा'बद्दलच्या बातम्या छापल्या गेल्या.
ते वाचून प्रसिद्ध संगीतकार (बासरीवादक) हरिप्रसाद चौरसिया यांनी बिस्मिल्ला खाँ यांच्याकडे 'कान्हारीरा' रागाच्या गुंतागुंतीबद्दल विचारपूस केली.
उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांनी त्यांच्याकडे 'सत्या'ची कबुली दिली आणि 'कान्हारीरा' राग गाऊन दाखवला. तो ऐकल्यानंतर जगातील सर्वात महान बासरीवादक हरिप्रकाश चौरसिया यांच्या डोळ्यातून सुद्धा आनंदाश्रू निघाले.
'कान्हारीरा' हा भारतीय संगीतातील एक पवित्र 'राग' आहे. कारण ते 'श्री' कडून आलेले आहे. देवांचे देव कृष्णाच्या 'कमलरुपी' ओठांतून ते आलेले आहे.
जेव्हा त्यांच्या शिष्याचा सन्मान करण्याचा विचार भगवान श्रीकृष्णाच्या मनात येतो तेव्हा त्यांच्या सन्मानाच्या पद्धती या खूप रहस्यमय असतात. भगवान श्रीकृष्ण हे जात, पंथ किंवा धर्मावर आधारित भेदभाव करत नाहीत. फक्त आणि फक्त 'भक्ती' इतकीच एक अट त्यांची असते.
सर्वं श्रीकृष्णार्पणम् !
धन्यवाद!