शनिवार, 29 अप्रैल 2023

सिंगापूरचा भाग्यविधाता - ली क्वान यू | Lee Kuan Yew | ली कुआन यू

  सिंगापूरचा भाग्यविधाता - ली क्वान यू   





सिंगापूरला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या पंतप्रधानपदाची जबाबदारी ली यांच्यावर आपसूकच आली. आधीपासून ते लोकांच्या समस्या सोडवणारे नेते होतेच. केम्ब्रिजमधून कायद्याची पदवी गुणवत्तेसह उत्तीर्ण झालेल्या ली यांनी काही काळ वकिलीही केली. पण नंतर स्वतंत्र झालेल्या सिंगापूरसाठी स्वतःला वाहून घेतले. सिंगापूरच्या प्रगतीसाठी काय करता येईल, त्याला जागतिक स्तरावर एक राष्ट्र म्हणून मानाचे स्थान कसे प्राप्त करून या विचारांनी त्यांना पछाडले होते. सिंगापूरसमोर अनेक समस्या आ वासून उभ्या होत्या. शेतीसाठी पुरेशी सुपीक जमीन नव्हती, नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभाव होता. गरिबी, अस्वच्छता, भ्रष्टाचाराने देश बरबटलेला होता. विविध वंशीय आणि विविध भाषा बोलणारे लोक सिंगापूरमध्ये स्थायिक झाले होते. पण ली यांनी धैर्याने या सगळ्या संकटांचा सामना करायचे ठरवले. एकेक पाऊल ते विश्वासानं आणि निर्धारानं टाकत गेले. 


सिंगापूरवासी नागरिक मेहनती होते. पण या विविध धर्म, वंशाच्या लोकांना एकत्र आणणे, त्यांच्यात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणे सोपे नव्हते. त्यासाठी ली यांनी वेगळ्या विचारांची वाट निवडली. ते सुरुवातीला डाव्या विचारसरणीचे असले तरी पुढे त्यांनी आपल्या विचारसरणीत बदल घडवून आणला. साम्यवादी विचारांची कास धरून आपल्याला चालणार नाही हे त्यांच्या लक्षात आले. लोकांमध्ये प्रबोधन घडवून त्यांच्या विचारसरणीत हळूहळू बदल घडवून आणावा लागेल असे त्यांना वाटत होते. ली तसे उच्चभ्रू ब्रिटिश संस्कृतीत वाढले होते. पण परिस्थितीनुसार ते स्वतःमध्ये बदल घडवत गेले. 


बिअर आणि गोल्फ या दोन ली यांच्या आवडीच्या गोष्टी. जीवनाचा आनंद घेणे, नियमित व्यायाम करून आपले शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवणे आणि सकारात्मक विचार करणे या गोष्टींवर त्यांचा भर होता. 


गोल्फच्या खेळात खेळताना मैदानावर असलेल्या छोट्याशा खळग्यात आपल्या हातात असणाऱ्या दांडीवजा बॅटने चेंडू टोलवायचा असतो. तो खळग्यात किंवा जास्तीत जास्त खळग्यांजवळ जाईल अशा कौशल्याने खेळ खेळावा लागतो. वाऱ्याचा वेग, चेंडूचे वजन, बॅटच्या फटक्यांचा जोर या सगळ्यांचा अंदाज घेऊन चेंडू टोलवावा लागतो. कुशल खेळाडू हे सरावामुळे सहज करू शकतो. ली यांच्यावर असलेली सिंगापूरची जबाबदारी काहीशी या खेळासारखीच नव्हती का ? सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊनच त्यांना हा चेंडू टोलवावा लागणार होता. त्यांना सिंगापूरला मानाचे स्थान प्राप्त करून द्यायचे होते. 


ली म्हणजे सिंगापूरला लाभलेला एक आगळावेगळा असा पंतप्रधान होता. सतत नवनवीन गोष्टी शिकून घेऊन स्वतःला अद्ययावत ठेवणे हा ली यांचा स्वभाव होता. ली यांनी अशीच एक आगळीवेगळी गोष्ट केली. त्यांनी सिंगापूरच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळत असतानाच १९६८ मध्ये अमेरिकेतील  सुप्रसिद्ध हार्वर्ड बिझिनेस स्कुलमध्ये व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी प्रवेश घेतला. पंतप्रधान पदावर कार्यरत असताना जगातील कोणत्याही पंतप्रधानाने यापूर्वी असे केले नव्हते. या मॅनेजमेंटच्या अभ्यासाचा उपयोग त्यांना सिंगापूरचे व्यवस्थापन उत्तम प्रकारे करण्यासाठी आणि सिंगापूरला प्रगतीपथावर नेण्यासाठी झाला. 


सिंगापूरमध्ये कमालीची विषमता होती. केवळ काही मोजक्याच लोकांजवळ स्वतःची घरे होती. ज्यांच्या हाती उद्योग आणि संपत्ती केंद्रित झाली होती, अशा लोकांजवळ भरपूर पैसे, स्वतःची प्रशस्त घरे होती.  बहुसंख्य जनता झोपडीतच राहत होती. अवतीभवती घाणीचं साम्राज्य होतं. लोकांना उद्योगधंदा नव्हता. तसे लोक मेहनती पण त्यांना रोजगार उपलब्ध नव्हता. ली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि कामगार वर्गाला स्वतःची घरे मिळवून द्यायची योजना आखली. त्यासाठी हौसिंग डेव्हलपमेंट बोर्ड स्थापन केले. अत्यंत कमी किमतीत गरीब जनतेला सुंदर आणि आवश्यक सुखसोयींनी युक्त अशी घरे बांधून दिली. अशा रीतीने झोपडपट्टीचा प्रश्न निकाली काढला. पण लोकांना अजून स्वच्छता, आरोग्याचे महत्व पटले नव्हते. 


त्यांच्या मंत्रिमंडळाने यासाठी अत्यंत कडक कायद्यांची तरतूद केली. लोकांचे प्रबोधन करणे आणि नियमांचे उल्लंघन केल्यास कडक शिक्षा वा दंड करणे अशी दुहेरी पद्धत त्यांनी अवलंबली. इमारतींभोवती घाण आढळली तर इमारतीत राहणाऱ्या सगळ्याच रहिवाशांना दंड भरावा लागे. बसमध्ये किंवा रस्त्यावर एखाद्या मुलाने घाण केली तर पोलीस त्याच्या पालकांना बोलावून ती घाण साफ करायला लावत. कितीही मोठा उच्चपदस्थ अधिकारी वा व्यक्ती असली तरी त्याची या शिक्षेतून सुटका होत नव्हती.


 येथील वाहतुकीचे नियम तर अतिशय कडक आहेत. वाहतुकीच्या नियमांचे लोक कसोशीने पालन करतात. सिग्नल कोणीही तोडत नाही. वेगाची ठरलेली मर्यादा कोणीही ओलांडत नाही. नियम तोडल्यास जबर शिक्षा किंवा दंड भरावा लागतो.  लोकांच्या अंगवळणी पडलेल्या सवयी बदलायला वेळ जरूर लागतो. पण राजकीय नेतृत्वाकडे इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी असेल तर यात नक्की सुधारणा होऊ शकते. लोकांच्या सवयी बदलतात आणि त्यांना शिस्त लागते हे आपल्याला सिंगापूरकडे पाहिले म्हणजे कळते.


सिंगापूरमध्ये सुरुवातीला प्रचंड भ्रष्टाचार होता. ली यांनी कठोरपणे हा भ्रष्टाचार निपटून काढायचे ठरवले. त्यासाठी कडक कायदे केले. भ्रष्टाचार विरोधी पथकाला त्यांनी त्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिलं. सामान्य माणूस असो, मंत्रीअसो वा अधिकारी, भ्रष्टाचार सिद्ध झाला तर त्यांना तुरुंगवास हा अटळ. आज सिंगापूर भ्रष्टाचार मुक्त राष्ट्रातील एक देश आहे.


 कामचुकार लोकांसाठी त्यांच्या प्रशासनात जागा नव्हती. शिस्तप्रिय आणि काम करणाऱ्या लोकांना हुशार विद्यार्थ्यांना त्यांनी उत्तेजन दिले. अमली पदार्थ जवळ बाळगणे वा त्याची तस्करी करणे हा गंभीर गुन्हा आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास सिंगापूरमध्ये अशा व्यक्तीला फाशीच्या शिक्षेपासून कोणी वाचवू शकत नाही. 


पंतप्रधान झाल्यानंतर सिंगापूरच्या रक्षणाच्या दृष्टीने ली यांनी अत्याधुनिक लष्कराची उभारणी केली. त्यासाठी इस्रायल या छोट्या देशाचा आदर्श त्यांच्यासमोर होता. इस्रायलच्या मदतीने आणि मार्गदर्शनाखाली त्यांनी अत्यंत सुसज्ज, शिस्तबद्ध आणि लढाऊ लष्कराची बांधणी केली. आज सिंगापूरचे लष्कर जगातील श्रेष्ठ लष्करांपैकी एक आहे. सिंगापूरमधील अठरा वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांना दोन वर्षे राष्ट्रीय सेवा योजनेसाठी द्यावी लागतात. त्यात लष्करी शिक्षणाचा समावेश असतो. या योजनेत प्रशिक्षणासाठी विविध धर्म, भाषा आणि  वंशाचे तरुण एकत्र येतात. या प्रशिक्षणादरम्यान त्यांच्यातील धर्म, भाषा आदींच्या जाणीवा बोथट होऊन आपण सगळे सिंगापूरवासी आहोत, सिंगापूरचे नागरिक आहोत आणि त्या राष्ट्राच्या भल्यासाठी आपल्याला काम करायचे आहे अशी राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होते. 


ली आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सगळेच सहकारी आपल्या देशासाठी झटणारे होते. अर्थात ली आणि त्यांचे बुद्धिमान सहकारी गोह केंग स्वी, लिम किन स्विम आणि इतरांनी सिंगापूरसाठी अथक कष्ट तर झेललेच पण आपल्या सहकाऱ्यांमध्ये आणि देशातील नागरिकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले.


 सिंगापूरमधील लोक मेहनती तर होतेच. ली सरकारच्या धोरणांमुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या सिंगापूरमध्ये आल्या. अनेक नवीन उद्योग सुरु झाले. लोकांच्या हातांना रोजगार मिळाला. सिंगापूरमध्ये उपलब्ध असलेली जमीन फार कमी होती. जी काही थोडीफार जमीन होती, तिची धूप मोठ्या प्रमाणात होऊन ती नापीक झाली होती. अशा जमिनीच्या वरच्या थरात भर घालून त्या जमिनीची सुपीकता वाढवण्यात आणि धूप थांबविण्यात त्यांनी यश मिळवले. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन त्या जमिनीवर वृक्ष लागवड केली. सिंगापूरला जगातील सर्वात जास्त हरित शहरांपैकी एक बनवण्याचा चमत्कार करून दाखवला.


देशाच्या नेतृत्वाकडे दूरदृष्टी असेल तर असलेल्या समस्यांवर रडत न बसता हातात जे काही उपलब्ध असेल,त्याच्या साहाय्याने कशी प्रगती करता येते हे सिंगापूरकडे पाहिले तर आपल्याला कळू शकते. सिंगापूरच्या पर्यटन व्यवसायाला ली यांनी चालना दिली. सिंगापूरला आज पर्यटन व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर परकीय चलन प्राप्त होते. सिंगापूर हे जगातील अनेक लोकांच्या दृष्टीने उत्तम पर्यटनस्थळ आहे.

पैशाच्या आसक्तित राहू नये.

 


पैशाच्या आसक्तित राहू नये.


कामवासना आणि पैसा ही दोन्ही परमार्थाला विघातक आहेत; पण मला जर कोणी विचारले की, 'त्यातल्या त्यात जास्त घातक कोणते ते सांगा ?' तर मी सांगेन की, 'पैसा हा त्यांतला त्यात परमार्थाला जास्त हानिकारक आहे. पैसा हा भगवंताची निष्ठा कमी करतो.' 


भगवंताने आपल्याला पैसा दिला आहे, तो आपण सत्पात्र आहोत म्हणून का दिला आहे ? यासाठी, भिकार्‍याला पैसा देताना उगीच वाद घालू नये. तसे करणे म्हणजे काही न करण्याची बुद्धी होय. 


एखादा त्यागी मनुष्य सर्व देईल पण 'स्व' देणार नाही. 'स्व' देऊन मग 'सर्व' ठेवले तरी चालेल, पण 'सर्व' देऊन 'स्व' ठेवला तर ते मात्र चालणार नाही; म्हणजेच, 'मी देतो' ही भावना राहिली तर सर्वच देणे वाया जाते. मुख्य म्हणजे त्यातली वासना गेली पाहिजे, तर खरे सुख लागते.


देह हा पाया धरून त्यावर इमारत बांधू लागलो तर इमारत पक्की कशी होणार ? मी 'माझा' देह म्हणतो, पण ताप येणे न येणे, इजा होणे न होणे, हे आपल्या हातात आहे का ? 'मी माझे रक्षण करीन ' असे म्हणतो, पण वाटेत ठेच लागून पडल्यावर लोकांनी मला घरी आणावे लागते; म्हणजे जीवित किती परस्वाधीन आहे ! देहाने कितीही कार्य केले तरी ते कळसाला नाही पोहोचणार. अभिमानाने केलेले कार्य कसे कळसाला पोहोचणार ? एक भगवदिच्छेने कार्य केले तरच ते शेवटाला जाते. 


समर्थांनी देहबुद्धी नष्ट करून, रामाचे अधिष्ठान ठेवून कार्य केले; म्हणून त्यांना एवढे कार्य करता आले. जो भगवंताचा झाला त्याचेच कार्य पूर्ण झाले, आणि त्यालाच खरे समाधान मिळाले.


राजाच्या पोटी आलेले देखील भिकारी होऊन जातात, मग मी संपत्तीचा कुठे गर्व करावा ? पैशाने प्रेमात बिघाड येतो आणि अगदी जवळचे नातेवाईकसुद्धा दूर होतात. मी खरे सांगतो, पैशाच्या आसक्तित तुम्ही राहू नका. ही आसक्ति नाहीशी करण्याचा सोपा उपाय म्हणजे संतसमागम हाच होय. 


आज खरे संतच कुठे आहेत असे आपण म्हणतो, पण आम्हाला संत भेटावा ही तळमळच खरी लागलेली नसते. संतात संतपणा दिसत नाही याचे कारण आमच्यात तळमळ नाही. सत्ययुगात जो राम होता तोच आजही आहे, पण माझा भावच कमी झाला त्याला काय करावे ! 

संतांना आपण खोटेपणा देतो. पण माझा भाव शुद्ध नाही हे नाही जाणत. 


विषयात सुख आपल्या इच्छेप्रमाणे मिळत नाही, म्हणून आपण संताकडे जातो. पण संताला अर्पण करून घेण्याकरिता कितीजण संताकडे जातात ? देवाकरिता देवाकडे जाणारे किती बरे निघतील ?

शुक्रवार, 28 अप्रैल 2023

🏵️ वहीनी...!

 🏵️🌀🌀🌀🌀🌀🏵️

 वहीनी...!

🏵️🌀🌀🌀🌀🌀🏵️

वहिनी अगदी पारंपारिक पद्धतीने आली आणि बोहल्यावर चढली निमूट सप्तपदी पूर्ण करून. दादाचा हात धरून विना तक्रार दादाच्या साध्या घरात आली, सामावली...


पण तरी माहेर काही तिचं सुटलं नाही. सासरी जे घडेल, त्याच्या वरचढ तिच्या माहेरी घडलेलं असायचं. त्यात कुणाला कधी खटकलं नाही, कारण एरवी तिचं वागणं अगदी सालस आणि समजूतदार होतं..


तिचं माहेरही होतंच तसं तालेवार; त्यानी हसतमुखाने मुलगी या साध्या घरी दिली, ती केवळ माणसं बघूनच. त्यामुळे त्यांच्याकडूनही कधी आगाऊपणा झाला नाही, की अवमान झाला नाही.


वर्षातून दोनदा वहिनी माहेरी जायची त्यात एकदा दादा तिला आणायला जायचा... हे आता आमच्या लहानपणापासून माहीत झालं होतं.


ती माहेराहून आली, की पुढचे काही दिवस तिच्या बोलण्यातून सतत माहेरचे वारेजंग दाखले ऐकावे लागायचे.. अर्थात ते ऐकण्यासारखेच असायचे. त्यांचा भलामोठा वाडा, त्यांची लांबच लांब पसरलेली बाग, फुलांचा ढीग, बागेशी येणारे मोर, वाट चुकून आलेली हरणं सगळंच स्वप्नवत वाटावं असं !


म्हणजे ही स्केटींग करण्यात मनमुराद वेगावर स्वार होणारी  मुलगी...  दादाच्या सोबत इथल्या घरात स्थिरावलीच कशी ? याचं आश्चर्य वाटतं ?


मधे तिचे भाऊ लंडनला शिक्षण पूर्ण करून आले आणि माहेरच्या गप्पा आणीकच वाढल्या... आम्हालाही ते ऐकायला आवडायचंच...  कारण तो परिसर, ती माणसं आम्हाला काही परकी नव्हती..


मी दहावीत नापास झालो, तेव्हा आईचं काही न ऐकता वहिनी मला तिच्या माहेरी घेऊन गेली होती. म्हणाली, "आता चार दिवस माणसं येऊन उगीच भंडावून सोडतील..."


चित्रपटात कसं पाहुणे आले, की ती घरची बाई नोकराला सांगते- "इन्हें इनका कमरा दिखाओ.." किंवा जवळचा कोणी असेल, तर "आओ, मैं तुम्हे तुम्हारा कमरा दिखाती हूँ" असं म्हणून दृश्यातून एक्झीट घेते..


पन्नाशी उलटली तरी मला या वाक्याचं अजूनही अप्रूप वाटतं..


वहिनीचं माहेरही तसंच चौसोपी होतं ! त्यात वहिनी माहेरची मोठी लेक ! त्यामुळे तिनेच त्या घराला एक शिस्त लावली होती..


मी वहिनीचा पाहुणा म्हणून माझीही त्या घरात खूप बडदास्त ठेवली गेली, मलाही माझी वेगळी खोली मिळाली होती. माझी "दहावी नापास होणं" एका अर्थी  "सेलिब्रेट" केलं जात होतं..


म्हणजे एकूण काय, अशी आमची मेघना वहिनी आणि तिचं माहेर हे आमच्या साठी एक अप्रूपच होतं..


मधल्या वर्षात दादाने पण खूप प्रगती केली. वहिनीच्या माहेराशी तुलनाच होऊ शकत नाही, पण तरी आमच्या परीने त्याने आसमान को हाथ छू लिये...


पण एक जाणवायला लागलं... वहिनीचं माहेराविषयी बोलणं कमी झालं. कधी बोललीच तरी त्यात पहिल्या सारखा आग्रह राहिला नव्हता.


मध्ये तिच्या माहेरचा जुना वाडा पाडून त्याहून आलिशान बंगला बांधला गेला. दोन्ही भावांची आॅफिसेस बंगल्याच्या आवारातच समाविष्ट केली होती...


वास्तुशांतीला मावशी सकट सगळेजण गेले होते. मलाही बोलावलं होतं, पण जायला जमलं नाही.


पण तिथूनच वहिनी एकदम गप्प झाली...


शेवटी न राहवून मी वहिनीला विचारलंच, "म्हटलं, हल्ली तू माहेरच्या घराबद्दल भरभरून बोलत नाहीस?"


ती खिन्नपणे म्हणाली,"काय बोलू?"


"काय झालं?" मी विचारलं.


ती म्हणाली, "तसं पाहिलं तर काहीच झालं नाही.. सगळं रीतीला धरून झालं. पण ती रीत मला मान्य करायला त्रास होतोय."


क्षणभर गप्प राहून ती म्हणाली, "आम्ही मुली सासरी येऊन माहेर मनात जपत असतो. आपण आता त्या घराला परके झालो, हे आमच्या लक्षातच येत नाही... आणि माहेरचे लेक परकी झाली...  हे गृहीतच धरून चलतात... खूप यातनामय आहे हे!"


"वहिनी, नीट सांग."

मी काकुळतीला येते म्हणालो..


तशी ती म्हणाली,

"काही नाही रेsssss आधी वाडा होता, त्यात माझी स्वत:ची खोली होती.. मला माझ्या खोलीचं कौतुक होतं. घरचेही त्या खोलीला ताईची खोलीच म्हणायचे."


"मग आता?"

मी नं राहवून विचारलं.


आता इतका आलिशान बंगला बांधला. एक मजला वाढवला पण त्यात मला कुठेच जागा नाही....


म्हणजे शंतनू (धाकटा भाऊ) आता दहा बारा वर्ष लंडनला जायचाय, तरी त्याची रूम आहे; ... आईबाबांची रूम असूनही आईची एक वेगळी रूम आहे, दादाच्या दोन्ही मुलांना वेगवेगळ्या रूम्स ..


पण ताईची जागा या घरात अबाधित आहे, असं कोणालाच वाटलं नाही..


मी सहज विचारून गेले 'माझी रूम?'


तर शंतनू म्हणाला, 'गेस्टरूम आहे ना... शिवाय स्टडीरूम आहेच.'


जागा होती, पण सामाऊन घेणं जे म्हणतात... ते  त्यांच्या लक्षातही आलं नाही..


मग मी मनापासून या घराकडे वळले या घरची होऊन गेले..


पण ही रीत मी मोडेन. आपण जेव्हा बंगला बांधू. मी छकुलीचं लग्न झालं, तरी तिची रूम तिला हवी तशी राखून ठेवेन...


गेस्टरूम मधे पाहुणे उतरवायचे... आपल्या लेकीबाळी नाही. त्या दुसर्‍या घरी गेल्या तरी... त्या आपल्याच असतात."


.....वहिनी भरभरून बोलत राहिली मी ऐकत राहिलो...


🎯 अपेंडीक्स म्हणजे काय ? 🎯

 ━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━

      🎯  अपेंडीक्स म्हणजे काय ?  🎯

━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━


अपेंडीक्स हा शब्द टॉन्सिल प्रमाणेच आपल्या परिचयाचा झालेला असतो आणि ऑपरेशन करून काढून संदर्भात तो येतो, त्यामुळे वरील प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. अपेंडीक्स हा पचनसंस्थेचा एक भाग आहे. मोठ्या आतड्याचा बारीक शेपटी सारखा वा करंगळी प्रमाणे दिसणारा हा भाग मोठ्या आतड्याशी लहान आतडे जिथे जुळते त्याजवळ असतो. 

तसे पाहता मानवामध्ये हा अवयव निरुपयोगीच. काही तज्ज्ञांच्या मते रोगप्रतिबंधक शक्ती निर्माण करण्यास याचा उपयोग होतो. जिवाणूंना अटकाव करण्याच्या याच्या कार्यामुळे यास पोटातील टॉन्सिल असेही म्हणतात. गायी-म्हशी सारख्या गवत खाणाऱ्या प्राण्यांमध्ये अपेंडीक्स बरेच मोठे असते व सेल्यूलोज पचन त्यात होते.


अपेंडीक्सच्या आतील पोकळीत अन्नकण अडकल्याने, पोटातील जंतांमुळे (बंद झाल्यास) त्यात जंतुसंसर्ग होऊन अपेंडीक्सला सूज येते. त्यास अपेंडीसायटीस असे म्हणतात. यात पोटात बेंबी खालील उजव्या भागात दुखते. ही वेदना तीव्र असते. सामान्यपणे उलटी सुद्धा होऊ शकते. पोटाचा तो भाग ताठर व दुखरा होतो. त्या व्यक्तीस बराच तापही असतो. 


त्यामुळे या व्याधीचे निदान झाल्यावर ते काढून टाकणे श्रेयस्कर ठरते. कारण असा त्रास रुग्णास वारंवार होऊ शकतो व त्याचा परिणाम म्हणून गंभीर गुंतागुंती होऊ शकतात. परंतु पोट दुखत असल्यास अपेंडीसायटीस असेल, असा गैरसमज करून घेणे योग्य नाही. पोटात दुखण्याची बरीच कारणे आहेत. पोटातील जंत, आमांश अशी कारणे आपल्याकडे बहुतांशी आढळतात. आजकाल अपेंडिक्स काढण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. विनोदाने अपेंडिक्स शल्यचिकित्सक यांची रोजीरोटी म्हटले जाते. 


वैद्यकीय क्षेत्रातही धंदेवाईकपणा वाढत चालल्याने रुग्णाने असे ऑपरेशन करून घेण्यापूर्वी २-३ तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास अनावश्यक शस्त्रक्रिया टळू शकेल.

❀ जेवताना पाणी पिण्याची सवय ❀

 ━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━

     ❀ जेवताना पाणी पिण्याची सवय ❀

━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━

 


पाणी प्यायल्यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. पण चुकीच्या वेळेस आणि चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्यास अनेक समस्याही उद्भवू शकतात. जर तुम्हाला जेवताना किंवा काही खाताना मध्येच पाणी प्यायची सवय असेल तर त्यामुळे होणारे नुकसान जाणून घेऊया.


पाणी हे आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेटेड राहतेच, शिवाय अनेक आजारांपासून आपण दूर राहतो. पण हेच पाणी काही वेळेस आपल्यासाठी हानिकारकही ठरू शकते. चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे हे आरोग्याला हानी पोहोचवू शकते.खरंतर बऱ्याच लोकांना काही खाताना किंवा जेवताना मध्येच किंवा जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. मात्र याच सवयीमुळे अनेक त्रास होऊ शकतो. तुम्हालाही अशी सवय असेल तर यामुळे काय नुकसान होते, हे जाणून घेऊया.


पचन क्रियेवर पडतो प्रभाव

जेवताना किंवा नंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनावर परिणाम होतो. खरे तर आपण जेव्हा अन्न खातो, तेव्हाच पचनक्रिया सुरू होते. अशा परिस्थितीत जेवणाच्या मध्येच पाणी प्यायल्याने या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे एकतर अन्न पचायला बराच वेळ लागतो किंवा कधी कधी अन्न नीट पचत नाही.

इन्सुलिनची पातळी वाढते

शरीरातील इन्सुलिन नावाचे हार्मोन स्वादुपिंडाद्वारे सोडले जाते. शरीरातील साखरेच्या प्रवाहात इन्सुलिनची महत्त्वाची भूमिका असते. पण जेवताना किंवा नंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. म्हणूनच जेवताना मध्येच पाण्याचे सेवन टाळणे चांगले ठरते.

ॲसिड रिफ्लेक्सचा त्रास होऊ शकतो

अन्नासोबतच पाणी प्यायल्याने ॲसिड रिफ्लेक्सची समस्या देखील उद्भवू शकते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, अन्न खाताना पाणी प्यायल्याने पोटात ॲसिडचे प्रमाण वाढते, त्यामुळे अनेक वेळा आंबट ढेकर येऊ लागतात. या समस्येलाच ॲसिड रिफ्लेक्स म्हणतात. एवढेच नाही तर जेवताना पाणी प्यायल्याने छातीत जळजळ होऊ शकते.

वजन वाढू शकते

जेवता पाणी प्यायल्याने लठ्ठपणाचा धोका संभवतो. खरंतर जेवताना पाणी प्यायल्याने पचनावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत अन्नाचे पचन नीट होत नाही, आणि जे अन्न पचत नाही त्यापासून तयार होणारे ग्लुकोज लठ्ठपणात बदलते. अशा परिस्थितीत जेवताना किंवा त्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीरातील साखर तर वाढतेच पण वजनातही वाढ होऊ शकते.

पोषक तत्वांची कमतरता

जर तुम्हाला जेवताना पाणी पिण्याची सवय असेल तर शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. अन्नातील पोषक तत्व शोषून घेणे हे आपल्या पचनसंस्थेचे काम असते. पण जेवताना मध्येच पाणी प्यायल्यास या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो, त्यामुळे आपल्या शरीरात पोषक तत्वांचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही.

ट्वीनिंग

 


ट्वीनिंग

 

                   खूप मोठ्या आणि सुरेख सजवलेल्या मांडवात सगळ्या नातेवाईकांची लगबग सुरू होती . नुकतीच वरमाला गळ्यात पडलेली आसावरी आणि आशिषची देखणी जोडी राजेशाही मंचावर उभं राहून ,  त्यांना भेटायला येणाऱ्या आप्त आणि मित्र मंडळींचे आशीर्वाद शुभेच्छा स्वीकारत होते . आसावरीचं  लक्ष सारखं बोटातल्या अंगठीकडे जात होतं . कालच साखरपुडा झाला ...तेव्हा आशिषने बोटात घातलेली अंगठी ..तशी छानच होती , पण ....कियाला  मनीष ने घेतलेली कसली भारी होती . लांबूनही चमकत होता त्यातला हिरा . खास मागवून घेतली होती म्हणे मुंबईवरून . नशीबवान आहे किया . मलाही तशीच हवी होती , पण सगळंच इतकं घाईत ठरलं की पसंतीला जायला सुद्धा वेळ मिळाला नाही . ती बोटातली अंगठी फिरवत असताना आशिषचा आवाज आला ...

" आसावरी , मामी आशीर्वाद देत आहेत . " आशिष हळूच तिच्या कानात पुटपुटला  तशी ती विचारातून बाहेर आली .

आशिष चे मामा मामी समोर बघून दोघेही नमस्कार करायला वाकले . आसावरी समारंभात असून नसल्यासारखी होती . 

 होमाच्या वेळी अशिषच्या आईवडिलांनी तिला दिलेला मोत्याचा सेट तिला आवडला नाही असं नाही , पण त्यात ' खास ' असं काही नव्हतं . तसे एकदोन सेट तिच्याकडे आधीपासूनच होते . आपल्या बाबतीत आपल्या इतर मैत्रिणींसारखं ' स्पेशल ' असं काही घडत नाहीये ह्या विचाराने ती अस्वस्थ होती . 

     गेल्या आठवड्यात रुचिरा कसलं वर्णन करून करून सांगत होती .... नुसती पसंती झाली तर  तिला सासर कडून  महागडी गढवाल , त्यावर शोभणारे मोती पोवळ्याचे दागिने मिळाले . बाकी साखरपुडा काय लग्न काय ... सगळंच डोळे दिपवणारं! 

तिच्या रिसेप्शनला तिने घातलेला गाऊन खास ' हिमानी रॉय ' कडून डिझाईन करून घेतला होता . 


           " आसावरी , अगं कुठे लक्ष आहे तुझं ? गौरिहार पुजला , निघायची वेळ झाली ...काय झालं बेटा ? चिंता नको करूस  सोनू , एकाच गावात आहोत आपण . नेहमी भेटत जाऊ ....आता छान हास बरं ..." हातात ओटी ठेवत आई म्हणाली , आणि तिला हुंदका फुटला . तिच्या भावना संमिश्र होत्या .    तिला वाटलं , आपल्याला रडू आलं त्याचं नेमकं कारण काय ? 

 माहेर सोडून जातोय हे ? नाही , सासर अगदी जवळ आहे ...मग ? नेमकी नाराजी कशामुळे ? आपलं लग्न कसं व्हावं , सगळं कशा पद्धतीने घडावं ह्याबद्दल आपण नकळत काही सप्न बघितलं होतं ....पण सत्यात जे घडतंय ते वाईट नाही , पण अपेक्षेप्रमाणे नाही ..ह्याचं वाईट वाटतंय . 

        मावशी , आत्या , आई बाबा आणि बाकी जवळचे नातेवाईक ह्यांना भेटून डोळे पुसत ती आशिष सोबत कार पर्यंत पोहोचली , आणि थबकली . एक साधीशी कार अगदी माफक सजवलेली ...पुन्हा तिचा चेहरा पडला . काय माणसं आहेत ही ? यांच्या घरची लक्ष्मी मी ....तिला घरी नेताना ही अशी नेणार ? काहीशा घुश्यातच ती आत बसली . सगळ्यांना निरोप देऊन कार निघाली ... त्याने तिच्याकडे प्रेमाने बघितले , पण तिची नजर  मान फिरवून खिडकी बाहेर ! त्यानं अलगद तिच्या हातावर हात ठेवला . तिने झटक्यात हात काढून घेऊन अजून अंग आक्रसून घेतलं .

" वाईट वाटतंय न? मी समजू शकतो , घरी लक्ष्मीपूजन झालं की एक चक्कर मारून येऊ आपण तुझ्या घरी . सगळ्यांना सरप्राइज देऊ ..चालेल ? " तो म्हणाला.

" नको . संध्याकाळी रिसेप्शन आहे . तेव्हा येणारच आहेत सगळे . इट्स ओके ." ती तुटकपणे म्हणाली .

" संध्याकाळच्या रिसेप्शन साठी घेतलेला घागरा नीट बसला न तुला ? फार कमी वेळ होता ग  , नाहीतर अजून बरेच मोठे मोठे शो रूम्स बघितले असते आपण . तुझ्या घाग्र्याला मॅचींग सूट घेतला बरं का मी . तुला फोटो पाठवला होता , आवडला न तुला ? " 

" मी तो तुम्ही घेऊन दिलेला घागरा घालणार नाहीये . मला हवा तसा गाऊन मिळाला चार दिवसांपूर्वी . तो घालणार आहे ." हे बोलताना तिच्या स्वरात किंचितसा अपराधी भाव जाणवला त्याला . पण तो काहीच बोलला नाही .

वाट बघून तिच म्हणाली , " चालेल न तुला ? तुझ्या घरचे नाराज तर नाही होणार ? कारण आता आपलं ट्वींनिंगही नाही होणार . "

" इट्स ओके . पण मला रंग सांगितला असतास तर मी पण घेतला असता तसा सूट .  नुसते कपडे मॅचिंग करून मनं जुळवता आली असती तर किती छान झालं असतं नाही ? " 

त्याच्या ह्या प्रश्नावर ती काहीच बोलली नाही .


                 दारात सजवलेलं माप ओलांडून दोघं आत आली . आल्या बरोबर थंडगार पन्ह्याचा ग्लास घेऊन खुद्द सासरेबुवा हजर .  "घ्या आसावरी मॅडम . तुमच्या सासरबुवांच्या हाताला चव आहे का बघा जरा ."  हे  मात्र तिच्यासाठी अगदी नवीन आणि खास होतं . तिचं मन वाचल्यागत. तिच्या शिणलेल्या मनाला असच  काहीतरी  पेय फार आवश्यक होतं . पन्ह अप्रतिम झालं होतं . 

      तिची बॅग घेऊन ती आणि आशिष त्यांच्या खोलीत गेले . आत मंद सुगंध होता ...तिच्या आवडीचा ...मोगऱ्याचा . हुश्श करून ती कॉटवर बसली , आणि समोरचा टेबल बघून ताडकन उभी राहिली .

तिच्या घराचा तिचा लाडका टेबल ...त्यावर तिचा आणि आईबाबांचा फोटो ...तिचा  टेबल lamp .. तिचा खास टेडी....तिची आवडती पुस्तकं ....तिने बालपणी जमवलेल्या पोस्टाच्या तिकिटांची चिकट वही ....आणि त्यावर एक पत्र .

अतिशय भारावलेल्या अवस्थेत तिने पत्र उघडलं ..." प्रिय आसावरी ...आपलं लग्न फार घाईत ठरलं ...एकमेकांना नीट जाणून घेण्यासाठी फार वेळ नाही मिळाला... लग्नाबद्दल तुझ्या मनात काही अपेक्षा असतील , तू काही स्वप्न बघितली असतील ...आणि कदाचित सत्यात त्यापेक्षा काही वेगळंच घडत असेल . पण मी तुला खात्री देतो की आपल्या सहजीवनात माझ्याकडून जाणतेपणी कधीही तुझं मन दुखावल्या जाणार नाही . लग्नातील धामधुमीत ह्या दोन दिवसात  नकळत कुठे तुझं मन दुखावलं गेलं असेल तर माफ कर . 

मुलगी आपलं घर आणि आपली माणसं सोडून एकदम अनोळख्या लोकांमध्ये येते तेव्हा तिची भावना काय असते हे पती म्हणून मी कदाचित नाही समजू शकणार ..पण एक जवळचा मित्र बनून,  भावसखा म्हणून जाणून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो . तुझं बालपण जिथे हुंदडलं त्या घराची सर ह्या घराला कदाचित नाही येणार , पण तुला कुठली उणीव भासू नये इतकं प्रेम नक्कीच देऊ शकतो . तुझा ....आशिष . " शेवटचा शब्द तिला नीट दिसलाच नाही , कारण ती अक्षरं ओली झाली होती . तिने मान वळवून त्याच्याकडे बघितलं , आणि धावत जाऊन त्याला बिलगली . त्यानेही आत्यंतिक प्रेमाने आपले हात तिच्या भोवती वेढून घेतले . 

" आसावरी , आता अशीच मला चीटकुन  रहाणार आहेस का ? तुला संध्याकाळची तयारी करायची आहे न  ? "

" हं .."

" तुझा तो खास गाऊन आणलाय न सोबत ? "

"आता तो  गाऊन नको , आपण तुमच्यातर्फे घेतलेला घागराच घालेन मी . आपल्याला ट्वींनिंग करायचंय न? कसं आहे न , मनं जुळली की बाकी आपोआप जुळतं . " म्हणत ती पुन्हा त्याला बिलगली .

पत्ता | शॉक कथा | आखिरी पत्ता की कहानी | ओ हेनरी | लघु कथाएं | कहानी सुनना चाहते हैं

 "पत्ता" (शॉक कथा)


माझ्या एका मित्राचे लग्न झाले. तो व त्याची बायको पहिल्यापासून एकाच गावात रहात होते.💁🏻‍♂️


  नवलाईचे दिवस छान चालले होते.🥰👩‍❤️‍👨


 लग्नाला साधारण एक दीड महिना झाल्यानंतर त्या मित्राची बायको एक दिवस त्याला म्हणाली की....💁‍♀️


 "माझ्या अमुक अमुक नावाच्या मैत्रिणीने आपल्या दोघांना आज संध्याकाळी चहाला बोलावले आहे."



 मित्र म्हणाला  "ठीक आहे, जाऊ या". 💁🏻‍♂️

आखिरी पत्ता की कहानी | 

 नवीन जोडप्याला असे बोलावण्याची पद्धत त्याकाळी होती. त्यानुसार संध्याकाळी त्यांनी जायची तयारी केली. मित्राने स्कूटर काढली व दोघेही त्या मैत्रिणीच्या घरी पोहोचले. चहा नाश्ता झाला. बराच वेळ गप्पा झाल्या. निघते वेळी एकदा तुम्हीही सगळे आमच्याकडे या असे बोलावणे करून  ते दोघे आपल्या घरी परत यायला निघाले.  


घरी परत येताना बायको गप्प गप्प होती. स्कूटर वर बसल्यावर ती नेहेमी नवऱ्याच्या खांद्यावर हात ठेवत असे. आत्ता मात्र तिने तसे केले नव्हते. ती सीटला धरून बसली होती. मित्राच्या मनात क्षणभर शंकेची पाल चुकचुकली......☹️

ओ हेनरी | 

  पण  त्याच्या मनात नुकत्याच झालेल्या पाहुणचाराचेच विचार घोळत होते. म्हणून त्याचे थोडे दुर्लक्ष झाले.  घरी आल्यावर थोड्याच वेळात मित्राला बायकोच्या गप्प असण्याची पुनश्च जाणीव झाली. त्याने काही विचारलं तर ती नुसतेच हूं हूं करत होती. त्याने न राहवून शेवटी विचारलेच की...🤔


 "काय झालंय? बोलत का नाहीयेस?"  त्यावर ती म्हणाली "काही नाही, बोलत आहे की."  

लघु कथाएं | 

पण हे काही खरे नव्हते. काही तरी घडले होते खास. पण काय असावे याचा त्याला अंदाज येत नव्हता.....😟


 बायकोच्या मैत्रिणीकडे पोहोचल्यावर आपण काही अकलेचे तारे तर तोडले नाहीत ना  हे तो आठवू लागला...... 🙆‍♂️


पण तसे काही घडल्याचे त्याला आठवले नाही. कारण तो तिथे गेल्यावर फार सावध राहिला होता. त्याने खबरदारी म्हणून बायकोच्या त्या मैत्रिणीकडे बघण्याचे कटाक्षाने टाळले होते......🫣

कहानी सुनना चाहते हैं

तिने विचारलेल्या प्रश्नांना तिच्याकडे न बघताच उत्तरे दिली होती. तो तिच्या नवऱ्याशी अघळ पघळ न बोलता माफक प्रमाणात बोलला होता. मुलांशी  कौतुकाने वागला होता. त्यांनी वहीत काढलेली विचित्र चित्रे कौतुकाने पाहिली होती.  मुलांनी गायलेली गाणी त्यातल्या बेसुरपणाकडे दुर्लक्ष करून तसेच चुकीच्या उच्चारातली स्तोत्रे  नापसंती न दर्शवता आवडल्यासारखे दाखवून ऐकली होती. तसेच ते सर्व मध्यंतरी साऊथला टूरवर गेले होते त्याचे मोबाईलवरील फोटो व व्हिडीओ न कंटाळता पाहिले होते.  चहाचे घोट फुर्र फुर्र आवाज न करता घेतले होते. तसेच जे खाणे केले होते तेही मचक मचक आवाज न करता खाल्ले होते.....😏


 त्यांच्याशी बोलताना बायकोची किंवा तिच्या माहेरच्या माणसांची निंदा नालस्ती किंवा टिंगल केली नव्हती. मोठ्ठ्याने हसण्याचे टाळले होते.  कितीही हसू आले तरी स्मितहास्यावर भागवले होते.  त्याच्या हिशेबाप्रमाणे तो सगळे  बरोबरच वागला होता......🙋‍♂️


 मग असे काय झाले होते की बायकोने रुसावे?😣


 घुम्यानेच जेवण झाले.  इकडे मित्राच्या पोटात खड्डा पडून हृदयाचे ठोके वाढत चालले होते......😰


 शेवटी  काकुळतीला येऊन त्याने शरणागती पत्करली व म्हणाला... "माझी काय चूक झाली आहे ते मला कळत नाहीये. तरीपण मी क्षमा मागतो. आता तरी अबोला सोड व सांग काय झाले ते?"


क्षमा शब्द ऐकल्यावर ती मनातल्या मनात एकदम प्रसन्न झाली. 🧏‍♀️


  पण ती खुषी चेहेऱ्यावर न दाखवता  शक्य होईल तेव्हढा चेहेरा कोरडा ठेवत तिने विचारले "ऐकायचंय का काय झालंय ते?" आता आमचा मित्र अर्धमेला झाला होता, तो उसने अवसान आणून म्हणाला "सांग बाई लवकर, मी कासावीस झालोय. मी तिथे काही चुकीचे तर वागलो नाही ना?" 😧🤒


त्याक्षणी वर्मावर अखेरचा घाव घालत ती उत्तरली ......


 "तुमचे तिथे काही चुकले नाही. चुकले ते त्याच्या जरा आधी.......🤨😠 

















"मी तुम्हाला ज्या मैत्रिणीकडे जायचे होते तिचे फक्त नांव सांगितले होते. तिचा पत्ता नव्हता सांगितला. तरी काहीही न सांगता सवरता वा न  विचारताच तुम्ही स्कूटर डायरेक्ट तिच्या दारात नेऊन कशी काय उभी केलीत?  तिचा पत्ता तुम्हाला कसा काय माहित?"......🧐🤨😠😡💁‍♀️


बुधवार, 26 अप्रैल 2023

सुंदर चेहरा / सुंदर वागणूक

सुंदर चेहरा / सुंदर वागणूक  



 एका सभेत गुरुजींनी एका ३० वर्षांच्या तरुणाला त्यांच्या प्रवचनाच्या वेळी उभे राहण्यास सांगितले.


"तू मुंबईत जुहू चौपाटीवर चालला आहेस आणि समोरून एक सुंदर मुलगी येत आहे, तू काय करशील?"


तरुण म्हणाला, "मी ती तिच्याकडे पाहेन."


गुरुजींनी विचारले, "ती मुलगी पुढे गेली तर मागे वळून बघशील का?"


मुलगा म्हणाला, "हो, बायको माझ्यासोबत नसेल तर." 

(सभेत सगळे हसले)


गुरुजींनी पुन्हा विचारले - "मला सांग, तो सुंदर चेहरा तुला किती दिवस लक्षात राहील?"


तरुण म्हणाला, "5-10 मिनिटे, जोपर्यंत दुसरा सुंदर चेहरा दिसत नाही."


गुरुजी त्या तरुणाला म्हणाले, 


"आता जरा कल्पना कर. तू जयपूरहून मुंबईला जात आहेस आणि मी तुला पुस्तकांचे एक पाकीट दिले आणि सांगितले की हे पाकीट मुंबईतल्या एका मोठया व्यक्तीला द्यायचे आहे...


पॅकेट डिलिव्हरी करण्यासाठी तुम्ही त्याच्या मुंबईतील घरी गेला तेव्हा तुम्हाला कळले की तो एक मोठा अब्जाधीश आहे.


घराबाहेर 10 गाड्या आणि 5 वॉचमन उभे आहेत.


तुम्ही आत पॅकेटची माहिती पाठवली, मग ते गृहस्थ स्वतः बाहेर आले. 


तुमच्याकडून पॅकेट घेतले. तूम्ही जायला निघाला तेव्हा घरी येण्याची विनंती केली. जवळ बसून गरमागरम जेवण दिले.


जाताना विचारले - 

"कसे आलात?"


तूम्ही म्हणालात, 

"लोकल ट्रेनमध्ये."


त्याने ड्रायव्हरला तुम्हाला इच्छित स्थळी नेण्यास सांगितले आणि तुम्ही तुमच्या जागेवर पोहोचणार इतक्यात त्या अब्जाधीश गृहस्थाचा फोन आला, 


"भाऊ, तुम्ही आरामात पोहोचलात ना!

आता मला सांग, किती दिवस त्या गृहस्थांची आठवण ठेवणार?"


तो तरुण म्हणाला, 

"गुरुजी! आपण अशा व्यक्तीला आयुष्यात मरेपर्यंत विसरू शकत नाही."


युवकाच्या माध्यमातून उपस्थितांना संबोधित करताना गुरुजी म्हणाले, 


"हे जीवनाचे वास्तव आहे.

सुंदर चेहरा थोड्या काळासाठी लक्षात राहतो, पण सुंदर वागणूक आयुष्यभर लक्षात राहते."


हाच जीवनाचा गुरुमंत्र आहे... चेहऱ्याच्या आणि शरीराच्या सौंदर्यापेक्षा तुमच्या वागणुकीच्या सौंदर्यावर लक्ष केंद्रित करा.. 


आयुष्य स्वतःसाठी आनंददायी आणि इतरांसाठी अविस्मरणीय प्रेरणादायी बनेल.

मंगलवार, 25 अप्रैल 2023

एरिक गारसेटी |एरिक गार्सेटी | Eric Garcetti



एरिक गारसेटी |एरिक गार्सेटी | Eric Garcetti 


यह है अमेरिकी वैचारिक हथियारघर की सबसे बड़ी तोप। नाम है एरिक गारसेटी। उम्र 52 वर्ष

लास एंजेलिस का मेयर रहा है। लोमड़ी की तरह चालाक और चीते की तरह फुर्तीला।जो बाइडेन की नाक का बाल। कट्टर कम्युनिस्ट है। 


आपने महाभारत युद्ध में सुना होगा कि अश्वत्थामा ने पांडवों पर ब्रह्मास्त्र चलाया था जिससे भगवान श्रीकृष्ण ने उत्तरा के गर्भ की रक्षा किया था। यह भी अपने आप को यही समझता है। 


ऐसा इसलिए कह रहा हूं क्योंकि यह व्यक्ति भारत में अमेरिका का राजदूत बनकर आ रहा है। वहीं से ललकारता हुआ आ रहा है कि 2024 में मोदी को उखाड़ फेंकूंगा। मोदी को जीतने नहीं दूंगा। इसके लिए जार्ज सोरोस ने 100 करोड़ डॉलर रख छोड़ा है कि किसी तरह मोदी को हटा दिया जाए।आपको शायद याद न हो कि पिछले दो सालों से भारत में कोई अमेरिकी राजदूत नहीं है। इसका कारण यह है कि जो बाइडेन को कोई ऐसा व्यक्ति नहीं मिल रहा था जो भारत की अर्थव्यवस्था को बढ़ने से रोक सके और मोदी को उखाड़ फेंके। अमेरिका में किसी देश में राजदूत नियुक्त करने की प्रक्रिया कुछ अलग ढंग की है। इसके लिए अमेरिकी सीनेट की संस्तुति लेना आवश्यक है। पिछले दो साल से जो बाइडेन बार-बार इसका नाम रख रहे थे पर सीनेट में रिपब्लिकन पार्टी का बहुमत था। 


रिपब्लिकन पार्टी का का कहना था कि एरिक गारसेटी का राजदूत बनना भारत अमेरिका के संबंधों को खतरा पहुंचाने जैसा होगा अंत में जार्ज सोरोस ने पैसे के बल पर दो रिपब्लिकन सदस्यों को सरकार की ओर मिलाकर बिल पास करा दिया। किसी भी दिन यह भारत में धमक सकता है। 


अंतरराष्ट्रीय राजनयिक प्रोटोकॉल ऐसा है कि भारत इंकार नहीं सकता। यह भारत आते ही विपक्षी दलों को एकजुट करने का प्रयास करेगा। भारत विरोधी एनजीओ और लुटियंस जोन के देशद्रोही मीडिया वालों को मिला कर काम करेगा। 


भारत के लिए राहत की बात यह है कि देश को एस जयशंकर जैसा योग्य विदेश मंत्री मिला है।एस जयशंकर ने कहा है कि चिंता की कोई बात नहीं है। एरिक गारसेटी को मैं बड़े "प्यार' से

समझा दूंगा। अब यह तो जानते ही होंगे कि एस जयशंकर का प्यार कैसा होता है।न मालूम हो यूरोपीय संघ के देशों से पूछ सकते हैं।

रत्न कोठे वापरावे , पोवळे रत्न अंगठी

 रत्न कोठे वापरावे -

ऋषीमुनींनी रत्न धारण करण्यासाठी अनेक अंगांचा निर्देष केलेला आहे. जसे की, अंगठी, ब्रेसलेट, कंकण,  रक्षाकरण्ड, बाजुबन्द इ. ठिकाणी रत्नांचा वापर करता येतो. पूर्वीच्या काळी राजे लोक मुगुट, देवघर, सिंहासन, तलवार, भोजनाचे पात्र यामध्ये सुध्दा रत्ने जडवीत असत

पुष्कराज रत्न फायदे

अनामिकेच्या ठिकाणी दोन रक्तवाहिन्या संयुक्त रूपाने पोचतात व इतर बोटांच्या ठिकाणी एकच रक्तवाहिनी येते. त्यामुळे अनामिका अत्यंत शुभ मानली आहे.

*रत्ने कोणत्या हातात धारण करावी *

ज्या हाताने आपण ईश्वराची पुजा करतो, देवकार्य करतो, तसेच भोजन करतो, तोच उजवा हात हा रत्न धारण करण्यासाठी स्त्री व पुरूष दोघांनाही शुभ असतो. स्त्रीयांनी डाव्या हातात रत्न धारण करावीत याला कोणताही आधार नाही.


पोवळे रत्न अंगठी


योग शास्त्रानुसार आपले उजवे अंग सुर्य नाडीच्या प्रभावाखाली येते सर्वच ग्रह परप्रकाशीत असुन सुर्य सोडुन इतर ग्रहांचे किरण सुर्यकिरणांव्दारेच आपल्या पर्यंत पोचतात, त्यामुळे सुर्य नाडी ज्या भागात प्रभावीत असते, 

कुंडली के हिसाब से  


त्याच हातात रत्न धारण केल्याने रत्नांचे तेज कायम राहते तसेच सुर्य नाडी उद्योगशील, प्रयत्नशील प्रत्यक्ष शारीरीक श्रमास पोषक असल्याने उजव्या हातातील रत्ने व्यक्तीला यशाच्या दृष्टीने वाटचाल करण्यास प्रवृत्त करतात. या उलट डावा हात हा चंद्र नाडीच्या प्रभावाखाली आहे, जी अत्यंत शीतल, थंड, बौध्दीक कामासाठी महत्वपुर्ण असते, 

राशि के अनुसार  


डाव्या हातात रत्न धारण केल्यास रत्नाचे तेज कमी होईलच तसेच ते रत्न कार्य करण्यास प्रवृत्त करणार नाही।

पोवळे रत्न price

Rs. 15508


सोमवार, 24 अप्रैल 2023

फक्त ६० सेकंड हे बोट चोळल्याने काय होते

 फक्त ६० सेकंड हे बोट चोळल्याने काय होते


संकलन :

  

जर तुम्ही रोज फक्त १ मिनिटं ह्या बोटांना दाबल्यास तुम्हाला ह्याचा काय फायदा होतो हे माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हांला ह्याचे फायदे सांगणार आहोत.


ही गोष्ट कदाचित तुम्हांला माहिती नसेल, आपले हाथ अनेक प्रकारचे आजार दूर करण्यास मदत करत. ह्या गोष्टीचा उल्लेख आपल्या शास्त्रात सुद्धा केला गेला आहे. जरी, हस्तमुद्रांचा वापर सुरुवातीला तप साधनेसाठी होत होता, पण नंतर ह्याचे वैज्ञानिक संदर्भ समजले गेले आणि ह्याचा वापर वैज्ञानिक दृष्ट्या आजार दूर करण्यासाठी केला जाऊ लागला. तर आज आम्ही सांगणार आहोत कि हाताच्या कुठल्या बोटाचा प्रयोग करून आपण कोणत्या प्रकारचे आजार स्वतःच दूर करू शकतात.


आपले हात आपल्याला विविध आजारांपासून बचाव करण्याची ताकद देतात. हे आपल्याला रोगांपासून सुटका मिळवण्यासाठी मदत करतात. हेच कारण आहे की, आपले शास्त्र आपल्याला हस्त मुद्रांचे ज्ञान देते. पतांजलि योग सुत्रांशिवाय ही असे बरेच ग्रंथ आहेत ज्यांमधे हस्त मुद्रांविषयी माहिती मिळते. तर चला आज जाणुन घेउया, योग शास्त्रामधे सांगितली गेलेली एका अश्या हस्त मुद्रेविशायी जे केल्याने तुम्हाला मिळतील हे अद्भुत फायदे. सर्वात पहिलं तुम्हाला सांगू इच्छितो कि हाताची बोटं शरीराच्या वेगवेगळ्या अंगांना जोडलेली असतात. आपल्या बोटांच्या बहुतेक नसा चे सरळ संबंध आपल्या शारीरिक अवयवांशी असतो. तज्ञांनीसुद्धा ह्या गोष्टी मान्य केल्या आहेत कि शरीराचे बहुतेक आजारांचे इलाज आणि त्या आजारांच्या वाढीला रोखण्यास बोटं खूप महत्वाची असतात. बोटांच्या द्वारे ह्या रोगांचे इलाज सुद्धा केले जाऊ शकते.


याचे अद्भुत फायदे: निसर्ग नियमानुसार आपल्या हाताची पाचही बोटे एका विशेष घटकाचे प्रतिनिधित्व करतात.


फक्त १ मिनिट रोज या बोटास दाबून ठेवल्याने या मोठ मोठ्या ५० रोगांचा नाश होतो. नक्की करून पहा. जे अश्या प्रकारे आहेत.


१. अंगठा – आग घटक,

२. तर्जनी (इंडेक्स फिंगर)– हवेतील घटक.

३. मध्यमा (मिडल फिंगर) – आकाश घटक.

४. अनामिका (रिंग फिंगर) – पृथ्वी घटक.

५. करंगळी - पाणी घटक.


बोटांची रचना :

तळहातावर शरीराच्या प्रत्येक भागासाठी एक विशेष प्रेशर पोईंट आहे. त्याला दाबल्यास विलक्षण फायदे होऊ शकतात. हस्त मुद्रांच्या माध्यमातून हेच केले जाते. जसे तुम्ही जर रोज निर्देशांक बोटास म्हणजेच मिडल फिंगर ला कमीत कमी २ ते ३ वेळेस ६० सेकंदांसाठी चोळाल. या ठिकाणी हळुवार पणे दाब दिल्याने, बद्धकोष्ठता (कब्ज) पासून सुटका मिळते. सोबतच पोटाशी निगडीत बरेच आजारहि औषधी न घेता बरे होऊ शकतात.


अंगठा आणि इंडेक्स फिंगरला मिळून फक्त मुद्रा हि बनवली तरीसुद्धा कब्ज, मुळव्याध आणि मुत्राशी निगडीत आजारांमध्ये फायद्याचे ठरते. सोबतच, वाढलेल्या वजनास कमी करायला सुद्धा ह्या मुद्रा मदतगार ठरू शकतात.


तर चला बघूया कोणत्या बोटामुळे कोणते फायदे होतात ते.


१. तर्जनी (इंडेक्स फिंगर) :

सर्वात पहिले तर्जनी बोटाची माहिती जाणून घेऊया. तर्जनीला इंग्रजी मध्ये इंडेक्स फिंगर सुद्धा बोलले जाते. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, ह्या बोटाला हलक्या हाथाने चोळल्याने पोटासंबंधी त्रास दूर केला जाऊ शकतो. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर कोणाला बद्धकोष्टता चा त्रास होत असेल तर रोज दिवसातून २ ते ३ वेळा ह्या बोटाला फक्त ६० सेकंड्स साठी चोळल्याने आराम मिळतो.


२. मधले बोट (मिडल फिंगर) :

जर तुम्हांला रात्री झोप येत नसेल किंवा खूप उशीरा झोप येत असेल तर झोपण्याअगोदर फक्त एक मिनिटासाठी तुमचे मधले बोट चोळा. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, असं करण्याने शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रित होतो आणि मानसिक तणाव दूर होतो. ह्या दोघांना नियंत्रित करण्यामुळे चांगली झोप येते.


३. अनामिका बोट (रिंग फिंगर) :

अनामिका बोटाला रिंग फिंगर सुद्धा बोलले जाते. तज्ञांच्या म्हणण्यानुसार ह्या बोटाला चोळल्याने अनेक फायदे होतात. तज्ञांच्या म्हणण्यानुसार ह्या बोटाला चोळल्याने पोटासंबंधित त्रासांपासून सुटका होते आणि कोणाला बद्धकोष्ठताचा त्रास होत असेल तर त्याने रोज १ मिनिट हे बोट चोळल्याने हि समस्या दूर होऊ शकते.


४. करंगळी (स्मॉल फिंगर) :

करंगळी बोट म्हणजे हाताचे सर्वात छोटे बोट. हाथाचे हे बोट दिसण्यास सर्वात छोटे असते. तज्ञांच्या म्हणण्यानुसार. ह्या बोटाला दिवसातून कमीत कमी १ मिनिटासाठी रोज चोळल्याने जर कोणाला मायग्रेनची समस्या असेल तर त्यापासून अराम मिळतो. म्हणून जर तुम्हाला मायग्रेनची समस्या असेल तर दिवसातून एकदा हा प्रयोग करून बघा.


५. अंगठा (थम्ब्ज) :

हाताच्या चार बोटांच्या फायद्याप्रमाणे अंगठा चोळ्याल्याने सुद्धा फायदा होतो. हाताच्या अंगठ्याने वेगवेगळ्या आजारांना दूर केले जाऊ शकते. तज्ञांच्या म्हणण्यानुसार अंगठ्याला दिवसातून एक मिनिटं चोळल्याने फुफ्फुसं मजबूत होतात. तज्ञांच्या मतानुसार, जर कोणाला श्वसनसंबंधी त्रास असेल तर त्यांनी ह्या प्रयोग नियमित केला पाहिजे, लवकर फरक जाणवेल.


चल मेरी लूना

          चल मेरी लूना


ज्याकाळी पुणे ते मुंबई अंतर पार करायला बाकीच्या रेल्वे गाड्यांना ५ तास लागत हेच अंतर डेक्कन क्वीन पावणे तीन तासात पार करत असे. १ जून १९३० साली सुरु झालेल्या डेक्कनक्वीन कधीच वाफेच्या इंजिनवर चालली नाही. पहिल्या दिवसापासून इलेक्ट्रिक इंजिनावर चालणारी पहिली प्रवासी गाडी, भारतातील पहिली डिलक्स गाडी, पहिली सुपरफास्ट गाडी, एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्याची सोय असणारी पहिली गाडी, महिलांचा व खानपान सेवेचा स्वतंत्र डबा असणारीही ही पहिलीच गाडी.



डेक्कन क्वीनच्या नावावर असे पहिले पणाचे अनेक विक्रम नोंद आहेत. भारतातील मानाची गाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेक्कन क्वीनच्या नावे आणखी एक विचित्र विक्रम आहे.


“लुना कडून हरण्याचा विक्रम”


लुना कोणाला माहित नाही? पुणेकर फिरोदियांच्या कायनेटिक ग्रुप कंपनीने जपानच्या होंडाच्या सहकार्याने लुनाची निर्मिती केली होती. इटालीयन प्याजिओच्या चिआओ नावाच्या गाडीची ही लायसन्स कॉपी होती. १९७२ साली ही गाडी लॉंच झाली आणि आल्या आल्या भारतभरात या गाडीची हवा सुरू झाली.


वजनाला अगदी हलकी, छोटी सुटसुटीत बाईक सायकलला एक उत्तम पर्याय होती. पुण्यासारख्या सायकलींच्या शहरात तयार होणाऱ्या लुनाने झटक्यात मार्केट मारले. कित्येकांनी ही गाडी बुक केली.


सुरवातीला अनेकांना शंका होती की, भारतात अनेक ठिकाणी रस्ते कच्चे आहेत तर ही गाडी तिथे कशी टिकेल? लुनाला स्पीड असणार की नाही?


यासाठी फिरोदियानी लुनाची पब्लिसिटी करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया वापरल्या. टीव्ही वर्तमानपत्रात याच्या जाहिराती झळकू लागल्या. तरुणांना आकर्षित करण्यासाठी क्रिकेटच्या सामन्यावेळी मॅन ऑफ द मॅच म्हणून ही लुना बक्षीस दिली जाऊ लागली.


फोर्स मोटर्सचे चेअरमन अरुण फिरोदिया यांना आठवते त्या प्रमाणे फेमस क्रिकेटर संदीप पाटील, चंद्रशेखर यांनी ही लुना जिंकली होती. दहावी बारावीच्या बोर्डात नंबर काढणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील लुना बक्षीस दिली जायची. यापेक्षाही वरताण म्हणजे लुनाच्या वेगाची खात्री सगळ्यांना पटावी म्हणून थेट डेक्कन क्वीन एक्प्रेसबरोबर तिची रेस लावणार असल्याच जाहीर केलं.


अनेकांना गंमत वाटली. ५० सीसी ची ही छोटीशी मोपेड भारतातल्या सुपरफास्ट ट्रेनशी कशी काय स्पर्धा करू शकते? हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे असा अनेकांना गैरसमज झाला. पण अरुण फिरोदिया सिरीयस होते. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषद सभापती जयंतराव टिळक यांच्या हस्ते पुणे स्टेशनवरून शर्यतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला व दादरला शर्यत संपणार तिथे मुंबईचे पोलीस कमिशनर यांना स्पर्धेचा विजेता घोषित करण्यासाठी परीक्षण करण्याची विनंती केली.


सकाळी ठीक ७.२० वाजता नेहमीच्या टायमिंगला डेक्कन क्वीन पुणे स्टेशन वरून सुटली. त्याचवेळी जयंतराव टिळक यांनी हजारोंचा जमाव व पत्रकारांच्या साक्षीने लुनाला देखील हिरवा झेंडा दाखवला.


लुनास्वाराने जीव तोडून गाडी हाकली. तेव्हा मुंबई पुणे जुना महामार्ग होता. आज आपण पाहतो तो एक्स्प्रेसवे अजून अस्तित्वात यायचा होता. खंडाळ्याचा प्रचंड मोठा घाट तिथला वळणावळणाचा रस्ता अशी अनेक आव्हाने लुना समोर होती. अनेकांनी पैज लावली होती की लुना लोणावळ्याच्या देखील पुढे जाऊ शकणार नाही. पण या साऱ्यांचा अपेक्षाभंग करून लुनाने आपल्या स्टाईलमध्ये घाटरस्ता पार केला.


अरुण फिरोदिया सांगतात की वाटेत इमर्जन्सी साठी मदत म्हणून आम्ही एक कार देखील लुनाच्या पाठोपाठ पाठवली होती. मात्र लुना एवढ्या सुसाट सुटली होती की कारला देखील तिला गाठणे अशक्य होत होतं.


लुनाने जेव्हा मुंबईत प्रवेश केला तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण फिरोदिया यांना लुना ही शर्यत पूर्ण करेल याची खात्री होती पण ती तब्बल १५ मिनिट लवकर दादर मध्ये दाखल होऊन सर्व शक्तिमान डेक्कन क्वीनला हरवेल हे खुद्द त्यांनी स्वप्नात देखील पाहिलं नव्हत.


पण हे खरोखर घडल. टाळ्यांच्या गजरात लुना डेक्कन कवींच्या आधी दादर स्टेशनला पोहचली. तिला गाठायला डेक्कन क्वीनला १५ ते २० मिनिट जास्त लागले. ५० सीसी ची मोपेड लुना जिंकली होती. मुंबईत वार्ताहर हा सोहळा बघण्यासाठी हजर होते. दुसऱ्या दिवशी प्रत्येक वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर लुनाचीच चर्चा होती.


त्यानंतर ‘चल मेरी लुना’ च्या आडव येण्याची हिंमत कोणाची उरली नाही.

रविवार, 23 अप्रैल 2023

15 मंत्र

 खालील 15 मंत्र प्रत्येक हिंदू व्यक्तीला "तोंडपाठ असायलाच" हवे आणि आपल्या मुलांनाही "शिकवलेच" पाहिजेत.


1. श्री महादेव 

          ॐ त्र्यम्बकं यजामहे, 

           सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ,

           उर्वारुकमिव बन्धनान्,

           मृत्योर्मुक्षीय मामृतात् !!


2. श्री गणेश

              वक्रतुंड महाकाय, 

              सूर्य कोटि समप्रभ 

              निर्विघ्नम कुरू मे देव,

              सर्वकार्येषु सर्वदा !!


3. श्रीहरी विष्णु 

           मङ्गलम् भगवान विष्णुः,

           मङ्गलम् गरुणध्वजः।

           मङ्गलम् पुण्डरी काक्षः,

           मङ्गलाय तनो हरिः॥


4. श्री ब्रह्मा

             ॐ नमस्ते परमं ब्रह्मा,

              नमस्ते परमात्ने ।

              निर्गुणाय नमस्तुभ्यं,

              सदुयाय नमो नम:।।


5. श्रीकृष्ण

               वसुदेवसुतं देवं,

               कंसचाणूरमर्दनम्।

               देवकी परमानन्दं,

               कृष्णं वन्दे जगद्गुरुम।


6. श्रीराम

              श्री रामाय रामभद्राय,

               रामचन्द्राय वेधसे ।

               रघुनाथाय नाथाय,

               सीताया पतये नमः !


7. माता दुर्गा

            ॐ जयंती मंगला काली,

            भद्रकाली कपालिनी ।

            दुर्गा क्षमा शिवा धात्री,

            स्वाहा स्वधा नमोऽस्तु‍ते।।


8. माता महालक्ष्मी

            ॐ सर्वाबाधा विनिर्मुक्तो,

            धन धान्यः सुतान्वितः ।

            मनुष्यो मत्प्रसादेन,

            भविष्यति न संशयःॐ ।


9. माता सरस्वती

            ॐ सरस्वति नमस्तुभ्यं,

             वरदे कामरूपिणि।

             विद्यारम्भं करिष्यामि,

             सिद्धिर्भवतु मे सदा ।।


10. माता काली

             ॐ क्रीं क्रीं क्रीं,

             हलीं ह्रीं खं स्फोटय,

             क्रीं क्रीं क्रीं फट !!


11. श्री हनुमान

          मनोजवं मारुततुल्यवेगं,

          जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं।

          वातात्मजं वानरयूथमुख्यं,

          श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥


12. श्री शनिदेव

             ॐ नीलांजनसमाभासं,

              रविपुत्रं यमाग्रजम ।

              छायामार्तण्डसम्भूतं, 

              तं नमामि शनैश्चरम् ||


13. श्री कार्तिकेय स्वामी

        ॐ शारवाना-भावाया नम:,

         ज्ञानशक्तिधरा स्कंदा ,

         वल्लीईकल्याणा सुंदरा।

          देवसेना मन: कांता,

          कार्तिकेया नामोस्तुते ।


14. श्री कालभैरव

          ॐ ह्रीं वां बटुकाये,

          क्षौं क्षौं आपदुद्धाराणाये,

          कुरु कुरु बटुकाये,

          ह्रीं बटुकाये स्वाहा।


15. गायत्री मंत्र

            ॐ भूर्भुवः स्वः,

            तत्सवितुर्वरेण्यम् 

            भर्गो देवस्य धीमहि 

            धियो यो नः प्रचोदयात् ॥


शुक्रवार, 21 अप्रैल 2023

अक्षय तृतीया मुहूर्त माहिती...

 अक्षय तृतीया मुहूर्त माहिती...


अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे


हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात. ते खालीलप्रमाणे आहेतः


दसरा, गुढीपाडवा, अक्षय तृतीया

हे तीन पूर्ण मुहूर्त आहेत.तर दिवाळीचा पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त आहे.


कोणतेही शुभ कार्याचा, नविन कार्याचा प्रारंभ या दिवशी करतात.हे मुहूर्त पुर्ण शुद्ध असल्यामुळे या दिवशी इतर दिवसांप्रमाणे कोणतेही शुभ काम सुरु करण्यास दिनशुद्धी बघण्याची गरज नाही.


ह्या दिवशी हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया येते. अक्षय्य तृतीया हा महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो.


ह्या दिवशी नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसबेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती असते.


अस्यां तिथौ क्षयमुपैति हुतं न दत्तं


तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया ।


उद्दिश्य दैवतपितॄन्क्रियते मनुष्यैः


तच्चाक्षयं भवति भारत सर्वमेव ।। – मदनरत्न


अर्थ : (श्रीकृष्ण म्हणतो) हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही; म्हणून हिला मुनींनी ‘अक्षय तृतीया’ असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते.


सांस्कृतिक समारंभ


महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्रातील एखाद्या दिवशी हळदीकुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावून मोगर्‍याची फुले किंवा गजरा, आंब्याची डाळ (किंवा भिजवलेले हरबरे) आणि पन्हे देतात. त्या हळदीकुंकू समारंभांचा (गौरी उत्सवाचा) अक्षय तृतीया हा शेवटचा दिवस असतो.


ज्योतिषविषयक समजुती 


१. अक्षय तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे सांगितले जाते. या दिवशी दुसरया युगाला सुरुवात झाली होती. ज्योतिषशास्त्रात कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणारया काळाला ‘महायुग' असे म्हणतात. ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे मानले जाते. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला ‘कल्पादीं' तसेच त्रेतायुगाचा (१२,९६,००० सौर वर्षाएवढा त्रेतायुगाचाकाळ) प्रारंभ म्हणजे ‘युगादी' ही तिथी वैशाख शुद्ध तृतीयेला येते.


शेतीसंबंधी प्रथा 


१. मातीत आळी घालणे व पेरणी : पावसाळा तोंडावर घेऊन अक्षय्य तृतीया येते. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे.) या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृत्तिकेबद्दल कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालतात. कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे, देशावर नाही. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही, अशी धार्मिक समजूत आहे. (बियाणे म्हणजे मळणीतील धान्य आपल्या आवश्यकतेनुसार खाण्यासाठी बाजूला काढून घेऊन पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवलेले उरलेले धान्य.)


महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्या कारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की, सतत पाऊस पडत राहिल्याने सुपीक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे पावसाळा तोंडावर असतांना मशागत केलेल्या भुसभुशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपे जाते. (निदान पूर्वीतरी, अक्षय्य तृतीयेच्या शुभमूहुर्तावर म्हणजेच पावसाला सुरुवात होण्यापूर्वी पेरणीची कामे पूर्ण केली जात असत. हल्ली पावसाचे प्रमाण कमी झाल्याने व शास्त्राप्रमाणे पेरणी न केल्याने जमिनी नापीक होत चालल्या आहेत व कसदार धान्य पिकण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.)


२.. वृक्षारोपण : अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही, अशी समजूत आहे.


धार्मिक समजुती 


हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे घागरीयेवढे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो.पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातो. असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानले जाई.


या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. अक्षय्य तृतीयेला ब्रह्मा व श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून, म्हणजे सगुणलोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते, अशी कल्पना आहे.


१. अर्थ : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्‍त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, अशी समजूत आहे


अक्षय तृतीया हा सण साजरा करण्याची पद्धत


‘कालविभागाचा कोणताही प्रारंभदिवस भारतियांना नेहमीच पवित्र वाटतो; म्हणून अशा तिथीस स्नानदानादी धर्मकृत्ये सांगितली गेली आहेत. या दिवसाचा विधी असा आहे – पवित्र जलात स्नान, श्रीविष्णूची पूजा, जप, होम, दान आणि पितृतर्पण. या दिवशी अपिंडक श्राद्ध करावे आणि ते जमत नसेल, तर निदान तिलतर्पण तरी करावे.


२ अ. उदकुंभाचे (उदककुंभाचे) दान


या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणाला उदककुंभाचे दान करावे.


२ अ १. महत्त्व


उदककुंभालाच ‘सर्वसमावेशक स्तरावरील निर्गुण पात्र’ असे संबोधले जाते.


२ अ २. उद्देश


अ. उदककुंभाचे दान करणे, म्हणजेच स्वतःच्या सर्व प्रकारच्या देहसदृश, तसेच कर्मसदृश वासनांच्या स्थूल, तसेच सूक्ष्म लहरी कुंभातील जलाला पवित्र मानून त्यात विसर्जित करणे आणि अशा प्रकारे स्वतःचा देह आसक्तीविरहित कर्माने शुद्ध करून त्यानंतर उदककुंभायोगे या सर्व वासना पितर अन् देव यांच्या चरणी ब्राह्मणाला ग्राह्य धरून अर्पण करणे


आ. पितरांच्या चरणी उदककुंभ दान दिल्याने पितर मानवयोनीशी संबंधित असल्याने ते आपल्या स्थूल वासना नष्ट करतात.


इ. देवाचा कृपाशीर्वाद हा आपल्या प्रारब्धजन्य सूक्ष्म कर्मातील पाप नष्ट करत असल्याने सूक्ष्म कर्मजन्य वासना देवांच्या चरणी या दानाकरवी अर्पण केल्या जातात.


२ अ ३. उदकुंभ दानाचा मंत्र


ब्राह्मणाला उदकुंभाचे दान देतांना पुढील मंत्र म्हणावा


एष धर्मघटो दत्तो ब्रह्मविष्णुशिवात्मकः ।


अस्य प्रदानात् तृप्यन्तु पितरोऽपि पितामहाः ।।


गन्धोदकतिलैर्मिश्रं सान्नं कुम्भं फलान्वितम् ।


पितृभ्यः सम्प्रदास्यामि अक्षय्यमुपतिष्ठतु ।। – धर्मसिन्धु


अर्थ : ब्रह्मा, विष्णु आणि शिव ज्यात सामावले आहेत असा हा धर्मघट मी ब्राह्मणाला दान केला आहे. या दानामुळे माझे पितर आणि देवता तृप्त होवोत. गंध, उदक, तीळ, यव आणि फळे यांनी युक्त असा हा कुंभ मी पितरांसाठी देत आहे. हा कुंभ माझ्यासाठी सदा अक्षय्य (क्षय न पावणारा) ठरो.


२ अ ४. शास्त्र


अक्षय तृतीया या दिवशी ब्रह्मांडात अखंड रूपातील, तसेच एकसमान गतीजन्यता दर्शवणार्‍या सत्त्व-रज लहरींचा प्रभाव अधिक प्रमाणात असल्याने या लहरींच्या प्रवाहायोगे पितर आणि देव यांना उद्देशून ब्राह्मणाला केलेले दान पुण्यदायी आणि मागील जन्माच्या देवाणघेवाण हिशोबाला धरून कर्म-अकर्म करणारे ठरत असल्याने या कधीही क्षय न होणार्‍या लहरींच्या प्रभावाच्या साहाय्याने केलेले दान महत्त्वाचे ठरते...


२. मृत्तिका पूजन : सदोदित कृपादृष्टी ठेवणाऱ्या मृत्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी व वैभवलक्ष्मी यांची प्राप्ती‍ होते. अक्षय्य तृतीया हा दिवस म्हणजे कृतज्ञ भाव ठेवून अशा मृत्तिकेची उपासना करण्याचा दिवस.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काय करावे 

या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी.

सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी.

ब्राह्मण भोजन घालावे.

या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवेत.

या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने विकत घ्यावेत.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.

शास्त्रांमध्ये अक्षय्य तृतीया 

या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते.

नर-नारायण या जोडगोळीने या दिवशी अवतार घेतला होता.

श्री परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते.

वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.

अक्षय्य तृतीयेचे माहात्म्य 

जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो.

या दिवशी परशुरामाची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते.

शुभ कार्ये या दिवशी होतात.

श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते, की 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय अविनाशी) होते.

या दिवशी बद्रीधाम येथील बद्रीनारायणाच्या मंदिरात सहा महिन्यांच्या बंदकालानंतर प्रथम प्रवेश मिळतो. अयोध्येजवळच्या वृंदावनात कुंजबिहारी श्रीकृष्ण मंदिराचे दरवाजेपण याच दिवशी उघडले जातात. अक्षयतृतीया ही विष्णूचा एक अवतार समजल्या जाणाऱ्या परशुरामाची जन्मतिथी आहे.

अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करतात व त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे घागरीयेवढे मडके आणून, त्यात पाणी भरुन त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातो. असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानतात. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते.(ज्योतिष राहुल नारायणराव पुराणिक)

गुरुवार, 20 अप्रैल 2023

वाळवणाचे आवडीचे पदार्थ, कोहळ्याचे सांडगे (प्रकार १)

 उन्हाळ्यासाठी special


वाळवणाचे  आवडीचे  पदार्थ


आपल्या रोजच्या जेवणात भाज्या, आमट्या, उसळी, चटण्या, कोशिंबिरी असतात. पण कधी कधी तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो. कधी बाजारात जाऊन भाजी आणायला वेळ नसतो म्हणून तर कधी आवड, बदल म्हणून घरात वर्षभराकरता करून ठेवलेले पदार्थ उपयोगाला येतात.       मूग-तांदळाची खिचडी केली, की उडदाचा पापड हवाच, तर उपवासाच्या साबुदाणा खिचडीबरोबर साबुदाणा पापडी मजा आणते. आणि पापड, कुरडईसारखे कुरकुरीत खमंग पदार्थ आबालवृद्धांनाही मनापासून आवडतात, तर कधी कधी सांडगे, भरल्या मिरच्या, सांडगे मिरच्या जेवणाची लज्जत वाढवितात. त्यामुळे उन्हाळा कडक होऊ लागताच अशा वर्षभराच्या साठवणीची, वाळवणाची गृहिणींची गडबड सुरू होते. खरंतर आजच्या नोकरदार गृहिणीला अशी कामे करायला वेळ तरी कुठे असतो? पण तरीही अनेकजणी उत्साहाने, धडपडत हे पदार्थ बनवतात. कारण उडदाच्या पापडाची गोटी बाहेर विकत मिळते, पण तिला आजीच्या, आईच्या किंवा सासूबाईंच्या हातची चव नसते. म्हणून मग वेळात वेळ काढून हे पदार्थ घरात बनवले जातात. पापड, कुरडयाखेरीज इतर वर्षभराच्या वाळवणाचे काही आगळेवेगळे पदार्थ.


कोहळ्याचे सांडगे (प्रकार १)


साहित्य :-


तीन वाट्या कोहळ्याचा कीस, १०० ग्रॅम भेंड्या, दोन मध्यम काकड्या, आठ-दहा हिरव्या मिरच्या, मीठ, हिंग, हळद, वाटीभर जाडपोहे, वाटीभर साळीच्या लाह्या, कोथिंबिरीची एक मोठी जुडी.

कृती : काकडी जुनी असावी. ती सालासह चिरावी. भेंड्या, कोथिंबीर, चिरून घ्यावी. मिरच्या वाटून घ्याव्यात. हे सगळे कोहळ्याच्या किसात घालावे. मग त्यात मीठ, हिंग, हळद, साळीच्या लाह्या, पोहे घालावेत. सगळे एकत्र करून खलबत्त्यात कुटावे. हे सगळे काम रात्रीच करून ठेवावे. भांड्यात घालून झाकून ठेवावे. सकाळी मिश्रण परत एकदा चांगले मिसळून घ्यावे.  प्लॅस्टिकच्या कागदावर त्याचे छोटे बत्ताशासारखे सांडगे घालावेत. दुसऱ्या दिवशी निघत असल्यास काढून उलटून चांगल्या कडक उन्हात वाळवावेत. घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावेत. हवे तेव्हा तळून तोंडी लावण्यास घ्यावे. (काकडी, भेंडीचे प्रमाण वाढवू शकता.)

  सांडगे मिरच्या


साहित्य :-


 पाव किलो जाड, बुटक्‍या हिरव्या मिरच्या, या अर्धे बोट लांबीच्या मिरच्या असतात. त्यामुळे तळायला सोप्या जातात. मेथीपूड २ चमचे, अर्धी वाटी धनेपूड, मीठ, हिंग, हळद, एका लिंबाचा रस.


कृती :-


दुपारी मिरच्यांना उभी चीर देऊन त्या मिठाच्या पाण्यात टाकाव्यात. देठ काढू नयेत. रात्री सगळा मसाला एकत्र करावा. त्यावर लिंबाचा रस आवश्‍यकतेप्रमाणे घालून कालवावे. पाण्यातल्या मिरच्या काढून निथळून त्यातले बी काढून मिरच्या मोकळ्या कराव्यात. त्यात तयार मसाला दाबून भरावा. एखाद्या तरसाळ्यात ठेवून त्यावर झाकण ठेवावे. सकाळी प्रत्येक मिरचीची भरलेली बाजू वर येईल. अशा त्या मिरच्या उन्हात ठेवून चांगल्या ८-१० दिवस वाळवाव्यात. मिरच्या वाळत आल्या की त्या पांढऱ्या होतात. भरपूर वाळवून त्या डब्यात भरून ठेवाव्यात. या मिरच्या तळून खाण्याकरता, दहिभाते, दहीपोहे, मुळ्याची दह्याची कोशिंबीर, कैरीची डाळ यावर तळून, कुस्करून घालाव्यात. छान चव लागते.


भूस-वडी


साहित्य :-


 गव्हाचा चीक काढल्यावर उरलेला चोथा, तिखट, मीठ, हिंग, हळद, तीळ, थोड्या तांदळाच्या अगर ज्वारीच्या कण्या.


कृती :-


सर्व पदार्थ एकत्र करून अंदाजे पाणी घालून कुकरमध्ये मऊ शिजवावे. कोमट झाल्यावर चांगले मळून घ्यावे. या मिश्रणाच्या छोट्या पापड्या थापून कडक उन्हात चांगल्या वाळवाव्या. या २-३ तळलेल्या पापड्या व भाजके शेंगदाणेही संध्याकाळची पौष्टिक न्याहारी होते.


मिश्र डाळींचे सांडगे


साहित्य :-


 एक वाटी चणाडाळ, अर्धी वाटी मटकीची डाळ, पाव वाटी उडीद डाळ, तिखट, मीठ, हिंग, हळद, चमचाभर धने-जिरे पूड, कोथिंबीर.


कृती :-


तिन्ही डाळी भाजून जाडसर दळाव्यात किंवा तीन तास भिजत घालून नंतर रवाळ वाटाव्यात. वाटताना पाणी निथळून टाकावे. भाजल्यास त्या पिठात इतर सर्व साहित्य घालून थंड पाण्याने पीठ किंचित घट्टसर भिजवावे. भिजवून वाटल्यास असेच सर्व साहित्य घालून पीठ कालवावे. त्याचे प्लॅस्टिक कागदावर अगर पाटाला, ताटाला तेल लावून छोटे-छोटे सांडगे घालावे. कडक उन्हात चांगले वाळवावे व घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावेत. या सांडग्यांची कांदा, वांगे, बटाटे वगैरे घालून रस्सा भाजी करता येते किंवा तळून आमटीतही टाकता येतात. (पीठ जास्त घट्ट झाल्यास सांडगे दडस होतात.)


गवारीच्या शेंगा


साहित्य :-


 गवारीच्या शेंगा, मीठ, आंबट दही, जिरेपूड, लाल तिखट.

कृती : शेंगाची डेरव (देठं) काढावीत. दह्यात लाल तिखट, मीठ, जिरेपूड घालावी व हलवावे. त्यात शेंगा बुडवून बाहेर काढून उन्हात वाळवाव्यात. पुन्हा एक-दोन दिवसांनी दही तयार करून ते सुकलेल्या शेंगा त्यात बुडवाव्यात व बाहेर काढून वाळवाव्यात. म्हणजे त्यावर दह्याचा थर बसेल. या शेंगा तळून जेवणात उपयोगाला आणाव्यात. खूप छान लागतात.


टीप : अशाच तऱ्हेने डिंगऱ्या म्हणजे मुळ्याच्या शेंगा, कारल्याच्या चकत्या, तोंडल-भेंडीच्या चकत्या, कोहळ्याच्या जाड साली वरीलप्रमाणे दही तयार करून त्यात बुडवून वाळवून ठेवतात व तळून खातात.


बाजरीच्या खारोड्या


साहित्य :-


एक वाटी बाजरीचा रवा, पाऊण वाटी पाणी, तिखट एक चमचा, भाजलेले तीळ १ चमचा, जिरे, ४-५ लसूण पाकळ्या खसटून.


कृती :-


बाजरीचा रवा भाजून घ्यावा. पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. त्यात लाल तिखट, मीठ, तीळ, जिरे, लसूण घालावा. भाजलेल्या रव्यात थोडे पाणी घालून तो किंचित सरसरीत करावा व उकळलेल्या पाण्यात घालून हलवावे. झाकण ठेवून मंद गॅसवर शिजवावे. चांगली वाफ आणावी. खाली उतरून मिश्रण परातीत पसरावे. कोमट झाल्यावर चांगले मळून त्याचे छोटे-छोटे सांडगे घालावेत व कडक उन्हात भरपूर वाळवावेत. हे सांडगे तळून खाता येतात किंवा जरा जास्त तेल घालून त्यात तीळ, सांडगे, कोथिंबीर घालूनही छान लागतात.


पोह्याची मिरगुंड


साहित्य :-


 भाजलेल्या जाड पोह्याचे पीठ एक वाटी, वाटीभर भाजलेल्या साबुदाण्याचे पीठ, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, हिंग, लाल तिखट १ ते २ चमचे, मीठ, अर्धा चमचा पापडखार.


कृती :-


पोह्याचे पीठ, साबुदाणा पीठ, जिरेपूड, तिखट, मीठ, हिंग एकत्र करावे. पापडखार रात्री कोमट पाण्यात भिजत घालावा. त्यातले एक चमचाभर पाणी पिठात मिसळावे. आवश्‍यक तेवढे थंड पाणी घालून पीठ भिजवावे. मळून छोटे गोळे करावेत. पोळी लाटून शंकरपाळ्याप्रमाणे कापावे. ही मिरगुंड २-३ दिवस चांगली वाळवावी. तळून खायला घ्यावीत. या प्रमाणात साहित्य घेऊन वर्षभराकरता मिरगुंडे बनवावी.


कोहळ्याचे सांडगे (प्रकार २)


साहित्य :-


 अर्धी वाटी मूगडाळ, १ वाटी चणाडाळ, पाव वाटी उडीद डाळ, कोहळ्याचा कीस अर्धी वाटी, चमचाभर भाजलेल्या तिळाची पूड, हिंग, हळद, हिरवी मिरची, लसूण ठेचा १ ते २ चमचे आणि मीठ.


कृती :-


डाळी रात्री भिजत घालाव्यात व सकाळी निथळून वाटाव्यात. त्यात इतर सर्व साहित्य घालून एकत्र करावे. त्याचे छोटे सांडगे घालावेत व कडक उन्हात चांगले वाळवावेत.


आंबोशी


साहित्य व कृती :-


ताज्या, घट्ट कैऱ्यांच्या सालीसुद्धा किंचित जाडसर फोडी कराव्यात व चांगल्या कडक उन्हात वाळवाव्यात. उपयोग करताना कोमट पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवाव्यात.


साबुदाणा - बटाटा पापडी


साहित्य :-


 पाव किलो भिजवलेला साबुदाणा, चार मध्यम बटाटे उकडून, मीठ, लाल तिखट, जिरे.


कृती :-


सकाळीच साबुदाणा भिजवावा. रात्री साबुदाणा आधणात ओतून शिजत ठेवावा. बटाटे किसून पुरणयंत्रातून गाळून घ्यावे. त्यात पाणी घालून सरसरीत करावे व शिजणाऱ्या साबुदाण्यात घालावे. तिखट, मीठ, जिरे घालावेत. मंद गॅसवर चांगले शिजवावे. उतरून ठेवावे. सकाळी या थंड पिठाच्या पापड्या घालाव्यात. पीठ घट्ट वाटल्यास आवश्‍यक तेवढे उकळते पाणी घालून हलवावे. या पापड्या बटाट्यामुळे खूप हलक्‍या होतात. आणि भरपूर वाळवल्यास बरेच दिवस टिकतात. शिवाय उपवासालाही चालतात.


तांदळाच्या बिबट्या


साहित्य व कृती :-


तांदूळ किंवा तांदळाच्या कण्या एक दिवस भिजत टाकाव्यात. दुसऱ्या दिवशी त्यात लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या वाटून घालाव्यात. हिंग व चवीप्रमाणे मीठ व पाणी घालून कुकरमध्ये मऊसर शिजवून घ्याव्यात. गार झाल्यावर मळून घेऊन त्याचे बत्ताशे घालावेत व उन्हात चांगले वाळवावेत. वर्षभर केव्हाही तळून खायला उपयोगी पडतात.


आमचूर पावडर


साहित्य व कृती :-


ताज्या व घट्ट कैरीच्या साली काढून त्या किसाव्यात अगर पातळ फोडी कराव्यात. उन्हात छान वाळवाव्यात. मिक्‍सरवर फिरवून पीठ करून बाटलीत भरून ठेवावी. आंबटपणासाठी उपयोग करावा.


छुंदा


साहित्य :-


खोबरी जातीच्या किंवा तोतापुरी ताज्या कडक कैऱ्या, मीठ, साखर, तिखट, जिरेपूड.


कृती :-


 कैऱ्यांची साल काढून त्या स्टीलच्या किसणीने किसाव्यात. त्यात मीठ घालून २-३ तास ठेवावे. नंतर सुटलेले पाणी ओतून काढावे. दाबून काढू नये. मग त्यात आपल्या चवीप्रमाणे एक वाटी किसाला दीड ते दोन वाट्या साखर घालून हलवून काचेच्या बरणीत हा कीस घालावा. वर पातळ दादरा बांधून बरणी आठ दिवस उन्हात ठेवावी. रोज सकाळी चमच्याने हलवावे. आठ दिवसांत साखरेचा पाक होतो. मग त्यात थोडे लाल तिखट व जिरेपूड घालून हलवून एक दिवस उन्हात ठेवावे. हा छुंदा वर्षभर टिकतो.


तवकिरीच्या झटपट पापड्या


साहित्य व कृती :-


  तवकीर पाण्यात कालवावी. पाणी गरम करून त्यात घालून हलवावी व मंद गॅसवर शिजत ठेवावी. चवीप्रमाणे मीठ घालावे. खसखस घालावी. साबुदाण्याच्या पापड्यांसारखे शिजवावे व पापड्या घालाव्यात. या पापड्या हलक्‍या व झटपट होतात.


कानमंत्र


बटाट्याचा कीस करायला बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवावे. सकाळी लवकर सालं काढून जाड्या किसणीने किसून कीस घालावा. म्हणजे दिवसभराचे भरपूर ऊन मिळते. ५-६ दिवस हा कीस वाळवावा. वर्षभर टिकतो.

गाजरे उकडून किंवा कच्ची किसून उन्हात वाळवावा. तीळ, मिरच्या घालून तेलावर परतून छान चटणी होते.

कांदे किसून कीस अगर काप करून कडक उन्हात वाळवावे. चिवडा, मसाला करण्याकरिता हा कांदा उपयोगी पडतो.

वर्षाची हळद, शिंगाड्याचे पीठ करताना रात्री पाणी उकळून त्यात टाकावे. पाणी त्याच्यावर यावे. झाकून ठेवावे. २-३ तासांनी पाणी ओतून ते रोळीत काढून निथळावे. सकाळी कडक उन्हात वाळत टाकावेत. हाताने तुकडा पडेपर्यंत वाळवावे व दळून आणावेत. हळदीसाठी राजापुरी हळद चांगली .

तिखट करण्यासाठी लालभडक मिरच्या आणाव्यात. डेख काढावी. बी घेऊ नये. मिरच्या फार दिवस तापवू नयेत. चुरगळल्या जाऊ लागल्या, की दळून आणाव्यात. अति उन्हाने मिरच्या पांढऱ्या होऊन तिखटेही पांढरे होते, तर देठांमुळे तिखट किडते.

वर्षभरासाठी मोहरी आणल्यावर ती रात्री स्वच्छ धुऊन रोळावी. निथळून कापडात बांधून ठेवावी. सकाळी लवकर पसरून वाळत ठेवावी. लाल व बारीक मोहरी औषधी असते, असे म्हणतात.

वाल वर्षभर टिकण्यासाठी निवडून आठ-दहा दिवस कडक उन्हात चांगले वाळवावेत. नंतर त्याला एरंडेल लावावे.

सीझनमध्ये भरपूर, रसरशीत मिळणाऱ्या मेथी, पालक, हरभऱ्याची भाजी यांसारख्या पालेभाज्या, कोथिंबीर, घेवडा, गवार, मटार यांसारख्या शेंग भाज्यासुद्धा वाळवून ठेवता येतात.

आवळ्याच्या सिझनमध्ये रसरशीत, ताजे आवळे उकडून किंवा कच्चे किसून सेंदोलोण पादेलोण, जिरेपूड, तिखट लावून कीस वाळवावा. वर्षभराची औषधी आवळासुपारी तयार. फोडीही चालतील. आवळे कुस्करून वरील मसाला लावून वड्या किंवा सांडगे करता येतात.

बुधवार, 19 अप्रैल 2023

अळूच्या पानाचे आयुर्वेदिक उपयोग.

 अळूच्या पानाचे आयुर्वेदिक उपयोग.


अळूची पाने मोठी व पसरट असतात. आणि ह्यावर पावसाचे पाणी चिकटून रहात नाही. अळुची चव ही तुरट गोड असते आणी हा थंड असतो त्यामुळे हा शरीरात वात व कफ दोष वाढवतो व पित्त कमी करतो.


अळू ही मूळची रानभाजी. म्हणजे ती रानावनातच आपोआप उगवत असे. हळूहळू तिचा खाण्यासाठी वापर व्हायला लागला. भारतातल्या बहुसंख्य राज्यात अळू खाल्ला जातो. बेसन लावलेली अळुवडी आपल्या सर्वांची परिचयाचे आहे. एखादे अळूचे पान जर खाजवे निघाले कि सगळी बोंबाबोंब! घश्याची खाज सांगता ही यायची नाही, आणि सहन ही व्हायची नाही....असो....


अळूचे काही औषधि  उपयोग.


1.बाळंत स्त्रीला अळू आणि मेथी यांची मिश्र भाजी खाल्यास भरपूर आणि सकस दुध येते.


2.अळू हे थंड, सारक, मलमूत्र साफ करणारे आणि भूक वाढवणारे आहे. 


3.गांधीलमाशी किंवा इतर विषारी कीटक चावल्यास अळू फुफाट्यात भाजून त्याचा रस काढून चावलेल्या जागी लावतात आणि पोटात देतात. अळूच्या पानांच्या रसात मिरे घालून पोटात घेतात, दंश झालेल्या जागेवर लावतात आणि डोक्यालाही चोळतात.

 

4.जखमेवर अळुच्या पाल्याचा रस वाटून लावल्यास त्यातील रक्त स्त्राव बंद होतो व जखम लवकर भरते.


5.अळूची भाजी रक्तवर्धक आहे.


अळूमध्ये Calcium Oxalate या द्रव्याचे क्षार किंवा त्यांचे स्फटिक असतात. ते घशाला टोचतात. म्हणून घशाला हे अळू खाल्यावर टोचल्यासारखे, खाजल्यासारखे होते. चिंचेचे पाणी यात घातल्याने हे क्षार त्यात विरघळतात आणि अळू खाजत नाही आणि पदार्थालाही छान चव येते.


मंगलवार, 18 अप्रैल 2023

कोहळा लावण्याची योग्य पध्दत

 कोहळा

------------------------------

घरात दुकानात अथवा व्यवसायाचे ठिकाणी असणाऱ्या , येणाऱ्या वाईट शक्ति व नजरदोष यापासुन सगळयांचे रक्षण करण्यासाठी कोहळा लावला जातो.

------------------------------------------------

कोहळा लावण्याची योग्य पध्दत

-----------------------------------------

कोहळा आणताना देठ असलेला आणावा. आणल्यानंतर कोहळा धुवावा.

त्याच्या 2 समोरासमोरच्या बाजुला ऊँ व स्वस्तिक काढ़ायचे असते. स्वस्तिक कुंकवाने काढावे. व ऊँ अष्टगंधाने काढावे.

त्यानंतर खालपासुन वर पर्यंत काजळाने एक रेघ ओढ़ावी. त्यानंतर कोहळा देवाजवळ ठवुन त्याची पूजा करावी.( हळद, कुंकू, अक्षदा, दिवा ,अगरबत्ती ) त्यानंतर प्रार्थना करताना घरात असणाऱ्या ,

येणाऱ्या वाईट शक्ति व नजरदोष यापासुन सगळयांचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करावी. आणि घरात व घराबाहेर ते कोहळे शिंकाळयात टांगावे.

कोहळा टांगल्यानंतर कधी कधी आठ दिवसाच्या आत खराब होतो. कारण अशुभ ऊर्जा सामावण्याची त्याची क्षमता संपलेली असते अशा वेळी कोहळा सडतो त्यातून पाणी गळते. असे ज्या वेळी होते तेव्हा कोहळा काढून कचऱ्यात टाकून द्यावा.

पुन्हा नवीन कोहळा आणून लावावा. कदाचीत सुरवातिला लवकर लवकर खराब होतो ( जर अशुभ ऊर्जा जास्त साठली असेल तर....)

नंतर तो एक वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकतो.

तरी पण जर सोमवती किंवा शनिअमावस्या किंवा दिवाळी अमावस्या हया वेळी कोहळा खराब नाही झाला तरी बदलावा .

एरवी जर कोहळा खराब झाला तर त्या पुढील शनिवारी लावावा. व एरवी लावताना सुद्धा शनिवारीच लावायचा व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा.

कोहळा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यावर बाहेरुन आलेल्या लोकांची नजर जायला हवी व बाहेर लावताना बाहेरची व्यक्ति त्याच्या खालुन आली पाहिजे.

कोहळा टांगल्याने घरात नकारात्मक शक्ति रहात नाही. तसेच बाहेरून येणारी व्यक्ति जर आपल्याशी खूप चांगले बोलत असेल पण मनात आपल्या बद्दल जर ईर्षा बाळगून असेल तर ते मनातले भाव निगेटीविटि मधे बदलतात व त्याचा परिणाम घरात व्यक्तिवर होतो

चिडचिड वाढते,व्यवसायात अडचणी येतात. प्रगती होत नाही. तसेच बाहेरची बाधा परिणाम करत नाही.

एक कोहळा घरात दुकानात व एक बाहेर टांगावा म्हणजे बाहेरून येणारी व्यक्ति त्या खालुन आली पाहिजे त्यामुळे कोहळा तिथेच त्या व्यक्तीच्या वाईट विचारावर परिणाम करतो .

----------------------------

बाहेरून कार्य करून आल्यावर, घरात प्रवेश करण्यापूर्वी पाय कां धुवावेत?

----------------------------------------------------

असे म्हणतात की, अशुभ कार्याला जाऊन आल्यावर पाय सर्व बाजूंनी धुवून घरात यावे, कारण अशुभ शक्ती, दारिद्र्य पायाद्वारे चालत घरात येते. शिवाय पायाला

लागलेल्या धुळीतूनही अशुभ शक्ती घरात प्रवेश करतात.

अशी कथा सांगतात की, फार पूर्वीच्या काळी एक राजा अतिशय घमेंडखोर होता. तो कोणाचेही कांही चालवून घेत नसे. एकदा काय झाले, तो राजा प्रजेच्या

दौर्यावर गेला असतां त्यावे पादत्राण तुटले आणि तो पाय धुवून येत असतांना पायाच्या घोट्याजवळ कांही भागाला पाणी लागले नाही, तर तेवढ्या

भागातून शनी त्याच्या राजवाड्य़ात प्रवेश करतां झाला आणि त्याचे सर्व साम्राज्य धुळीस मिळाले.

म्हणून घरात येण्यापूर्वी पाय सर्व बाजूंनी धुवून घरात यावे.

-------------------------------------------------

_____

भस्म

------------------------

व्युत्पत्ती

‘भ’ म्हणजे ‘भर्त्सनम्’ (नाश होणे) आणि ‘स्म’ म्हणजे ‘स्मरणम्’ (स्मरण करणे) थोडक्यात ज्यामुळे आमची पापे नाश पावतात आणि आम्हाला ईश्वराचे स्मरण होते, ते भस्म ! भस्मातील ‘भ’ म्हणजे सगळ्या पापांची निंदा करण्याचे द्योतक आहे, तर ‘स्म’ यातून शिवाच्या स्मरणाची आठवण होते.

व्याख्या

कुठलीही वस्तू जाळल्यावर जी राख उरते, तिला ‘भस्म’ म्हणत नाहीत, तर देवाची पूजा म्हणून यज्ञात आहुती दिलेले तूप, समिधा, इतर वनस्पती इत्यादी सर्व जाळल्यावर जे अवशेष रहातात, त्यालाच ‘भस्म’ म्हणतात.

अर्थ

भस्म लावणे, याचा सांकेतिक अर्थ म्हणजे ‘दुष्कृत्यांचा नाश होणे’ आणि ‘ईश्वराची आळवणी करणे’ होय.

-------------------------------

■. भस्माचे महत्त्व

--------------------------------

भस्म आपल्याला ‘हे शरीर नश्वर आहे आणि एक दिवस त्याचीही राख होणार आहे; म्हणून आपण देहाची आसक्ती बाळगता कामा नये’, याची आठवण करून देते

----------------------------

. भस्माचा टिळा

------------------------------

शिवभक्तीचे प्रतीक असणे-

भस्म हे विशेषकरून शिवाशी संबंधित आहे; कारण भगवान

शिव सर्वांगाला भस्म लावतो. शिवभक्त आपल्या भालप्रदेशावर भस्माने त्रिपुंड्राकृती काढतात. कधी कधी लाल रंगाचा टिळाही या त्रिपुंड्राच्या मध्यभागी काढतात.

तो टिळा शिवभक्तीचे प्रतीक मानला जातो. जीव-शिव यांच्या मीलनाने हे दृश्य आणि अदृश्य जगत निर्माण होते, हे दर्शवणारे चिन्ह होय.

-----------------------------------------

■. भस्म लावण्याचा उद्देश

------------------------------------------

आम्हाला आमचे देहतादात्म्य सोडून या जन्ममरणाच्या फेर्यांतून मुक्त व्हायचे आहे, याची आठवण म्हणून.

■. भस्माचा वापर

दंडावर भस्माचा वापर

अ.

भस्म हे सर्वसाधारणपणे कपाळावर लावतात. काही जण दंड आणि छाती इत्यादी भागांवरही लावतात. काही तपस्वी सर्वांगाला भस्म लावतात.

अ १.

*भस्म कपाळाला लावतांना पाळावयाचा दंडक

उपनिषदे एक दंडक पाळायला सांगतात, ‘भस्म कपाळाला लावतांना ‘महामृत्यूंजय मंत्रा’चा जप करावा.

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।

उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् ।।

– ऋग्वेद, मण्डल ७, सूक्त ५९, ऋचा १२

*अर्थ

कीर्तीमान आणि महाशक्तीशाली त्र्यंबकाचे (रुद्राचे) आम्ही यजन करतो. हे रुद्रा, काकडी देठापासून खुडावी, त्याप्रमाणे आम्हाला मृत्यूपासून मुक्त कर; पण अमरत्वापासून दूर ठेवू नको.

आ. बरेच जण प्रत्येक वेळी चिमूटभर भस्मच वापरतात.

इ. पूजा म्हणून देवाला राखेने अभिषेक घालतात. त्या भगवत् स्पर्शाने पवित्र झालेली राख भस्म म्हणून वाटतात.

■. भस्माचे इतर प्रचलित शब्द

विभूती

विभूती म्हणजे गौरव. विभूती लावणार्यांना ती गौरव प्रदान करते.

. रक्षा

रक्षा म्हणजे सुरक्षेचा स्त्रोत. रक्षा लावणार्यांना तो निर्मल बनवतो आणि अनारोग्य अन् विपत्ती यांपासून त्यांचे रक्षण करतो.

-----------------------------------------

■ भस्मातील औषधी गुण

-------------------------------------------

भस्मात काही औषधी गुण असल्याने ते आयुर्वेदिक उपचार पद्धतीत वापरतात. शरिरातील बाष्पता शोधून घेण्याच्या क्षमतेमुळे डोकेदुखी, सर्दी या व्याधींसाठी त्याचा औषधात उपयोग होतो.

■ ब्रह्माप्रमाणेच राखही शाश्वत असणे

लाकडे जळल्यावर त्यांची केवळ राख शेष रहाते. त्या राखेचा आणखी नाश होत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्म हे अविनाशी सत्य आहे. असंख्य नाम रूपात्मक असणारी ही दृश्ये आणि अदृश्य सृष्टी नष्ट झाली, तरी हे ‘सत्य’ विद्यमान रहाते. –

------------------------------

भस्माची शिकवण

--------------------------

१.

मनुष्याने आपली आहुती देऊन भस्म होणे, म्हणजे आपल्या इच्छा-आकांक्षा, दोष, अज्ञान अन् अहं यांचा त्याग करणे आणि मनाची शुद्धता प्राप्त करणे

२.

मानवी देह हा नश्वर असल्याने मरणानंतर त्या देहाची जळून राखोटी होणार आहे. त्यामुळे कोणीही देहासक्ती बाळगू नये. मृत्यू कोणत्याही क्षणी येऊ शकतो, याची जाणीव ठेवून मोठ्या महत्प्रयासाने मिळालेला मनुष्यजन्म सार्थकी लावण्यासाठी आणि आपला प्रत्येक क्षण पवित्र अन् आनंददायी करण्यासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे, असे भस्म सूचित करते. अर्थात् यांतून साधनेचे महत्त्व पुन: एकदा अधोरेखितहोते.

 


--------------------

जन्मकुंडली म्हणजे काय?

----------------------------------------

खूप लोकांना हा प्रश्न पडतो कि जन्मकुंडली नेमके म्हणजे काय? तर चला थोडक्यात जाणून घेऊया

देवाचे काम काय आहे की आपल्याला आईच्या गर्भात गर्भधारणा झाल्यावर पहिल्या दिवसा पासुन ते नवव्या महिन्यात पर्यंत गर्भात आपले रक्षण करणे आणि जसा आपला आईच्या गर्भातून आपला या पृथ्वीवर म्हणजे एका ग्रह वर जन्म होतो तसा या नऊ ग्रहाचा आपल्या जीवनावर प्रभाव सुरू होतो.

जातकाचा जन्म पृथ्वीवर झाल्यावर वरते या ग्रहाची स्थिति काय आहे ते आपल्या जन्मदिनांक, जन्मवेळी तुमच्या जन्मस्थळावरून पंचागच्या आधारे ग्रह- नक्षत्र-राशींची स्थिती दाखवणारा सांकेतिक पद्धतीचा आराखडा म्हणजे तुमची जन्मकुंडली व कुंडलीतील ग्रहांची स्थिती नुसार ग्रह हे जीवनावर प्रभाव करतात.

कुंडलीत जे आकडे असतात त्यांना जन्म लग्न असे म्हणतात ते राशींचे अनुक्रमांक दाखवणारे आकडे असतात. स्थानांचे म्हणजे घरांचे अनुक्रमांक तिच्यात लिहीत नाहीत. आपल्याकडे ती चौकटीत मांडलेली असते. कुंडली ही खगोलशास्त्रावर आधारलेली असते पण तिच्यावरुन भाकीत सांगणे हा फलज्योतिषाचा भाग आहे

पण प्रथम आपल्याला ज्योतिषाची थोडी माहिती असली पाहिजे. आपण जेव्हा ज्योतिषास जन्म वेळ, तारीख आणि जन्मठीकाण सांगतो .तेव्हा ज्योतिषी एक कुंडली तयार करतो .ही कुंडली म्हणजे जन्माच्या वेळी आकाशात जी ग्रहस्थिती होती त्याचा नकाशा . म्हणून

आज ह्या लेखात कुंडलीमध्ये जी १२ स्थाने असतात त्यांची माहिती सांगेन.

*१) पहिले स्थान -लग्नस्थान

या स्थाना वरून माणसाचे आयुष्य, रंग, उंची, रूप, स्वभाव, डोके, मेंदू या गोष्टी पहिल्या जातात.

*२) दुसरे स्थान – धनस्थान

या स्थाना वरून माणसाला मिळणारा पैसा, त्याचे डोळे, बोलणे, वाणी (मधुरता, कुटुंबातील व्यक्ती, त्याशिवाय काही मारक बाधक गोष्टी पहिल्या जातात.

*३) तिसरे स्थान -पराक्रम स्थान

या वरून माणसाने स्वतः मेहनतीने मिळवलेले यश, छोटे प्रवास, लहान भावंडे, हात, श्वसनसंस्था पहिली जातात.

*४) चौथे स्थान -सुख स्थान

या स्थानावरून प्राथमिक शिक्षण (10/12 पर्यंतचे) वाहनसुख, गाडी, बंगला, मालमत्ता, आई, माणसाचे मन, जमीन या गोष्टी पाहतात.

*५) पाचवे स्थान -संतती स्थान/विद्या/

महालक्ष्मी स्थान

नावाप्रमाणेच यावरून मुले बाळे, उच्च शिक्षण, विवाह स्थळ, शेयर मार्केट,सट्टा बाजार, यश, अंगात असलेल्या कला, विविध गोष्टींचे उत्पादन, पाठीचा कणा या गोष्टी पाहतात

*६) सहावे स्थान -रिपू स्थान

या स्थानावरून आपले शत्रू , आजार, रोग, पोट, मामा, पाळीव प्राणी, कोर्टकेस इत्यादी गोष्टी पाहतात

*७) सातवे स्थान –विवाह स्थान

हे जोडीदाराचे स्थान आहे. जोडीदाराचे रंग रूप, स्वभाव, इत्यादी, शिवाय व्यवसायातील पार्टनर पण यावरूनच बघतात.

*८) आठवे स्थान -मृत्युस्थान

यावरून मृत्युच्या वेळची परिस्थिती, गुप्तधन, वारसा हक्काचे धन, गुप्त गोष्टी पहिल्या जातात.

*९) नववे स्थान – भाग्य स्थान/ पुर्व जन्म कर्म स्थान/ धर्मस्थान

या वरून दूरचे प्रवास, यात्रा, धार्मिक गोष्टी, न्यायखाते, उपासना, नातू,पणतू (मुलाचे मुल), पाय या गोष्टी पाहतात.

*१०)दहावे स्थान -कर्मस्थान

पिता, व्यापार, व्यवसाय, माणसाचा नोकरी धंदा, पदोन्नती, त्यातील यश, गुडघे या गोष्टी पाहतात .

*११) अकरावे स्थान -लाभ स्थान/धन संचय स्थान

या स्थानावरून वेगवेगळे लाभ, मित्र परिवार, कान या गोष्टी पाहतात, आपल्या सर्वांच्या कुंडलीत हे स्थान नक्कीच प्रबळ असावे

*१२) बारावे स्थान -व्यय स्थान

या वरून परदेशी जाणे, हॉस्पिटल, जेल, गुंतवणूक, खर्च होणे या गोष्टी पाहतात तसेच मोक्षा करिताही नवम व द्वादश या स्थानांचा एकत्रित विचार करतात

------------------------------------------------------

मंगळवारी सुख समृद्धी साठी हे उपाय करून बघा

--------------------------------------------------

मंगळवारी मंगळ ग्रहाच्या निमित्ताने विशेष पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की मंगळ ग्रहाच्या पूजेमुळे जमिनीशी निगडित कार्यांमध्ये विशेष लाभ मिळू शकतो.

1. प्रत्येक मंगळवारी मारुतीला शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पित करायला पाहिजे. या उपायाने मारुती लवकर प्रसन्न होतो.

2. लाल मसुरीच्या डाळीचे दान एखाद्या गरजूला व्यक्तीला द्या. या उपायामुळे मंगळाचे सर्व दोष दूर होण्यास मदत मिळते.

3. शिवलिंगावर लाल फूल अर्पित करायला पाहिजे. शिवलिंगावर लाल फूल अर्पित केल्याने मंगळ ग्रहाची प्रसन्नता वाढते.

4. मारुतीच्या समोर दिवा लावावा आणि हनुमान चालीसाचा पाठ करावा.

5. एखाद्या असा तलाव किंवा सरोवर जेथे मासोळ्या आहे. तेथे जाऊन मासोळ्यांना कणकेच्या गोळ्या बनवून खाऊ घालाव्या. हा उपाय तुम्ही रोज करू शकता.

6.हा दिवस कर्जापासून मुक्तीसाठी उत्तम मानला गेला आहे.

या दिवशी लाल गायीला पोळी खाऊ घालावी.

7.मंगळवारी हनुमान मंदिर किंवा गणपती मंदिरात नारळ चढवावे.

8. मंगळवारी लाल वस्त्र, लाल फळ, लाल फूल आणि लाल रंगाची मिठाई गणपतीला अर्पित केल्याने मनोकामना पूर्ण होते.

9. मंगळवारी एखाद्या देवी मंदिर किंवा गणपती मंदिरात ध्वजा चढवून आर्थिक समृद्धीसाठी प्रार्थना केली पाहिजे. पाच मंगळवार पर्यंत असे केल्याने धन मार्गात येणार्या सर्व अडचणी दूर होतात.

10. मनाच्या शांतीसाठी पाच लाल फूल एखाद्या मातीच्या भांड्यात गहूसोबत घराच्या गच्चीवरील पूर्वी कोपर्यात झाकून ठेवावे. एक आठवडा त्यांना हातदेखील लावू नये. पुढील आठवड्याच्या मंगळवारी ते गहू गच्चीवर पसरवून द्यावे आणि फुलं घरातील मंदिरात ठेवावे. याने आपल्या जीवनातील सर्व ताण दूर होईल आणि आपल्याला शांती जाणवेल.

11. मंगळवारी या वस्तूंचे प्रयोग करणे किंवा या वस्तू दान करण्याचे विशेष महत्त्व आहे- तांबे, सोनं, केशर, कस्तुरी, गहू, लाल चंदन, लाल गुलाब, शेंदूर, मध, लाल पुष्प, शेर, मृगछाल, मसुराची डाळ, लाल कन्हेर, लाल मिरची, लाल दगड, लाल मूंगा.

----------------------------------------


fly