━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━
❀ जेवताना पाणी पिण्याची सवय ❀
━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━
पाणी प्यायल्यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. पण चुकीच्या वेळेस आणि चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्यास अनेक समस्याही उद्भवू शकतात. जर तुम्हाला जेवताना किंवा काही खाताना मध्येच पाणी प्यायची सवय असेल तर त्यामुळे होणारे नुकसान जाणून घेऊया.
पाणी हे आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेटेड राहतेच, शिवाय अनेक आजारांपासून आपण दूर राहतो. पण हेच पाणी काही वेळेस आपल्यासाठी हानिकारकही ठरू शकते. चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे हे आरोग्याला हानी पोहोचवू शकते.खरंतर बऱ्याच लोकांना काही खाताना किंवा जेवताना मध्येच किंवा जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. मात्र याच सवयीमुळे अनेक त्रास होऊ शकतो. तुम्हालाही अशी सवय असेल तर यामुळे काय नुकसान होते, हे जाणून घेऊया.
पचन क्रियेवर पडतो प्रभाव
जेवताना किंवा नंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनावर परिणाम होतो. खरे तर आपण जेव्हा अन्न खातो, तेव्हाच पचनक्रिया सुरू होते. अशा परिस्थितीत जेवणाच्या मध्येच पाणी प्यायल्याने या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे एकतर अन्न पचायला बराच वेळ लागतो किंवा कधी कधी अन्न नीट पचत नाही.
इन्सुलिनची पातळी वाढते
शरीरातील इन्सुलिन नावाचे हार्मोन स्वादुपिंडाद्वारे सोडले जाते. शरीरातील साखरेच्या प्रवाहात इन्सुलिनची महत्त्वाची भूमिका असते. पण जेवताना किंवा नंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. म्हणूनच जेवताना मध्येच पाण्याचे सेवन टाळणे चांगले ठरते.
ॲसिड रिफ्लेक्सचा त्रास होऊ शकतो
अन्नासोबतच पाणी प्यायल्याने ॲसिड रिफ्लेक्सची समस्या देखील उद्भवू शकते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, अन्न खाताना पाणी प्यायल्याने पोटात ॲसिडचे प्रमाण वाढते, त्यामुळे अनेक वेळा आंबट ढेकर येऊ लागतात. या समस्येलाच ॲसिड रिफ्लेक्स म्हणतात. एवढेच नाही तर जेवताना पाणी प्यायल्याने छातीत जळजळ होऊ शकते.
वजन वाढू शकते
जेवता पाणी प्यायल्याने लठ्ठपणाचा धोका संभवतो. खरंतर जेवताना पाणी प्यायल्याने पचनावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत अन्नाचे पचन नीट होत नाही, आणि जे अन्न पचत नाही त्यापासून तयार होणारे ग्लुकोज लठ्ठपणात बदलते. अशा परिस्थितीत जेवताना किंवा त्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीरातील साखर तर वाढतेच पण वजनातही वाढ होऊ शकते.
पोषक तत्वांची कमतरता
जर तुम्हाला जेवताना पाणी पिण्याची सवय असेल तर शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. अन्नातील पोषक तत्व शोषून घेणे हे आपल्या पचनसंस्थेचे काम असते. पण जेवताना मध्येच पाणी प्यायल्यास या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो, त्यामुळे आपल्या शरीरात पोषक तत्वांचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें