सोमवार, 17 अप्रैल 2023

श्री स्वामी समर्थ चिंतन (२)

 ❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

     🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।। 🙏🌹  

             श्री स्वामी समर्थ चिंतन (२)

       

 

            स्वामी अंतर्ज्ञानी होते. भविष्यात काय घडणार आहे, याचे ज्ञान त्यांना असल्यामुळे आपल्या कृतीतून ते लोकांना सावध करीत असत. स्वामी भक्तांसाठी "वैद्यो नारायणो हरि:" होते. व्याधी जडलेल्या माणसाला वैद्यांच्या औषधाने गुण आला नाही, तर ते स्वामींकडे येत. स्वामींनी सांगितलेल्या औषधांनी ते बरे होत असत. जो भक्त निस्वार्थ वृत्तीने आणि शुध्द आचरणाने नित्य स्वामींची सेवा करीत, त्यांच्या मनातील इच्छा स्वामी पूर्ण करीत असत. श्रीस्वामी समर्थांची सिध्द योग्यांमध्ये 'सर्वश्रेष्ठ योगी' म्हणून गणना केली जाते. स्वामी हे मुळातच ज्ञानसंपन्न असल्यामुळे कुणीही साधुसंतांने त्यांना आध्यात्मिक प्रश्न विचारला असता ते समर्पक उत्तरे देऊन त्यांचे समाधान करीत. अक्कलकोटचे हे चालते बोलते परब्रम्ह बालकांबरोबर खेळू लागले की, बालकच होत असत. बदफैली लोकांना शिव्या देऊन सन्मार्गाला लावीत. कधी कधी गीतेतले श्लोक, वेदमंत्र आणि संतांचे अभंग म्हणत असत. रसिकता व विनोदी बुध्दीही त्यांचे अंगी होती. कुत्रा आणि गाय हे त्यांचे आवडते प्राणी होते.


           स्वामी अलौकिक व्यक्तिमत्वाचे योगी असून स्वयंभू होते. त्यांनी आजकालच्या साधुसंतांप्रमाणे मठाची व आश्रमांची उभारणी केली नाही. भोळ्या भाबड्या भक्तांना फसवून, त्यांचेकडून धनाची अपेक्षा केली नाही. कारण ते स्वतः कुबेर होते. राजाधिराज होते. वरून क्रोधित दिसणाऱ्या स्वामींच्या अंत:करणात प्रेमाचा झरा वाहत असे. त्यांची नित्य सेवा करणारे सेवेकरी चोळाप्पा, बाळाप्पा, श्रीपादभट आणि सुंदराबाई स्वामींची अहोरात्र काळजी घेत असत. स्वामींनी दत्तात्रेय आदि देवतांचा कधीही जप केला नाही. केवळ अक्कलकोटी असलेल्या शिवमंदिरात जात असत. अक्कलकोटचे मालोजी राजे काशी क्षेत्री विश्वेश्वराचे मंदिरात शिवाचे दर्शन घेण्यासाठी गेले असता, त्यांना शिवाऐवजी स्वामींचे दर्शन घडले.


           भगतद्गीतेच्या ९ व्या अध्यायातील एक श्लोक देह ठेवण्यापूर्वी स्वामींनी २५ वेळा म्हटला. याचा अर्थ "श्री स्वामींची जे अनन्य भावे भक्ती करतील त्यांचा योगक्षेम, ऐहिक व पारमार्थिक उन्नती श्री स्वामी चालवतील." देह ठेवल्यानंतरही "हम गया नही जींदा है ।" असा प्रत्यय श्रीस्वामींनी बिडकर महाराजांना दिला. जे सकाम भावनेने स्वामींकडे जातात त्यांची इच्छापूर्ती होते. जे निष्काम भावनेने स्वामींकडे जातात, त्यांच्या जन्माचे कल्याण स्वामी करतात. स्वामींवर पेर्ण श्रध्दा ठेवून, आपल्या वाट्याला आलेले कर्म आपण प्रयत्नपूर्वक पार पाडल्यास आपले जीवन स्वामीमय, आनंदमय बनून जाईल.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly