सोमवार, 10 अप्रैल 2023

मुलींच्या पायात चांदीचंच पैंजण का असतं ?

 मुलींच्या पायात चांदीचंच पैंजण का असतं ?


भारतातील महिलांच्या पेहरावात विविध प्रकारच्या दागिन्यांचा समावेश होतो. कित्येक पिढ्यांपासून या गोष्टी स्त्रिया वापरत आल्या आहेत. नाकातील नथ, गळ्यातील गंठण, कानातलं, कमरपट्टा किंवा मग पैंजण; स्त्रिया यातील किमान एक तरी दागिना वापरतातच.


या सर्वांचा उद्देश केवळ सौंदर्य वाढवण्यासाठी नसून, त्याचे आरोग्यावरही चांगले परिणाम होत असतात. याच कारणामुळे, बाकी दागिने जरी सोन्याचे किंवा चांदीचे असले, तरी पैंजण हे केवळ चांदीचेच वापरले जाते. भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार, चांदीचा संबंध हा चंद्राशी आहे. प्राचीन ग्रंथांमध्ये असं म्हटलं आहे, की चांदीची उत्पत्ती ही भगवान शंकराच्या नेत्रांतून झाली होती.


यामुळे चांदीला समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच एखाद्याचा भरपूर फायदा झाला, की त्याची चांदी झाली असं म्हटलं जातं. भारतीय संस्कृतीत चांदीचा असा उल्लेख असल्यामुळे, चांदीचं पैंजण महत्वपूर्ण आहे. 


आपण थोडं मध्य-पूर्व आशियाकडे गेलो, तर तेथील संस्कृतीमध्ये पैंजणाचा संबंध आरोग्याशीही लावला जातो. पैंजणाचा परिणाम हा शारिरीक आणि मानसिक आरोग्यावरही होतो, असं या देशांमध्ये कित्येक पिढ्यांपासून मानलं जातं. त्यामुळेच तिथेही चांदीचं पैंजण वापरण्यावर भर दिला जातो. एकूणच भारत असो किंवा बाहेरचे देश, सगळीकडेच चांदीचं पैंजण वापरण्याचे भरपूर फायदे सांगितले जातात.


मात्र हे फायदे काय आहेत? जाणून घेऊया. 

असं म्हटलं जातं, की शरीरातील बाहेर पडणारी सकारात्मक ऊर्जा, तेथेच थांबवून ती शरीरात पुन्हा पाठवण्याचं काम चांदी करते. आपल्या शरीरातून जी ऊर्जा बाहेर पडत असते, त्याचे प्रमाण हाताच्या किंवा पायाच्या माध्यमातून सर्वाधिक असते.


चांदीचं कडं वा पैंजण घातल्यामुळे ही ऊर्जा बाहेर पडण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे आपल्याला लवकर थकवा जाणवत नाही. तसेच, शरीरात बऱ्याच प्रमाणात सकारात्मक ऊर्जा राहते. यासोबतच चांदीमुळे रक्ताभिसरणही चांगलं होत असल्याचं म्हटलं जातं.


चांदीच्या पैंजणामुळे पायात रक्ताचा पुरवठा चांगल्या प्रमाणात होत राहतो. किचनमध्ये कित्येक तास उभं राहून काम करणाऱ्या महिलांना पाय दुखणं किंवा पाठदुखी अशा समस्या जाणवू लागतात. मात्र, चांदीचं पैंजण वापरल्यामुळे अशा दुखण्यांचं प्रमाण कमी होतं. चांदीमध्ये मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती असते, त्यामुळेच जुन्या काळातील राजेमहाराजे सोन्या-चांदीच्या ताटांमध्ये खात-पित असत.


चांदीची आभूषणं वापरल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. यामुळेच आपल्याकडे लग्नात वधूच्या पायांच्या बोटांत चांदीची जोडवी घालण्याची पद्धत आहे. यामुळे स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास कमी होण्यास मदत होते, तसंच गर्भाशयही सुस्थितीत ठेवण्यासाठी चांदीच्या जोडव्यांचा आणि पैंजणाचा फायदा होते. 


सोन्याचं पैंजण का नाहीत वापरत? 

आयुर्वेद शास्रानुसार, चांदी ही पृथ्वीच्या ऊर्जेला चांगल्याप्रकारे प्रतिसाद देते, तर सोनं हे शरीराच्या आणि प्रकाशाच्या ऊर्जेला उत्तम प्रतिसाद देतं. त्यामुळेच चांदीचा उपयोग पैंजण आणि जोडव्यांमध्ये केला जातो, तर सोन्याचा उपयोग नथ, गंठण अशा शरीराच्या वरील भागात वापरल्या जाणाऱ्या दागिन्यांमध्ये केला जातो.


🌹आरोग्यम् धनसंपदा🌹

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly