कोहळा
------------------------------
घरात दुकानात अथवा व्यवसायाचे ठिकाणी असणाऱ्या , येणाऱ्या वाईट शक्ति व नजरदोष यापासुन सगळयांचे रक्षण करण्यासाठी कोहळा लावला जातो.
------------------------------------------------
कोहळा लावण्याची योग्य पध्दत
-----------------------------------------
कोहळा आणताना देठ असलेला आणावा. आणल्यानंतर कोहळा धुवावा.
त्याच्या 2 समोरासमोरच्या बाजुला ऊँ व स्वस्तिक काढ़ायचे असते. स्वस्तिक कुंकवाने काढावे. व ऊँ अष्टगंधाने काढावे.
त्यानंतर खालपासुन वर पर्यंत काजळाने एक रेघ ओढ़ावी. त्यानंतर कोहळा देवाजवळ ठवुन त्याची पूजा करावी.( हळद, कुंकू, अक्षदा, दिवा ,अगरबत्ती ) त्यानंतर प्रार्थना करताना घरात असणाऱ्या ,
येणाऱ्या वाईट शक्ति व नजरदोष यापासुन सगळयांचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करावी. आणि घरात व घराबाहेर ते कोहळे शिंकाळयात टांगावे.
कोहळा टांगल्यानंतर कधी कधी आठ दिवसाच्या आत खराब होतो. कारण अशुभ ऊर्जा सामावण्याची त्याची क्षमता संपलेली असते अशा वेळी कोहळा सडतो त्यातून पाणी गळते. असे ज्या वेळी होते तेव्हा कोहळा काढून कचऱ्यात टाकून द्यावा.
पुन्हा नवीन कोहळा आणून लावावा. कदाचीत सुरवातिला लवकर लवकर खराब होतो ( जर अशुभ ऊर्जा जास्त साठली असेल तर....)
नंतर तो एक वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकतो.
तरी पण जर सोमवती किंवा शनिअमावस्या किंवा दिवाळी अमावस्या हया वेळी कोहळा खराब नाही झाला तरी बदलावा .
एरवी जर कोहळा खराब झाला तर त्या पुढील शनिवारी लावावा. व एरवी लावताना सुद्धा शनिवारीच लावायचा व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा.
कोहळा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यावर बाहेरुन आलेल्या लोकांची नजर जायला हवी व बाहेर लावताना बाहेरची व्यक्ति त्याच्या खालुन आली पाहिजे.
कोहळा टांगल्याने घरात नकारात्मक शक्ति रहात नाही. तसेच बाहेरून येणारी व्यक्ति जर आपल्याशी खूप चांगले बोलत असेल पण मनात आपल्या बद्दल जर ईर्षा बाळगून असेल तर ते मनातले भाव निगेटीविटि मधे बदलतात व त्याचा परिणाम घरात व्यक्तिवर होतो
चिडचिड वाढते,व्यवसायात अडचणी येतात. प्रगती होत नाही. तसेच बाहेरची बाधा परिणाम करत नाही.
एक कोहळा घरात दुकानात व एक बाहेर टांगावा म्हणजे बाहेरून येणारी व्यक्ति त्या खालुन आली पाहिजे त्यामुळे कोहळा तिथेच त्या व्यक्तीच्या वाईट विचारावर परिणाम करतो .
----------------------------
बाहेरून कार्य करून आल्यावर, घरात प्रवेश करण्यापूर्वी पाय कां धुवावेत?
----------------------------------------------------
असे म्हणतात की, अशुभ कार्याला जाऊन आल्यावर पाय सर्व बाजूंनी धुवून घरात यावे, कारण अशुभ शक्ती, दारिद्र्य पायाद्वारे चालत घरात येते. शिवाय पायाला
लागलेल्या धुळीतूनही अशुभ शक्ती घरात प्रवेश करतात.
अशी कथा सांगतात की, फार पूर्वीच्या काळी एक राजा अतिशय घमेंडखोर होता. तो कोणाचेही कांही चालवून घेत नसे. एकदा काय झाले, तो राजा प्रजेच्या
दौर्यावर गेला असतां त्यावे पादत्राण तुटले आणि तो पाय धुवून येत असतांना पायाच्या घोट्याजवळ कांही भागाला पाणी लागले नाही, तर तेवढ्या
भागातून शनी त्याच्या राजवाड्य़ात प्रवेश करतां झाला आणि त्याचे सर्व साम्राज्य धुळीस मिळाले.
म्हणून घरात येण्यापूर्वी पाय सर्व बाजूंनी धुवून घरात यावे.
-------------------------------------------------
_____
भस्म
------------------------
व्युत्पत्ती
‘भ’ म्हणजे ‘भर्त्सनम्’ (नाश होणे) आणि ‘स्म’ म्हणजे ‘स्मरणम्’ (स्मरण करणे) थोडक्यात ज्यामुळे आमची पापे नाश पावतात आणि आम्हाला ईश्वराचे स्मरण होते, ते भस्म ! भस्मातील ‘भ’ म्हणजे सगळ्या पापांची निंदा करण्याचे द्योतक आहे, तर ‘स्म’ यातून शिवाच्या स्मरणाची आठवण होते.
व्याख्या
कुठलीही वस्तू जाळल्यावर जी राख उरते, तिला ‘भस्म’ म्हणत नाहीत, तर देवाची पूजा म्हणून यज्ञात आहुती दिलेले तूप, समिधा, इतर वनस्पती इत्यादी सर्व जाळल्यावर जे अवशेष रहातात, त्यालाच ‘भस्म’ म्हणतात.
अर्थ
भस्म लावणे, याचा सांकेतिक अर्थ म्हणजे ‘दुष्कृत्यांचा नाश होणे’ आणि ‘ईश्वराची आळवणी करणे’ होय.
-------------------------------
■. भस्माचे महत्त्व
--------------------------------
भस्म आपल्याला ‘हे शरीर नश्वर आहे आणि एक दिवस त्याचीही राख होणार आहे; म्हणून आपण देहाची आसक्ती बाळगता कामा नये’, याची आठवण करून देते
----------------------------
. भस्माचा टिळा
------------------------------
शिवभक्तीचे प्रतीक असणे-
भस्म हे विशेषकरून शिवाशी संबंधित आहे; कारण भगवान
शिव सर्वांगाला भस्म लावतो. शिवभक्त आपल्या भालप्रदेशावर भस्माने त्रिपुंड्राकृती काढतात. कधी कधी लाल रंगाचा टिळाही या त्रिपुंड्राच्या मध्यभागी काढतात.
तो टिळा शिवभक्तीचे प्रतीक मानला जातो. जीव-शिव यांच्या मीलनाने हे दृश्य आणि अदृश्य जगत निर्माण होते, हे दर्शवणारे चिन्ह होय.
-----------------------------------------
■. भस्म लावण्याचा उद्देश
------------------------------------------
आम्हाला आमचे देहतादात्म्य सोडून या जन्ममरणाच्या फेर्यांतून मुक्त व्हायचे आहे, याची आठवण म्हणून.
■. भस्माचा वापर
दंडावर भस्माचा वापर
अ.
भस्म हे सर्वसाधारणपणे कपाळावर लावतात. काही जण दंड आणि छाती इत्यादी भागांवरही लावतात. काही तपस्वी सर्वांगाला भस्म लावतात.
अ १.
*भस्म कपाळाला लावतांना पाळावयाचा दंडक
उपनिषदे एक दंडक पाळायला सांगतात, ‘भस्म कपाळाला लावतांना ‘महामृत्यूंजय मंत्रा’चा जप करावा.
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् ।।
– ऋग्वेद, मण्डल ७, सूक्त ५९, ऋचा १२
*अर्थ
कीर्तीमान आणि महाशक्तीशाली त्र्यंबकाचे (रुद्राचे) आम्ही यजन करतो. हे रुद्रा, काकडी देठापासून खुडावी, त्याप्रमाणे आम्हाला मृत्यूपासून मुक्त कर; पण अमरत्वापासून दूर ठेवू नको.
आ. बरेच जण प्रत्येक वेळी चिमूटभर भस्मच वापरतात.
इ. पूजा म्हणून देवाला राखेने अभिषेक घालतात. त्या भगवत् स्पर्शाने पवित्र झालेली राख भस्म म्हणून वाटतात.
■. भस्माचे इतर प्रचलित शब्द
विभूती
विभूती म्हणजे गौरव. विभूती लावणार्यांना ती गौरव प्रदान करते.
. रक्षा
रक्षा म्हणजे सुरक्षेचा स्त्रोत. रक्षा लावणार्यांना तो निर्मल बनवतो आणि अनारोग्य अन् विपत्ती यांपासून त्यांचे रक्षण करतो.
-----------------------------------------
■ भस्मातील औषधी गुण
-------------------------------------------
भस्मात काही औषधी गुण असल्याने ते आयुर्वेदिक उपचार पद्धतीत वापरतात. शरिरातील बाष्पता शोधून घेण्याच्या क्षमतेमुळे डोकेदुखी, सर्दी या व्याधींसाठी त्याचा औषधात उपयोग होतो.
■ ब्रह्माप्रमाणेच राखही शाश्वत असणे
लाकडे जळल्यावर त्यांची केवळ राख शेष रहाते. त्या राखेचा आणखी नाश होत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्म हे अविनाशी सत्य आहे. असंख्य नाम रूपात्मक असणारी ही दृश्ये आणि अदृश्य सृष्टी नष्ट झाली, तरी हे ‘सत्य’ विद्यमान रहाते. –
------------------------------
भस्माची शिकवण
--------------------------
१.
मनुष्याने आपली आहुती देऊन भस्म होणे, म्हणजे आपल्या इच्छा-आकांक्षा, दोष, अज्ञान अन् अहं यांचा त्याग करणे आणि मनाची शुद्धता प्राप्त करणे
२.
मानवी देह हा नश्वर असल्याने मरणानंतर त्या देहाची जळून राखोटी होणार आहे. त्यामुळे कोणीही देहासक्ती बाळगू नये. मृत्यू कोणत्याही क्षणी येऊ शकतो, याची जाणीव ठेवून मोठ्या महत्प्रयासाने मिळालेला मनुष्यजन्म सार्थकी लावण्यासाठी आणि आपला प्रत्येक क्षण पवित्र अन् आनंददायी करण्यासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे, असे भस्म सूचित करते. अर्थात् यांतून साधनेचे महत्त्व पुन: एकदा अधोरेखितहोते.
--------------------
जन्मकुंडली म्हणजे काय?
----------------------------------------
खूप लोकांना हा प्रश्न पडतो कि जन्मकुंडली नेमके म्हणजे काय? तर चला थोडक्यात जाणून घेऊया
देवाचे काम काय आहे की आपल्याला आईच्या गर्भात गर्भधारणा झाल्यावर पहिल्या दिवसा पासुन ते नवव्या महिन्यात पर्यंत गर्भात आपले रक्षण करणे आणि जसा आपला आईच्या गर्भातून आपला या पृथ्वीवर म्हणजे एका ग्रह वर जन्म होतो तसा या नऊ ग्रहाचा आपल्या जीवनावर प्रभाव सुरू होतो.
जातकाचा जन्म पृथ्वीवर झाल्यावर वरते या ग्रहाची स्थिति काय आहे ते आपल्या जन्मदिनांक, जन्मवेळी तुमच्या जन्मस्थळावरून पंचागच्या आधारे ग्रह- नक्षत्र-राशींची स्थिती दाखवणारा सांकेतिक पद्धतीचा आराखडा म्हणजे तुमची जन्मकुंडली व कुंडलीतील ग्रहांची स्थिती नुसार ग्रह हे जीवनावर प्रभाव करतात.
कुंडलीत जे आकडे असतात त्यांना जन्म लग्न असे म्हणतात ते राशींचे अनुक्रमांक दाखवणारे आकडे असतात. स्थानांचे म्हणजे घरांचे अनुक्रमांक तिच्यात लिहीत नाहीत. आपल्याकडे ती चौकटीत मांडलेली असते. कुंडली ही खगोलशास्त्रावर आधारलेली असते पण तिच्यावरुन भाकीत सांगणे हा फलज्योतिषाचा भाग आहे
पण प्रथम आपल्याला ज्योतिषाची थोडी माहिती असली पाहिजे. आपण जेव्हा ज्योतिषास जन्म वेळ, तारीख आणि जन्मठीकाण सांगतो .तेव्हा ज्योतिषी एक कुंडली तयार करतो .ही कुंडली म्हणजे जन्माच्या वेळी आकाशात जी ग्रहस्थिती होती त्याचा नकाशा . म्हणून
आज ह्या लेखात कुंडलीमध्ये जी १२ स्थाने असतात त्यांची माहिती सांगेन.
*१) पहिले स्थान -लग्नस्थान
या स्थाना वरून माणसाचे आयुष्य, रंग, उंची, रूप, स्वभाव, डोके, मेंदू या गोष्टी पहिल्या जातात.
*२) दुसरे स्थान – धनस्थान
या स्थाना वरून माणसाला मिळणारा पैसा, त्याचे डोळे, बोलणे, वाणी (मधुरता, कुटुंबातील व्यक्ती, त्याशिवाय काही मारक बाधक गोष्टी पहिल्या जातात.
*३) तिसरे स्थान -पराक्रम स्थान
या वरून माणसाने स्वतः मेहनतीने मिळवलेले यश, छोटे प्रवास, लहान भावंडे, हात, श्वसनसंस्था पहिली जातात.
*४) चौथे स्थान -सुख स्थान
या स्थानावरून प्राथमिक शिक्षण (10/12 पर्यंतचे) वाहनसुख, गाडी, बंगला, मालमत्ता, आई, माणसाचे मन, जमीन या गोष्टी पाहतात.
*५) पाचवे स्थान -संतती स्थान/विद्या/
महालक्ष्मी स्थान
नावाप्रमाणेच यावरून मुले बाळे, उच्च शिक्षण, विवाह स्थळ, शेयर मार्केट,सट्टा बाजार, यश, अंगात असलेल्या कला, विविध गोष्टींचे उत्पादन, पाठीचा कणा या गोष्टी पाहतात
*६) सहावे स्थान -रिपू स्थान
या स्थानावरून आपले शत्रू , आजार, रोग, पोट, मामा, पाळीव प्राणी, कोर्टकेस इत्यादी गोष्टी पाहतात
*७) सातवे स्थान –विवाह स्थान
हे जोडीदाराचे स्थान आहे. जोडीदाराचे रंग रूप, स्वभाव, इत्यादी, शिवाय व्यवसायातील पार्टनर पण यावरूनच बघतात.
*८) आठवे स्थान -मृत्युस्थान
यावरून मृत्युच्या वेळची परिस्थिती, गुप्तधन, वारसा हक्काचे धन, गुप्त गोष्टी पहिल्या जातात.
*९) नववे स्थान – भाग्य स्थान/ पुर्व जन्म कर्म स्थान/ धर्मस्थान
या वरून दूरचे प्रवास, यात्रा, धार्मिक गोष्टी, न्यायखाते, उपासना, नातू,पणतू (मुलाचे मुल), पाय या गोष्टी पाहतात.
*१०)दहावे स्थान -कर्मस्थान
पिता, व्यापार, व्यवसाय, माणसाचा नोकरी धंदा, पदोन्नती, त्यातील यश, गुडघे या गोष्टी पाहतात .
*११) अकरावे स्थान -लाभ स्थान/धन संचय स्थान
या स्थानावरून वेगवेगळे लाभ, मित्र परिवार, कान या गोष्टी पाहतात, आपल्या सर्वांच्या कुंडलीत हे स्थान नक्कीच प्रबळ असावे
*१२) बारावे स्थान -व्यय स्थान
या वरून परदेशी जाणे, हॉस्पिटल, जेल, गुंतवणूक, खर्च होणे या गोष्टी पाहतात तसेच मोक्षा करिताही नवम व द्वादश या स्थानांचा एकत्रित विचार करतात
------------------------------------------------------
मंगळवारी सुख समृद्धी साठी हे उपाय करून बघा
--------------------------------------------------
मंगळवारी मंगळ ग्रहाच्या निमित्ताने विशेष पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की मंगळ ग्रहाच्या पूजेमुळे जमिनीशी निगडित कार्यांमध्ये विशेष लाभ मिळू शकतो.
1. प्रत्येक मंगळवारी मारुतीला शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पित करायला पाहिजे. या उपायाने मारुती लवकर प्रसन्न होतो.
2. लाल मसुरीच्या डाळीचे दान एखाद्या गरजूला व्यक्तीला द्या. या उपायामुळे मंगळाचे सर्व दोष दूर होण्यास मदत मिळते.
3. शिवलिंगावर लाल फूल अर्पित करायला पाहिजे. शिवलिंगावर लाल फूल अर्पित केल्याने मंगळ ग्रहाची प्रसन्नता वाढते.
4. मारुतीच्या समोर दिवा लावावा आणि हनुमान चालीसाचा पाठ करावा.
5. एखाद्या असा तलाव किंवा सरोवर जेथे मासोळ्या आहे. तेथे जाऊन मासोळ्यांना कणकेच्या गोळ्या बनवून खाऊ घालाव्या. हा उपाय तुम्ही रोज करू शकता.
6.हा दिवस कर्जापासून मुक्तीसाठी उत्तम मानला गेला आहे.
या दिवशी लाल गायीला पोळी खाऊ घालावी.
7.मंगळवारी हनुमान मंदिर किंवा गणपती मंदिरात नारळ चढवावे.
8. मंगळवारी लाल वस्त्र, लाल फळ, लाल फूल आणि लाल रंगाची मिठाई गणपतीला अर्पित केल्याने मनोकामना पूर्ण होते.
9. मंगळवारी एखाद्या देवी मंदिर किंवा गणपती मंदिरात ध्वजा चढवून आर्थिक समृद्धीसाठी प्रार्थना केली पाहिजे. पाच मंगळवार पर्यंत असे केल्याने धन मार्गात येणार्या सर्व अडचणी दूर होतात.
10. मनाच्या शांतीसाठी पाच लाल फूल एखाद्या मातीच्या भांड्यात गहूसोबत घराच्या गच्चीवरील पूर्वी कोपर्यात झाकून ठेवावे. एक आठवडा त्यांना हातदेखील लावू नये. पुढील आठवड्याच्या मंगळवारी ते गहू गच्चीवर पसरवून द्यावे आणि फुलं घरातील मंदिरात ठेवावे. याने आपल्या जीवनातील सर्व ताण दूर होईल आणि आपल्याला शांती जाणवेल.
11. मंगळवारी या वस्तूंचे प्रयोग करणे किंवा या वस्तू दान करण्याचे विशेष महत्त्व आहे- तांबे, सोनं, केशर, कस्तुरी, गहू, लाल चंदन, लाल गुलाब, शेंदूर, मध, लाल पुष्प, शेर, मृगछाल, मसुराची डाळ, लाल कन्हेर, लाल मिरची, लाल दगड, लाल मूंगा.
----------------------------------------
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें