बुधवार, 19 अप्रैल 2023

अळूच्या पानाचे आयुर्वेदिक उपयोग.

 अळूच्या पानाचे आयुर्वेदिक उपयोग.


अळूची पाने मोठी व पसरट असतात. आणि ह्यावर पावसाचे पाणी चिकटून रहात नाही. अळुची चव ही तुरट गोड असते आणी हा थंड असतो त्यामुळे हा शरीरात वात व कफ दोष वाढवतो व पित्त कमी करतो.


अळू ही मूळची रानभाजी. म्हणजे ती रानावनातच आपोआप उगवत असे. हळूहळू तिचा खाण्यासाठी वापर व्हायला लागला. भारतातल्या बहुसंख्य राज्यात अळू खाल्ला जातो. बेसन लावलेली अळुवडी आपल्या सर्वांची परिचयाचे आहे. एखादे अळूचे पान जर खाजवे निघाले कि सगळी बोंबाबोंब! घश्याची खाज सांगता ही यायची नाही, आणि सहन ही व्हायची नाही....असो....


अळूचे काही औषधि  उपयोग.


1.बाळंत स्त्रीला अळू आणि मेथी यांची मिश्र भाजी खाल्यास भरपूर आणि सकस दुध येते.


2.अळू हे थंड, सारक, मलमूत्र साफ करणारे आणि भूक वाढवणारे आहे. 


3.गांधीलमाशी किंवा इतर विषारी कीटक चावल्यास अळू फुफाट्यात भाजून त्याचा रस काढून चावलेल्या जागी लावतात आणि पोटात देतात. अळूच्या पानांच्या रसात मिरे घालून पोटात घेतात, दंश झालेल्या जागेवर लावतात आणि डोक्यालाही चोळतात.

 

4.जखमेवर अळुच्या पाल्याचा रस वाटून लावल्यास त्यातील रक्त स्त्राव बंद होतो व जखम लवकर भरते.


5.अळूची भाजी रक्तवर्धक आहे.


अळूमध्ये Calcium Oxalate या द्रव्याचे क्षार किंवा त्यांचे स्फटिक असतात. ते घशाला टोचतात. म्हणून घशाला हे अळू खाल्यावर टोचल्यासारखे, खाजल्यासारखे होते. चिंचेचे पाणी यात घातल्याने हे क्षार त्यात विरघळतात आणि अळू खाजत नाही आणि पदार्थालाही छान चव येते.


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly