कोरोनो के साईड इफेक्टस...
गेल्या एक दीड महिन्यांपासून केवळ घरात आणि घरात बसून असल्यामुळे घरातील समोर आलेलं ढळढळीत सत्य...
१. आमच्या घरात गरजेपेक्षा कितीतरी वस्तू जास्त आहेत... ज्यांना घरात का घेतलं आणि अजूनही घरात त्या का आहेत हा एक मोठा प्रश्नच आहे...
२. आमच्या घरात ऐकून चारशे बेचाळीस भांडी असून त्यातील केवळ दोनशे बहात्तर भांडी वापरात असतात...( रोज मी भांडी घासतो त्यामुळे ज्ञानात पडलेली माहिती )
३. आमच्या घराचं एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचे अंतर हे साधारणपणे पंचवीस मीटर असून जवळपास ऐंशी चकरा मारल्या की चार किमी चालणं होतं...
४. आमच्या घरात दोन-तीन वाट्या अशा आहेत की ज्या अतिक्रमण केल्यासारख्या घरात ठाण मांडून आहेत...त्यावर दुसऱ्याच कोणाचतरी नाव टंकलिखित केलेलं असून बायकोने बहुदा त्या वाट्या पाकिस्तानने बळकावलेल्या कश्मीरप्रमाणे आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत...लॉकडाऊन संपला की सर्जिकल स्ट्राइक करून त्या ताब्यात घेऊन ज्याच्या त्याला परत करण्यात येतील...
५. या बायकोकडे आणि पोरीकडे इतके कपडे आहेत, इतके कपडे आहेत, इतके कपडे आहेत की या त्या त्यांच्या साड्या, सलवार, पॅंट शर्ट यांची एकमेकांची गाठ बांधून लांब केले तर पृथ्वीला वेढा मारून त्याची गाठ घालून तिला आकाशात टांगता येईल...
६. आमच्या घरात असाही काही दुर्गम भाग आहे जेथे माणूस आणि झाडू कधीही पोहोचलेला नाही...
७. घरात तीस टक्के जिन्नस, पदार्थ, वस्तू अशा आहेत की ज्या बायकोला 'कोठेय?' असं विचारल्यावर ती त्या वस्तू घरात असूनही 'नाही आहेत' असं उत्तर देते...
८. बायकोने बोललेल्या प्रत्येक वाक्याला अर्थ असतोच असं नाही आणि आपण उगाचंच आपला मेंदू फ्राय करून त्याचा अर्थ लावून त्याला प्रत्युत्तर द्यायचे नसते हे याकाळात अजून ज्ञानदात पडलेली भर...'शांती' खूप गोड असते...
९. मनात आणलं तर घरातल्या घरात एक तास व्यायाम सहज करता येऊ शकतो...
१०. आमच्या घरातील भांडे घासणाऱ्या मावशी का टिकतं नाही याचा शोध लागला असून घरात तयार केलेला प्रत्येक पदार्थ चोवीस तासात तीन वेळा आपले कपडे सॉरी भांडे बदलत असतो...
११. आमच्या घरातील एका बेडशीटवर दोनशे बेचाळीस फुले असून एकशे बहात्तर पानं आहेत...
१२. घरात टीव्ही असूनही तो जराही न बघता दिवस काढता येऊ शकतो...
१३. आपला मोबाईलचा टॉक टाईम ( एका दिवसात फोन वर बोलण्याचा कालावधी ) हा बायकोच्या मोबाईल टॉकटाईमचे वर्गमुळ काढून त्याला तृतीयांशने गुणल्यावर जो येतो आकडा येतो त्याच्या निम्मा असतो...
सध्या एवढे बास...अजून बरंच काही आहे पण ते पुढच्या भागात...