श्री सियाराम बाबां लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
श्री सियाराम बाबां लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

शनिवार, 19 जून 2021

श्री सियाराम बाबां

  संत श्री #सियाराम #बाबा



....नर्मदेच्या किनारी अजूनही वास्तव्य करणारे ११०+ वय वर्षाचे विलक्षण अवलिया संत श्री #सियाराम #बाबा.....


भारत हि संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. इथे अनेक संत महात्म्यांनी जन्म घेतले. असेच एक अवलिया संत नर्मदे किनारी तेलिया भाटियाण (मध्यप्रदेश) गावात राहतात.

नर्मदा परिक्रमा करणारा प्रत्येक परिक्रमवासी त्यांचा आश्रमात येऊनच जातो तेव्हा त्यांची सेवा खुद्द सियाराम बाबा करतात.परिक्रमावासींना जेवण देऊन अनेक वस्तू देतात.येणाऱ्या प्रत्येक माणसाला चहा चा प्रसाद दिला जातो एका छोट्या पातेल्यात कायम चहा उकळत ठेवलेला असतो आणि विशेष म्हणजे कितीही भक्त आले तरी त्यातला चहा पुरतो.

सियाराम बाबा कायम लंगोटी वर असतात भलेही कितीही थंडी ऊन पाऊस असुदेत.

सियाराम बाबांचा चेहरा हनुमानासारखा आहे. त्यांचा चेहऱ्यात हनुमानाची झलक खूप भक्तांना होते.

सियाराम बाबांचे वय अंदाजे ११० ते १३० सांगितले जाते.स्वातंत्र्य पूर्व काळात भारतात इंग्रज शासन चालू होते त्यांचे वय १३-१५ होते त्याच दरम्यान त्यांना साधूचे दर्शन  होऊन कडकडीत वैराग्य प्राप्त झाले आणि संसाराचा त्याग करून ते हिमालयात तप करण्यास निघून गेले एवढीच माहिती त्यांचा पूर्व आयुष्या बद्दल माहिती.ते स्वतः कोण त्यांचे गुरू कोण ते हिमालयात किती वर्ष राहिले तप साधना कोणती केली कोणी शिकवली सगळ्या गोष्टी म्हणजे खूप मोठे रहस्य आणि गूढ आहेत श्री सियाराम बाबानी आज पर्यंत ह्या गोष्टी कोणालाही सांगितल्या नाहीत ....आजही त्यांना विचारले की ते एकच गोष्ट बोलतात की "माझे काय आहे,  मी तर फक्त मज्जा बघतो ."

तेलीया भाटीयाण मध्ये आल्यावर श्री सियाराम बाबानी एक छोटी कुटी बांधलेली आणि तिथेच राहू लागले. तिथे त्यांनी हनुमानाची मूर्ती स्थापन केली.रोज सकाळ पासून संध्याकाळपर्यंत "राम" नामाचा जप आणि तुलसीदास रचित "रामचारीतमानस" रामायण नित्य पाठ केले ,असे त्यांनी हे १२ वर्षाचे कठीण तप केले.१२वर्षात त्यांनी मौन व्रत धारण केले. कोणाशी काही बोलले नाहीत गाववाल्याना काही कळत नव्हते बाबाजी कोण आहेत कुठून आले १२ वर्षांनी त्यांनी मौन व्रत तोडल्यावर त्यानी पाहिले शब्द बोलले ते "सियाराम"... तेव्हापासून गाव त्यांना सियाराम बाबा म्हणून संबोधित करू लागले.

खूप वेळा नर्मदा मय्याला पूर येतो तेव्हा सगळं गाव पाण्यात बुडवून जाते संपूर्ण गाव एका सुरक्षित स्थळी हलवले जाते पण श्री सियाराम बाबा आपला आश्रम आणि मंदिर सोडून कधीच जात नाहीत.नर्मदा माई चा पुरात ते "रामचरितमानस" रामायणचा पाठ करतात. पूर ओसरल्यावर जेव्हा गाववाले गावात परत येतात आणि बाबांना भेटतात तेव्हा सियाराम बाबा त्यांना म्हणतात की " माँ नर्मदा भेटायला आलेली तिनी दर्शन आणि आशीर्वाद घेऊन देऊन परत गेली, आईला काय घाबरायचय ती तर मैय्या आहे."

बाबानी नंतर १२वर्षे खडेश्वरी साधना केली त्यात त्यांनी प्रत्येक काम झोपणे खाणे सगळं उभेराहूनच केले, नर्मदेला पूर आल्यावर पाणी बाबांचा नाभी पर्यंत आले पण तिथून ते हटले नाहीत आश्रमतच राहून आपली साधना पूर्ण केली.

श्री सियाराम बाबांचा आश्रमात माकड कुत्री मांजर उंदीर बाबांबरोबर एकत्र राहतात आणि त्यांचा बरोबरच जेवतात आणि झोपतात.

श्री सियाराम बाबांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बाबा १०रुपयेचा वर प्रसादि (दक्षिणा) घेत नाहीत ५००,१००० कितीही दिले तरी ते  त्यातले १० रुपये घेतात आणि उरलेले त्या व्यक्तीला पारत देतात.

त्यांचा जुना आश्रम धरण पाणी क्षेत्रात गेला आहे म्हणून त्यांना सरकारनी २ कोटी ५१ लाख रूपये दिले पण त्यांनी ते सर्व पैसे नागलवाडी मधील नागदेवताचे भव्य मंदिर बांधायला दान देऊन टाकले.

एकदा तरी त्यांचे दर्शन घेऊन यावे...🙏🏻🙏🏻


जय शंकर..!!

नर्मदे हर..!!

नर्मदे हर..!!


fly