संपर्क आणि कनेक्शन. लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
संपर्क आणि कनेक्शन. लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

बुधवार, 12 अप्रैल 2023

🪔संपर्क आणि कनेक्शन.🪔

 🪔🪔🪔🪔🪔🏵️🪔🪔🪔🪔🪔

              संपर्क आणि कनेक्शन.


1990 मी रामकृष्ण मिशनच्या एका साधुसोबत फ्लाइटद्वारे दिल्लीहून परतत होतो. चिलीमधील एक पत्रकार आमच्यामध्ये होता. त्यांनी साधुंची मुलाखत घेतली.


पत्रकार - प्रिय सर, आपल्या शेवटच्या भाषणात आपण योग (संपर्क) आणि संयोग (कनेक्शन) याबद्दल सांगितले. हे खरोखर गोंधळात टाकणारे आहे. तुम्ही समजावून सांगू शकाल का?


साधु त्याकडे पाहून हसले, त्यांनी विचारले की, चिलीहून आला आहात का?


पत्रकार  - हो...


साधु - घरी कोण कोण आहेत?


पत्रकाराने विचार केला की, बहुतेक ते त्याचा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा एक अतिशय वैयक्तिक आणि अनावश्यक प्रश्न आहे.


तरीही पत्रकाराने सांगितले - आई वारली आहे, वडील आहेत, 3 भाऊ एक बहीण आहे आणी सर्वजण विवाहित आहेत.


साधु शांत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य विलसत होते.


त्यांनी पुढे विचारले - तुम्ही तुमच्या वडिलांशी बोलता का?


आता पत्रकार उघड उघड त्रस्त दिसत होता...


साधु - आपण शेवटच्यावेळी त्यांच्याशी कधी बोलले?


पत्रकार - त्याची चिडचिड लपवून म्हणाला - एक महिना मागे असू शकते.


साधु - भाऊ आणि बहिणींशी सहसा भेटतात का?


जेव्हा आपण एक कुटुंब म्हणून एकत्रित होतो तेव्हा ?


या टप्प्यावर मी पत्रकाराच्या कपाळावर घाम फुटलेला पाहिला.


कोण कोणाची मुलाखत घेत आहे?


साधु पत्रकाराची मुलाखत घेत आहे?


एक उसासा घेऊन पत्रकारांनी म्हटले, आम्ही गेल्या 2 वर्षांपूर्वी ख्रिसमसला भेटलो होतो.


साधु - किती दिवस एकत्र राहिले?


पत्रकार - (घाम पुसत) 3 दिवस ...


साधु - तुम्ही तुमच्या पित्याजवळ बसुन किती वेळ घालवलात?


मी पत्रकाराला गोंधळलेले आणि कागदावर काहीतरी लिहिताना पाहिले...


साधु - तुम्ही कधी नाश्ता किंवा लंच किंवा डिनर एकत्रित केले आहे? त्यांना कधी विचारले आहे की ते कसे आहेत? तुमच्या आईच्या मृत्युनंतर त्यांचे आयुष्य कसे संपते?


पत्रकार आकाशाकडे भरुन आलेल्या डोळ्यांनी पाहत होते.


साधु अजूनही शांत होते. त्यांनी स्मित करून आपले हात पत्रकाराच्या हातावर ठेवले आणि म्हणाले, अस्वस्थ किंवा दुःखी होऊ नकोस.


अजाणतेपणी मी तुला दुखावले असल्यास मी दिलगीर आहे... पण हे मुळात तुझ्या संपर्क आणि कनेक्शन प्रश्नाचे उत्तरच हे आहे....


साधु - तुझा वडिलांशी संपर्क आहे पण तुम्ही कनेक्टेड नाही. तुम्ही एकमेकांशी जोडलेले नाहीत.


कनेक्शन... कनेक्शन हृदयापासून हृदयापर्यंत आहे, एकत्र बसणे, एकमेकांची काळजी घेणे, एकमेकांना मिठ्या मारणे, एकमेकांना स्पर्श करणे, एकमेकांना हात लावणे, एकमेकांकडे बघणे, एकाच प्लेटमधून अन्न खाणे, एकत्र थोडा वेळ घालवणे म्हणजे कनेक्शन...


साधु - तुम्ही सर्व भाऊ-बहिणी एकमेकांच्या संपर्कात आहात परंतु एकमेकांशी कनेक्टेड नाहीत.


आजच्या जगातली ही खरीखुरी परिस्तिथी आहे.


घरात, समाजात आणि प्रत्येक ठिकाणी सगळेचजण  एकमेकांच्या संपर्कात आहेत पण त्यांच्यात कोणतेही कनेक्शन नाही, संवाद नाही.... प्रत्येकजण एका आभासी जगात आहे.


पत्रकारांनी डोळे पुसले आणि म्हटले, मला एक धडा शिकवण्यासाठी धन्यवाद.


मलाही आठवले...


आमच्या लहानपणी आम्ही ट्रेन, बस किंवा फ्लाइट मध्ये प्रवास केला तेव्हा .... सर्वजण एकमेकांकडे पाहुन स्मित करीत असत... नंतर एकमेकांशी बोलणे, छोट्याशा प्रवासात एकमेकांशी गप्पा मारत असत. आणी याच छोट्याशा प्रवासात कोणाला त्यांचे आयुष्यभराचे मित्र तर कोणाला त्यांचे आयुष्याचे काका किंवा मावशी मिळत असत.


आणि आता जेव्हा मी ट्रेन किंवा फ्लाइटने प्रवास करतो, तेव्हा मी फक्त एका दफनभूमीत प्रवेश करत असल्यासारखा... कोणीही एकमेकांना डिस्टर्ब करत नाही. सर्व जण फोन किंवा लॅपटॉपच्या टिक टिक टिक टिक मध्ये व्यस्त आहेत ... या डब्यामधील प्रत्येकजण संपूर्ण जगाच्या संपर्कात आहे, परंतु कोणीही आपल्या सहप्रवाशांना ओळखत नाही... हा छोटासा प्रवास म्हणजे एक छोटीशी 50 ते 100 "जिवंत मेलेल्या" माणसांची एक स्मशानभूमीच जणु...


चला एकमेकांशी संवाद साधत... एकमेकांची काळजी घेत... एकमेकांबरोबर मजेत वेळ घालवुया... एकमेकांच्या संपर्कात नव्हे तर एकमेकांशी कनेक्टेड राहूया...

fly