सोमवार, 10 मई 2010

मधुमेह

सध्याचे जीवघेणे स्पर्धेत मानवी जीवन गतीमान झाले आहे. मानव जगाशी व स्वता:शी स्पर्धा करतांना एखाद्या सतत चालणाऱ्या मशिन सारखा काम करु लागला आहे. परिणामी त्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष्य द्यायला वेळ नाही व आरोग्याकडे दुर्लक्ष व त्यामूळे अनेक व्याधी व विकारांनी जखडला जातो मानवाच्या शरीर व मनाची क्षमता भरपुर असते. प्रतिरोध शक्ति भरपुर असते, ८०% आजार वाढलेला असतो तो पर्यंत माहित पडत नाही. जो पर्यंत आजारासाठी डॉक्टराकडे जावे लागत नाही तो पर्यंत त्याला आजाराची जाणीव होत नाही, तेव्हा त्याला आरोग्याची जाणीव होते तोपर्यंत आजार वाढलेला असतो. कित्येक रुग्ण असे आहेत की, ज्यांनी दवाखान्यात पाउल टाकले नाही. साधी इंजेक्शन, गोळी ही घेतली नाही. अचानक आजारी पडले, हॉस्पिटल मध्ये एडमिट करावे लागले ते वाचले आणी ३०,०००/- रु. बिल झाले. जीवनावर बंधने लादली गेली नियमीत डॉक्टरांकडे तपासणी सुरु झाली. २ लाख, ३ लाख त्या पेक्षाही जास्त पण हॉस्पिटलचे बिल इतके झालेले आहेत. बील झाल्यानंतर ही व्यक्ति वाचतोच असे नाही. टेंशन आणी ताणतणाव मुळे शरीराची ब्लड शुगर व ब्लड प्रेशर मध्ये वाढ होते. तर इतर गोष्टिंचा तर प्रश्नच नाही. सध्या वायु प्रदुषण, पाणी प्रदुषण, अन्न प्रदुषण व भेसळ, बैठी जीवन पध्दती, अनियमित जेवण, अनियमित दिनचर्या, वाढते ताणतणाव इत्यादी अनेक कारणामुळे शरीरावर व मनावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परीणाम होत असतो जो पर्यंत रोग जास्त प्रमाणात वाढत नाही तोपर्यंत त्याचे चिन्ह दिसत नाही. त्यामुळे नियमित संपुर्ण शरीर तपासणी अतिशय महत्वावी असते. मुंबई, पुणे मध्ये व्यक्ती दर वर्षी टोटल बॉडी चेक-अप करतात. विदेशांमध्ये नोकरी लागण्या आधी टोटल बॉडी चेक-अप करावी लागते व फ़िजीकल फ़िटनेस पाहीला जातो. शरीरामध्ये प्रत्येक अवयवांचे प्रत्येक अवयवांशी संबंध असतो. जसा नाकाचा संबंध कानाशी असतो डोळ्यांचा मेंदुशी असतो (ऑप्टीक नर्वद्वारे) त्याचे प्रमाण हाडाचे, मसल्याचे आर्टडीचे, वेन्सचे, नर्वचे जाळे पसरलेले असते. एकमेकांनमध्ये गुसटलेले असतात. एका अवयवाचा बिघाड झाल्यास सर्व अवयव खराब होऊ शकतात उदा. ब्लड प्रेशर, ब्लड शुगर वाढलेली असली कि डोळे, हार्ट, किडनी, मन संस्था व इतर अवयवांनवर परिणाम होतो. म्हणून कोणत्याही प्रकारची शस्त्र क्रिया ऑपरेशन करण्याआधी डॉक्टर रक्त दाब, रक्तातील शुगर / साखरचे प्रमाण नॉर्मल लेव्हलवर आणतात. मग ऑपरेशन करतात. शुगर असो की, बीपी किंवा कोणतीही लेव्हल नॉर्मल ठेवावी लागते. बरेचसे डायबेटीस व रक्त दाब व इतर आजाराचे रुग्ण इतके तरबेज होऊन जातात कि डॉक्टर व नर्सच्या सानिध्यात राहून ते त्यांचे शुगर नॉर्मल ठेवतात. ही चांगली गोष्ट आहे. पण काही लोक अधिक दुर्लक्ष करतात. आणि शुगर कमी झाली काय व वाढली काय काही फ़रक पडत नाही. अशा लोकांना गंभीर परिणाम भोगावे लागतात. वाढलेली शुगर डोळे, हार्ट, किडनी, मज्ज संस्था इतर अवयवांनवर परिणाम करते. मधुमेह सगळ्यात वाईट आजार मानला जातो. म्हणून मधुमेहाला किंग ऑफ़ द डिसीज म्हणतात. काही लोकांचे डोळे जातात, तर काहींना हार्ट अटॅक आल्यावर ही कळत नाही.




टोटल बॉडी चेक-अप म्हणजे काय ?

अनेकांना प्रश्न पडतो, टोटल बॉडी चेक-अप सर्व स्पेशलिस्ट डॉक्टर कडून तपासणी, जनरल कोणत्याही व्यक्तीला साधारणपणे पाच-सात त्रास असतात. डोळे दुखतात, डोळे आग मारतात, डोळ्यांना पाणी येते, कान ठनकतात, छाती मध्ये दुखते, जेवण जात नाही, अपचन होते, कमी कामात थकवा येतो, वजन कमी किंवा जास्त होते, पायाच्या टाचा दुखतात, वेळो वेळी लघवी लागते, वेळो वेळी तहान लागते, व त्वचेचा पण आजार हात पाय पण दुखतात, छाती मध्ये कळ येते, इत्यादी अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात. कोणताही त्रास असेल तर मनात निरनिराळ्या शंका येतत. मधुमेह असेल काय? रक्त दाब असेल काय? रक्त कमी असेल काय? डोळे नाक कान ह्यात दोष असेल काय? ह्रदयात दोष असेल काय? पोटात गडबड आहे? किडनी लिव्हर बरोबर काम करत असेल का? चरबी (कोलेस्टेरॉल व ईतर लिपीड) वाढलेले असतील का? इ. अनेक प्रकारच्या शंका-कुशंका उत्पन्न होतात. कोणत्याही डॉक्टर्कडे गेल्यावर ते त्यांच्या विभागाचे बघतात. उदा. डोळ्यांचे डॉक्टर डोळे बघतात, कानाचे डॉक्टर कान बघतात, दातांचे डॉक्टर दात तपासतात, हाडांचे डॉक्टर हाडांची तपासणी करतात, आणि ते व्यक्ती आपल्या विभागाच्या तपासण्या करतात व दुसरा त्रास असल्यास संबंधीत स्पेशलिस्ट डॉक्टरकडे पाठवतात व ते बरोबरही असते. टोटल बॉडी चेक-अप मध्ये कित्येक पटीचे फ़ायदे आहेत. कारण सर्व स्पेशलिस्ट डॉक्टर्स पेशंटला असलेल्या आजारावर आपले लक्ष केंद्रित करतात जेणेकरुन निदान व्हायला सोपे जाते व प्रत्येक अवयवाची काळजी कशी घ्यावी हे पण मार्गदर्शन करतात. व्यक्ती वरुन पाहिल्यावर तंदुरुस्त वाटतो पण आतुन त्याच्यात काय दोष आहे याचा पत्ता लागत नाही. टोटल बॉडी चेक-अप मध्ये सुक्ष्म तपासणी होते. साधारण तपासणी मध्ये जे आढळत नाही ते टोटल बॉडी चेक-अप मध्ये आढळून येते. कारण टोटल बॉडी चेक-अप मध्ये सुक्ष्म तपासणी होते अनुभवी तज्ञ स्पेशलिस्ट डॉक्टर व मशिनरीच्या साह्याने बारकाईने तपासणी केली जाते. इतकेच नव्हे तर पुर्ण दिवसाच्या दिनचर्येचा आढावा घेतला जातो. टोटल बॉडी चेक-अप मध्ये डोळे, नाक, कान, घसा, कानाचा ऑडियोग्राम घेतला जातो. रेडिओलॉजीस्ट कडून छातीचा एक्सरे चेस्ट घेतला जातो. इलेक्ट्रोकार्डियोग्राम (इ.सी.जी.) लीपीड प्रोफ़ाईल (कोलेस्टेरॉल व इतर लीपीड्स) चे प्रमाण तपासणी केली जाते.

रेडिओलॉजीस्ट (तज्ञ सोनोग्राफ़ी) द्वारे किड्नी लिव्हर मॅजीक बॉक्स (पोटात) विविध अवयवांची तपासणी केली जाते. हाडंचे डॉक्टर व्यायमाबाबत मार्गदर्शन करतात. त्वचा व गुप्त रोग तज्ञ तपासणी करतात व रक्तामध्ये व्हि.डि.आर.एल. टेस्ट, एडस इ. महत्वाच्या तपासण्या केल्या जातात शेवटी ताणतणाव नियंत्रण व क्वॉलिटी ऑफ़ लाईफ़ साठी मनाचे तज्ञ तपासणी करतात व जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न केला जातो. मारोती कार असो फ़्रिज, टी. व्ही., कॅमेरा किंवा कोणतेही मशिन असो त्या वस्तुंचा बेस्ट वापर करता येईल किंव चांगल्या रितीने कसे मेंटेन करता येईल याठी युझर्स मॅन्युअल पुस्तक दिले जाते. पण या शरीर रुपी मशीन बरोबर कोणतेही पुस्तक दिले जात नाही. म्हणून माणसाला परिस्थिती फ़िरवत जाते तसे तॊ फ़िरत जातो. सकाळी ५ वाजे पासुन मानव रुपी गाडी सुरु होते व दिवसभर ओढाताण करुन रात्री उशीरा पर्यंत शरीर रुपी गाडी धावतच जाते. स्वत:चे नोकरी, व्यवसाय, नातेवाईक सर्वांसाठी वेळ असतो पण स्वत:च्या आरोग्यासाठी कोणालाच वेळ नसतो. हे किती दुर्दैव आहे. याचाच परिणाम एक दिवस आपल्याला व्याजासकट मोजावा लागतो. टोटल बॉडी चेक-अप अतिशय फ़ायदयाचे आहे ज्या प्रमाणे आपली स्कुटर, मोटार सायकल, मारोती कार, ई. ची दर सहा महीन्यांनी ओव्हर आइलींग (सर्व्हीसींग) करतो तसेच व आपल्या शरीरुपी गाडीचे पण वर्षातून एक वेळा तपासणी करुनच घ्यायला पाहीजे.

मधुमेह (डायबेटीस) हा एक महाघातक आजार आहे. शरीरात इन्शुलीन हे हार्मोन कमी प्रमाणात तयार होणे अथवा योग्य प्रमाणात असूनसुद्धा शरीराने त्याला दाद न देणे अशा दोन कारणांमुळे हा आजार होतो. इन्फेक्‍शन, अपघात, फ्रॅक्‍चर, जखमा, मानसिक तणाव, औषधांचे चुकलेले डोस यांनी सुद्धा आजार वाढत जातो. कालांतराने या आजारात शरीरातील हृदय, मेंदू, किडनी, डोळे, लिव्हर काम, रक्तवाहिन्या आदी महत्त्वाच्या अवयवांमध्ये बिघाड उत्पन्न होतात. पूर्णोपचारांमध्ये रुग्णाच्या संपूर्ण शरीराचा एनर्जी बायोफिल्ड स्कॅन सर्वप्रथम करून आजाराच्या मूळ कारणाचा शोध घेतला जातो व त्याला अनुसरून ऍलोपॅथीच्या सोबत ऍक्‍युपंक्‍चर (वेदनारहित युरोपियन सुयांची आधुनिक टेक्‍नॉलॉजी), पंचकर्म, योग्य आहार व जीवनशैली योग आणि व्यायाम असा एकत्रित उपचार केला जातो.

या उपचारांमुळे सहा महिन्यात डायबेटीस मुळापासून जातो. असा अशास्त्रीय दावा मी मूळचा ऍलोपॅथीतज्ज्ञ असल्याने करणार नाही. पण पुरेशा उपचारांमुळे बऱ्याच रुग्णांचा मधुमेह कायमचा बरा होऊन हळूहळू त्यांची सर्व औषधे बंद होतात. गॅंग्रीन, न्युरोपॅथी, डायबेटीक रेटीनोपॅथी, किडनी व मेंदूविकार आदी कॉम्प्लीकेशन्ससुद्धा पूर्णोपचारांमुळे आटोक्‍यात लवकर येतात.
Won Park is the master of Origami. He is also called the "money folder", a practitioner of origami whose canvas is the United States One Dollar Bill.




ATT00022.jpg














 


ATT00040.jpg





 .








 











 








A


A











 

A


fly