1. kerala hse results 2010
2. plus two results 2010
3. higher secondary results
4. afmc
5. chirkutonorkut
6. rama rama krishna krishna review
7. emblem of peace
8. direct hai correct hai
9. next is what
10. dhse
बुधवार, 12 मई 2010
क्षयाच्या जिवाणूपुढे मानवी पेशी कशा हतबल होतात?
माणसाला जेव्हा कुठलाही रोग होतो तेव्हा त्यात पेशी बाधित होत असतात. क्षयासारख्या अजूनही मोठय़ा प्रमाणात आढळणाऱ्या रोगात जीवाणू त्यांचा मार्ग कसा सुकर करतात त्या जैविक प्रक्रियेवर नवा प्रकाश टाकणारे संशोधन युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या वैज्ञानिकांनी केले आहे. क्षयाच्या जीवाणूकडून अशाप्रकारचे जैविक संदेश पाठवले जातात की, त्यामुळे या जीवाणूंशी लढणाऱ्या पेशी फितूर होऊन जीवाणूंच्या बाजूने आपली निष्ठा अर्पण करतात. श्वसन मार्गातील व इतर पृष्ठभागावर असलेल्या एपिथेलियल पेशी या खरेतर क्षयाच्या जीवाणूशी लढत असतात, पण जीवाणू त्यांना काही संदेश पाठवतात त्यामुळे या पेशी त्यांची तलवार तर म्यान करतात व या जीवाणूंना क्षयाची लक्षणे असलेल्या टय़ूबरकल्स व इतर गोलाकार गाठी तयार करण्यास मदत करू लागतात. टय़ूबरकल्समुळे क्षयाचा जीवाणू संख्येने वाढतो व इतर ठिकाणी पसरत जातो. हे संदेश रैणवीय मार्गाने पाठवले जातात. त्यामुळे काही प्रकारचे ह्रदयविकार, कर्करोग तसेच इतरही काही रोगात असे घडू शकते. जर जीवाणूंचा हा रैणवीय संदेश लढणाऱ्या पेशींपर्यंत पोहोचला नाही तर त्यातून आपली प्रतिकारशक्ती यंत्रणा अधिक सक्षम राहू शकते. परिणामी पेशीही फितूर होणार नाहीत. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या डॉ.ललिता रामकृष्णन यांनी हे संशोधन केले आहे. त्यांच्या मते हे संदेशांचे गूढ उकलल्याने रोगाचा मार्गच बंद करता येऊ शकतो व त्यासाठी औषधेही तयार करता येतील. श्रीमती रामकृष्णन या सूक्ष्मजीवशास्त्र, वैद्यक व प्रतिकारशक्तीशास्त्राच्या सहायक प्राध्यापिका आहेत. सायन्स नियतकालिकाच्या ताज्या अंकात त्यांचे हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. सध्या टीबीवरची जी औषधे आहेत ती कालांतराने निष्प्रभ ठरत जातात त्यामुळे नवी औषधे शोधण्यासाठी त्यांचे संशोधन उपयुक्त ठरणार आहे व जागतिक आरोग्य संशोधक टीबीवरील अशा अभिनव संशोधनाच्या प्रतीक्षेत आहेत. रामकृष्णन यांच्या मते जीवाणूची घोडदौड रोखणे ही अभिनव कल्पना आहे व त्यामुळे संशोधनाची दिशाच बदलली आहे. जीवाणू कशा पद्धतीने पाय पसरतो हे कळल्याने त्याची लागण आणखी पसरू नये यावर उपाय करता येतील. सध्याच्या उपचारपद्धतींपेक्षा कमी वेळात उपचार करणे त्यामुळे शक्य होणार आहे. सध्याच्या उपचारपद्धतीत क्षयाच्या रुग्णांना झालेली जीवाणूची लागण कमी करण्यास फार वेळ लागतो. सध्या उच्च रक्तदाब, नैराश्य यासारखे रोग हे ब्लॉकर्सचा वापर करून बरे करण्याचे एक तंत्र आहे. हे ब्लॉकर्स उपचारांचा भाग म्हणून पेशींकडून पाठवले गेलेले संदेश रोखतात. क्षयासारख्या संसर्गजन्य रोगात अशाप्रकारे ब्लॉकर्स तयार करणे शक्य आहे हे आताच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे असे श्रीमती रामकृष्णन यांचे मत आहे. त्यांनी यापूर्वी झेब्राफिशमध्ये केलेल्या संशोधनात असे दिसले होते की, टीबीचे टय़ूबरकल्स जीवाणूंचे संरक्षण करतात असे जे पूर्वी सांगितले गेले होते ते खरे नाही. नोडय़ूल्स म्हणजे ग्रॅन्युलोमाज या जीवाणूंच्या वसाहती असतात व तेथेच त्यांचे उत्पादन व नंतर इतरत्र पाठवणी होते. शरीराची पहिली संरक्षक फळी असलेल्या मॅक्रोफॅगस पेशी या जीवाणूंना खाऊन टाकतात किंवा नष्ट करतात पण जेव्हा त्या नोडय़ुल्सच्या युद्धभूमीवर जातात तेव्हा टीबीचा जीवाणू त्यांच्यावर मात करतो व या पेशीच बाधित होतात. अनेकदा टीबीचा जीवाणू या मॅक्रोफेगस पेशींना मारत नाही तर त्यांच्यातच डेरा टाकून आयत्या बिळावर नागोबासारखा वाढू लागतो. नंतर मॅक्रोफेगसची प्रतिरक्षा प्रणाली कमकुवत करतो. अशा जास्तीत जास्त मॅक्रोफेगस पेशींना ग्रॅन्युलोमाच्या जाळ्यात ओढून हा जीवाणू विस्तार करीत जातो नंतर या जीवाणूग्रस्त मॅक्रोफॅगस पेशी शरीराच्या इतर भागात जातात व आणखी मॅक्रोफॅगसना त्यांच्याकडे ओढतात व नवीन टय़ूबरकल्स बनत जातात व क्षय वाढतच जातो. श्रीमती रामकृष्णन व त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या रैणवीय प्रक्रियेमुळे क्षयाचा मायकोबॅक्टेरिया शरीरात नोडय़ूल्स पसरवतो ती शोधून काढली आहे. आतापर्यंत असे वाटत होते की, जीवाणूतील ईसॅट-६ हे प्रथिन टीबीच्या शरीरातील प्रसारास कारणीभूत आहे असे मानले जात आहे. रामकृष्णन व त्यांच्या सहकाऱ्यांनी आता असे शोधून काढले आहे की, या प्रथिनामुळे एपिथेलिकल पेशी एमएमपी-९ हे विकर तयार करतात. हे विकर उतींना जोडणाऱ्या जिलटिनला तोडते. काही लोकांमध्ये एमएमपी-९ विकरामुळे क्षय किंवा इतर रोगांची बाधा होण्याची शक्यता वाढते. संसर्गजन्य नसलेल्या आरथ्रायटिस व हृदयविकार तसेच कर्करोग यातही हे विकर खलनायकाच्या भूमिकेत असते. टीबीबाधित मॅक्रोफॅगसच्या आसपास एपिथेलियल पेशींमुळे एमएमपी-९ या विकराचे प्रमाण वाढत असते असेही दिसून आले आहे. ज्या झेब्राफिश गर्भामध्ये हे एमएमपी-९ विकर काढून टाकण्यात आले होते ते नंतर टीबी संसर्गाला चांगला प्रतिकार करू शकले असे प्रयोगात दिसून आले आहे ही आशादायी बाब आहे.
सदस्यता लें
संदेश (Atom)