सोमवार, 15 अप्रैल 2013

महागात पडलेलं स्त्रीदाक्षिण्य (मुक्तपीठ) Mahagat padlele stri daxinya

 महागात पडलेलं स्त्रीदाक्षिण्य (मुक्तपीठ)  Mahagat padlele stri daxinya

Image result for स्त्रीदाक्षिण्य
From eSakal.com
पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून बाहेर पडलो, तर एक अतिशय सुंदर, गोरी तरुणी समोर उभी राहिली. तिनं शेजारच्या हॉटेलमध्ये कॉफी दिली. बाहेर पडताच. तिनं, 'ज, औंधला सोडता का?' अशी विनंती केली. थंडीच्या त्या दिवसांत रात्री आठ-साडेआठच्या सुमारास तिला तिकडं सोडण्यासाठी गेलो. तिनं पैशांचीही गळ घातली. पैसेही दिले अन्‌...
- एस. व्ही. ब्रह्मे


या घटनेला अंदाजे 22 वर्षे झाली. पुणे विद्यापीठात बागेच्या ऑफिसात होतो. नुकतीच नवीन लुना घेतली होती. रोज जाणे असल्यानं बहुतेक मुली परिचयाच्या झाल्या होत्या; पण मला मुलींच्या मागे जाणं, गप्पा मारणं या गोष्टी जमायच्या नाहीत व तशी वेळच कधी आली नाही. कारण मुलीच माझ्याशी आपणहून बोलायच्या, चेष्टा करायच्या. ऑफिसमध्ये जाता-येताना मुली लिफ्ट मागायच्या व मी त्यांना लुनावर सोडत असे, त्यामुळे परिचय व्हायचा.

असाच एकदा सुट्टीच्या दिवशी म्हसोबा गेटसमोरील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून बाहेर पडलो, तर काय एक अतिशय सुंदर, गोरी तरुणी समोर उभी. 'विद्यापीठ गेटपर्यंत सोडता का?'' माझ्या उत्तराची वाट न पाहता ती माझ्या मागे बसली. पुढे कॉर्नरला अशोका हॉटेलमध्ये तिने कॉफी दिली व बाहेर आलो.

मग ती म्हणाली, 'प्लीज, जरा औंधला रूमवर सोडता का? उशीर झाला आहे.'' रात्रीचे साडेआठ वाजले होते. स्त्रीदाक्षिण्य म्हणून आम्ही निघालो. ते दिवस थंडीचे होते. गार वारं व थंडी, राजभवनच्या पुढे गेल्यावर तिला खूप थंडी वाजू लागली. माझा जर्किन तिला घालायला दिला व आम्ही पुढं निघालो. थोड्या वेळानं तिनं अंगचटीला येण्याचा प्रयत्न केला. मी गोंधळून गेलो. तसेच लुना जोरात चालवत होतो. मला असा अनुभव नवीनच होता. केव्हा एकदा तिला रूमवर सोडतो, असं झालं होतं. शिक्षकनगरच्या पुढे कॉर्नरवर तिच्या रूमवर सोडले. ती व तिच्या मैत्रीणींनी आत बोलावून गरम चहा दिला. गप्पा मारताना तिने 4-5 हजार रुपये आहेत का, मला फी भरायची आहे. मी उद्याच तुम्हाला तुमच्या ऑफिसात पैसे परत आणून देते. मी तुम्हाला रोज पाहते. नक्की तुमचे पैसे देईन. विश्‍वास ठेवा, असं सांगितलं. ती नाव, आडनावावरून चांगल्या घराण्यातील वाटली म्हणून माझ्याकडे होते, ते चार हजार रुपये दिले. घरी जायला अजून खूप उशीर होईल म्हणून मी जोरातच घरी आलो.

इतर कामाच्या गडबडीत दुसऱ्या दिवशी ती येणार हे विसरून गेलो. मित्राच्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता. त्या गडबडीत व कामामुळे ती गोष्ट पूर्ण विसरलो. आठ दिवस झाले, एकदम मला पैशाची व त्या तरुणीची आठवण झाली म्हणून लगेचच ऑफिस सुटल्यावर तिच्या रूमवर गेलो. बेल वाजल्यावर एक वयस्कर बाईंनी दरवाजा उघडला. मी त्यांना आठ दिवसांपूर्वीची सगळी हकिकत सांगितली. त्यांनी सांगितलेली माहिती ऐकून मला तर चक्करच येते की काय असं झालं. त्या म्हणाल्या, की त्या दोन-तीन जणी भाड्यानं राहात होत्या. त्या परवाच त्यांच्या गावी गेल्या. तुझ्यासारख्या दोन-तीन जणांना त्यांनी फसविले आहे. त्या पुढे म्हणाल्या, की नशीब चार हजार गेले. इतर दोन-तीन जणांना तर त्या तिघींनी बराच गंडा घातला आहे. स्त्रीदाक्षिण्य दाखवून मी फसलो गेलो होतो, तेव्हापासून कोणाही अनोळखी तरुणीला लिफ्ट न देण्याचा निश्‍चयच केला.

How and when to own a Credit card



प्रतिक्रिया
On 25/01/2013 05:11 PM झंप्या दामले said:
आज आचार्य अत्रे असते तर नक्की म्हणाले असते ' गेल्या दहा हजार वर्षात एवढा कल्पनारम्य विनोदी लेख झाला नव्हता '
On 25/01/2013 04:17 PM swati teke said:
पु. . देशाप्न्डे साहेबान्नातर एवढी अगाध लोकप्रियता मिलावालीली व्यक्ती म्हणजे ब्रम्हे... जर पु. . असते तर त्यांनी ब्रम्हे आजोबांवर व्यक्ती आणि वल्ली मध्ये एक पात्र नक्की लिहिले असते "विद्यापीठातला ह्रितिक"
On 25/01/2013 03:48 PM pk said:
ते दिवस थंडीचे होते. गार वारं थंडी, राजभवनच्या पुढे गेल्यावर तिला खूप थंडी वाजू लागली. माझा जर्किन तिला घालायला दिला आम्ही पुढं निघालो. तुम्ही आमिर खान आणि ती राणी...गुलाम पिक्चर तुमच्यावर तयार झालाय..
On 25/01/2013 03:33 PM puneri_Pandit said:
अहो असे ४००० रुपये खिशात बाल्गाय्चात तुम्ही .. तर मग लुना वर कशाला फिराय्चात ? कार घेऊन टाकायची ना .. ४००० रुपयात . एम. आय. नक्की भरता आला असता कारचा .. आणि एका वेळेस अनेक मुलींना लिफ्ट देऊ शकला असतात तुम्ही ..
On 25/01/2013 03:27 PM smita said:
ब्रह्मे नि त्यांचा फोटो दिला नसता तर हि कथा रहस्यमय झाली असती :) पण फोटो मुळे लोक चवताळले आहेत अगदी :D
On 25/01/2013 03:20 PM smita said:
खरच ब्रह्मे नि विनोदी कथा लिहाव्यात, इतके निखळ हसवू शकतात ते लिखाणातून! आणि अतिशय निरागस पणे थापा मारू शकतात..केवळ एक महान लेखक असे करू शकेल :)
On 25/01/2013 03:11 PM pk said:
@पुणेकर अबे दगडा..पुण्यातले सगळेच काय newton,edison असतात का??
On 25/01/2013 02:49 PM Narayan Pethi said:
मला तरी एक गोष्ट पटली, त्या मुलीकडे नक्कीच फी भरायला पैसे नसणार, नाही तर एरवी कुठल्या मुलीला बावीस वर्षापूर्वी कुणी ब्रह्मेनच्या मागे ते सुधा लुनावर बसण्यासाठी लाख रुपये दिले असते तरी तयार झाली नसती. मी उद्यापासून खिश्यात चार हजार रुपये घेवून त्या पेट्रोल पाम्पाभोवती फेर्या मारायला सुरवात करणार आहे बघू ब्राह्मेंसारखा नशीब चमकत का ते
On 25/01/2013 01:34 PM smita said:
चला, ह्या वीकेंडला एक काम आहे, ब्रह्मे fan क्लूब जोइन करायचा :)
On 25/01/2013 01:25 PM Atul said:
ब्रम्हे पुढचा लेख कधी पाठवणार आहात..... आम्ही चातका सारखी वाट बघत आहोत .....
On 25/01/2013 11:47 AM अर्क said:
ब्रह्मे, कृपया त्या चांगल्या घराण्यातल्या वाटणाऱ्या मुलीचा नाव आडनाव देत का? परवाच मला एका औन्धतल्या आजी बाईंनी फसवलं .. bike वर सफाईने बसल्या तेव्हाच माझ्या लक्ष्यात आला होतं... या same असणार नक्कीच !!
On 25/01/2013 11:42 AM shraddha said:
हा हा हा :D धन्य तो लेख ..आणि धन्य त्या प्रतिक्रिया!! ब्रह्मे साहेब आहे थोडा तरी विचार करायला हवा लेख लिहितांना ... आणि दादाहारींची प्रतिक्रिया !!! :D खरंच हसून हसून पोट दुखायला लागलंय... पण या पुणेकरांच्या पोटात का दुखतंय ब्रह्मे पुण्याचे आहेत हे ऐकून, काय माहित..!! अहो तुम्ही सगळ्या पुणेकरांची gurantee कशी घेऊ शकता..? पुण्यात काय अश्या नगांची कमी आहे? आणि जर तुम्ही Genaralization च्या नियमाने बोलत असाल ,तर मग बुलढाणा वाले काय चुकीचे बोलले ? आहातच मुळात कंजूस तुम्ही पुणेकर :P ... बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असते तुमची :) मनाला लाऊन नको घेऊ बरं का हो ... शेवटी सत्य एकंच... "जय महाराष्ट्र "!!! बाकी ब्रह्मे ROCKSSSS !!!
On 25/01/2013 10:22 AM रोहित तेली said:
अहो २२ पूर्वी ATM मधुन पैसे काढले असतील तुम्ही विसरला......? काय राव हा पण पतंग उडाला असता .
On 25/01/2013 10:04 AM सोलापूरकर said:
काय मस्त फेकल आहे. तोंडावरून दिसताच आहे - नंबर फेकू!
On 25/01/2013 07:21 AM bajirao peshwe said:
ह्या लेखाला सलाम .... खूप दिवस नंतर असे मनमोकळे हसविणारा लेख वाचला.....आआआआआआ ह्रितिक ब्रह्मे...............
On 24/01/2013 11:55 PM Sagar said:
बाकी कोणी काही म्हणो, पण ब्रम्हे "स्त्रीदाक्षिण्य" या शब्दाने आमच्या मराठी शब्दकोशात भरच टाकली आभारी आहे तस ती ब्रम्हे fan club ची idea चांगली आहे तुमचा किस्सा गमतीदार तर आहेच पण भलताच विनोदी आहे ब्रम्हे चालू द्या तुमच लिखाण पुढील लेखाच्या प्रतीक्षेत.......................................
On 24/01/2013 09:19 PM Sachin said:
ब्रह्मे साहेब, आपने खाया नही, पिया नही, ग्लास भी नही फोडा, उपर से टेबल भी साफ किया, बर्तन भी धोया, कचरा भी उठाया, वाश बेसिन भी साफ किया फिर भी ४००० का बिल भरा..वाह तुम्हारा दिल है कि दिल्ली दरवाजा...
On 24/01/2013 08:28 PM Rojer said:
ब्रह्मे महाराज, लई भारी लेख आहे...त्या पेक्षा प्रतिक्रिया भारी आहेत...हसून हसून डोळ्यातून पाणी आले....असच चांगले लिहा...
On 24/01/2013 07:36 PM swati teke said:
गार्गी बहुदा ब्रम्हे आजोबांची कोणीतरी दिसते
On 24/01/2013 07:36 PM Dhanajay Mane said:
आआं.... ह्रितिक रोशन.... पोरी मागे लागायच्या ... हाहाहा.. आवरा अरे... किती फेकायचे ते.... तरी बरे, University रोड वर तुम्ही दोघांनी गाणी वगैरे नाही गायली.. आणि dance वगैरे नाही केला.....
On 24/01/2013 05:03 PM गार्गी said:
लेखावर विनोद करण्यापेक्षा लोकांनी त्यातुन बोध घेण अपेक्षित आहे ़़
On 24/01/2013 04:21 PM yogesh said:
मी पण ब्रम्हे फान क्लूब जोइन करणार.......कृपया लवकर फान क्लूब चालू करणे.....नाहीतरी आज काल एवढे हसायला कुठे मिळते...
On 24/01/2013 04:03 PM smita said:
चित्र अगदी स्त्य्लीश काढले आहे !!!!
On 24/01/2013 02:26 PM Bramhe said:
आहो मीच हा ब्रम्हे...च्यायला कोणीतरी माझा फोटो वापरून माझ्या नावाने लेख टाकला आहे
On 23/01/2013 05:58 PM @ A Ra deshpande said:
लौकरात लौकर fan club सुरु करणे :) मंडळ आपले आभारी राहील!
On 23/01/2013 05:47 PM Suyog said:
ब्रम्हे साहेबांना माझा मनाचा मुजरा !!!!...........ऐसा ब्रम्हे कधी होवे .....!!!!
On 23/01/2013 05:47 PM swati teke said:
google map वर ब्रम्हे आजोबांच्या घराचा पत्ता आहे.............
On 23/01/2013 05:38 PM Ankur said:
अरे अनील मुंगीकर पुणेकरांना बोलण्याशिवाय आणि प्रत्येक बातमीवर प्रतिक्रिया देण्याशिवाय दुसरा कामधंदा नाही का. जर घराकडे लक्ष द्या दर्जाहीन प्रतिक्रिया देण्यापेक्षा.
On 23/01/2013 05:28 PM khochak said:
ब्रम्हे साहेबाना वाटते असेल लेख लिहिला आणि मुंबई पहिली...................
On 23/01/2013 05:16 PM swati teke said:
आजोबा मला तुम्हाला भेटावेसे वाटते आहे, पत्ता (आणि लिफ्ट LOL ) द्याना PLZZZZZZZZZZZZZZZZZ
On 23/01/2013 05:15 PM khochak said:
आज म्या ब्रम्ह पहिला म्हणीचा अर्थ आज कळला ......
On 23/01/2013 04:54 PM satish kadam said:
"त्या म्हणाल्या, की त्या दोन-तीन जणी भाड्यानं राहात होत्या. त्या परवाच त्यांच्या गावी गेल्या. तुझ्यासारख्या दोन-तीन जणांना त्यांनी फसविले आहे. त्या पुढे म्हणाल्या, की नशीब चार हजार गेले. इतर दोन-तीन जणांना तर त्या तिघींनी बराच गंडा घातला आहे. स्त्रीदाक्षिण्य दाखवून मी फसलो गेलो होतो, तेव्हापासून कोणाही अनोळखी तरुणीला लिफ्ट देण्याचा निश्चयच केला. " एक कळत नाही कि वयस्कर बाईं एकदा म्हणतात दोन-तीन जणी भाड्यानं राहात होत्या. नंतर म्हणतात त्या तिघी होत्या आणि ज्यांना फसवले ते दोन-तीन जण होते. किती हा गोंधळ. टीप : तुम्हाला धन्यवाद कि तुमच्या लेखांनी आम्हाला खूप हसवले. कृपया नाराज होवू नका. " जो हसवतो सर्वाना तोच आवडे सर्वाना."
On 23/01/2013 04:35 PM A Ra Deshpande said:
मी लवकरच फेसबुकवर "ब्रम्हे फ्यान क्लब" सुरु करणार आहे, इच्छुकांनी जोइन व्हावे ही विनंती. ब्रम्हे साहेब पुढच्या लेखाची आतुरतेने वाट बघत आहे. लोकांना राग येणारच कोल्ह्याला द्राक्षे आंबट म्हणतात तसा प्रकार आहे. बावीस वर्षापूर्वी लग्नाची बायकोसुधा आजूबाजूचे बघतात म्हणून लुनावर (लुनाला आम्ही काय म्हणायचो ते लिहिले असते पण सकाळ पूर्ण प्रतिक्रिया बाद ठरवेल म्हणून आवरतो घेतो) नावार्यामागे बसायला तयार व्हायची नाही आणि तुम्हाच्या मागे एक निन्तांत सुंदर गोरीपान तरुणी बसली ह्याबद्दल लोकांची पोटदुखी सुरु झाली असेल. तुम्ही प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करा आणि पुढचा लेख लिहायला लागा.
On 23/01/2013 04:29 PM Sunil Ayakar said:
प्रतिक्रिया देणार्यांनी लक्षात घ्यावे कि ब्रम्हे ह्यांचा फोटू बावीस वर्षापूर्वीचा असावा. साधारण बावीस पंचवीस वर्षापूर्वी पोरींनी अमोल पालेकर टाईप दिसणाऱ्या पोरांची छेद काढावी असे उद्योग त्यावेळी नुकतेच सुरु झाले होते. आणि ब्रम्हे ह्यांची चेहरेपट्टी त्याकाळी खूप फ़ेमस होती मुलींसाठी. तुम्ही २०१२ चा अमीर खान डोळ्यासमोर आणून बघू नका १९७५ मधला बिन बोडीवाला अमोल पालेकर समोर आणून बघा. मला तरी ब्रम्हे ह्यांचा पूर्ण लेख पटला. लुनाला मागे सीट बसवून घेत येत.
On 23/01/2013 02:46 PM Shireen said:
लोकहो ह्या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास बसला आहे , कारण श्री ब्राम्हेंचा चेहेराच सांगतो .... असतो एकेकाचा चेहेराच असा कि जो फसविला जाण्यासाठीच देवाने बनवला असतो त्याला काय करणार ....
On 23/01/2013 02:41 PM Sumedh said:
हा लेख आणि प्रतिक्रिया वाचल्यावर माझ्या डोळ्यातून घळघळा पाणी आले ......... हसून हसून !!!
On 23/01/2013 02:19 PM ब्रह्मेंचा पंखा said:
त्या पेट्रोल पंपावर गर्दी का असते हे कळालं. २२ वर्षं हा किस्सा अनेकांना सांगितल्यामुळं त्याची दंतकथा झाली असेल. आशा वाईट असते हो ..
On 23/01/2013 02:16 PM Kiran.. said:
ब्रह्मेंशी कुणी तरी खुन्नस काढलेली दिसतेय. अवर्षणग्रस्त भागातल्या कुणा अभागी इसमाचा फोटु ढापून सकाळला इनोदी लेख पाठवलेला दिसतोय. २२ वर्षापूर्वीची घटना म्हटल्यावर इतक्या वर्षात कुणी शहाणं व्हायचं राहतं का ? त्या काळी पण ल्युना वर मागे कुणी बसत नसे. कारण मागचं सीटच नव्हतं ल्युनाला. ब्रह्में तर युनिवर्सिटीत काम करणारे. त्यांना काय कळत नसेल ? त्यांच्या बदनामीसाठी एखाद्या स्टुडण्ट ने हे काम केले असेल. टीप : मी ब्रह्में नाही.
On 23/01/2013 01:52 PM पुणेकर said:
@ आरती : आहो, पूर्ण ब्रम्हांडात जरी तुम्ही आणि ब्रम्हेंनी मिळून जरी त्या मुलीना शोधलेत तरी त्या मुली सापडणार नाहीत, आणि आता विषय पुरे, ब्रम्ह्नेंना जर राग आला तर ब्रम्हास्त्र टाकून सगळे उध्वस्त करतील.
On 23/01/2013 01:51 PM Aamachi pune said:
जाता येत मुली लिफ्ट मागत असतील तर लुना कशाला चालवायचा ..... एखादी रिक्षा विकत घेयाची ना... एका वेळी / मुलीना घेऊन गेला असता रिक्षातून ...... "थोड्या वेळानं तिनं अंगचटीला येण्याचा प्रयत्न केला. मी गोंधळून गेलो. तसेच लुना जोरात चालवत होतो"... लुना काय १०० च्या स्पीड ने चालवली का
On 23/01/2013 01:45 PM पुणेकर said:
मला वाटते असला मूर्खपणा करणारा माणुस पुण्याचा असूच शकत नाही, तो नक्कीच बाहेरचा म्हणजे बुलडाणा, परभणी वगैरेचा असणार.
On 23/01/2013 01:11 PM दादाहरी said:
"अजी म्या ब्रह्मे पाहिले"- ब्रह्मे साहेब म्हणजे राजस सुकुमार मदनाचा पुतळा! त्यांचे हे रुबाबदार रूप पाहून कुणाही मुलीने घायाळ व्हावे. त्यात त्या मुलीची ती काय चूक हो. यांना पाहिले आणि भाळली ती भाबडी पोर. आणि मागितली लिफ्ट, मागितली कसली अगदी अंगचट होऊन बसलीच गाडीवर. आणि त्या काळात चार पाच हजार खिशात घेऊन फिरणारे हे, थोर व्यक्तिमत्त्व, म्हणजे कुठल्यातरी संस्थानिक घराण्याचेच वारसदार. उदात्त मनाचे ब्रह्मे साहेब. दिले बापडीला पैसे आणि गेले विसरून. धन्य ती मुलगी धन्य ते ब्रह्मे साहेब!
On 23/01/2013 12:49 PM shriniwas sabale (khedkar) said:
मी पाहिलेला वह कौन ठी सिनेमा आठवला तीने पण त्याला लिफ्ट मागितली होती मला वाटते कि भ्रम्हे ला शायद भ्रम झाला असला पाहिजे असो इतरांनी एवढी खेचल्यावर माझ्यासाठी काहीच शिल्लक राहिले नाही. ब्रह्मे तुम्ही एखादा चांगला विषय निवडायला पाहिजे होता, सिनेमाच्या कथेतून बाहेर या हवा स्वच्या आहे दुर्सरा विषय नक्की सुचेल ......धन्यवाद ...........श्रीनिवास साबळे(खेडकर)
On 23/01/2013 12:26 PM Shriram said:
खोटारडे ब्रह्मे
On 23/01/2013 12:15 PM ARUN SAHASRABUDHE said:
यावरून लक्षात घ्या उत्तम लेख झापून प्रतिक्रिया कमी येतात त्यांना केराची टोपली trp वाढवण्याचे कला साधली पाहिजे.
On 23/01/2013 11:55 AM tintin said:
लेख चांगला झाला आहे कि नाही हा मुद्दा वेगळा पण फेकूगिरी मात्र चांगली जमून आली आहे....हा हा हा....मला खूप हसू आले लेख वाचतांना...त्या बद्दल धन्यवाद....
On 23/01/2013 11:53 AM lalit said:
चोखंदळ वाचक . लेखापेक्षा प्रतिक्रिया भारी. लय भारी.
On 23/01/2013 11:49 AM आरती said:
टेन्शन घेऊ नका ब्रम्हे साहेब.. आपण त्या चांडाळनीला शोधून काढू व्याजासहित पैसे परत घेऊ...आणि कृपा करून आता धन्यवाद म्हणू नका....
On 23/01/2013 10:10 AM som said:
मला हे वाचून एकाच गाणं आठवलं. "दिल को हज़ार बार रोका रोका रोका, दिल को हज़ार बार टोका टोका टोका दिल है हवाओं का झोंका झोंका झोंका दिल को बचाना, धोखा ना खाना धोखा है प्यार यार प्यार है धोखा.
On 23/01/2013 08:32 AM DJ said:
'पुणें'करांना बाहेरगावच्या पोरी अशा शेंडी लावून गेल्या म्हटल्यावर काय इज्जत राहिली..?? शेम शेम.
On 23/01/2013 07:43 AM Freedom Fighter said:
अफजलला फाशी दिल्यास काश्मीर भागात तीव्र पडसाद उमटतील दोन वर्षांतच काश्मीर देशापासून वेगळा होईल,’. अफजलला फाशी देन्याच्या विरोधात् आहे. कारण काश्मीर नाही. कारण है की अफ़ज़ल ने अर्धवट काम केले, आत घुसूंन सर्वान्चा सफाया केला पाहिजे होता म्हणजे सर्व भ्रष्ट नेते संपले असते.
On 23/01/2013 05:42 AM santosh chavan said:
Hello
On 23/01/2013 12:17 AM amol said:
ब्रह्मे, हा फोटू कधीच हो....त्या बाईने जेव्हा सांगितले कि त्या मुलीने खूप जणांना गंडा घातला तेव्हा तुम्ही लगेच फोटू काढला का हा ?
On 23/01/2013 12:14 AM amol said:
@समीक्षक लई भारी समीक्षण केला राव तुम्ही... "सुंदर ते ध्यान" ...हाहाहाहा....लई भारी राव
On 22/01/2013 08:12 PM VIJAY said:
बर झाल लवकर निघालात घरून मुलीच्या नाहीतर वाईट झाल असत अजून तुमच. तोंड हि दाखू शकले नसते तुम्ही कुठे
On 22/01/2013 07:41 PM समीक्षक said:
बास का राव..बावीस वर्षांपूवी चार पाच हजार खिशात घेऊन हिंडत होतात? त्यावेळी लुना त्या किमतीत मिळत होती. आम्हीच भेटलो काय पुड्या सोडायला? बाकी तुमच्या फोटोवरून तुमचे "सुंदर ते ध्यान" लक्षात येत आहेच.
On 22/01/2013 07:35 PM Mirchi said:
ब्रम्हे, 22 वर्षांपूर्वी ४००० रुपये म्हणजे आताचे जवळ जवळ - लाख रुपये किंवा जास्तच.किती फेकायचे याची काही लिमिट ठेवा आणि उगाच स्वतःच्या मुर्ख पणाचे बिल बायकांच्या नावाने फाडू नका
On 22/01/2013 07:23 PM Shailesh said:
माझ्या रुबाबदार व्यक्तिमत्वावर भाळलेल्या अवतीभवती पिंगा घालणाऱ्या स्त्रियांना खरतर मी आता कंटाळलो होतो. त्यामुळे ज्या दिवशी माझे विमान paris मध्ये उतरले तेंव्हा first क्लास केबिन मधून बाहेर येताना मी ठरवले कि आजची संध्याकाळ एकट्यानेच घालवायची. माझ्या अलिशान हॉटेलच्या बागेत चंद्रप्रकाशात सीन नदीकडे बघताना वाईनचे घुटके घेत सांद्र संगीताचे सूर एकून मी हरवून गेलो. आणि त्याच क्षणी त्या फ्रेंच सुंदरीची आणि माझी नजरानजर झाली. आमचे फ्रेंच भाषेतील संभाषण वातावरणावरून प्रेमापर्यंत कधी पोहोचले ते माझे मलाच कळले नाही. खोलीत पोहोचल्यावर ती माझ्या बाजूला बसली आणि अचानक अचानक तिने मला पाठीत रट्टे घातले ती मराठीत म्हणाली 'मेल्या, झोपालाहेस आठ आठ वाजेपर्यत, पाणी कोण तुझा काका भरणार आहे का ?'. मला काही कळेना. पण माझे डोळे मी उघडले मला चाळीतली खोली डोळे वटारून बोम्बलनारी माझी आई दिसली. मी लागलीच बादली घेऊन खाली नळावर पळालो.
On 22/01/2013 07:20 PM pradeep said:
Bramhay तस्मै नमः
On 22/01/2013 07:13 PM nil said:
वाचक सडकछाप लेखांना जास्त प्रतिक्रिया देतात असे माझे निरीक्षण आहे. १० मिनिटे वाया गेली आणि हाती काही लागले नाही म्हणून असावे कदाचित.
On 22/01/2013 06:36 PM Avadhut Koparde said:
एक पुणेकर असून देखील तुम्ही इतके मुर्खासारखे कसे काय वागू शकता. अहो लोक वर्षानु वर्षांची ओळख असली तरी १००० रुपये उसने द्यायचे म्हणजे विचार करतात. आणि तुम्ही ४००० दिलेत. धन्य.
On 22/01/2013 06:05 PM Aj said:
"मी गोंधळून गेलो. तसेच लुना जोरात चालवत होतो. मला असा अनुभव नवीनच होता. " हो आम्ही रोज अनुभव घेतो. ब्रम्हे साहेब ती तुमच्या अंगचटीला येत होती तेव्हाच तुम्ही तिचा डाव ओळखायला हवा होता पण तुमच्या मनात लाडू फुटला म्हणून तसेच पुढे गेलात. शिवाय तिला घराच्या बाहेर सोडून तुम्ही वर तिच्या घरी गेलात काय राव अजून काय लिहायचे, पण बरे झाले तुम्हाला चांगली शिक्षा मिळाली .जर कोणी काळी मुलगी असती तर तिला तुम्ही बळ पण लिफ्ट दिली नसती. दिसली सुंदर मुलगी कि लागले लिफ्ट द्यायला
On 22/01/2013 05:49 PM manu said:
उत्तम कथा...पण लेखक कथेच्या शेवटी एक disclaimer टाकायला विसरलेले दिसतात . "ह्या कथेतील पात्र आणि घटना पूर्णतः काल्पनिक असून, काही साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा..."
On 22/01/2013 04:53 PM mayuresh said:
काय भंकस लावली आहे!! ४००० रुपये देवून विसरून जायला तुम्ही काय टाटा बिर्ला चे जावई आहात ? स्वतःचा बावळट पणा आणि फेकू वृत्ती जगजाहीर केली आहे येथे :)
On 22/01/2013 04:52 PM rahul said:
दुसर्यांना खोटीच वाटणार .........ज्याची जळते त्याला काळते .
On 22/01/2013 04:36 PM smita said:
अतिशय फेकू लेख...त्यामुळे नो comments
On 22/01/2013 04:18 PM bakul said:
"मला मुलींच्या मागे जाणं, गप्पा मारणं या गोष्टी जमायच्या नाहीत तशी वेळच कधी आली नाही. कारण मुलीच माझ्याशी आपणहून बोलायच्या, चेष्टा करायच्या" हाहाहा! चेहरा पाहिलाय का ब्रम्हे आरशात. २२ वर्षांपूर्वी मुली इतक्या मोकळ्या असून लुनावर लिफ्ट मागत असतील हे अतीच होतंय! नितीन यांच्याशी सहमत.
On 22/01/2013 03:55 PM A Ra Deshpande said:
ब्रम्हे काय फेकाफेकी करता हो. त्या मुलीने पैसे घेतले असतील पण पाचशेच्यावर नसतील (ते सुधा जास्त) आणि स्थळ सुधा कोफी शोप नाही तर रस्ता असेल. तुमच्या नशीब रूम सोडा कोफी शोप असला तरी नसीब समाजाव लागेल.
On 22/01/2013 03:50 PM nana phadanvis said:
लेखातील सर्वात मजेशीर वाक्य "कारण मुलीच माझ्याशी आपणहून बोलायच्या, चेष्टा करायच्या. ऑफिसमध्ये जाता-येताना मुली लिफ्ट मागायच्या मी त्यांना लुनावर सोडत असे, त्यामुळे परिचय व्हायचा. " एकदम मस्त आहे बारा का चालू द्या...
On 22/01/2013 03:35 PM pravin said:
स्त्रीदाक्षिण्य कि स्रीलंपटपणा?
On 22/01/2013 03:32 PM yogesh said:
अतिशयोक्तीचा कळस आहे !!! तिने लिफ्ट मागितली लगेच अशोका मध्ये कॉफ्फी पाजली ... कॉफी पाजायला पैसे होते मुलीकडे मग ऑटो ने जायचे ना.... परत रूम वर आल्यावर चहा पाजला... तरी तुमाला तिचा डाव कळला नाही,,,, स्वताच्या मुर्ख पानाचे किस्से लोकांना सांगायची हौस आहे वाटते तुमाला साहेब... एक तर लेख खोटा आहे आणि खरा असेल तर अशा लोकांसोबत असेच व्हायला हवा....
On 22/01/2013 02:54 PM sam said:
फारच दानशूर आहात तुमी
On 22/01/2013 02:51 PM akshay said:
हाहाहाहा लोल
On 22/01/2013 02:24 PM Punekar said:
संजय - आम्ही पुणेकरांनी कोणाला काय द्यावे हे तुम्ही शिकवायला नको, आधी हिशोब निट करा, शहाणपणा करताना तरी शहाण्यासारखे लिहावे.
On 22/01/2013 12:49 PM संजय इंगळे , बुलडाणा said:
नितीन बरोबर मी सहमत आहे . विशफुल थिंकिंग ! अहो २२ वर्षापूर्वी सोन्याचा भाव ९०० /- तोळा होता म्हणजे आजचे १२००००/- तुम्ही पुणेकर कुणाला देणार आणि ते पण अपेक्षा ठेवता............क्या फेकता हैं !!!!
On 22/01/2013 12:46 PM vachika said:
अहो देवाचे आभार माना.. वेळ चांगली होती म्हणूनच वाचलात.. नाहीतर त्या मुलीने की केल आसत तुमच देवास ठाऊक. आणि २२ वर्षापूर्वी तर आशा खूप बातम्या वाचण्यात येत आसत.. रात्रीच्या वेळी १त्य मुलाने अनोळखी मुलीला लिफ्ट देणे म्हणजे खूपच धोका पत्करणे. की पण डेरिंग आहे हो!
On 22/01/2013 12:23 PM dwijraj said:
ब्रह्मे साहेबांचा फोटोही, ज्या दिवशी ही फसवणूक लक्षात आली तेव्हा लगेच काढला होता असं दिसतंय!
On 22/01/2013 10:10 AM Manoj Parihar said:
हर हर महादेव .... पुणे नेटिजन्स खूप दिवसा नंतर असा लेख आला .... प्रतिक्रिया चा पाउस पडायला पाहिजेत ........ .............. आक्रमण :)
On 22/01/2013 08:59 AM jagdish said:
घटना २०-२२ वर्षांपूर्वीची आहे, म्हणजे १९९०... त्यावेळी - हजारांची किंमत खूप होती (असावी). आणि - हजार रुपये खिशात घेवून फिरत होता ???? ग्रेट.... फार मोठी व्यक्ती आहात तुम्ही! चहा-कॉफी पर्यंत ठीक आहे पण एवढे पैसे देवून तुम्ही विसरणे आणि .... त्यापुढचे सर्व अतिशयोक्ती अलंकारात बसते. :-)
On 22/01/2013 08:34 AM nitin said:
विशफुल थिंकिंग ! सारखे मनात असे व्हावेसे वाटते पण घडत नाही, म्हणून काही वर्षांनी तेच घडले होते असे स्वताची समजूत होते. त्यातलाच हा लेख !. कसली मुलगी आणि कसली लिफ्ट,सगळेच भासमय.
On 22/01/2013 08:29 AM Shailendra said:
ही गोष्ट खरी वाटत नाही... आणि २२ वर्ष पूर्वी - हजार रुपये ही खूप जास्त रक्कम होती... त्यामुळे कामाच्या गडबडीत 'पूर्णपणे' विसरणे, हे पटत नाही....
On 22/01/2013 07:55 AM Anil Mungikar said:
श्री ब्रह्मे २२ वर्षापूर्वीचा तुमच्यावर आलेला प्रसंग त्या वेळी तुम्ही केलेला नीशच्य योग्य होता. गेले तर गेले ४००० रुपये, तुमची इज्जत तर वाचली. आता तर पुणे खूप बदलले आहे, काय काय प्रकार चालत असतील देवालाच ठाऊक.



मंगलवार, 9 अप्रैल 2013

Most Common English Errors of Indian students.......

Here's a list of some of the most common mistakes that many English speakers in India make. Of course the list is not complete. I will continue to add more in my oncoming blogs. If you remember some of such common blunders, please inform me through your comments as it may help a good number of Indian students who wish to hone their communication skills in English.

In each pair of the following sentences, the sentences given in brackets are the accepted standard English)



Their childrens are very naughty.
(Their CHILDREN are very naughty.)

She is my cousin-sister.
(She is my COUSIN.)



I like the peoples of my country.
(I like the PEOPLE of my country)


He is my cousin-brother.
(He is my COUSIN.)

I got many informations about....
(I got a lot of INFORMATION about....)

There are different types of equipments here.
(There are different types of EQUIPMENT here)

I want to buy a pant/pent.
(I want to buy A PAIR OF PANTS.)

It cost him only one rupees.
(It cost him only one RUPEE.)

200 kilometres are a ling distance.
(200 kilometres IS a long distance.)

Parents should aware their children about......
(Parents should MAKE THEIR CHILDREN AWARE ABOUT.....)

Anyways, hope to see you again.
(ANYWAY, hope to see you again.)

She oftenly comes here.
(She OFTEN comes here.)


What is your good name, please?
(What is your name, please?)

Mrs & Mr Sharma
(MR &MRS Sharma.)

My brother is reading in fourth class.
(My brother is STUDYING in fourth class.)
(My brother is in fourth class.)


My Mrs is not well today.
(My WIFE is not well today.)

I used to do exercise daily.
(I used to TAKE exercise daily.)

I am completely agree with you.
(I completely agree with you.)

Jack is one of my best friend.
(Jack is one of my best FRIENDS.)


He is belong to Delhi.
(He BELONGS to Delhi.)

fly