मंगलवार, 30 अप्रैल 2013
हॅकिंग घटले
जगभरात हॅकिंगचे प्रमाण चीनमध्ये सर्वाधिक असल्याचे निदर्शनास आले आहेत .
जगभरात सायबर हल्ल्यांची भीती व्यक्त होत असताना भारतात मात्र हॅकिंगचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे .
हॅकिंगच्या बाबतीत ' टॉप टेन ' देशांच्या यादीत भारत आठव्या स्थानावर आहे .
' अकामयी टेक्नॉलॉजीस ' या कंपनीने हॅकिंगच्या प्रमाणाबाबत केलेल्या सर्वेक्षणात विविध देशांची धक्कादायक माहिती समोर आली आहे .
जगभरातील एकूण हॅकिंग पैकी ४१ टक्के हॅकिंग हे चीनमध्ये होत असल्याचे निदर्शनास आले आहे .
सन २०१२च्या शेवटच्या तिमाहीत झालेल्या हॅकिंगवरून ही आकडेवारी काढण्यात आली असून , याची कारणमीमांसाही करण्यात आली आहे .
चीनमध्ये हॅकर्सचे सर्वात मोठे नेटवर्क असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे .
यात काम करणारे काही लोक चीनच्या सैन्यातील असल्याचेही समोर आले आहे .
चीन खालोखाल अमेरिकेचा नंबर येतो .
अमेरिकेत हॅकिंगचे प्रमाण १० टक्के असून , हे प्रमाण आधीच्या तिमाहीपेक्षा तीन टक्क्यांनी कमी झाले आहे .
अमेरिकेत सर्वाधिक अनॉनिमस आणि विध्वंसक कारवाया करणारे अॅण्टिसेक लोक असून , तेथे सायबर हल्ले रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली आहे .
तिसऱ्या क्रमांकावर तुर्कस्तान हा देश आहे .
या देशात हॅकिंगचे प्रमाण ४ .
७ टक्के इतके आहे .
मागील तुलनेत या देशातील हॅकिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे .
रशियाचा क्रमांक चौथा असून , या देशातील हॅकिंगचे प्रमाण ४ .
३ टक्के इतके आहे .
तैवान हा देश चीनी हॅकर्सचा नेहमीचाच टार्गेट राहीला आहे .
मात्र , या देशाने उभी केलेली सायबर सुरक्षा यंत्रणा चीनी हल्लेखोरांना पुरून उरली आहे .
देशातील हॅकिंगचे प्रमाण १२ .
७ टक्क्यांवरून ३ .
७ टक्क्यांवर आले आहे .
त्याखालोखाल ब्राझील , रोमानिया या देशांचा नंबर येतो .
या खालोखाल आठव्यास्थानी भारताचा क्रमांक येतो .
भारतातील हॅकिंगचे प्रमाण हे २ .
३ टक्के इतके आहे .
यापूर्वी हे प्रमाण २ .
५ टक्के इतके होते , तर मागील वर्षी ते तीन टक्के इतके होते .
देशातील सायबर सुरक्षा यंत्रणा अधिक प्रभावी करण्यात आली असून , एथिकल हॅकर्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आले आहे .
या खालोखाल इटली नवव्या स्थानावर तर हंगेरी दहाव्या स्थानावर आहे .
जगातील सर्वात मोठा धोका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायबर क्राइमकडे जगातील सर्व देशांनी विशेष लक्ष पुरविले आहे .
यामुळे हल्लेखोरांना हल्ले करणे कठीण होत असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे .
भारताच्या बाबतीत सायबर सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात प्रगत देश म्हणून असे संबोधण्यात आले आहे .
सदस्यता लें
संदेश (Atom)