बुधवार, 5 अप्रैल 2023

मी.... चा स्वाहा....म्हणजे 🌹स्वामी🌹

 मी.... चा स्वाहा....म्हणजे    🌹स्वामी🌹




➿➿➿➿➿➿➿


एक व्यक्ती नेहमी 'श्री स्वामी समर्थ' नामाचा जप करीत असे. हळूहळू तो फार म्हातारा झालेला त्यामुळे तो एका खोलीत पडून असायचा. जेव्हा कधी त्यास शौच, स्नानासाठी जावे लागे तेव्हा तो आपल्या मुलाला मदतीसाठी आवाज देत असे आणि मुलगा त्यास घेऊन जात असे.

हळूहळू काही दिवसानंतर मुलाला आवाज देऊन ही मुलगा येत नसे जर आला तर फार उशीरा. त्यामुळे कधी कधी अंथरुन घाण होई, त्यावरच दिवस घालवावा लागत असे. आणि आता जास्त म्हातारपण आल्यामुळे फार कमी दिसू लागले होते. 

एके दिवशी सकाळी असाच तो आवाज देत असताना पटकन मुलगा आला आणि आपल्या कोमल स्पर्शाने त्यांना शौच-स्नानाला घेऊन गेला. नंतर अंथरूणावर आणून झोपवले. असा आता त्या मुलाचा रोजचा दिनक्रम चालू झाला होता. मग म्हाताऱ्यास संशय येतो की, आधी जेव्हा मी अनेकवेळा आवाज द्यायचो तेव्हा मुलगा येत नव्हता. पण आता एका अावाजात मुलगा कसा येतो.? आणि मला शौच-स्नानास घेऊन जातो. म्हणून एकदा तो म्हातारा त्या मुलाचा हात पकडतो आणि विचारतो की,  "खरे सांग तु कोण आहेस ? कारण माझा मुलगा तर असा एवढा नम्र विनयी नाही." तेव्हा खोलीत एकदम प्रकाश प्रकट झाला त्या मुलाच्या रूपातील श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपले रुप दाखवले. तेंव्हा ती म्हातारी व्यक्ती रडत म्हणाली, "हे स्वामीराया, तुम्ही स्वतः माझ्या या कार्यासाठी रोज येत होता.... स्वामीराया तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला यातून मुक्ती द्या.!"

तेव्हा स्वामी महाराज म्हणतात की, "तू जे भोगत आहे ते तुझे प्रारब्ध आहे. तू माझा खरा भक्त आहेस. नित्य माझे नाम जपत असतो, म्हणून तुझ्या भक्तीच्या प्रेमापोटी तुझे प्रारब्ध मी स्वतः भोगून संपवत आहे." 

स्वामीराया स्वतः म्हणतात, "माझी कृपा सर्वोपरि आहे त्यामुळे तुझे प्रारब्ध संपवता येते. नाहीतर प्रारब्ध भोगण्यासाठी परत जन्माला यावे लागेल. हाच कर्माचा नियम आहे. म्हणून मी स्वतः तुझे प्रारब्ध संपविण्याचा प्रयत्न करत आहे व जन्म-मरणातून तुला मुक्ती द्यायची आहे."

स्वामी महाराज म्हणतात, "प्रारब्ध तीन प्रकारचे आहेत...

१)मंद

२)तीव्र

३)तीव्रतम


* 'मंद प्रारब्ध' माझे नाम जपल्याने संपवता येते.

* 'तीव्र प्रारब्ध' हे खऱ्या संताच्या सान्निध्यात राहून श्रद्धा

आणि विश्वासाने माझे नामाचा जप करुन संपवता येते.

* 'तीव्रतम प्रारब्ध' मात्र भोगावेच लागते.


पण जो नित्य श्रद्धा आणि विश्वासाने माझे नाम सतत जपत असतो त्याच्या प्रारब्धात मी स्वतः बरोबर राहून त्याचे प्रारब्ध मी संपवतो, त्याला याचा त्रास होऊ देत नाही. प्रारब्ध आधी रचले काय नंतर रचले काय ? मी कशाला चिंता करु, फक्त 'श्री स्वामी समर्थ' नाम जपत राहायचे.....


🙏।। अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू अवधूत चिंतन भक्त वत्सल्य भक्ताभिमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।।🙏

मंगलवार, 4 अप्रैल 2023

होमिओपॅथीची औषधं घेण्यातली मजा काही औरच...

 होमिओपॅथीची औषधं घेण्यातली मजा काही औरच...


औषधाच्या बाटलीतून ४ गोळ्या काढाव्या म्हटलं तर साबुदाण्याच्या ६ गोळ्या बाहेर पडतात. त्यातल्या पुन्हा २ गोळ्या परत टाकायला गेलो तर ४ गोळ्या बाटलीत परत जातात... 


या गदारोळात रोग्याचं लक्ष आजारावरून दूर होतं आणि तो लवकर बरा होतो...


 😂🤪😂




खरं पाहिलं तर जगातला कुठलाच मनुष्य शाकाहारी नसतो ...

कारण , 

थोडं बहुत डोकं तर प्रत्येकच जण खात असतो.


😛😛😛😛😛😛




नोटा कागदापासून बनतात, कागद लाकडापासून बनतो आणि लाकूड झाडापासून मिळतं .......

याचा अर्थ असा की पैसे झाडाला  लागतात. 


😜😜👍👍




विवाहित माणसाला त्याच्या जीवनात किमान दोन खर्च तरी करावेच लागतात...


१. बायको गोरी असेल तर..

Sun Screen...


आणि 


२. काळी असेल तर...

Fair & Lovely.....


😝😝😝😝😜




म्हणतात की जो हसला त्याचं घर वसलं !!

पण .........

ज्याचं घर वसलं, त्याला विचारा......

की तो नंतर केव्हा हसला??


😄😄😄😛😛😛




'बायकोला/नवऱ्याला' समजून घेणं म्हणजे :~

32 GB चा 

Video Download करणं.

31.5 GB Download

झाल्यावर Error मेसेज दिसणं !!!!


😝😝😝😝




जगात केवळ तेच लोक साधेभोळे असतात, ज्याच्या मोबाइल मध्ये पासवर्ड नसतो.


🤪😜😛




कांही लोक whatsapp वर फक्त

दोनच स्टेटस पोस्ट करतात....

पहिलं:-- good morning....

दूसरं:-- good night .....

असं वाटतं..... जणू whatsapp च्या दुकानाचं शटर उघडायची आणि बंद

करायची जबाबदारी यांच्यावरच सोपवली असावी...... आणि मालाच्या खरेदी - विक्रीची जबाबदारी आपली.


😜😜😜😒😒




एक सर्व्हेनुसार आजही आपल्या देशात......

'तू प्यार है, किसी और का, तुझे चाहता कोई और है'

हे गाणं वाजल्यावर १० पैकी ८ मुलं इमोशनल होऊन जातात ...


😂😂😝😝




भारतातले लोक इतके टॅलंटेड असतात की 'गाडी' हालवून सांगू शकतात ....

गाडीत पेट्रोल किती आहे ते.


😎😜😜😜😜




ट्रेनच्या गर्दीच्या 'चक्रव्यूहा' ला भेदण्याचं जे कौशल्य या "नमकीन अथवा कटलरी" विकणाऱ्यांपाशी असतं ते तर 'अभिमन्यु' पाशीही नव्हतं.


😊😛😖😆😉😄




माणूस सर्वात अधिक खुश तेव्हा होत असतो, जेव्हा रेल्वे फाटक बंद होत असतं त्याच्या आधीच तो आपली गाडी फाटका पलिकडे काढून घेतो.......

आई शप्पथ सांगतो की त्याला ऑलेंपिक रेस जिंकल्याचं समाधान मिळत असतं.


😂😂😂😂



अजून पर्यंत हे समजलं नाही की 

OK च्या ऐवजी K आणि GOOD MORNING च्या ऐवजी GM लिहिणारे आयुष्याचे २ सेकंद वाचवून काय करत असतील ?


आणि ह्या  Hmm ...वाल्यांनी तर फारच त्रास दिला आहे. असं वाटतं की आपण म्हशीशीच बोलतोय ! 


😜😜😃😛



आई बाप आपल्या मुलीसाठी सुयोग्य स्थळ  शोधताना दोन गोष्टींकडे लक्ष देतात...

पहिली म्हणजे मुलगा खात्या पित्या घरातला असावा.....

आणि दूसरी

तो 

पिणारा खाणारा

नसावा ....

हे कसं काय बुवा ....?? 


😳😄😂😂



गळ्यात मंगळसूत्र पडलेलं असेल तर मुलीचं लग्न झालेलं आहे.....

आणि

चेहरा पडलेला असेल तर मुलाचं लग्न झालेलं असावं.


😜😜😂


जीवन चांगलं  जगायचं असेल तर हसणं आवश्यक आहे. 


x

fly