बुधवार, 5 अप्रैल 2023

तुलसीदासांच् बुद्धिचातुर्य

तुलसीदासांच् बुद्धिचातुर्य



 "श्री.तुलसीदासांना" एकदा एका भक्तांने विचारले की...

"महाराज तुम्ही रामाचे इतके गुणगान गाता, तुम्हाला स्वतः रामाने कधी दर्शन दिले आहे का ?"

तुलसीदास म्हणाले :- "हो"

भक्त :- मला पण दर्शन घडवाल का  ?

तुलसीदास :- "हो नक्की"

★ तुलसीदासांनी त्याला खुप समर्पक उत्तर दिलं, जे एखाद्या गणिती तज्ञाला ही लाजवेल !!!

तुलसीदास म्हणाले , ""अरे हे खुप सोप्पं आहे !!!  तू रामाचे दर्शन तुझ्यातच घेऊ शकशील.""

प्रत्येकाच्या नावांत देखील शेवटी आपल्याला रामाचेच दर्शन घेता येईल. 

त्यासाठी मी तुला एक सुत्रश्लाेक  सांगतो. त्याप्रमाणे कोणाच्याही नावाला ते सुत्र लागु होईल!!!

भक्त :-"कोणते सुत्र ?"

तुलसीदास :- हे ते सुत्र ...

||"नाम चतुर्गुण पंचतत्व मिलन तासां द्विगुण प्रमाण ||  || तुलसी अष्ट सोभाग्ये अंत मे शेष राम ही राम || "

वरील सुत्राप्रमाणे

★ आता कोणाचेही नांव घ्या, त्याची अक्षरे माेजा...

१)त्याला (चतुर्गुण) ४ ने गुणा.

२)त्यात (पंचतत्व मिलन) ५ मिळवा.

३)त्याची (द्विगुण प्रमाण) दुप्पट करा.

४)आलेल्या संख्येला (अष्ट सो भागे) ८ ने भागा.

""पुर्ण भाग जात नाही!!!

दरवेळेस बाकी २ शिल्लक राहतेच ...

ते दोन म्हणजेच "राम" ही दोन अक्षर होय...

★विश्वासच बसत नाही ना ?

उदा. घेऊ...

कोणाचेही नाव निवडा, अक्षर कितीही असोत !!!

★ उदा. ..निरंजन...४ अक्षरे

१) ४ ने गुणा ४x४=१६

२)५ मिळवा १६+५=२१

३) दुप्पट करा २१×२=४२

४)८ ने भागा ४२÷८= ५पुर्णांक, बाकी मात्र २ !!!

बाकी नेहमी दोनच अक्षरे उरतील ती म्हणजे - "राम" !!!


विशेष म्हणजे सुत्रश्लोकातील संख्यांना सुद्धा तुलसीदासांनी फार महत्व दिलं आहे!!!

★1) चतुर्गुण म्हणजे 

४ पुरुषार्थ :- धर्म, अर्थ, काम, मोक्ष !!!

★2) पंचतत्व म्हणजे पंचमहाभौतिक :- पृथ्वी, जल, अग्नि, वायु , आकाश!!!

★3) द्विगुण प्रमाण म्हणजे माया व ब्रह्म असे दोन !!!

★4) अष्ट सो भागे म्हणजे आठ दिशांनी :- 

चार दिशा :- पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण .

 चार उपदिशा - आग्नेय,नैऋत्य, वायव्य, ईशान्य.   

आठ प्रकारची लक्ष्मी :- 

आग्घ, विद्या, सौभाग्य, अमृत, काम, सत्य, भोग आणि योग लक्ष्मी.


आता प्रत्येकाने स्वतःच्या नावाने हे तपासून पहा, विस्मयकारक वाटेल पण बाकी नेहमी २ च येईल...


यात तुलसीदासांच्या बुद्धिचातुर्याची व अतुट रामभक्तीची ओळख पटते !!!

🙏🏻जय श्रीराम🙏🏻

"मृत्यू" म्हणजे काय ?

 मृत्यू का येतो ,, ?

                    


       जे उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे.

                       संत ज्ञानेश्वर


या विश्वाचे काही नियम आहेत, जे सर्व विश्वाला पाळावे लागतात. अशा  नियमां मधील हा एक नियम आहे. या विश्वात ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या,  होत आहेत व होतील त्या नाश पावल्या, नाश पावत आहेत व नाश पावतील. मानवी देह  निर्माण होतो म्हणून त्याला शेवटही आहे. ज्याला आरंभ आहे त्याला शेवट आहे.


                   मृत्यू कधी येतो ?


मृत्यू कधीही लवकर येत नाही किंवा उशिराही येत नाही. मृत्यू नेहमीच, ज्यावेळी यायला पाहिजे त्यावेळीच येतो.


या जन्मीचे प्रारब्ध संपले की मृत्यू येतो. जे कर्म पक्व होऊन फळ देण्यास  सिद्ध झालेले असते, त्याला 'प्रारब्ध' असे म्हणतात. 'प्रारब्ध' या शब्दाला  एक नकारार्थी किंवा असहायतेची छटा आहे. पण तसे असण्याची काही गरज नाही.  सद्गुरुंच्या कृपेचा आधार घेत विवेकाचा वापर करून, श्रेयस निवड करत आपले  प्रारब्ध आपल्याला बदलता येते. हीच तर मानवी जन्माची सर्वात मोठी उपलब्धी  आहे. मानवा व्यतिरिक्त इतर जीवांना मात्र ही उपलब्धी मिळालेली नाही.


हिंदु ज्ञान परंपरेतील एक मूलभूत सिद्धांत आहे - कर्म सिद्धांत. कर्म  म्हणजे कृती. ही कृती स्थूल पातळी वरील कार्य, मानसिक पातळी वरील भावना किंवा  वैचारिक पातळीवरील तरंग या स्वरूपात असेल. त्यालाच कर्म असे म्हटले जाते.  प्रत्येक कर्माचे त्याच्या प्राप्त स्वरूपात फळ मिळतेच.


काही  कर्माचे फळ लगेच मिळते त्याला "क्रियमाण कर्म" म्हणतात. काही कर्माचे फळ  काही काळा नंतर मिळते, त्याला "संचित कर्म" म्हणतात. या दुसऱ्या प्रकारच्या  संचित कर्मातील जे कर्मफळ भोगाच्या दृष्टीने देण्यायोग्य झालेले असते,  त्याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध म्हणजे कोणी कोणावर लादलेले ओझे नसते,  तर ते या जन्मात किंवा या पूर्वीच्या जन्मात स्थूल, भावनिक, वैचारिक  पातळीवर आपण जे कर्म केले त्या कृतीचा परिणाम असतो. ते या जन्मात आपल्याला  अनुभवायचे असते. त्यालाच 'प्रारब्ध भोग' असेही म्हणतात.


        माझे कर्म कुठे साठवलेले असते ?


प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब त्यांच्या चित्तावर लिहिलेला असतो. चित्त  म्हणजे अंतर्मन. याच अंतर्मनामध्ये सर्व कर्मे साठवली जातात. ज्याला आपण  आठवणी किंवा संस्कार म्हणतो.

ज्यांची ध्यानात गती आहे ते मात्र  त्यांच्या चित्तावरील आठवणी किंवा संस्कार पाहून, त्यांच्या आयुष्यात जे  काही घडत आहे, त्याविषयीची कर्मगती जाणू शकतात.


               प्रारब्ध कोण ठरवतो ?


स्वतःचे प्रारब्ध प्रत्येक जीव स्वतः ठरवतो. पुढील जन्म घेण्या अगोदर  प्रत्येक जीव कुठल्या कर्माची फळे पुढील जन्मात भोगायची ते स्वतः ठरवतो.  त्याप्रमाणे तो जीव त्याच्या कर्मास साजेसे योग्य ते आई-वडील, इतर  नातेवाईक, मित्र मंडळी व इतरांची निवड करतो. यालाच 'जीवन नियोजन' असेही  म्हणतात.


प्रारब्धा कडे "घ्यायचे अनुभव" किंवा "शिकायचे धडे" या  दृष्टिकोनातूनही  पाहता येते. प्रारब्धा विषयीच्या या अर्थाने 'प्रारब्ध हे  भोगूनच संपवावे लागते, असे समजते. यामध्ये असहायतेची भावना नसते, तर  आत्म्याच्या उत्क्रांती साठीचा हा अनुभव असतो, अशा अनुभवांनाच 'तीव्र  प्रारब्ध' असेही म्हणतात. परंतु प्रारब्धा मध्येही बदल करणे शक्य असते. प्रारब्धा मधील बदलाच्या शक्यते मुळेच आध्यात्मिक साधनेलाही महत्व प्राप्त होते.


            मृत्यूची भिती का वाटते ?


१. जर जन्माला आल्या पासून मृत्यूचा अनुभवच नाही, तर त्याची भिती  वाटण्याचे कारण  म्हणजे पूर्वजन्मांमध्ये मनुष्य कितीतरी वेळा मृत्यू पावला  आहे आणि त्यामुळेच मृत्यूचे भय त्याच्याठायी स्मृतीमध्ये साठले आहे. मरण  येताना शेवटी जी स्मृती राहते, तीच गती मृत्यू पावलेल्याच्या ठायी प्राप्त  होते. मृत जीवाने जीवीत असताना शरीरावर अत्यंत प्रेम केलेले असते. त्यामुळे  ते शरीर सोडताना त्याला जे दुःख होते, ती स्मृती त्याच्याबरोबर पुढील  जन्मात येते आणि त्यामुळेच त्या जीवाला मृत्यूची भिती वाटते. याचाच  अर्थ जीवाच्या चित्तावर पूर्व जन्मातील मृत्यूच्या आठवणी साठवलेल्या असतात  आणि त्या आठवणीं मुळेच त्याला मृत्यूची भिती वाटत असते.


२. या जन्मात जीवास मृत्यू कधी व कसा येणार ? हे माहीत नसते. या अनिश्चितते मुळेही त्यास मृत्यूची भिती वाटते.

३. मृत्यूची भिती ही बऱ्याचदा मृत्यूच्या समयी होणाऱ्या वेदनांचे भय, असहायता, दुसऱ्यावरच्या अवलंबनत्वाची भिती, आप्तस्वकीयांच्या वियोगाचे  दुःख, जीवनाचा मोह वगैरे अशा अनेक कारणां मुळे निर्माण झालेली असते.


                "मृत्यू" म्हणजे काय ?  


 हे जर आपण नीट समजून घेतले तर मृत्यू विषयीची अनायास वाटणारी भीति निर्माण होणार नाही.

★ "मृत्यू" म्हणजे मृत होणे नसून पुढील जीवन प्राप्त होणे, असे आहे आणि ही जन्म जन्मांतरीची प्रक्रिया आहे.

★ जीवन व मृत्यू या भिन्न अवस्था नसून एका पाठोपाठ येणाऱ्या जीवन चक्राच्या  जीवन गती विषयक क्रिया आहेत. या जीवन क्रिया कर्माच्या शून्य अवस्थे पर्यंत अविरत चालू राहतात. जीवन - मरणाच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी सद्गुरु ची आवश्यकता आहे. 


गुरु भक्त शिष्या कडून वेगवेगळ्या सेवा व दान रूपाने पुण्य कर्म करून घेतात  मंत्र मूलम् गुरुवाक्य  समजून जो भक्त शिष्य सदैव गुरूच्या हाकेला सेवा व दान यासाठी तत्पर असतो त्याला गुरु दानाच्या काही पटीत परत तर देतातच. परंतु त्यांच्या संसार रथाची दोरी आपल्या हातात घेतात त्याहीपेक्षा अशा भक्त  शिष्य मोक्षमूलम् गुरुकृपा  यास पात्र होतो.


तात्पर्य -: गुरु कार्यात मिळणारी सेवा ही पूर्व प्रारब्ध शिवाय मिळत नाही मिळणारी गुरु सेवा ही ईश्वरी कार्य समजून काम करीत राहिल्यास जन्म मृत्युच्या चक्रातून मुक्ती  मिळवून देणारच असते, तोच भक्त शिष्य मोक्ष प्राप्त करू शकतो. 

*********


लेख अप्रतिम आहे . 

जरूर वाचा आणिआपल्या मनःचतुष्टि वरील अनावश्यक बोजा फेकून द्या.


🚩🚩🙏राम कृष्ण हरी 🙏🚩🚩

fly