गुरुवार, 6 अप्रैल 2023

🌞🌞पवनपुत्र हनुमान🌞🌞 🌻एक अलौकिक उत्पत्ती 🌻

 🌞🌞पवनपुत्र हनुमान🌞🌞      

 🌻एक अलौकिक उत्पत्ती 🌻


श्री हनुमंताला "११ वा रुद्र" मानतात.! त्याचे वडील केसरी नावाच्या वानर जातीचे राजा होते.! ते ऋष्यमूक पर्वतावर राहत असत. हनुमानाची आई

अंजनीदेवी ही मोठी सती साध्वी

भारतीय नारी होती.! तिने पुत्रप्राप्ती

साठी भगवान शंकराची आराधना केली असता भगवान शंकराने प्रसन्न होऊन तिला वर मागण्यास सांगितले तेंव्हा तिने

शंकरासारखा भोळा परंतु वाऱ्या प्रमाणे पराक्रमी तेजस्वी पुत्राची मागणी केली.!शंकरांनी तिला वरदान दिले!----


"वज्रदेहं पुत्रवरमुमाकास्तस्तदा$ ब्रवीत.। एकादशो महारुद्रस्तव पुत्रो भविष्यती ।।


"हे अंजनी,! वज्रदेही ११ वा रुद्र पुत्ररूपाने तुझ्या उदरी जन्म घेईल."! तू तुझे हात पसरून डोळे बंद कर व उभी  राहून माझे ध्यान करत रहा"! काही वेळातच पवनदेव तुझ्या हातात जो प्रसाद ठेवतील तो प्रसाद भक्षण केल्यानंतर यथायोग्य वेळी तुला रुद्रावतार स्वरूप तेजस्वी पुत्ररत्न प्राप्त होईल.!भगवान शंकराच्या आज्ञेनुसार

अंजनी ध्यानमग्न झाली.!!!!

त्याचवेळी आयोध्येत चक्रवर्ती राजा दशरथ पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ

करीत होता.! यज्ञपुरूषाने तिन्ही राण्यांच्या हातावर खीरीचे गोळे

ठेवले.! तेव्हा तिथे आकाशातून अचानक एक घार आली व राणी कैकयीच्या हातातील खारीचा गोळा घेऊन आकाशमार्गे उडून जाऊ लागली.! आणि क्षणभरात तिथे भगवंताच्या कृपेने भयंकर वादळ आले व घारीच्या तोंडातून

खीरीचा गोळा खाली ध्यानात असलेल्या अंजनीच्या हातात पडला.!अंजनीने तो प्रसाद ग्रहण केला.! नवमास व्यतित झाल्यावर अंजनीच्या उदरातून चैत्र शुक्ल पौर्णिमेला मंगळवारी हनुमंताचा जन्म झाला.!" वाऱ्या मुळे दिली गेलेली खीर" हे हनुमान जन्माचे मुख्य कारण असल्याने हनुमंताला "पवनपुत्र"

नावाने ओळखले जाऊ लागले.!!

🛶 🛶 🛶 🛶 🛶 🛶 🛶 🛶

खालील प्रभावी मंत्राचा १२००० जप केल्यास शत्रूपासून संरक्षण होते

व सकल मनोकामना पूर्ण होते.!

👇 👇 👇 👇 👇 👇 👇 👇


💥 💥 💥 💥 💥 💥 💥 💥

ओम् हनुमते नमः ।। अंजनी-गर्भ-संभूतम् कपीन्द्र सचिवोत्तम । रामप्रिय नमस्तुभ्यम् हनुमन् रक्ष सर्वदा ओम् हनुमते नमः ।।

💥 💥 💥 💥 💥 💥 💥 💥

# चराचरात श्रीराम #

 # चराचरात श्रीराम #


 श्री भीमरूपी स्तोत्राचे पठण रोज नित्यनियमाने केले जाते आणि लहान मुलांकडून म्हणून घेतलं जातं हेतु हाच की, एक संस्कार व्हावा मनावर, जिंव्हेवर, विचारांवर म्हणजे ते बालक पण सुविचारी व्हावं म्हणून म्हणवून घेतलं जातं..

पण जस जसे विचार प्रगल्भ होतात तसतसा विचार केला जातो अभ्यास केला जातो तेंव्हा त्यातील गहनता लक्षात येते आणि महती कळते तेंव्हा आपोआप नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी लीन होतो. अशा कृपाळू हनुमानाचा उद्या पहाटे सुर्योदया आधी पोर्णिमेच्या शुभ दिवशी अंजनी मातेच्या पोटी जन्म झाला , 

श्रीराम 🌹🙏 


भीमरुपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती | 

वनारी अजंनीसुता रामदूता प्रभंजना ||1|| 


ह्या स्तोत्रात भीम हे हनुमंताचे नाव आहे. रामायणातील सुंदर कांडा मध्ये " सीताशुद्धी घेऊनिया भीम आला " असे म्हणले आहे. रामदास स्वामींनी हनुमंताची स्तुती करतांना " नमन गा तुज भीमराया | निजमती मज दे तुज गाया |" असे म्हणले आहे. यजर्वेदात रुद्रदेवाला भीम म्हणले आहे. सूर्यपुराणात पण उल्लेख आहे. म्हणजेच हनुमंत हा रुद्राचा म्हणजेच शिवाचा अवतार आहे. हनुमंत वज्र आहे कारण इंद्राने हनुमंताला वरदान दिले की, माझे वज्र तुझा सांभाळ करेल. तुला कुठल्याही अस्त्राने, शस्त्राने दुखापत होणार नाही. म्हणून हनुमंत हा वज्र आहे.  मरुताच्या म्हणजे वायूच्या वेगाने जाणारा म्हणून मारुती. क्षमेचे रुप असणारा हनुमंत वनारी आहे. वनारी ह्या शब्दात प्रलयाची कल्पना सामावली आहे. 

हनुमंत म्हणजे प्रभंजन. जीव हा चैतन्याचा अंश आहे. तो परब्रम्हात प्रवेश करतो तेंव्हा लिंगदेह भंग पावत नाही, वासनांची बीजे शिल्लक राहतातच म्हणून जन्म मरणाचा फेरा संपत नाही, ह्या फेऱ्याच  हनुमंत भंजन करतो म्हणून प्रभंजन हे नाव हनुमंताचे आहे. 

हनुमंताच्या बळाचे वर्णन करण्यासाठी महाबली पण म्हणले आहे. हनुमंत हा प्राणदाता आहे. हनुमंत हा सुखदायी, शोकहरण करणारा आहे म्हणून सौख्यकारी आहे. आत्म्याचे स्व रुपाबद्दलचे आपले अज्ञान नाहीसे करतो. हनुमंताचे वैशिष्ट्य म्हणजे उपास्य आहे उपासकही आहे. म्हणून हनुमंताला वैष्णव म्हणले आहे. हनुमंत हा गायक आहे. श्रीरामाचा त्रयोदशाक्षरी नामाचा सतत जप चालु असतो. 

हनुमंत हा दिनानाथ आहे. अनाथांना तो सनाथ करतो. म्हणून हनुमंताला सर्वभावाने शरण जावे. हनुमंत हा हरीरुप आहे. तो संकट, भय, दु:ख, हरण करतो. हनुमंत हा सुंदर आहे तो पारमार्थिक. तो परमात्मा आहे, जगदन्तर आहे. हनुमंत हा पातालदेवताहन्ता आहे. पाताळात, अहिरावण महिरावणांनी पूजन केलेल्या देवीचा हनुमंताने नाश केला. याच देवीच्या चरणावर राम लक्ष्मणाला बळी देणार होते. हनुमंताला अंजनीमातेने शेंदूराचा लेप लावून भव्य केले. 

हनुमंत हा लोकनाथ आहे..सगळ्या जगताचा नाथ तो लोकनाथ पण तो भू:, भुव:, स्व:, मह:, जन:, तप:, आणि सत्यम या सातही लोकांचा नाथ आहे. हनुमंत हा जगन्नाथ आहे तो स्थुल, सूक्ष्म, आणि कारण या तिन्ही जगतांचा नाथ आहे. हनुमंत प्राणनाथ आहे,  कालातीत आहे, प्राचीन आहे, वर्तमान आहे, भविष्यात आहे म्हणून पुरातन आहे. हनुमंत हा पुण्यलवान आहे पावनही आहे. परितोषक आहे. 

ध्वज हे विजयाचे प्रतिक आहे. श्रीरामांचा ध्वज बांधलेला दंड हनुमंताने आपल्या बाहुमध्ये पेललेला आहे आणि आकाशात फडकवला. हनुमंत हा धर्मसंस्थापना साठीच आहे. दुष्टांचा संहार करण्यासाठी हनुमंत त्याचे रुद्ररुप धारण करतो शत्रूच्या विनाशासाठी अत्यंत विध्वंसक आहे म्हणून हनुमंताला काळाग्नी, काळरुद्रग्नी म्हणले आहे. 

हनुमंताच्या मुखात ब्रम्हांड वसलेलं आहे. त्याच्या डोळ्यातून क्रोधाच्या ज्वाळा निघत आहे त्यामुळे दुष्टांचा संहार करण्यासाठी डोळ्यातील ज्वाळेमुळे प्रलय होतो. वज्रासारखा प्रहार करणारी शेपटी वळवून ठेवली आहे. हनुमंताच्या मस्तकावर सुंदर मुकुट कानात मधले कुंडलं शोभून दिसतात. मंजुळ आवाज करणारी रुणझुण वाजणारे नुपूर असून दोन्ही हातात कंकणे आहेत. हनुमंताच्या कटीवर सुवर्ण कौपिन जी निसर्गदत्त आहेत ती झळाळत आहे. असा हा हनुमंत पर्वताप्रमाणे उं, विशाल, आणि धिप्पाड असला तरी सडपातळ आहे. हनुमंत हा हवे तसे रुप धारण करु शकतो तो विजेप्रमाणे चपळ आहे तेजस्वी आहे. हनुमंताने कोट्यावधी उड्डाणे घेत उत्तरेकडे उडत जाऊन मंदार पर्वता सारखा द्रोणागिरी पर्वत संजीवनी वनस्पतीसाठी क्रोधाने उपटला आणि मनोवेगाने परत त्याच जागेवर नेऊ ठेवला.हनुमंत  सर्वात लहान अणूपासून ते ब्रम्हांड आजपर्यंत एवढा मोठा आकार धारण करु शकतो. हनुमंताच्या शेपटीत वज्राचा आघात करण्याची क्षमता आहे.  शेपटीने तो ब्रम्हांड आला वेढा घालु शकतो. हनुमंताची ब्रम्हांडामध्ये कोणाशीच तुलना होऊ शकणार नाही. हनुमंताने डोळ्याने सूर्य मंडळ पाहिले आणि ते गिळून टाकले. हनुमंत इतका मोठा वाढत गेला की, त्याने शून्यमंडळाचा भेद केला. आकाशाच्या शुन्याला भेदणे म्हणजे सच्चिदानंद परमात्मस्वरुप अनूभवणे.हनुमंताविना शून्य असलेले जग, हनुमंतामुळे पूर्णत्व प्राप्त करते हीच हनुमंताच्या अवताराची पूर्तता. हनुमंताच्या दर्शनाने भूतप्रेत, समंध, सर्व प्रकारच्या चिंता मिटतात आणि आनंद, सुख प्राप्त होते. हनुमंताच्या कृपेने भवरोग, भवव्याधी नाहीशा होतात. हनुमंताचे दर्शन म्हणजे परमात्म्याचे दर्शन. 

श्री रामदास स्वामी म्हणतात हे," हनुमंता या पंधराश्लोकी स्तुतीचा स्वीकार करा." कीतीही केलं तरी स्तुती पूर्ण होऊ शकत नाही. चंचल मन दृढ रहो अशी प्रार्थना हनुमंताकडे केली आहे. श्रीरामांच्या दासांमध्ये हनुमंताचे नाव अग्रस्थानी आहे. त्यामुळे संपुर्ण वानरकुळाचा उध्दार झालाय.‌ हनुमंत साक्षात रामरुपी आहे. हनुमंताचे दर्शन झाले की, सर्व दोष नाहीसे होतात. देहदृष्टीने हनुमंत हा रामाचा दास आहे, पण जीवसृष्टीने हनुमंत हा रामाचा अंश आहे. 

 अशा ह्या बलभीमाला हनुमंताला माझा साष्टांग नमस्कार.  

श्री राम जय राम जय जय राम. 🌹🙏

fly