🏹 ||आरती परशुरामाची || 🏹
जयदेव जयदेव जय परशुरामा
आरती ओवाळू करुनी तव स्मरणा ||धृ|| जयदेव......
सोडुनी सारी क्षेत्रे तुजपाशी आलो प्रेमे कुसुमे अर्पुनी तल्लीन झालो तुजपाशी येता चित्तासी हरलो आनंदे भवडोही तरोनिया गेलो ||१|| जयदेव......
माया मोह आदी विकार पाठीशी त्यातुनी बाहेरी मजला काढीशी श्रद्धा देवा माझी एका तुजपाशी तुजविण कोणी नाही मज तारायासी || २ || जयदेव...
मारुनी दुष्टासी अवनी रक्षिसी राहुनी महेंद्री दाने ती करिसी अगणित महिमा तुझा न कळे कवणासी आम्ही मुखे गातो तव गुण कवनासी || ३ || जयदेव.....
सात्विक राजस तामस तुझेच हे गुण
हाती नित्य असतो परशु व बाण
एकनाथ तू अमुचा तुज आम्ही शरण मानुनी सेवा घ्यावी होऊनी दयाघन || ४ || जयदेव......
अनन्यभावे सेवा जे कोणी करिती इच्छित पुरवुनी देसी संतती संपत्ती
समर्थ ऐसा दाता तुजविण ना जगती मस्तक चरणी ठेवूनी विनंती तुज अंती || ५ || जयदेव......