बुधवार, 23 अगस्त 2023

रोप जम्पिंग: दररोज दोरीवरून उड्या मारा, फिट राहा.

 रोप जम्पिंग: दररोज दोरीवरून उड्या मारा, फिट राहा.

 

दोरीवरून उड्या मारण्याला अष्टपैलू व्यायाम म्हटले जाऊ शकते. दोरी खूप स्वस्त असून व्यायामाचे चांगले साधन आहे. ही दोरी बॅगमध्ये सहजपणे ठेवता येते. याचा कुटुंबातील सर्वजण वापर करू शकतात.यामुळे तुमची फिटनेस चांगली राहते. तसेच यामुळे शरीराचा प्रत्येक भाग सक्रिय होऊन वजन कमी करण्यात आणि फिट ठेवण्यात मदत होते. सोबतच आपल्या शरीराला चांगला आकार मिळतो. जे लोक भारी व्यायाम करणे पसंत करतात त्यांच्यासाठी दोरीवरून उड्या मारणे वॉर्म-अप व्यायामासारखे आहे. खेळाडूदेखील याचा वापर स्वत:ला फिट ठेवण्यासाठी आणि आपली एकाग्रता वाढवण्यासाठी करतात.ही तुमच्यासाठी उत्तम कार्डियोव्हेस्क्युलर एक्सरसाइज ठरेल. तसेच हृदयासाठीही हा व्यायाम उत्तम आहे.


दोरीवरच्या उडय़ा.


लहानपणी आपण मजेमजेत दोरीच्या उडय़ा मारतो, अगदी मित्रमैत्रिणींमध्ये दोरीच्या उडय़ा मारण्याच्या स्पर्धाही लावतो.


लहानपणी आपण मजेमजेत दोरीच्या उडय़ा मारतो, अगदी मित्रमैत्रिणींमध्ये दोरीच्या उडय़ा मारण्याच्या स्पर्धाही लावतो. मोठे झाल्यावर या व्यायामाला एक वेगळी ओळख प्राप्त होते, ती म्हणजे वजन कमी करण्यासाठीचा व्यायाम, पण दोरीच्या उडय़ांनी खरेच वजन कमी होते का, शिवाय सगळ्यांनी हा व्यायाम केला तर चालतो का, ते जाणून घेऊया.


खूप दोरीच्या उडय़ा मारल्या की वजन कमी होते हा एक गैरसमजच आहे. दोरीवरच्या उडय़ा मारताना सर्वात जास्त व्यायाम होतो तो पोटऱ्यांच्या स्नायूंना. त्यामुळे दोरीच्या उडय़ांमुळे पोटरीचे आणि पायाचे पुढच्या बाजूचे स्नायू बळकट होतील, पण तुम्ही केवळ वजन कमी करण्यासाठी अगदी ३० मिनिटे वा ४० मिनिटे दोरीच्या उडय़ा मारल्यात तरी त्याचा त्या दृष्टीने फारसा फायदा नाही. वजन कमी करण्यासाठी दोरीच्या उडय़ांपेक्षा जलदगतीने चालण्याचा फायदा अधिक.


पोटरीचे स्नायू बळकट करणे हाच उद्देश असेल तर चवडय़ावर वर-खाली होण्याच्या व्यायामानेही ते साधते.


आपल्या घोटय़ाच्या वर ‘अकिलीज टेंडन’ नावाचा स्नायू असतो. जे लोक रोज दोरीच्या उडय़ा मारतात त्यांच्यापैकी काही जणांमध्ये रोजच्या वर-खाली उडय़ा मारल्यामुळे या टेंडनला सूज येऊ शकते. त्यात उडय़ा मारणाऱ्याचे वजन जास्त असेल तर त्रास अधिक संभवतो.


दोरी फिरवताना मनगटाची हालचालही वारंवार एकाच प्रकारे होते. त्यामुळे काहींमध्ये मनगटाच्या स्नायूलाही सूज येणे शक्य आहे.


ज्यांना गुडघ्यांची झीज सुरू झाली आहे त्यांनी हा व्यायाम शक्यतो टाळावा. तरुणांनी मात्र वॉर्मअप करताना तो केल्यास हरकत नाही.


लहान मुले लीलया दोरीच्या उडय़ा मारतात. मोठेपणी मात्र सवय नसताना एकदम दोरीच्या उडय़ा मारणे सुरू केले तर तोल जाऊन पडण्याची भीती अधिक असते.


काही जणांमध्ये दोरीच्या उडय़ांनी कमरेच्या चकतीवर ताण येऊन कमरेचे दुखणे सुरू होऊ शकते.


दोरीच्या उडय़ांमध्ये हात आणि पाय यांचा मेळ साधून उडी मारावी लागते. त्यामुळे विविध कारणांमुळे ज्यांचा तोल जातो अशांसाठी हा व्यायाम नक्कीच बरा नव्हे. (उदा- कानाच्या समस्यांमुळे तोल जाणे, स्पाँडिलोसिस, पार्किन्सन्स इ.)


दोरीच्या उडय़ांच्या व्यायामाला असलेल्या मर्यादांमुळे फक्त आणि फक्त तेवढाच व्यायाम शक्यतो नको. पण याचा अर्थ ज्यांना दोरीच्या उडय़ा मारता येतात त्यांनी त्या मारुच नयेत असे नाही. ‘वॉर्मअप’मध्ये आपण जे विविध व्यायाम करतो- उदा. जोर काढणे, सीटअप काढणे इत्यादी. त्याबरोबरच पाच मिनिटे दोरीच्या उडय़ा हा एक व्यायाम असावा.


दोरीच्या उडय़ा मारायच्याच असतील तर शक्यतो पायात स्पोर्ट शूज घालून करा. त्याने ‘शॉक अब्सॉर्बर’सारखा परिणाम मिळतो आणि पावलावर फार ताण पडत नाही.


या उडय़ा मारताना पाच मिनिटांनी एकदा थोडी विश्रांती घ्यावी. हवे असल्यास नंतर परत पाच मिनिटे दोरीच्या उडय़ा माराव्या.

शुक्रवार, 18 अगस्त 2023

पंचकच्छ

कच्छ , पंचकच्छ

 गृहस्थासाठी कोणतेही धार्मिक कृत्य करताना कच्छ म्हणजे काष्ठा अनिवार्य आहे ।


सर्वसाधारण आपण जे धोतर नेसतो ते जर गाठ मारून नसलेलं असेल तर ते त्रिकच्छ होते ।

म्हणजे तीन वेळा खोचलेले ।,, नवखे धोतर नसणारे असे धोतर नेसतात ।


उजवीकडील डावीकडे आणि डावीकडील उजवीकडे शेडे खोचून जे नेसले जाते त्याला पंचकच्छ म्हणतात,, कारण ते पाच वेळा खोचून नेसले जाते ।। अभ्यस्त लोकं या प्रकारातील धोतर नेसतात ।


कुक्षिद्वये तथा पृष्ठे नाभौ द्वौ परिकीर्तितौ ।

पञ्चकच्छास्तु ते प्रोक्ताः सर्वकर्मसु शोभनाः ।।

आचारेन्दु ।।


उपरोक्त दोन्ही प्रकारातील नेसण्यात काष्ठा असतो ।


पंचकच्छ हे उत्तम आणि गाठ मारून नसलेले त्रिकच्छ हे मध्यम ।


पण दोन्ही ग्राह्य आहेत ।


अजून एक पद्धत आहे ,, दुटांगी धोतर,, लफ्फेदार बटरफ्लाय,

त्याला तिर्यक्कच्छ म्हणतात,, हे अग्राह्य असते ।

किंवा अजून एक "शिवलेले रेडिमेड तयार" मिळते


ते फॅन्सी ड्रेस साठी ठीक आहे ,, पण धार्मिक कृत्यात अग्राह्य ।


किंवा काही जण नुसती लुंगी नेसतात,, गोल,, त्याला विकच्छ म्हणतात,, हे प्रवासात अथवा नुसतंच काही काम नसताना, झोपताना चालेल ।

पण धर्मीम कृत्यात अग्राह्य ,, ।


पाठशाळेत शिकणाऱ्या ब्रह्मचाऱ्याला पंचकच्छ नेसण्याचे बंधन नाही,, पण त्याने कौपिन ,, म्हणजे लंगोटी धारण केली पाहिजे,, । 


लंगोट नव्हे ,, 


लंगोटी,, ,,, लंगोटी म्हणजे नुसतीच कापडाची लांब पट्टी असते ,, जी कटिसूत्रात अडकवली जाते ।


लंगोट म्हणजे शिवलेला असतो ।


सोवळ्याच्या संकल्पनेत शिवलेलं वस्त्र चालत नाही , कारण त्याची अखंडता नाहीशी झालेली असते ।


काष्ठा न लावता केलेलं कर्म निष्फळ ठरतं ,, 


काष्ठा न लावता जे काही जप, पूजा, दान, हवन इत्यादी केलं जातं त्याचं सर्व पुण्य पाताळात जातं ,,


छिद्र असलेल्या पिंपात कितीही घागरी ओतल्या तरी त्याचा उपयोग नसतो । तसे आहे हे ।


एकदा एकाने विचारलं , " कि मग मी काष्ठा न लावता एवढा जप केला तो व्यर्थ गेला ?" 


त्यावर मी म्हणालो , "नाही, व्यर्थ नाही गेला ,, त्या जपाचं फलस्वरूप म्हणूनच तुला आज हे कळलं कि काष्ठा लावूनच जप करावा ।" 


जेव्हा बलि महाराजांना पाताळात जाण्याची आज्ञा झाली तेव्हा त्यांनी विष्णुंना विचारलं कि आमच्या भोजनाची काय व्यवस्था,, आम्हाला ऊर्जा कशी मिळेल ?

त्यावर विष्णु म्हणाले , पृथ्वीवर जे काही अशास्त्रीय पद्धतीने धर्मकर्म होईल ती ऊर्जा तुला प्राप्त होईल, जे कोणी अमंत्रक भोजन करतील ते भोजन तुला प्राप्त होईल ।


श्रीभगवानुवाच ।


दानान्यविधी दत्तानि श्राद्धान्यश्रोत्रियाणि च ।

हुतान्यश्रद्धया यानि तानि दास्यन्ति ते फलम् ।।


अदक्षिणास्तथा यज्ञाः क्रियाश्चाविधिना कृताः ।

फलानि तव दास्यन्ति अधीतान्यव्रतानि च ।।


उदकेन विना पूजा विना दर्भेण या क्रिया ।

आज्येन च विना होमं फलं दास्यन्ति ते बले ।।


श्री वामन पुराण , अध्याय ३१ , श्लोक ७८, ७९, ८० ।

fly