रविवार, 4 जून 2023

महादेवांशी संबंधित रहस्य

 महादेवांशी संबंधित रहस्य



🔸स्मशानापासून ते कैलासपर्यंत, जाणून घ्या महादेवांशी संबंधित रहस्यांची उत्तरे.


देवांचे देव महादेव हे अद्भुत व अविनाशी आहेत. महादेव जेवढे सरळ आहेत तेवढेच ते रहस्यमयसुध्दा आहेत. त्यांचे राहणीमान, निवासस्थान सर्वकाही इतर देवांपेक्षा वेगळे आहे. शिव स्मशानात निवास करतात, गळ्यात साप धारण करतात, भांग आणि धोतरा ग्रहण करतात असे विविध रहस्य यांच्याशी निगडीत आहेत. आज आम्ही तुम्हाला महादेवाशी संबंधित काही रोचक गोष्टी आणि यामध्ये दडलेले लाईफ मॅनेजमेंटचे सूत्र सांगत आहोत.


🔹भगवान शिव यांना स्मशानाचे निवासी का मानले जाते?

महादेवाला संपूर्ण कुटुंब असलेले देवता मानले जाते, परंतु तरीही ते स्मशानात निवास करतात. भगवान शिव संसारिक असूनही ते स्मशानात निवास करतात यामागे लाईफ मॅनेजमेंटचे एक गूढ सूत्र दडलेले आहे. हा संसार मोह-मायेचा प्रतिक असून स्मशान वैराग्याचे. महादेव सांगतात की, या संसारात राहून आपले कर्तव्य पूर्ण करावेत, परंतु मोहमायेपासून दूर राहावे. कारण हा संसार नश्वर आहे. कधी न कधी हे सर्व नष्ट होणार आहे. यामुळे संसारात राहून कोणताही मोह न बाळगता आपले कर्तव्य पूर्ण करत वैरागीप्रमाणे आचरण करावे.


🔹भूत-प्रेत महादेवाचे गण का आहेत?

महादेवाला संहाराची देवता मानण्यात आले आहे. म्हणजेच, जेव्हा मनुष्य आपल्या सर्व मर्यादा तोडू लागतो तेव्हा महादेव त्याचा संहार करतात. ज्या लोकांना आपल्या पाप कर्माचे फळ भोगावे लागते, तेच प्रेतयोनी प्राप्त करतात. या सर्वांना महादेव दंडित करतात, कारण शिव संहार देवता आहेत. या कारणामुळे यांना भूत-प्रेतांचा देवता मानले जाते. वास्तवामध्ये जे भूत-प्रेत आहेत ते केवळ एक सूक्ष्म शरीराचे प्रतिक आहेत. महादेवाचा यामागे असा संदेश आहे की, प्रत्येक प्रकारचा जीव ज्याची सर्वजण घृणा करतात किंवा त्याला घाबरतात, तोसुद्धा महादेवाजवळ पोहोचू शकतो, अट केवळ एवढीच आहे की, त्याने स्वतःचे सर्वस्व महादेवाला समर्पित करावे.


🔹महादेव गळ्यात साप धारण का करतात?

महादेव जेवढे रहस्यमयी आहेत तेवढेच त्यांचे वस्त्र आणि आभूषण विचित्र आहेत. संसारिक लोक या गोष्टींपासून दूरच राहतात. महादेव त्याच गोष्टी स्वतःजवळ बाळगतात. भगवान शिव एकमेव अशी देवता आहेत, जे गळ्यात साप धारण करतात. वास्तवामध्ये साप एक धोकादायक प्राणी आहे, परंतु तो कोणालाही विनाकरण दंश करत नाही. साप परिस्थितिक तंत्राचा महत्त्वपूर्ण जीव आहे. लाईफ मॅनेजमेंट दृष्टीकोनातून पाहिल्यास महादेव गळ्यामध्ये साप धारण करून असा संदेश देतात की, जीवनचक्रात प्रत्येक प्राण्याचे विशेष योगदान आहे. यामुळे कधीही हिंसा करू नये.


🔹महादेवाच्या हातामध्ये त्रिशूळ का आहे?

त्रिशूळ हे भगवान शिवाचे प्रमुख अस्त्र आहे. त्रिशूळाकडे पाहा, तीन तीक्ष्ण टोके दिसतात. तसे पाहिले तर हे अस्त्र संहाराचे प्रतीक आहे. परंतु वास्तवात त्रिशूळामागे फार मोठा गूढ अर्थ दडला आहे. या जगात तीन प्रकारच्या प्रवृत्ती आहेत. सत, रज आणि तम. सत म्हणजे सत्यगुण, रज म्हणजे सांसारिक आणि तम म्हणजे तामसी अर्थात निशाचरी प्रवृत्ती. प्रत्येक माणसात या तीन्ही प्रवृत्ती आढळून येतात. फक्त या प्रवृत्तींचे प्रमाण प्रत्येकात वेगवेगळे असते. त्रिशुळातील तीन टोक या तीन प्रवृत्तींचे प्रतिनिधीत्व करतात. भगवान शिव आपल्याला संदेश देतात की, या तीन्ही गुणांवर आपले नियंत्रण आहे. हा त्रिशूळ तेव्हाच उचला, जेव्हा कठीण परिस्थिती असेल. तेव्हा या तीन्ही गुणांचा आवश्यकतेनुसार वापर करा.


🔹महादेवाला का प्यावे लागले विष?

समुद्र मंथनातून निघालेले विष भगवान शिव यांनी आपल्या कंठात धारण केले. विषाच्या प्रभावाने त्यांचा कंठ निळा झाला आणि ते निळकंठ नावाने प्रसिद्ध झाले. समुद्र मंथनाचा अर्थ आहे, विचारांचे मंथन. मनामध्ये असंख्य विचार आणि भावना असतात, त्यांचे मंथन करून चागले विचार आचरणात आणावेत. आपण जेव्हा आपल्या मनाचे मंथन करू तेव्हा सर्वात पहिले वाईट विचार बाहेर पडतील. हेच विष असून हे वाईटाचे प्रतिक आहे. महादेवाने हे आपल्या कंठात धारण केले, त्याचा प्रभाव शरीरावर होऊ दिला नाही. महादेवाचे विष प्राशन आपल्याला असा संदेश देतो की, वाईट गोष्टींचा प्रभाव आपल्यावर न होऊ देणे. वाईट गोष्टींपासून नेहमी दूर राहावे.


🔹महादेवाचे वाहन नंदी (बैल) का आहे?

*महादेवाचे आवाहन नंदी आहे. बैल अत्यंत कष्टाळू प्राणी आहे. हा प्राणी शक्तिशाली असूनही अत्यंत शांत आणि भोळा आहे. महादेवसुद्धा परमयोगी, शक्तिशाली आणि परम शांत स्वभावाचे तसेच एवढे भोळे आहेत की यांचे क नाव भोलेनाथ सर्व जगात प्रसिद्ध आहे. महादेवाने ज्याप्रकारे कामदेवाला भस्म करून त्यावर विजय प्राप्त केला होता, त्याचप्रमाणे त्यांचे वाहनसुद्धा कामी नाही. त्याचे काम वासनेवर पूर्ण नियंत्रण राहते. या व्यतिरिक्त नंदीला पुरुषार्थाचे प्रतिक मानले जाते. खूप कष्ट करूनही बैल कधीही थकत नाही. हा प्राणी सतत आपले कर्म करत राहतो.


याचा अर्थ आपणही सदैव आपले कर्म करत राहावे. कर्म करत राहिल्यामुळे ज्याप्रमाणे नंदी महादेवाला प्रिय आहे, त्याचप्रकारे आपणही महादेवाची कृपा प्राप्त करू शकतो.*


🔹महादेवाच्या मस्तकावर चंद्र का आहे?

महादेव भालचंद्र नावानेसुद्धा प्रसिद्ध आहेत. भालचंद्रचा अर्थ मस्तकावर चंद्र धारण करणारा. चंद्राचा स्वभाव शीतल असतो. चंद्राच्या प्रकाश शीतलता प्रदान करतो. लाईफ मॅनेजमेंट दृष्टीकोनातून महादेव आपल्याला असा संदेश देतात की, आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी मन, बुद्धी शांत ठेवून कार्य करावे. बुद्धी शांत असल्यास कोणत्याही समस्येतून सहजपणे मार्ग काढला जाऊ शकतो.


🔹महादेवाला तीन डोळे का आहेत?

धर्म ग्रंथानुसार सर्व देवतांना दोन डोळे आहेत, परंतु महादेवाला तीन डोळे आहेत. तीन डोळे असल्यामुळे यांना त्रिनेत्रधारी असेही म्हणतात. लाईफ मॅनेजमेंट दृष्टीकोनातून पाहिल्यास महादेवाचा तिसरा डोळा प्रतीकात्मक आहे. डोळ्यांचे काम आहे मार्ग दाखवणे आणि रस्त्यामध्ये येणाऱ्या अडचणींपासून सावध करणे. आयुष्यात विविध संकट येत राहतात, जे आपण लवकर ओळखू शकत नाहीत. अशावेळी विवेक आणि धैर्य एका उत्तम मार्दर्शककाप्रमाणे आपल्याला योग्य-अयोग्य गोष्टीमधील फरक सांगतात. हा विवेक प्रेरणारुपात आपल्यामध्ये असतो. फक्त तो जागृत करण्याची आवश्यकता आहे.


🔹महादेवाचे संपूर्ण शरीरावर भस्म का लावतात?

आपल्या धर्मशास्त्रात सर्व देवी-देवता अलंकार, वस्त्र, दागीने यांनी सुसज्जित असे दाखवले गेलेले आहेत. तर, महादेव फक्त मृगचर्म (हरणाचे कातडे) गुंडाळलेले आणि भस्म लावलेले असतात. भस्म महादेवाचे प्रमुख वस्त्र आहे, कारण महादेवाचे संपूर्ण शरीर भस्माने झाकलेले असते. संतांचे सुद्धा भस्म हेच एकमात्र वस्त्र आहे. अघोरी, संन्यासी आणि इतर साधू आपल्या शरीरावर भस्म लावून फिरतात. महादेवाच्या भस्म लावण्यामागे वैज्ञानिक तसेच अध्यात्मिक कारण आहे. भस्माचा एक विशेष गुण आहे. भस्म शरीरातील रोमांचित करणा-या छिद्रांना बंद करते. भस्म शरीरावर लावल्याने गरमीमध्ये गरमी आणि थंडीमध्ये थंडी जाणवत नाही. भस्म त्वचासंबंधी रोगांमध्ये औषधाचे काम करते. भस्म धारण करणारे महादेव हा संदेश देतात की, परिस्थितीनुसार स्वतःला बदलने हा मनुष्याचा सर्वात मोठा गुण आहे.


🔹शिवलिंगावर भांग, धोत्रा धोतरा का अर्पण करतात?

धार्मिक मान्यतेनुसार महादेवाला भांग प्रेमी सांगण्यात आले आहे. शिव चरित्रामध्ये विविध रोचक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, परंतु त्यामध्ये सामावलेल्या असाधारण संदेशांमुळेच महादेव पूजनीय आहेत. यामध्ये विशेषतः विषपान, बिल्वपत्र, धोत्रा यासारख्या कडवट सामग्री प्रिय असणे यामागे एक शिकवण आहे. वास्तविकतेमध्ये सुखासाठी शक्ती संपन्न होण्यासोबतच परोपकार, त्याग आणि संयम या गोष्टींद्वारे वाईट सवयी किंवा परिस्थिती स्वरूपातील कडवटपणा गोडव्यामध्ये बदलण्याची शिकवण आहे. याच कारणामुळे शिवलिंगावर भांग, धोत्रा आणि रूटीचे फुल यासारख्या विषारी गोष्टी विशेष मंत्राचा उच्चार करून अर्पण करणे शुभ मानले गेले आहे. या विशेष मंत्राच्या स्मरणाने अपयश स्वरूपातील दुःख समाप्त होऊन सुख आणि यश प्राप्त होईल.


🔹महादेवाला बेलाचे पान का अर्पण करतात?

विविध ग्रंथांमध्ये महादेवाला बेलाचे पान अर्पण करण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. तीन पान असलेले एक बिल्वपत्राचा लाईफ मॅनेजमेंट दृष्टीकोनातून विचार केल्यास, बिल्वपत्राचे तीन पानं चार पुरुषार्थामध्ये तिघांचे प्रतिक आहे - धर्म, अर्थ व काम. हे तिन्ही निस्वार्थ भावनेने महादेवाला समर्पित करणाऱ्या व्यक्तीला चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष प्राप्त होतो.

❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

वडाचे झाड

 वडाचे झाड


पाश्चात्य देशांत आणि नवीन पिढी ही  आपल्या परंपरेची जेव्हा टिंगल-टवाळी करते तेव्हा वाईट वाटतं. हिंदू लोक म्हणे झाडांची, नदीची कशाचीही पूजा करतात .

    पण श्वास आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत अन्यथा मृत घोषित केल्या जाऊ...ती प्राणवायू वृक्ष देताहेत . पाणी आहे तर जीवन आहे. ते नाही मिळालं तर जीव तहानेने कसा कासावीस होतो माहिती आहे ना.. मग या दोन गोष्टी जे आपल्याला देत असतील तर ते आपले पूज्य आणि आदरस्थान नाही झाले तरच नवल ..झाड नष्ट होणे म्हणजेच पाणी संपणे आणि पाणी संपले म्हणजे जीवन संपले ... कडुलिंब,पिंपळ इत्यादी अनेक औषधी वृक्ष आहेत मग वटवृक्षाचे एवढे महात्म्य का?

        त्यामागे बरीच कारणे आहेत ..आपण क्रमवार पाहूयात...


१.... वटवृक्ष हे अक्षय ,अमर्त्य, सर्जक, निर्माता आहे. हे वृक्ष स्वतः  पासून असंख्य वृक्ष उत्पन्न करतात.मुख्य झाडातून निघणाऱ्या पारंब्या जमिनीत खोलवर जाऊन एक नवीन झाड तयार करतात.असं करत करत खूप झाडं उभे राहतात...जणू एक मोठी वसाहतच ..तयार होते.

  कोलकत्ता मधील जगदीश चन्द्र बसु बोटानिकल गार्डनमध्ये २५० वर्षांचे वडाचे झाड कितीतरी एकर मध्ये पसरलेले आहे.

       महाराष्ट्रात पेमगिरी, संगमनेर येथे साडेतीन एकर मध्ये वडाची मोठी झाडे आहेत .


२... हे झाड २४ तास प्राणवायू (oxygen) सोडत असतात रात्री प्रकाश नसताना हे कसे शक्य आहे तर ते CAM..(Crassulacean Acid Metabolism )या प्रक्रियेतून ऑक्सीजन देत असतं..


३... वायुप्रदूषणच नव्हे तर हे वृक्ष ध्वनी प्रदूषण रोखण्याचे ही काम करतात .पूर्वी शाळा अशा झाडाखालीच किंवा जवळ भरायच्या. मंदिराजवळ पण हे झाड असायचं


४...  एक निरोगी, शंभर फूट उंच झाड 11000 गॅलन पाणी मातीतून घेऊ शकतं आणि ते हवेत वाष्प रुपात सोडत असतं.

                 म्हणूनच जवळपास चे तापमान चार ते पाच डिग्री सेल्सिअस ने कमी असतं .याची पानं जाड, लंबगोल ,चमकदार ,हिरवी असतात. झाडाखाली बसल्यावर अंगावर तुषार पडत राहतात आणि खरंच मन प्रसन्न होतं ...


५..ही झाडं ढगांना आकर्षित करतात त्यामुळे जिथे ही झाडं असतात तेथे भरपूर पाऊस पडतो आणि जवळपास वडाचे झाड असेल तर विहिरीला पाणी लागणारच असा शेतकऱ्यांचा कयास असतो..


 ६... या झाडाचा घेर  (canopy) जगातील कुठल्याही वृक्षापेक्षा जास्त असतो.आणि हे झाड भरपूर सावली देण्यास समर्थ असते...अशोकाची झाडं सुंदर दिसतात पण सावली देण्यास असमर्थ असतात.ही झाडं फळं देत नाहीत ,ना पक्ष्यांना आश्रय देऊ शकत ..ढगांना पण आकर्षित करु शकत नाहीत...

पण वडा च्या झाडांमध्ये हे  सामर्थ्य आहे.


७...वटवृक्ष हे अनेक पशुपक्ष्यांना अन्न आणि निवारा  देतो.. असंख्य जीवजंतू यावर जगत असतात .याची फळे खातात .या पशुपक्ष्यांची विष्ठा, मूत्र ,मृतदेह ,झाडांची पडून कुजलेली पानं मिळून झाडाखालची जमीन सुपीक झालेली असते . ही माती मूठ- मूठ शेतात टाकली तर जमीन सुपीक होते .


८... या पानांच्या पत्रावळी, द्रोण करतात .


९..आयुर्वेदाप्रमाणे वड हे अनेक रोगांवर आणि इन्फेक्शन वर औषधी म्हणून वापरण्यात येते..


         तर अशा या बहुगुणी, जीवनदायी वृक्षाचे संवर्धन होऊन समाजाला कृतज्ञतेची जाणीव व्हावी आणि हे वृक्ष तोडण्याचा विचारही मनात  येऊ नये..म्हणून आपल्या पूर्वजांनी या वृक्षाला पूजेचा मान दिला.

 आता  तुम्ही धूप -दीप ,नैवेद्या ने सम्मान ही केला तर त्यात गैर काहीच नाही पण झाडाखाली घाण करता कामा नये कारण नैवैद्य खायला मुंग्या, किडे, उंदीर येतात. ते झाड पोखरतात दिवा ठेवला की तेल सांडतं.. त्यामुळे जमिनीची धूप होते.. दोरा ही गुंडाळा पण कच्चा गुंडाळला तर चालतो कारण तो कुजून  जातो .

      परंतु त्याला बांधून कशाला टाकायचं ? 

    तर वटपौर्णिमेला या वृक्षांची काळजी घ्यायची आणि जिथे  जागा मिळेल तिथे नवीन रोप लावायची. म्हणूनच तर हा सण पावसाळ्यात येतो कारण तेव्हा झाडे लावतात आणि ती जगतात ..


आता प्रश्न आहे उपवास का करायचा?

 आपल्याकडे म्हणतात....

 एक वेळ खातो तो योगी 

दोन वेळ खातो तो भोगी 

आणि तीन वेळ खातो तो रोगी...


म्हणजे सामान्य माणसाने दोनच वेळा जेवावे.आठवड्याला एक आणि दोन एकादशी ला  उपवास करावेत.

हे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देतात मनावर ताबा ठेवायला शिकवतात ..हल्ली लोक अभिमानाने सांगतात ,"आम्ही नाही करत उपास" का करत नाही याचं स्पष्टीकरण देता येत नाही ..उपास करणाऱ्यांनाही  सांगता येत नाही की उपास का करावा...

 मला आठवतं एक दिवस रात्री साडेदहा वाजता बाहेर कट्ट्यावर बसलेलो होतो .. समोरून एक ओळखीचे गृहस्थ येत होते . आम्हाला पाहून ते थांबले .सोबत त्यांचा मुलगा पण होता. आम्ही विचारलं "अरे याची तर उद्या परीक्षा आहे ना?" तो बारावीला होता .तर वडील हसले आणि म्हणाले.." याला पाणी पुरी खायची होती .. समजावलं की उद्या जाऊ पण नाही आत्ताच खायचीये  . नाही नेलत तर परीक्षाच देणार नाही म्हणाला म्हणून १० किमी लांब पाणी पुरी खाऊ घालून आणलंय..."

      असे अनेक किस्से आहेत.. रात्री दोन वाजता आईस्क्रीम हवी म्हणून दुकान उघडून आणणे ..एखादी गोष्ट हवी म्हणून वेडंपिस होणं ..चांगलं आहे का ?

      उपवास केला की  हे आज खायचं नाही उद्या मिळेल. लहानपणापासूनच रुजायला हवं की आत्ताच्या आत्ता गोष्ट मिळणार नाही किंवा मिळू शकत नाही..

 डॉक्टर जिचकार यांना कोण ओळखत नाही...सर्वात जास्त शिकलेलेच नव्हे तर बुद्धिमान माणूस  आणि त्यांच्या प्रेरणेने डॉक्टर जगन्नाथ दीक्षित महाराष्ट्राचे brand ambassador for obesity यांनी डायट प्लान दिला....ते म्हणतात दोनच वेळ जेवलात तर मधुमेह आणि लठ्ठपणा जातोच पण कॅन्सर सारखे दुर्धर रोग ही दूर होऊ शकतात.

हे भारतीय आहेत आपण बाहेरचं उदाहरण घेऊयात.....


Yoshinori Ohsumi यांना 2016 ला physiology and medicine यात Autophagy   या शोधावर नोबेल पुरस्कार मिळाला आणि intermittent fasting या शब्दाशी आपण परिचित झालो.. ते म्हणतात जर तुम्ही आठ तासांचे अंतर ठेवून जेवलात तर शरीरातील उपयोगी सेल्स हे जिवाणूंना खातात आणि energy create करतात.. हे जेवणानंतर सहा तासांनी सुरू होत असतं..या ८ तासांच्या  मध्ये तुम्ही पाणी पिऊ शकता पण solid  खाल्ल्याने ती प्रक्रिया ब्रेक होते .

        १६ तास, २४ तास, ४८ तास असा उपवास केल्याने शरीरातील खराब सेल्स  नष्ट होऊन जातात.

        हे झालं शरीरशुद्धी बद्दल ..उपवासाने आपण मानसिक सामर्थ्य आणि मनावर ताबा ही मिळवतो...हे ही खरं आहे..


 आता प्रश्न पडतो ...की पौर्णिमेलाच का?  

        तर आपण हे जाणतो की पौर्णिमेला सूर्य चंद्र आणि पृथ्वी हे एका रेषेत येतात आणि तेव्हा समुद्रात भरती येते. चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर.. हे पृथ्वीचे स्वतःचे आणि मध्यबिंदू पर्यंतच्या अंतरा पेक्षाही कमी असते

Harry Shipment professor of Physics and astronomy.. Delaware .हे सांगतात की ..Tides are higher when moon is full because at that time the gravity from the moon and sun are pulling together on the earth"

          अर्थात सूर्य आणि चंद्र दोघांचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीवर काम करत असते त्यामुळे समुद्राला भरती येते.मग छोटे तलाव ,नदी इत्यादींवर परिणाम होतो का ?...हो ..पण कमी असल्याने दिसत नाही .पृथ्वीवर सत्तर टक्के पाणी आहे तसेच आपले शरीरही 70 टक्के पाण्याने बनलेले आहे मग आपल्याही  मनःशरीरावर पौर्णिमेचा परिणाम होतो का ?

       तर याचे  उत्तर ही हो आहे .तुम्ही ज्या स्थितीत असाल ती स्थिती enhance होते म्हणजे वाढते ...तुम्ही जर चिंतित असाल तर जास्त चिंतित व्हाल..आनंदी असाल तर जास्त आनंदी व्हाल .

         पोलीस खात्यातील एका प्रवक्त्याने सांगितले की

Sussex police force च्या रिसर्च प्रमाणे... "There was a rise in violent crime when moon was full. Research carried out by us has shown a correlation between violent incidents and full moon."

म्हणजे अपराधी व्यक्ती ची ती वृत्ती वाढते.

         याचा अर्थ असा होत नाही का की आपल्या पूर्वजांना हे माहिती होतं म्हणूनच. पोर्णिमेच्या दिवशी पूजा उपवास इत्यादी ने मन  चांगल्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा....निसर्गात घडणाऱ्या घटनांचे कसे भल्यासाठी उपयोग करावा हे चांगले ठाऊक होते...

    आता पुढचा प्रश्न 

        महिलांनीच का नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना पूजा करावी? पुरुषांनी का करू नये ? 

           याचा अर्थ असा होतो का की स्त्री जीवन हे पती शिवाय काहीच नाही?

          प्राचीन काळात हा भेदभाव नव्हताच .आपल्याला गार्गी, मैत्रेयी लोपामुद्रा यांची नावे माहिती आहेत. शंकराचार्य आणि पंडित मंडनमिश्र मधील झालेल्या शास्त्रार्थात  पंडित मंडनमिश्र यांच्या पत्नी उभया भारती होत्या... परंतु सातशे वर्षांच्या गुलामी ने ,यवनांनी स्त्रियांवर केलेल्या अत्याचारामुळे शिक्षणापासून वंचित राहणे, बालविवाह ,सती जाणे ,जोहर सारख्या प्रथा समाजामध्ये रूढ झाल्या.. मातृसत्ताक पद्धती जाऊन पितृसत्ताक पद्धती लागू झाली .

       शंभर वर्षांपूर्वीपर्यंत हे मातृसत्ताक पद्धतीचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात.. कारण सुप्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मा हा मामाकडे राहत असे. आणि लग्न झाल्यावर सासरी राहायला गेल्याचा उल्लेख आढळतो. काही दिवसांपूर्वी एक दक्षिण भारतीय मैत्रीण सांगत होती की तिची "आई तिच्या मोठ्या बहिणी कडे राहते. कारण जसं तुमच्याकडे मुलगा वारसदार असतो तसं आमच्याकडे मुलीला सगळी संपत्ती जाते.. भाऊ जवळच राहतो ..तो पण काळजी घेतो.." 

      आता तर मुला मुलींना समान हक्क  मिळालेत ...आणि आजकालची मुलं पण पत्नीचा सन्मान करतात ...

   मुलं पण बायकोवरील प्रेमापोटी उपवास करतात...परंतु उद्या जर तुम्ही म्हणाल की मी काठापदराची साडी नेसून हातात पूजेचे ताट घेऊन वडाची पूजा करायला जाणार ... तर मला नाही वाटत की तुमचे नवरे शेरवानी घालून  तुमच्या सोबत प्रदक्षिणा घालायला येतील ...

असो...या दिवशी सावित्री- सत्यवान चे स्मरण आलेच.. म्हणजे वटसावित्रीची कथा सांगण्यात येते की तिने आपल्या नवऱ्याचे प्राण वाचवले.. मृत्यू च्या दाढेतून काढून आणलं...

        म्हणजे नेमकं काय केलं असणार...? आज आपण पेशंट ला  दवाखान्यात नेतो आणि डॉ ऑक्सिजन लावतात..तसंच काहीसं असेल का? वटवृक्षा खाली झोपवल्याने प्राणवायू मिळाल्याने सत्यवान शुद्धीवर आला असेल....नाही का ? या कथा आपल्याला काहीतरी शिकवत असतात... नाही का..

    आता हे वृक्ष आपल्या मनोकामना खरंच पूर्ण करतात का ?

.....आपण विज्ञान काय म्हणणं ते बघूयात. 

           एक जिमनेस्ट रेबेका... Olympic मध्ये प्रत्येक वेळेस तिला gold medal   मिळता मिळता राहून जायचं कारण एक  विशेष एक्ट  खूप प्रयत्न करूनही तिला जमत नसे. शेवटी तिला तिच्या कोच ने  सांगितलं की तू ते एक्ट mentally कर... आणि ती ते करत राहिली.. आणि आश्चर्य म्हणजे  जेव्हा तिने फिजिकली केलं तेव्हा तिला ते सहज जमलं. आणि शेवटी तिने गोल्ड मेडल मिळवले. आज-काल स्पोर्ट्स मध्ये कोच ही  टेक्निक वापरतात ...असे बरेच प्रयोग झालेत आणि आढळून आलं की मेंटली प्रॅक्टिस करणारे आणि ग्राउंडवर प्रॅक्टिस करणाऱ्यांमध्ये काहीही फरक नव्हता जेव्हा तुम्ही एखादी इच्छा किंवा स्वप्न डोळे मिटून बघत असता तेव्हा मेंदूला कल्पना आणि सत्य यातला फरक कळत नसतो आणि म्हणूनच ते सत्य होतं आणि जेव्हा झाडाच्या प्रदक्षिणा मारल्याने  मेंदूला भरपूर प्राणवायू मिळाल्याने ताजातवाना होतो, शांत होतो ,अशा वेळेस तुम्ही मनात साकारलेले दॄश्य  सत्य होते...


fly