रविवार, 2 फ़रवरी 2020

Tmc Full Form 1 tmc म्हणजे किती क्यूसेक म्हणजे काय? टीएमसी म्हणजे काय?

एक टीएमसी म्हणजे one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (01 अब्ज) इतके घन फूट.


1 टीएमसी = 28,316,846,592 लिटर्स.

1 tmcft. is equivalent to: 1,000,000,000 cubic feet (28,000,000 m3) (approx.) ... 2.83168466×107 cubic meters.

Image result for water dam"

 पाऊस  वेगवेगळी धरणे भरल्याच्या आणि वाहून जात असल्याच्या  बातम्यात अनेकदा काही वेगवेगळे शब्दप्रयोग केलेले दिसतात. ते असतात पाण्याच्या साठ्याच्या मोजमापाचे….
याबद्दलची थोडी माहिती घेउ या ?

1) TMC म्हणजे काय ?
2) Cusec म्हणजे काय ?
3) Cumec म्हणजे काय ?

स्थिर पाणी मोजण्याची एकके –
1) लिटर
2) घनफूट
3) घनमीटर
4) धरणातील पाणी मोजण्याचे एकक – टीएमसी TMC (Thousand Million Cubic Feet) (अब्ज घनफूट)


इतके tmc पाणी जमा झाले, तितके Cusec पाणी सोडले असे आपण पेपर मधून वाचतो. याचा नेमका अर्थ काय?
आपणास फक्त “लिटर” संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवू यात.

१) 01 tmc म्हणजे one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (०१ अब्ज) इतके घन फूट.
01 tmc = 28,316,846,592 litres
२) 01 Cusec = 01 cubic feet per second = 28.317 litres per second.
३) 01 Cumec =01 cubic meters per second = 1000 litres per second.


उदा.
पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता १.९७ tmc आहे.
म्हणजे त्यात १.९७x२८.३१७ अब्ज लिटर्स पाणी मावते.
याच धरणातून सध्या ५०० क्युसेक पाणी नदीत सोडत आहेत.
म्हणजे ५००x२८.३१७ लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडल्या जात आहे.

महाराष्ट्रातील क्षमतेने मोठी ५ धरणे

१) उजनी ११७.२७ tmc
२) कोयना १०५.२७ tmc
३) जायकवाडी ७६.६५ tmc ( पैठण )*
४) पेंच तोतलाडोह ३५.९० tmc
५) पूर्णा येलदरी २८.५६ tmc


 वाहते पाणी मोजण्याची एकके –
नदीतून वाहणार्‍या पाण्याचा वेग किंवा धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्याचा वेग मोजण्यासाठी ‘क्युसेक्स’ व ‘क्युमेक्स’ ही परिमाणं वापरतात. ‘क्युसेक्स’ म्हणजे ‘घनफूट प्रतिसेकंद’, तर ‘क्युमेक्स’ म्हणजे ‘घनमीटर प्रतिसेकंद’. 

धरणाच्या दारातून किंवा एखाद्या बंधार्‍यावरून एका सेकंदाला किती घनफूट किंवा घनमीटर पाणी वाहतं आहे, हे यावरून कळतं. या वेगानं पाणी किती वेळ सोडलं जातं, त्यावर त्या धरणातून किती पाणी बाहेर पडलं हे ठरतं. 

फुटाशी संबंधित असलेलं ‘क्युसेक्स’ हे परिमाण सध्या प्रचलित आहे, पण मीटरशी संबंधित असलेल्या ‘क्युमेक्स’चा वापर आता शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.

1) 1 क्यूसेक (Cusec)– एका सेकंदास एक घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्यूसेक होय. या प्रमाणात एक सेकंदात 28.3 लिटर पाणी बाहेर पडते.
2) 1 क्युमेक (Cumec) – एका सेकंदास एक घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युमेक होय. या प्रमाणात एक सेकंदात 1,000 लिटर पाणी बाहेर पडते.
 पाऊसही वेगवेगळ्या परिमाणांमध्ये मोजता येतो. अचूक नोंदीसाठी पाऊस मिलिमीटरमध्ये मोजला जातो. काही ठिकाणी सेंटिमीटर किंवा इंचामध्येही तो सांगितला जातो. या परिमाणांचा एकमेकांशी संबंध आहेच.

‘एक इंच म्हणजे २५.४ मिलिमीटर’ आणि ‘एक सेंटिमीटर म्हणजे १० मिलिमीटर’. मागच्या पिढीत पाऊस इंचामध्ये सांगण्याची पद्धत होती. आता मुख्यतः मिलिमीटर हे परिमाण वापरलं जातं.

1 टी एम सी पाणी म्हणजे किती लिटर
टीएमसी अर्थ
पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एकक
टाकीतील पाणी कसे मोजावे
घनमीटर म्हणजे काय
पाण्याचा विसर्ग म्हणजे काय
1 Tmc Equal To Litres
1 Tmc Water How Many Acres
Cusecs Full Form
Tmc Company Full Form
Tmc Full Form In English
Tmc Full Form In Railway
Tmc Full Form Party
Tmc Meaning In English


1 टिप्पणी:

  1. Your Affiliate Profit Machine is ready -

    Plus, making profit with it is as easy as 1 . 2 . 3!

    This is how it works...

    STEP 1. Input into the system what affiliate products the system will push
    STEP 2. Add PUSH BUTTON TRAFFIC (it LITERALLY takes 2 minutes)
    STEP 3. See how the affiliate products system grow your list and up-sell your affiliate products on it's own!

    Do you want to start making profits???

    Click here to start running the system

    जवाब देंहटाएं

fly