त्वचा आणि डोळ्यांच्या समस्येवर घरगुती उपचार
सध्याच्या काळात लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत अनेकांच्या हातात इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स पाहायला मिळतात. त्यामुळे सध्याच्या काळात इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जणू काय प्रत्येकाच्या जीवनचा अविभाज्य भाग झाला आहे.मात्र या गॅजेट्सच्या अतिवापरामुळे त्याचा परिणाम थेट आपल्या त्वचेवर होत असतो. सतत कम्प्युटर, टीव्ही, मोबाईल यांचा वापर केल्यामुळे डोळ्यांना इजा पोहोचू शकते. तसंच डोळ्यांभोवती सुरकुत्याही पडू लागतात.
डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे गॅजेट्सच्या अतिवापरामुळे कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्यावर घरगुती उपाय कोणते हे पाहुयात.

- बदाम रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी त्याची पेस्ट तयार करा आणि ती डोळ्यांभोवती लावा. हे डोळ्यांभोवती असलेले काळे वर्तुळ दूर करण्यास फायदेशीर ठरेल.
- झेंडूची फुले ही दहीमध्ये मिक्स करून चेह-याला लावणे फायदेशीर ठरेल.
- कडुलिंब, तुळस आणि हळद यांचे मिश्रण एकत्र करून त्याचा फेस पॅक आठवड्यातून तिनदा चेह-याला लावा.
- डोळ्यांचा थंडावा मिळण्यासाठी काकडी किंवा कोल्ड स्पूनचा वापर करा.
- सतत मोबईल, लॅपटॉप व इतर इलेक्ट्रोनिक गॅजेट्सचा वापर करणा-या व्यक्तींनी दर वीस मिनिटांनी विश्रांती घेत २० सेकंदासाठी स्क्रीनव्यतिरिक्त दूरवर नजर फिरवा.
- संतुलित आहाराचे सेवन करा. रोजच्या आहारात फळं आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. (सर्व माहिती - डॉ. रिंकी कपूर, कॉस्मेटिक डरमॅटोलॉजिस्ट आणि डरमॅटो सर्जन)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें