गुरुवार, 7 जुलाई 2022

कोकणातले स्पेशल टेस्टी खमंग पदार्थ यादी ..

 कोकणातले स्पेशल टेस्टी खमंग पदार्थ यादी ..


आपल्या समस्त कोकणस्थ बंधू भगिंनीसाठी मी सर्व कमेंटस चिन्मय गोखले ह्यांच्या पोस्टमधून एकत्र केले आहेत, धन्यवाद चिन्मय गोखले ह्यांना, ज्यांच्यामुळे हे अनेक कोकणी पदार्थ आम्हाला कळले, ही पोस्ट मुद्दामहून मी वेगळी टाकली आहे, कारण त्यांच्या पोस्टखालच्या कमेंटस सगळेजण वाचतीलच असे नाही म्हणून, 

आणि काहींनी माहिती नसलेल्या रेसिपीही डिटेलमधे द्याव्यात म्हणजे सगळ्या कोकणस्थ भगिनींना त्या घरी करुन बघता येतील. 

कोकणातील स्पेशल टेस्टी खमंग पदार्थांची यादी खालीलप्रमाणे 👇


1) शिरवळ्या(शेवया) व नारळाचे दूध

2)सोलकढी

3)रायवळ आंब्याची आमटी

4)घावन,आंबोळ्या

5)बटाट्याची कापं

6)अळूवाडी व अळूचे फतफते

7)गुळपोहे

8)तिखट मिरची चुरडून केलेले पोहे

9)उकडीच्या पोळ्या, पुरणपोळीसारखे गव्हाच्या लाटीत तांदूळाची उकड घालून पोळी करणे ही आमरसाबरोबर खातात

 10)कोळ पोहे,

 11)सांदण, 

12)पातोळे,

13) ओल्या फेण्या.

 14) कोळाच भरीत ( वांग्याचे)

 15)कडधान्याच्या पाण्याचं कळण,

 16)फणसाच्या पुर्या,

 17)भोपळ्याचे घारगे,

 18)काकडीचे (तवसाचे) घावन.

19)रायवळ आंब्यांचे कोयाडं.

 20)दडपे पोहे,उकड,

 21)पावसाळ्यात मिळणारी भारंग भाजी

 22)केळफूल भाजी,

23) आठळ्या भाजी, ( फणस बिया) (गोड ,तिखट)

 24)आंबोळी,

 25)फणसाच घावन घाटलं

26) चांदीवड्याच्या पानावरच्या फेण्या

 27)फणसा चा  रस काढून केलेली सांदण

28)ऋषी पंचमीची भाजी

29 मोकळं  भाजणी

 30)पंचामृत, घारगे,

 31)तिखटामिठाचा शिरा,

32)दूधातले घावन

33)फोडणीची पोळी,

34)पोळीचे लाडू

 35)तांदुळाच्या साल पापड्या ,

36)गव्हाचा चीक,

37)पंचामृत,

38)कायरस,

39)दिंड,

40)कडबू, 

41)उकडीच्या पोळ्या,

42)फणसाची भाजी,

43)केळफुलाची भाजी..

 44)फणसाच्या अाठीळांची खेड ,

 45)गोवलाच्या पानांच्या अळूवडीसारख्या वड्या, 

46) गरे घालून केलेली कढी, 

47)पडवळाच्या बीयांची चटणी, 

48)अांब्याचं रायतं,

 49)सगळ्या प्रकारच्या फळभाज्यांची भरीतं,

 50)मोदकाबरोबर नारळाचं दूध  

51)पारोशाची भाजी/भजी इ.इ.

 52)कुळीथ पिठलं..

 53)मेतकुट गुरगुट्या भात ..

54) सुधारस

 55) हळदी च्या पानावर थापून उकडलेली पानगी

 56)खापराची  पोळी आणि त्याच्याबरोबर नारळाचं दूध गूळ घातलेलं

 57)बिंबलाचे लोणचे,

 58)मनगणं,

59) रस शेवया.

 60)ओल्या फेण्या बरक्या फणसाचे गरे घालून केलेली कढी

 61)फणसाचं सांदण,

 62)खांडवी

 63)ओल्या काजुची उसळ, 

64)अंबाडे फळाची उड्ड मेथी, चटणी, लोणचे

 पाटवड्या,

 65)राघवदासाचे लाडू, आंबोळी.

 66)भोपळ्याचे घारगे

 67)भोपळ्याच्या सालींची चटणी,  

68)उकड कडबोळी

 भारंगीची,

69)कुवाळीची,खडकतेऱ्याची भाजी

 70)कापे गऱ्यांची खीर

 71)निवगऱ्या,

72)सांज्याच्या पोळ्या,

 73)घोळीची भाजी

74) तांदूळाची पेज,

 75)रातांब्याच बियांच सार ,

76)खापर पोळी,

 77)वेसवार ,

 78)कापा फणसा चे  पिकलेले गरे, उभे चिरून त्याला साखर मीठ मोहोरी लाल सुकी मिरची घालून केलेली भाजी

79)बरक्या फणसाचे गर घालून केलेली कढी

 80))मिरगुंड

 81)पोह्याचे पापड

82) फणसाचे तळलेले काप

83) आंबापोळी

 84)तांदूळ चिकवड्या,

 85)लाल तांदूळाचा भात, 

86) वालाची उसळ,

 87) तांदूळ भाकरी, 

88)पोह्याचे डांगर

 89)गव्हल्याची खीर

90) पावटे किंवा कुळिथाची आठीळ्या घालून उसळ .

91) कैरीचे नारळाचा रस घालून केलेले सार

92) भारंगी ची भाजी , 

93) उडीदाच्या पापडाच्या डांगराच्या लाट्या, 

94)कच्च्या कुयरिची(छोटासा कोवळा फणस) 

95) भिजवलेले शेंगदाणे व सांडगे मिरची तळून भाजी.

96) जमिनीत अंकुरलेल्या हिरव्या काजुची भाजी 

97) गोड आमसूले, आमसूलाच्या वड्या, 

98) बिमलं, करमल यांची उड्डामेथी, चटणी, लोणचे, 

99) काळ्या वाटण्याची उसळ व वडे 

100) पातोळे .  ----  कोकणी खाद्यसंस्कृतीमधला अजून एक आगळावेगळा पदार्थ .  कोकणी पदार्थात तांदूळाला महत्त्वाचे स्थान आहे .खुपशा पाककृती या तांदूळाभोवती फिरत राहतात .                                  

         पातोळ्यांचे घटक पदार्थ -  तांदूळाचे जाडसर पीठ , तवशाचा कीस ( जुन मोठी काकडी साधारण एक किलो वजन ) , गुळ पाऊण किलो , हळदीची पाने साधारण १८-२० .अर्धा चमचा मीठ .

           काकडीच्या बिया काढून काकडी किसुन घ्यावी.एका मोठ्या पातेल्यात तुपावर कीस परतुन घ्यावा .काकडी किसल्यावर त्याला पाणी सुटते ते सुद्धा यात वापरावे .नंतर यात गुळ मिसळावा .थोडे मीठ घालावे .गॕसवरच गुळ मिसळून घ्यावा .गॕस बंद करून मिश्रण गरम असताना त्यात तांदूळाचे पीठ चांगले मिसळुन घ्यावे .हे मिश्रण साधारणपणे दोन तास भिजू द्यावे .  नंतर हळदीचे पानाला तुपाचा हात फिरवावा .पानाच्या अर्ध्या भागात भिजवलेले पीठ थोडे जाडसर थापावे आणि उरलेले अर्धे पान त्यावर घडी घालावे .जास्ती जाड करू नये .नीट शिजत नाही .अशी सर्व पाने लावून घ्यावी .

              इडली पात्रात तळाशी पाणी घालावे .त्यात एक चाळण ठेवावी .चाळण पाण्यात बुडणार नाही याची खबरदारी घेणे . चाळणीत मध्यभागी एक तांब्या उपडा ठेवावा .त्याच्या कडेने ही पाने उभी लावावी .साधारणपणे आठ ते दहा .(छायाचित्रे पहावी .म्हणजे योग्य कल्पना येईल .) साधारण पंधरा मिनिटे शिजवावे . पाच मिनिटांनी वाफ जिरल्यावर झाकण उघडून पातोळे बाहेर काढावे .बरोबर तोंडी लावायला भरपूर तुप आणि कैरीचे लोणचे .               

             तवसे मिळाले नाही तर कोणतीही जुन काकडी वापरलेली चालते . पण तवशाचा स्वाद काही वेगळाच .

101) गवसणी ची पोळी..हा पदार्थ मी केवळ ऐकला आहे, कधी खाल्ला नाही. माझ्या आईनी सांगितल्या प्रमाणे हि पोळी आमरसा बरोबर खायला करतात..जसे पुरणपोळी करताना, गव्हाच्या कणकेत पुरण भरून पोळी करतात तसे ह्या  पोळी मध्ये गव्हाच्या कणकेत तांदुळाची उकड भरून हि पोळी करतात.

102) कुळथाचे कळण आणि उसळ

Ravyach(Rawa tupawar khamanga bhajun) kanheri.Panyatil,tup,jire ,mith,Pani ghalun keleli.Kanheri.

Pachayla sopi.

103) 

अंबाडीची भाजी लुप्त झाली आहे,बहुतांश भाजीवल्याना सुद्धा ही पालेभाजी माहिती नाही,जी लसूण अँड मुगाची डाळ घालून अतिशय उत्तम लागते

104) घोळीची भाजी,

 105) पोह्याच्या पीठाचा दुध-गुळ घालून केलेला मधल्या वेळी खाण्यासाठी केलेला लाडू 

106) देवदिवाळीला कोकणात नैवेद्याला घारगे करतात.साजूक

तुपातला शिरा करुन त्यात कणीक घालून तळायचे.अप्रतिम

लागतात.

107) आठळ्या पावटे भाजी, भाजून पावटे घातलेली पाऱ्याची भाजी, अळूची देठी 2 प्रकारची, देठी गाठी भाजी, घाटले, कच्च्या आंब्याचे सार, गोड गुळाचे पोहे, गूळ घालून केलेली शिकरण, अनेक प्रकारची भरीत, रायते आणि कायरस, भाजणीतील शेवग्याच्या शेंगा, तिखट गोड घारगे, गुळाची सांजा पोळी, डाळिंबी सोबत कॉम्बिनेशन असलेल्या भाज्या उदा. पडवळ,  दुधी,तोंडली घोसाळे etc घालून केलेली. काही विशिष्ट तूप जिऱ्याच्या फोडणीत केलेल्या भाज्या, मेथी,अळू,अंबाडी ची डाळ कण्या घालून केलेली गोळा भाजी, आंबोळ्या v नारळाचे दूध, मोकळ भाजणी, वाटली डाळ, घट्ट उकड हे माझ्या माहितीतले विस्मरणात गेलेले पदार्थ, आई मावशी यांना विचारले तर त्या अजून खूप,माहीत नसलेली नावे सांगतील

108) लुप्त हत चाललेले चित्पावनी खाद्य पदार्थ:


खालती दिलेले खाद्यपदार्थ आमी आमच्या खाद्यसंस्कृती थीन हद्द पार करीत सों. क्ष

पुढच्या पिढ्यांना आमी न्यूडल कमी ड्रायफुड ची दिशा दाखवीत सों.

असे हे पदार्थ एक वेळ पोटाची भूक म्हणी खात सलो. आज ती खाद्यसंस्कृतीची एक विविधता म्हणी पुढल्या पीढ्यासमोर रेल्वे किमान हरकत से. 


१. कायरस : 

२.  सुकृण्डे: म्हटले सारखा सुखरून्डे (सुक्कीना उंडे ) मुग्गांची डाळ किंवा चणेचे दाळीचे दर वर्खा श्रादद्ध /महालायला मुद्दाम करीत सले. एतां करीत नाय.

३.पानगा/पाने : 

४. पिठलां :

५.  चुलीवेल्ली भाकरी :  अतशा भाकरी  गॅसवर भाजसत. तांदळाचे पिठाची उकड करनी,  केळीचे पानावर थापटुनी, चुलीवर भाकरी  भाजीत सतांना ओले कपडेन पाणी फिरवनी भाजलेली भाकरी खूसखुशीत हसे. भाजनी   चुलीत घालनी फुगयलेली भाकऱ्याची चवच वेगळी. 

६. तांबडे तांदुळाची पेज अणि बरोबर खारतली आंबाडी.

७.टायकिळेची भाजी.

८. उकड आंबाडेचां रायतां 

९. आंकुराची भाजी अणी सांबारां.

१०. लापशी: 

११. तांदुळाची उकड : 

१२.  कर्मलाचां लोणचां :

१३. पणसाची खीर :

१४. गावठी तिखटमिठाचे पाहु/पोहे :

१५. नासणेची आंबील :

१६. मिरची पुड कमी खोबरेल तेला बरोबर उकडलेल्यो आठुळ्यो :

१७. हिरवां केळां निखाऱ्यात भाजनी खाणां. :

१८.कुड्याच्या फुलांची भाजी/ शेंगांची चटणी :

१९. घोटशेरीचे आकूर  तेची भाजी :

२० तांदुळाच्यो शेव्यो

२१. खापरोळी : कोकणातली आणखीन एक दुर्मिळ झालेला पदार्थ म्हणजे खापरोळी.

साहित्य-4वाट्या तांदूळ,2वाट्या हरभरा डाळ, 1वाटी उडीद डाळ, चमचा भर मेथीदाणे, नारळाचा रस आणि गुळ, वेलची पुड.

दोन्ही डाळी तांदूळ आणि मेथीदाणे स्वच्छ धूवून 7ते8तास  भिजवावे. नंतर रवाळ वाटून घ्यावे. आणि परत 7/8तास झाकून ठेवावे. नारळाचा रस गुळ आणि वेलची घालून तयार करावा. ८तासांनंतर हे पिठ फुगुन येईल. आता भिड्याला तेल लावून आंबोळी घालावी. वाढताना डीश मध्ये आंबोळी ठेऊन वर नारळाचा रस घालावा.

२२. खांटोळी : 

२३. तवसळी :

२४. दुधी भोपळेची खिर :

२५. कणग्यांची खिर : 

२६. मेथीची  पेज :

२७. कुवाळेचे सांडगे : 

२८. भारलेली मिर्ची : 

२९. घोटांचां रायतां :

३०. अननसाची चटणी अणी भाजी :

३१. खोबरे ची कापां :

109) रातांब्याच बियांच सार ,खापर पोळी, वेसवार ,

110) मेतकुटाची धिरडी

111) ओली हळद आंबे हळदिचे लोणचे 

112) दही केळं. ( पिकलेल्या केळ्याची कोशिंबीर थोडीशी मोहरी फेसून लावायची, थोडसं मीठ, थोडीशी साखर)

113) दामटी 

ही दामटी माझी आजी छान करायची तांदूळाच्या पिठात तेल,मीठ, थोडा ओवा जीरे घालायचे (हे ओवा जीरे मी नंतर अॕड करायला लागले छान चव लागते आजी फक्त तेल मीठ घालायची) आणि संपूर्ण पीठ दुधात भिजवायचे पोळीच्या पिठासारखे आणि थालिपिठासारखे तव्यावर तेल टाकून छान खरपूस मिडियम आचेवर भाजून घ्यायचे वरुन तूप घ्यायचे खाताना, लींबू लोणच्याबरोबर छान लागतात ह्या दामट्या.


राघवदास लाडू रेसिपी 👇

(रवा, खवा खोबरे लाडू )


साहित्य : 2 भांडी रवा, 2 भांडी साखर, 1 भांडं खवा, पाऊण भांडे  डेसीकेटेड खोबरे (खरे तर  नारळाचा चव घालतात पण पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे लवकर खराब होतील म्हणून नाही घातला) तूप 1 भांड्याच्या वर, वेलची पूड, काजू, बेदाणे चिमूटभर मीठ..

रवा तूप घालून खमंग भाजून झल्यावर त्यातच डेसीकेटेड नारळ घालून थोडे परतावे, दुसरीकडे खवा परतून घ्यावा नंतर रवा खवा खोबरे सगळे एकत्र करून थोडे भाजावे 

बेदाणे धुवून थोडा वेळ पाण्यात भिजू द्यावेत नंतर ह्या भाजलेल्या रवा खवा ह्यात काजू बेदाणे घालावे रव्याच्या गरम असण्याने बेदाणे पण थोडे गरम होतात त्यावरच वेलची पूड घालावी..

दुसरीकडे 2 भांडी साखरेचा पाक करायला ठेवावा अगदी एक तारी न करता थोडासा घट्ट असू द्यावा मग ह्या रव्याच्या मिश्रणात पाक घालून नीट एकत्र करावे थोड्या वेळाने थोडे थोडे ढवळावे मिश्रण आळले की त्याचे लाडु वळावेत...

टीप : मिश्रण हळूहळू आळंत गेले की समजावे लाडु मऊ होणार आणि पटकन आळले तर हमखास भागराच होणार..

 

खांडवी ...रेसिपी👇

माझाही एक प्रयत्न...


मी हे microwave मध्ये केलंय तयारीचा वेळ सोडून अवघ्या 6 ते 7 मिनिटांत तयार..

एकीकडे गुळ पाण्यात विरघळवून उकळत ठेवले उकळी आल्यावर त्यातच कीसलेलं आलं, चिमूटभर मीठ आणि नारळाचा चव घातला चांगली उकळी आल्यावर गॅस बंद केला...

दुसरी कडे 2 वाट्या इडली रवा त्यात तूप घालून microwave ला 2,2 मिनिटे असे 6 मिनिटं ठेवून खमंग भाजून घेतले नंतर गुळ खोबरे आले मिश्रित उकळते पाणी थोडे थोडे घातले रवा थोडे थोडे पाणी घातल्याने छान मोकळा शिजला पुन्हा 1 मिनिट microwave मधे ठेवून बाहेर काढले आणि मग छान ढवळून आधीच तूप लावून ठेवलेल्या ताटात घातले नीट पसरून त्यावर नारळाचा चव घालून थापले गार झल्यावर वड्या पाडल्या...

 

सुरणाची उपासाची भाजी, केनी -कुर्डू ची भाजी, बिरडे उसळ, केळ्याचे घारगे, ताकातल्या तिखट पानग्या, सुरळीच्या वड्या, शेवग्याच्या शेंगा घालून आमटी, गोळ्यांची आमटी, डाळिंब्या , शेवग्याच्या फुलांची पीठ पेरून भाजी, ओव्याच्या पानांची भजी.

प्राजक्ता मेहेंदळे


अळूची देठी - 

हे आळूच्या दांड्या न चे उकडुन आणि साल काढून केलेलं भरित असतं.. दही मीठ तूप जिऱ्याची फोडणी

घालून करायचे  

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly