बुधवार, 1 फ़रवरी 2023

ऑइल पुलिंग : दातांसाठी तसेच संपूर्ण शरीरासाठी आहे अत्यंत फायदेशीर !

 ऑइल पुलिंग : दातांसाठी तसेच संपूर्ण शरीरासाठी आहे अत्यंत फायदेशीर ! 


ऑइल पुलिंग म्हणजे "तेलाने तोंड स्वच्छ धुणे". ही अत्याधुनिक पद्धत नसून ते एक प्राचीन आयुर्वेदिक तंत्र आहे. आयुर्वेदात आपले पोट आणि तोंड खूप महत्वाचे मानले जातात.


जर तुमचे पोट आणि तोंड निरोगी असेल तर तुमचे संपूर्ण शरीर निरोगी राहाते. ऑइल पुलिंग हे तंत्र दातांसाठी तसेच संपूर्ण शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला ऑइल पुलिंग म्हणजे काय आणि त्यासाठी कोणते तेल उत्तम आहे याबद्दल माहिती देणार आहोत. तेलाने गुळणा करणे, हे तुम्हाला ऐकायला थोडे विचित्र वाटेल. पण ही पद्धत आता खूप प्रचलित आहे. अगदी सेलिब्रिटीदेखील याचे समर्थन करताना दिसतात. तुम्हाला वाटेल पाण्याने आपण तोंड स्वच्छ धुवू शकतो, मग तेलाने असे करण्याची काय गरज? परंतु तुम्हाला हे जाणून घेऊन आश्चर्य वाटेल की, तेलाने तोंड धुणे आणि पाण्याने धुणे या दोन भिन्न पद्धती आहेत, ज्यांचे विशेष महत्त्व आहे.


ऑइल पुलिंग म्हणजे तेलाने गुळणा करणे. या पद्धतीला आयुर्वेदात कवला किंवा गंडुश असे म्हणतात. प्राचीन काळी ऋषी-मुनींनी तोंड आणि पोटाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी या तंत्राचा वापर केला, अशी मान्यता आहे. अनेकजण हल्ली ऑइल पुलिंगसाठी खोबरेल तेलाचा वापर करतात. 


ऑइल पुलिंगसाठी कोणते तेल आहेत उत्तम ? 


नियमित ऑइल पुलिंग करण्यासाठी तिळाचे तेल वापरणे सर्वोत्तम आहे. आयुर्वेदानुसार गार्गलिंगसाठी हे तेल सर्व लिक्विड फॅट्समध्ये सर्वोत्तम आहे. ऑइल पुलिंगचे फायदे ऑइल पुलिंगने दात निरोगी आणि चमकदार राहतात. एवढेच नाही तर हिरड्यांच्या जळजळीच्या समस्येपासूनही सुटका मिळते. तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळते. तसेच दातांमधली पोकळी काढून टाकण्यासही मदत होते. या तंत्राने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. ऑइल पुलिंगने रक्त शुद्ध होते. यामुळे त्वचेवर चमक येते आणि पिंपल्सची समस्याही दूर होते. तसेच केस गळणेही थांबते.


तेलाव्यतिरिक्त तुम्ही कोणत्या गोष्टी वापरू शकता - दातांमध्ये मुंग्या येणे, दात सैल होणे किंवा दुखत असल्यास तिळाचे तेल उत्तम आहे. - तुमच्या तोंडात जळजळ होत असेल, तोंडात व्रण होत असतील, तर तूप तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. - तुमचे तोंड खूप कोरडे राहात असेल आणि जास्त तहान लागत असेल दुधाचा वापर करावा.


तोंडात कोणत्याही प्रकारचा जडपणा जाणवत असेल तर कोमट पाण्याने गार्गल करणे चांगले. - तोंड स्वच्छ करण्यासाठी आणि तहान शमवण्यासाठी मधदेखील एक चांगला पर्याय आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly