|| श्री स्वामी समर्थ ||
एके दिवशी गुरुदेवांसोबत असलेल्या एका भक्ताने सांगितले,
गुरुदेव नदीकाठी बसले होते आणि मी त्यांना विचारले, "गुरुदेव तुम्ही काय करीत आहात?"
गुरुदेव उत्तरले, "मी नदी जी वाहत आहे ती वाहून संपण्याची वाट पाहत आहे जेणेकरून मी नदी ओलांडून जाऊ शकेन." यावर मी उत्तर दिले, "गुरुदेव तुम्ही काय म्हणत आहात? नदी वाहून संपल्याची वाट पाहिल्यास तुम्ही वाट पाहत राहाल आणि गुरुदेव तुम्ही नदी ओलांडूच शकणार नाही."
गुरुदेव म्हणाले, "मी तुम्हा सर्वांना सुद्धा हेच सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.
जे नेहमी मला सांगत असतात की आयुष्यातल्या जबाबदाऱ्या कमी झाल्यावर आम्ही साधना, सेवा, सत्संग करणार...त्यांना हेच सांगू इच्छित आहे की ज्याप्रमाणे नदी चा प्रवाह कधीच थांबणार नाही आणि वाहणाऱ्या पाण्यांमध्ये आपल्याला नदी पार करावी लागेल, त्याचप्रमाणे आपले जीवन देखील संपेल परंतु आपल्या जीवनातील जबाबदाऱ्या कधीच संपणार नाहीत.
आपले व्यस्त काम आणि जबाबदारी यामधूनच आपल्याला सेवा, साधना आणि सत्संग या साठी वेळ / मार्ग काढावाच लागेल.