इंद्रजाल
इंद्रजाल हि वनस्पती मुख्यत्वेकरून समुद्रात सापडते, या वनस्पतीला पानं नसतात तर फक्त छोट्या छोट्या एकमेकाला चिकटलेल्या फांद्या असतात. वास्तुशास्त्रात वास्तुदोष निवारणासाठी याचा वापर केला जातो. घरातील तअसेच कार्यालयातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे व सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करण्याचे काम इंद्रजाल करते. मुख्य दरवाजा समोर इंद्रजाल लावली असता नकारात्मक शक्तींना घरात प्रवेश करण्यापासून अटकाव करते.
अतिशय दुर्मीळ अशा इंद्रजलची नित्य नियमाने पूजा केल्यास लगेच परिणाम दिसून येतात. याचा वापर नजरबाधा, वास्तुदोष, चोरांपासून रक्षण, नकारात्मकता कमी करण्यासाठी, घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करण्यासाठी, मालकाच्या भाग्याला चालना देण्यासाठी केला जातो. वैज्ञानिक भाषेत हिला समुद्र पंखा म्हणतात तर काही ठिकाणी समुद्र फणी सुद्धा म्हणतात.
ज्या घराच्या उत्तर-पुर्व किंवा उत्तर दिशेला याची स्थापना केली जाते तिथे सुख, समृद्धी, यश, बाहेरच्या बाधेपासून मुक्ती, आणि पैशाची चणचण भासत नाही.
हीच्या अनेक जाती असून अनेक रंगात ही वनस्पती मिळते. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी याची पूजा केली जाते. अतिशय दुर्मिळ अशी ही वनस्पती आहे. मानसिक स्थैर्य, कौटुंबिक स्वास्थ वाढवण्यास मदत करते. तसेच व्यवसायात प्रगती आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी हीचा वापर केला जातो. पैसा आणि शक्ती देणारी ही दुर्मिळ वनस्पती आहे.
महत्त्व आणि उपयोग :
वैदिक काळापासून या वनस्पतीचा वापर करण्यात आला आहे. आयुष्यातील बर्याच समस्या सोडवण्यासाठी इंद्रजालचा वापर केला जातो, कारण इंद्रजाल ही प्रभावी वनस्पती असून बाधा, काळी जादू, नजर बाधा दूर करते.
★ आर्थिक समस्या, तोटे भरून काढण्यासाठी व्यवसायाला चालना देण्याचे काम करते. मुख्य दरवाजासमोर किंवा दक्षिण दिशेत याची स्थापना केल्यास कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण भासत नाही. पैसे येत राहतात. आर्थिक स्थैर्य येते
★ वास्तुदोष दूर करण्याचे काम करते
★ घरातील/ऑफिसमधील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि आसपास सकारात्म ऊर्जा प्रवाहित करते.
★तुमच्या भोवती तसेच तुमच्या कुटुंबाभोवती संरक्षणात्मक कवच निर्माण करते.
इंद्रजालचा वापर/स्थापना :
सिद्ध केलेले आणि पूजा केलेले इंद्रजाल लगेच परिणाम दाखवते. तंत्रसाधनेत इंद्रजालला विशेष महत्त्व आह
- √घराच्या दिवाणखाण्यात, दर्शनी भागात उत्तरेच्या किंवा पूर्वेच्या भिंतीवर लावू शकतात.
- √कार्यालयाच्या किंवा घराच्या मुख्य प्रवेश द्वारावर लावू शकतात.
- √रवि पुष्य नक्षत्र, नवरात्र, दीवाळी इत्यादि शुभ दिनी इंद्रजालची स्थापना करून आपल्या कार्यालयात अथवा घरात अध्यात्मिक लाभ मिळवू शकतात.