गुंतवणुक लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
गुंतवणुक लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

मंगलवार, 25 अक्टूबर 2011

गुरुमंत्र

• अपार कष्ट करा : मेहनत कधीच वाया जात नाही. पण काम न करता केलेली बाष्कळ बडबड माणसाला लयास नेल्याखेरीज राहत नाही.

• आळस झटकून टाका : वाळूवर झोपून राहणारा खेकडा कोणत्याही लाटेबरोबर समुद्रात वाहून जातो.

• उत्पन्न (मिळकत) : कधीही केवळ एका उत्पन्नाच्या साधनावर अवलंबून राहू नका. एका मार्गाने येणा-या १०० रुपयांपेक्षा १०० मार्गांनी येणारा १-१ रुपया नेहमीच चांगला.

• खर्च : आवश्यकतेपेक्षा जास्त खरेदी केली तर लवकरच आवश्यक गोष्ट विकण्याची वेळ येईल.

• बचत : खर्च करून उरलेल्या उत्पन्नाची बचत करण्यापेक्षा आधी बचत करून नंतर उरलेले पैसे खर्च करा.

• कर्ज : कर्ज घेणारा हा कर्ज देणा-याचा गुलाम होऊन जातो.

• जमाखर्च : जमाखर्च मांडणे आणि त्याचा अभ्यास करणे अतिशय महत्वाचे आहे. जर बुटच फाटला असेल तर पावसाळ्यात छत्रीचा काय उपयोग?

• हिशेब तपासणे : लहान लहान खर्चाचा ताळेबंद ठेवा. एका छोट्याशा चिद्रामुळे पूर्ण जहाज बुडू शकते.

• आर्थिक धोका : ब-याच इन्व्हेस्टमेंट भरपूर फायदा देणा-या आणि आकर्षक असतात, मात्र त्यात तेवढाच धोका लपलेला असतो. त्यामुळे अशा इन्व्हेस्टमेंटचा जरा काळजीपूर्वक विचार करा. जर नदीची खोली पहायची असेल तर दोन्ही पाय पाण्यात टाकून कसे चालेल?

• गुंतवणुक : सर्व अंडी एकाच पारड्यात ठेवून कसे चालेल?

fly