तीळ लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
तीळ लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

रविवार, 8 अक्टूबर 2023

बहुगुणी तीळ...!

 बहुगुणी तीळ! तीळ :- 


तीळ मजबुत हाडांसाठी. तीळात कॅल्शियम आहे, ते आपल्या सर्वांना माहीतच आहे. याशिवाय मँगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ब गटातील जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थही आहेत. तीळातील कॅल्शियम हाडांसाठी चांगलं तर आहेच, तसेच तीळात झिंक जास्त असते, जे हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत करते. थोडक्यातच स्त्रियांना याचा खूप फायदा होऊ शकतो. तीळातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक हाडांसाठी पोषक ठरतात. थंडीच्या दिवसात तीळ खाण्याची सवय ठेवल्यास हाडं किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवणार नाही. दिवसातून एकदा तुम्ही मोठा चमचाभर तीळ खाल्लेत, तर तुमचे दातही मजबूत होतील. 

तीळ in english 

तिळात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स उच्च प्रमाणात असल्यामुळे रोग प्रतिकारशक्तीही वाढते. हिवाळा स्वास्थासाठी चांगला मानला जातो. थंडीच्या दिवसांत अशा काही गोष्टी मिळतात ज्या आपल्या शरीरासाठी फायदेशीर मानल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे तीळ. तीळ एक असा खाद्यपदार्थ आहे, ज्यात अनेक गुणकारी घटक असतात. दिसायला अतिशय छोटा असणाऱ्या तीळाचे मोठे फायदे आहेत. थंडीत तीळाचं सेवन शरीरासाठी उत्तम मानलं जातं. तीळामुळे शरीराला उष्णता मिळण्यास मदत होते. तर आपल्या शरीराची हाडंदेखील मजबूत करते. 

अंगावरील तीळ in English

वैज्ञानिकदृष्ट्या तीळाच्या तेलामध्ये केसांसाठी पोषक घटक असल्याचं सांगण्यात आलं आहे. तीळाच्या तेलात व्हिटॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि प्रोटीनही मूबलक प्रमाणात आढळतं.

जाणून घ्या! तीळ खाण्याचे ‘हे’ १० फायदे

◼️तीळात सेसमीन नावाचे एन्टीऑक्सिडेन्ट आढळतात जे कॅन्सर पेशी वाढण्यापासून बचाव करतात. 


◼️तीळाच्या सेवनामुळे भूक वाढते. तीळ वात, पित्त आणि कफची समस्या कमी करण्यास मदत करते. 

तीळ खाण्याचे फायदे तोटे 

◼️तीळाच्या तेलाने सतत मालिश केल्याने हाडं मजबूत होण्यास मदत होते. 


◼️थंडीच्या दिवसांत तीळाचं तेल त्वचेवर लावल्याने त्वचेवरील रखरखीतपणा दूर होतो. तीळाच्या सेवनाने चेहरा चमकदार होण्यास मदत होते. 

जवस खाण्याचे फायदे 

◼️पोटात दुखत असल्यास काळे तीळ गरम पाण्यासोबत खाल्ल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो. 


◼️तीळामध्ये असणाऱ्या काही घटकांमुळे तणाव, डिप्रेशनच्या समस्यांपासून सुटका होण्यास मदत मिळू शकते.


◼️तीळ आणि खडीसाखर एकत्र खाल्ल्याने सुक्या खोकल्यापासून आराम मिळू शकतो. 

खसखस खाण्याचे फायदे

◼️कान दुखत असल्यास तीळाच्या तेलात लसून एकत्र करुन, तेल हलकं गरम करुन लावल्यास कानदुखी कमी होऊ शकते.


◼️तीळाचं सेवन दातांसाठीही गुणकारी ठरतं. सकाळी ब्रश केल्यानंतर तीळ चावून खाल्ल्याने दात मजबूत होण्यास फायदा होतो.

 तिळाच्या तेलाचे फायदे 

◼️सतत तोंड येत असल्यास तीळाच्या तेलात सेंधव मीठ मिसळून लावल्यास आराम पडू  शकतो.


म्हणूनच पूर्वीपासून तीळ आणि तिळाचे तेल चिरतारुण्यासाठी वापरत असावेत.

fly