धनत्रयोदशी कथा लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
धनत्रयोदशी कथा लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

मंगलवार, 18 अक्टूबर 2011

धनत्रयोदशी

धनत्रयोदशी:

आश्विन कृष्ण त्रयोदशी - दिवाळीचा पहिला दिवस - हिंदूधर्मातील सण आणि उत्सव

धनत्रयोदशी कथा
:
धनाची पूजा करणे हा  या सणामागील हेतू आहे. व्यापारी, दुकानदार लोक ह्या दिवशी या दिवशी पाटावर लक्ष्मीची मूर्ती, वह्या, धंद्याची हत्यारे, सोने, नाणे ह्यांची पूजा करतात. शेतकर्‍यांच्या दॄष्टीने नवीन आलेले धान्य हेच त्यांचे धन असते. त्यामुळे ते नवीन धान्याची पूजा करतात. त्यावेळी धने व गूळ ह्यांचा नैवेद्य दाखवतात. ह्या सुमारास झेंडू व शेवंतीची फुले मुबलकप्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे पूजेला झेंडू ची व शेवंतीची फुले वापरतात. या दिवसापासून दारांत आकाशकंदील व पणत्या लावण्यास सुरूवात करतात. व्यापारी वर्गात हा दिवस फार मोठा उत्साहाने साजरा करतात. वैद्य लोक ह्या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपला पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दीव्यानी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगुन जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात(यमलोकात) परततो. अश्या प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणुनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लाउन त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.

धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे समुद्र मंथन. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली.
तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.कार्तिक कृष्ण त्रयोदशीला समुद्रमंथनापासून आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले. त्यांनी देवांना अमृत देऊन अमर केले. धनत्रयोदशीच्या दिवशी दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी धन्वंतरीची पूजा केली जाते. याच दिवशी यमाचीही पूजा केली जाते.

धनत्रयोदशीच्या दिवशी काय करावे?
  1. भगवान धनवंतरीची पूजा करा.
  2. घरात नवीन झाडू किंवा सूप खरेदी करून त्याची पूजा करा.
  3. सायंकाळी दीप प्रज्वलन करून घर आणि दुकानाची पूजा करावी.
  4. मंदिर, गोशाळा, घाट, विहीर, तलाव, बागेत दिवा लावावा.
  5. तांबे, पितळ, चांदीच्या गृहोपयोगी वस्तू व आभूषणाची खरेदी करा.
  6. कार्तिक स्नान करून प्रदोष काळात घाट, गोशाळा, विहीर, मंदिर आदी स्थानांवर तीन दिवस दिवा लावा.

धनत्रयोदशी पूजेत काय करावे.
अ)कुबेर पूजन
आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी शुभ मुहूर्तावर नवीन गादी किंवा जुनी गादी साफ करून ठेवा. त्यानंतर नवीन बसण्याचे कापड टाका. संध्याकाळनंतर तेरा दिवे लावून तिजोरीत कुबेराचे पूजा करा.
कुबेराचे ध्यान करताना खालील मंत्र म्हणा.
”श्रेष्ठ विमानावर विराजमान, गरूडाप्रमाणे भासणारा, दोन्ही हातात गदा धारण करणारा, डोक्यावर श्रेष्ठ मुकुट करणार्‍या, भगवान शंकराचा प्रिय मित्र निधीश्वर कुबेर मी तुझे ध्यान करतो आहे.”

खालील मंत्राद्वारे चंदन, धूप, दीप, नैवेद्य दाखवून पूजा करा.
-----------------------------------------------------------------
‘यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन-धान्य अधिपतये
धन-धान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा ।’
-----------------------------------------------------------------
नंतर कापूर आरती करून फुले अर्पण करा.

ब) यम दीपदान

धनत्रयोदशीच्या संध्याकाळी एखाद्या पात्रात तिळाच्या तेलाने भरलेला दिवा लावावा.
गंध, पुष्‍प आणि अक्षतांनी पूजा करा आणि दक्षिणेकडे तोंड करून यमासाठी खालील प्रार्थना करा.
-----------------------------------------------------------------
‘मृत्यना दंडपाशाभ्याम् कालेन श्यामया सह।
त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यज प्रयतां मम।’
-----------------------------------------------------------------
आता ते सर्व दिवे सार्वजनिक स्थळावर लावा. त्यापैकी एक दिवा दाराच्या उंबरठ्यावर अखंड तेवत ठेवा. अशा प्रकारे दीपदान केल्यावर यमाचा पाश आणि नरकातून मुक्ती मिळते.

यमराज पूजन
या दिवशी यमासाठी एक पिठाचा दिवा बनवून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावा.
घरातील स्त्रियांनी रात्री दिव्यात तेल टाकून चार बत्त्या लावा. पाणी, पोळी, तांदूळ, गुळ, फूल, नैवेद्यासह दिवा लावून यम देवाची पूजा करा.















धनत्रयोदशी Dhanatryodashi (The 13th day of Ashwin) as the name suggests is the festival of wealth. It is considered auspicious to buy gold or any metal object on this day. Goddess Laxmi is worshipped in for of Sri Yantra.Many parts of Maharashtra celebrate a ritual called Yamadeepdan in which womenfolk of the house light one lamp each for every living male member of the house to ensure his long life. People from the Ayurveda fraternity also celebrate this day to commemorate Dhanwantri, the divine physician.



 24-10-2011 को धनतेरस है. धनतेरस. धन त्रयोदशी – इस दिन धन के देवता कुबेर और मृत्यु देवता यमराज की पूजा का विशेष महत्व है । इसी दिन देवताओं के वैद्य धनवंतरि ऋषि अमृत कलश सहित सागर मंथन से प्रकट हुए थे । अतः इस दिन धनवंतरी जयंती मनायी जाती है
धनतेरस के दिन चांदी खरीदने की भी प्रथा है। इसके पीछे यह कारण माना जाता है कि यह चन्द्रमा का प्रतीक है जो शीतलता प्रदान करता है और मन में संतोष रूपी धन का वास होता है। संतोष को सबसे बड़ा धन कहा गया है। जिसके पास संतोष है वह स्वस्थ है सुखी
च दिवसीय दीपावली पर्व का आरंभ धन त्रयोदशी से होता है। इस दिन सायंकाल घर के मुख्य द्वार पर यमराज के निमित्त एक अन्न से भरे पात्र में दक्षिण मुख करके दीपक रखने एवं उसका पूजन करके प्रज्वलित करने एवं यमराज से प्रार्थना करने पर असामयिक प्रचलित कथा के अनुसार कार्तिक कृष्ण त्रयोदशी के दिन समुद्र मंथन से,दीपावली एवं धनतेरस के लिए हल्द्वानी का कार बाजार पूरी तरह सज गया है। घर की लक्ष्मी को खुश करने के लिए धनतेरस पर सैकड़ों कारों की एडवांस बुकिंग हो चुकी है। पंचांग के अनुसार हर साल कार्तिक कृष्ण की त्रयोदशी के दिन धन्वतरि त्रयोदशी मनायी जाती है। जिसे आम बोलचाल में 'धनतेरस' कहा जाता है। यह मूलतः धन्वन्तरि जयंती का पर्व है और आयुर्वेद के जनक धन्वन्तरि के जन्म दिवस के रूप में मनाया जाता है, धनतेरस | Dhanteras. ... धनतेरस पर क्या खरीदें क्या दान करें. धनतेरस पर आपको मिल सकता है भगवान धनवंतरि से सेहत का आशीर्वाद और लक्ष्मी का वरदान लेकिन इसके.  धनतेरस-पर-क्या-खरीदें-क्या-दान-करें.हम लोग धनतेरस के दिन खरीदारी करने पर जोर क्यों देते हैं और पूरी रात रोशनी क्यों की जाती है। आइये, जानते हैं धनतेरस की कहानी,दीपावली का पर्व धनतेरस (इस बार 24 अक्टूबर, सोमवार) से प्रारंभ हो रहा है। इस दिन यदि राशि के अनुसार नीचे लिखे उपाय किए जाएं तो धन-संपत्ति आदि का लाभ होता है। ये उपाय इस प्रकार हैं- मेष- यदि आप धनतेरस के दिन शाम के समय घर के मुख्य ,इस धनतेरस पर आप धन के देवता कुबेर को प्रसन्न कर धनवान बन सकते हैं। धन के देवता कुबेर को प्रसन्न करने का यह सबसे अच्छा मौका है। धनतेरस के इस मौके पर आप कुबेर की,बहुत कम लोग जानते हैं कि धनतेरस आयुर्वेद के जनक धन्वंतरि की स्मृति में मनाया जाता है। इस दिन लोग अपने घरों में नए बर्तन ख़रीदते हैं और उनमें पकवान रखकर भगवान धन्वंतरि को अर्पित करते हैं। लेकिन वे यह भूल जाते हैं कि असली धन तो

fly