भारतीय टपाल विभागाने आज गुरूपुष्यामृत योगाचे औचित्य साधून गेल्यावर्षी प्रमाणे सोन्याच्या नाण्यांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे . त्यानुसार महाराष्ट्र आणि गोवा सर्कलमधील सर्व प्रमुख टपाल कार्यालयांमध्ये चोवीस कॅरेट सोन्याची नाणी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार असून पोस्टाकडून बाजारभावावर सात टक्के सवलत देण्यात येणार आहे .
पुष्य नक्षत्र शुभ मानून यादिवशी ग्राहक सोने , चांदी या धातूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात . यापूर्वीही पोस्टाने या मुहूर्तावर सोन्याची नाणी पोस्टात विक्रीसाठी उपलब्ध केली होती . त्या योजनेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता . या पार्श्वभूमीवर सवलतीच्या दरात सोन्याच्या नाण्यांची विक्री करण्याची सदर योजना पोस्टाने खास आजच्या दिवसासाठी पुन्हा लागू केली आहे .
ही नाणी १ ग्रॅम , ५ ग्रॅम , ८ ग्रॅम , १० ग्रॅम , २० ग्रॅम आणि ५० ग्रॅम वजनामध्ये उपलब्ध आहेत . ती २४ कॅरेट आणि ९९ . ९९ टक्के शुद्धतेची असून स्वित्झरर्लण्ड येथील वैलकैम्बी कंपनीने निर्माण केली आहेत . टॅपरप्रुफ पॅकेजिंग मध्ये खालील निवडक टपाल कार्यालयात ही नाणी उपलब्ध असतील . ही योजना फक्त १८ एप्रिल पुरतीच लागू असेल .
मुंबई क्षेत्र : अंधेरी , बोरीवली ( पश्चिम ), चेंबूर , दादर , घाटकोपर , बोरीवली , कल्याण शहर , माहीम , मालाड , माटुंगा ( पूर्व ), मोतीलालनगर , गोरेगांव ( पूर्व ), मुलुंड ( पश्चिम ),आणि मुंबई जीपीओ ,पनवेल , .
कोकण विभाग - रत्नागिरी , दापोली , देवरूख , चिपळूण , कुडाळ , कणकवली , मालवण , सिंधुदुर्गनगरी , आणि सावंतवाड़ी
टपाल कार्यालय .
नागपूर क्षेत्र : नागपूर सिटी आणि शंकरनगर टपाल कार्यालय ,नागपूर जीपीओ
औरंगाबाद क्षेत्र :नासिकरोड आणि नासिक टपाल कार्यालय
पुणे क्षेत्र : सातारा आणि कराड टपाल कार्यालय, पुणे जीपीओ
आणि
गोवा क्षेत्र : म्हापसा , फोंडा , सांगली , मडगाव, कोल्हापूर , कोल्हापुर शहर, मिरज