नोकरी संदर्भ(बॅंकांमध्ये भरती)
बॅंकेची नोकरी म्हणजे आरामदायी नोकरी असा पूर्वी एक समज होता. यातील अतिशयोक्ती सोडली, तर बॅंकेची नोकरी सर्वच दृष्टीने योग्य आहे. अनेक बॅंकांमध्ये आता नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्याचा अधिकाधिक फायदा करून घेण्यासाठी हा आढावा.
"अर्थार्जन', अत्यंत आवश्यक गोष्ट! अनेकविध पर्यायांनी अर्थार्जन करून उपजीविका करण्यात येते. त्यात नोकरी करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. "नोकरी मिळणे' म्हणजे आयुष्यात स्थिरस्थावर व्हायला सुरवात होणे. शिक्षणापाठोपाठ येणारे आयुष्यातील वळण म्हणजे नोकरी. वळणे घेत घेत एकएक टप्पा पार करीतच आयुष्य पुढे सरकत असते. त्या त्या वयात प्रत्येक टप्पा हा महत्त्वाचा आणि आनंदाचा असतो.
नोकरी नाही अशी ओरड आजकाल सारखी आपल्या कानावर येते; पण सध्या बॅंकिंग क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर नोकरभरती होते आहे. काही बॅंकांच्या जाहिराती यापूर्वीच येऊन गेल्या. अर्ज भरणे, परीक्षा, मुलाखती आणि नंतर नोकरी मिळण्याचा आनंद या सर्व पायऱ्या दोन-चार बॅंकांच्या बाबतीत सुरू आहेत. तरीही नजीकच्या काळात क्लार्क, ऑफिसरची पदे भरण्यात येणार आहेत. प्रत्येक वर्षी थोडी थोडी भरती केली जाईल.
बॅंकिंग सर्व्हिस रिक्रुटमेंट बोर्ड (BSRB) मार्फत पब्लिक सेक्टर बॅंकेमध्ये 1978 मध्ये मोठ्या प्रमाणात नोकरभरती झाली होती. ती सर्व मंडळी आता निवृत्त होत आहेत. तसेच मध्यंतरी बॅंकांनी स्वेच्छा निवृत्ती देऊ केली होती. त्यामुळे अनेकांनी निवृत्ती स्वीकारली. त्याशिवाय मध्यंतरीच्या 15 ते20 वर्षांच्या काळात अत्यल्प प्रमाणात नोकरभरती झाली. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून सध्या बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध आहेत. सध्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आवश्यकतेपेक्षा खूप कमी आहे. कमी स्टाफमुळे बॅंकिंग कारभार सुरळीतपणे करताना कर्मचाऱ्यांवर ताण पडतो.
संगणकीकरण झाले असले तरीसुद्धा सतत बदल घडवणाऱ्या बॅंकांमार्फत उत्तम सेवा उपलब्ध करताना बॅंकेला व सर्व कर्मचाऱ्यांना दिलेला वेळ कमी पडत आहे. रोजचा अत्यावश्यक कामकाजाव्यतिरिक्त अनेक महत्त्वाची कामे करायला सवड मिळू शकत नाही. अशा परिस्थितीवर तोडगा म्हणजे नवीन नोकरभरती हाच आहे.
प्रत्येक व्यक्ती, संस्था, व्यवसाय, इतर अन्य कोणीही लहानमोठे असोत, त्या सर्वांनाच बॅंकिंग सेवेची गरज असते. त्या गरजा पूर्ण करण्यासाठी बॅंका प्रयत्नशील आहेत. काही वर्षांपूर्वी सॉफ्टवेअर क्षेत्रात नोकरीची नोकऱ्यांची बूम होती. तेव्हा अनेकांनी त्या क्षेत्रात पदार्पण केले आणि आपले पाय रोवले. आता त्या क्षेत्रात संपृक्तता (saturation) येत आहे. सॉफ्टवेअर आणि इतर अनेक क्षेत्रांमधील फायद्याच्या तुलनेत बॅंकेच्या नोकरीतील फायदे अनेक पटींनी जास्त आहेत. बॅंकेत नोकरी करताना व्यक्तिमत्त्व समृद्ध करता येते. बॅंकेतील काम एकट्यादुकट्याचे नसून संघभावनेने करण्याचे काम आहे. सतत समूहात वावरत असताना व्यक्तीच्या स्वभावाचे, गुणदोषांचे प्रकटीकरण त्याच्या वागण्यातून दिसून येते. तिथेच दोषांचे निर्मूलन करून गुण संवर्धन करण्याची संधी या कामामध्ये वारंवार मिळते. आपल्या बॅंकेत काम करताना आपलेपणाची भावना कर्मचाऱ्यांच्या मनात उत्पन्न झाल्याने उत्पादनक्षमता व कार्यतत्परता वाढते.
बॅंकेतील कामाची वेळही बऱ्याच अंशी सोयीची असते. काही विभाग उशिरापर्यंत कार्यरत असते, तरी सर्वसाधारणपणे नोकरीची नऊ ते सहा हीच वेळ असते.
बॅंकिंग हे क्षेत्र स्त्रियांना करियरच्या दृष्टीने अधिक योग्य आहे. बॅंकेत अनेक कर्मचारी काम करतात. त्यामुळे स्त्रियांना इतरवेळी येणारे वाईट अनुभव या नोकरीमध्ये टाळता येऊ शकतात. बॅंकांमध्ये खुले वातावरण असते. तेथील प्रत्येकजण आपली इभ्रत सांभाळून काम करत असतो. त्यामुळे अत्यंत सुरक्षित वातावरणात काम करण्याचा आनंद महिलांना घेता येऊ शकतो. अशा वातावरणामुळे साहजिकच पदोन्नतीचा मार्क सुकर होतो. त्यामुळे बॅंकिंग क्षेत्र हे स्त्रियांच्या करिअरला उत्तम संधी देणारे क्षेत्र आहे.
पैशांच्या दृष्टीनेही बॅंकेतील करिअर हे उत्तम पर्याय ठरू शकते. स्वतःच्या किंवा बॅंकेच्या आर्थिक व्यवहारांचे उत्तम प्रकारे ज्ञान मिळवता येते. बॅंकेच्या नोकरीत पगारही चांगला मिळतो. दरवर्षी वेतनवाढ होते. कर्जासाठी विविध सुविधा मिळतात. नोकरीत स्थिरता असल्याने समाजात आदराचे स्थान मिळते.
बॅंकेत काम करणारे कर्मचारी उत्तम कानसेन बनू शकतात. येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाशी सौजन्याने वागणे, त्यांची समस्या सोडवणे, योग्य ते मार्गदर्शन करणे, मदत करणे, सर्वांगाने विचार करण्याची तयारी आणि निर्णयाप्रत येताना घ्यायची दक्षता अशा सर्व गोष्टींची तयारी बॅंकेत होते.
प्रत्येक बॅंक आपापल्या पद्धतीने आपापल्या बॅनरखाली परीक्षा घेतात. त्यासाठी IBPS (Institute of Banking Personnel Selection) या संस्थेचे सहकार्य घेतले जाते. मोठ्या प्रमाणावर येणारे अर्ज, त्यांची तपासणी, छाननी, पेपर काढणे, परीक्षेची वेळ व जागा ठरवणे, निकाल लावून मेरिटची यादी तयार करणे या सर्व गोष्टी त्यात येतात. काही बॅंका स्वतः मुलाखती घेतात, तर काही बॅंका हे कामसुद्धा IBPS कडून करून घेतात. कुठल्याही शाखेचा पदवीधर बॅंकेत नोकरी करू शकतो. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेसाठी किमान 55% ते 60% गुण असणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. बॅंकेची परीक्षा देण्यासाठी किमान बारावी पास ही अट आहे. पदवीधर विद्यार्थ्याला प्राधान्य दिले जाते. त्याचप्रमाणे दहावीमध्ये गणित विषय असणे महत्त्वाचे असते.
बॅंकेच्या शेतीकर्ज विभागात शेतकी अभ्यासक्रम पदवीधर व्यक्तीची गरज असते. त्यामुळे बीएससी ऍग्रिकल्चरची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यास येथे प्राधान्य मिळू शकते. बॅंकिंग औद्योगिक वित्त विभागात विविध शाखांच्या इंजिनिअर्सची गरज असल्याने त्यांनाही बॅंकेत वाव आहे. आजकाल बॅंका संगणकीकृत झाल्याने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषयातील पदवीधरांनाही बॅंकेत प्रवेश मिळवणे शक्य आहे. जागतिक उद्योग, आयात, निर्यात यांची होणारी वाढ पाहता, त्या क्षेत्रात विविध कोर्सेस किंवा डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांनाही बॅंकेच्या फॉरेन एक्स्चेंज खात्यात सहजगत्या नोकरी मिळू शकते. कायदेक्षेत्रात अभ्यास केलेल्या किंवा नातेसंबंधांबाबत अभ्यास असणाऱ्या व्यक्तींनाही बॅंकेत अर्ज करता येऊ शकतो. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थीही बॅंकेत नोकरीसाठी अर्ज करू शकतात.
काही बॅंकांच्या परीक्षेच्या तारखा पुढीलप्रमाणे-
युनियन बॅंक ऑफ इंडिया 5-12-2010
फेडरल बॅंक 5-12-2010
विजया बॅंक 12-12-2010
ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स 26-12-2010
इंडियन बॅंक 2-1-2011
स्टेट बॅंकेच्या असोसिएट बॅंक 16-1-2011
पंजाब ऍण्ड सिंध बॅंक ऑफिसर्स
तसेच ऍग्रिकल्चर ऑफिसर्स 23-1-2011
पंजाब ऍण्ड सिंध बॅंक क्लार्क 30-1-2011
बॅंकेतील नोकरीचे फायदे
- उत्तम पगार
- सोयीच्या कामाच्या वेळा
- खेळीमेळीचे वातावरण
- बढतीची संधी
- सुरक्षेची हमी
नोकरी शोध
http://www.employmentnews.gov.in/
रोजगार नोंदणी
http://india.gov.in/howdo/howdoi.php?service=12
बॅंके मध्ये नोकरी करायची असेल तर या भरती विषयक अधिक माहिती खाली दिलेल्या दुव्यावर आहे.
http://ibps.in/html/common.htm
अधिकाधिक मराठी तरूण-तरुणींनी या संधीचा लाभ घ्यावा आणि अधिकाधिक जणांना याची माहिती द्यावी.
नोकरी संदर्भ जहिरत, जहिरत नोकरी संदर्भ, जहिरत नोकरी संदर्भ, नोकरी संदर्भ latest, नोकरी संदर्भ lates, नोकरी संदर्भ भरती, नोकरी संदर्भ दैनिक, नोकरी संदर्भ, नोकरी संदर्भ daynik, नोकरी संदर्भ, latest news on सरकारी नोकरी news, latest news on सरकारी नोकरी, 24dunia hindi search latest news सरकारी नोकरी, सरकारी नोकरी news, latest news on latest news on latest news on latest news on rasmalai cashews barfi, पुणे सरकारी नोकरी, वृषभ राशि के लिए सरकारी नोकरी, दौसा सरकारी नोकरी, सरकारी नोकरी, लड़की को सरकारी नोकरी,इन्फोसिसला गरज पडल्यास धावून येईन मूर्ती, बाळासाहेबांच्या समर्थनात राज आला धावून, harayana नोकरी, नोकरी के लिए लाल किताब के टोटके, 10वी 12वी नोकरी, नोकरी विज्ञापन 2011, अधिक मास नोकरी प्राप्ति के मंत्र, नोकरी संदर्भ भरती, आपका विभाग नोकरी, हरियाणा मे नोकरी