पाठदुखी लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
पाठदुखी लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

मंगलवार, 8 नवंबर 2011

वात-संधीवात नियंत्रणासाठी आधी कमी करा लठ्ठपणा!

 नागरिकांना विशेषतः ज्येष्ठांना नकोसा वाटणारा ‘संधीवात’ हा आजार नसून शरीरातील नैसर्गिक बदल आहे. कोणत्याही प्रकारे श्रीमंत-गरीब असा भेदभाव न करणारा संधीवात कोणालाही जडू शकतो. संधीवात रोखता येऊ शकत नसला तरीही तो टाळता येऊ शकतो, नियंत्रणात आणू शकतो, फक्त त्यासाठी आवश्यकता आहे ती, नियमित व्यायाम, शरीराचे वजन कमी ठेवणे अन् वैद्यांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे प्राशन न करण्याची…
सर्वसाधारणपणे सर्वांच्या सांध्यामध्ये गॅप असतोच या गॅपमध्ये एक संवेदना नसलेला पदार्थ असतो. परंतु, एकदा का हा पदार्थ निघून गेला की, त्यानंतर गुडघेदुखी सुरू होते. शरीरातील या नैसर्गिक बदलातूनच खर्‍या अर्थाने संधीवाताला सुरूवात होते. संधीवाताचे ओटिओ आथ्रीटिस, आर.ए. ऍन्ड कोलाजन आथ्रीटीस, गाऊट आणि इन्फेक्टिव्ह असे एकूण चार प्रकार आहेत. गाऊट प्रकारात सांध्यात खडे होऊन त्यातील गुळगुळीत भागात चरे पडतात आणि तेथे झीज होण्यास सुरूवात होते. तर इन्फेक्टिव्ह संधीवातात सांध्यामध्ये टी.बी. होतो. असा प्रकार विशेषतः भारतातच आढळतो,आता विज्ञानाने संधीवाताच्या रुग्णांना स्वतःच्या स्वावलंबनावर जगण्याची शक्ती उपलब्ध करून दिली आहे. शस्त्रक्रियेनंतर संधीवाताचा रुग्ण महिनाभरातच पूर्वीप्रमाणे नॉर्मल जीवन जगू शकतो,साधारणपणे १८ वर्षापासून ६० वर्षापर्यंत शारीरिकदृष्ट्या सक्षम असणार्‍या संधीवाताच्या शस्त्रक्रिया केली जाते. तरीही त्याचे प्रमाण ५ टक्के असून, उर्वरित ९५ टक्के रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज भासत नाही. त्यातच आजच्या जमान्यात लेझर उपचार पध्दतीही फायद्याची ठरत

संधीवात टाळता येऊ शकतो

साधारणत: प्रत्येक दहा घरांमागे पाच ते सहा घरांत संधीवाताचा रुग्ण आढळतो. संधीवाताचे साधा संधीवात व आमवात असे दोन प्रकार आढळतात. साधा संधीवात हा वयपरत्वे म्हणजे ५० ते ६० वर्षे वयापुढील व्यक्तींमध्ये आढळून येतो. ओमवात म्हणजेच रुमॅटॉईड आथ्रायटीस. हा रक्त दोषांमुळे निर्माण होतो. याची सुरुवात कोणत्याही वयात होऊ शकते.
संधीवातावरील उपचारांमध्ये सुरुवातीस रुग्णाला वेदना शामक औषधांचा वापर केला जातो. किंवा स्टिरॉईड्सचा वापर करुन काही काळासाठी वेदनांची तीव्रता कमी करता येते. यातच शेवटी हालचाल पूर्ण मंदावल्यास सांधा बदलण्याची शस्त्रक्रिया केली जाते.
 सध्या जगात सगळीकडे लेसर थेरपी वापरली जाते. यात मृदूकिरणांचा वापर केला जातो. दोन्ही प्रकारच्या संधीवातासाठी या शस्त्रक्रियेचा वापर होतो. याने सांध्यांवरील सूज कमी होते. सांध्यांचा आवाज कमी होतो. घर्षण ही कमी होते.
लेसर थेरपी घेत असताना रुग्ण आपली रोजची कामे, व्यायाम नियमीत सुरु ठेवू शकतो. आहारात मात्र काही बदल सुचवले जातात. सांध्यांची झीजही थांबते. म्हणूनच लेसर थेरपीला नवसंजिवनी म्हटले जाते.

वात-संधीवात नियंत्रणासाठी आधी कमी करा लठ्ठपणा!
नागपूर - वात अन्‌ संधीवात झाल्यानंतर कोणता आहार घ्यावा, काय खावे, काय खाऊ नये. वात-संधीवात आटोक्‍यात आणण्यासाठी आधी लठ्ठपणा कमी करा, लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोणता आहार नियमित घ्यावा 
 
वात आणि संधीवात झाल्यानंतर शरीराचा लठ्ठपणा कमी केल्यानंतरच तो आटोक्‍यात येतो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी समोसा, शितपेये, फास्टफुड, मद्य, तेलकट-गोड पदार्थ टाळण्याचा आणि सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला यावेळी रुग्णांना देण्यात आला. खसखस, अजवाईन, जिरा, कडीपत्ता, हिंग यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे ते भरपूर प्रमाणात सेवन करणे आवश्‍यक आहे. मधुमेहासाठी रात्री दोन बदाम भिजवून खाल्यास त्याचा मोठा लाभ होतो. आळीवची खीर सेवन केल्याने हिमोग्लोबीन वाढून हाडांचे दुखणे कमी होते. मेथी पावडर सकाळी एक चमचा घेतल्यास त्यानेही मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो. सर्वांत स्वस्त आणि सहज कुठेही मिळणारे राजगिऱ्याचे लाडू वाढलेले शरीराचे वजन कमी होण्यात हितकारक ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वातासाठी कॅल्शियम आणि पोटॅशियम दररोजच्या आहारात घेणे आवश्‍यक असल्याचा सल्ला रुग्णांना देण्यात आला. वात-संधीवातासाठी आवश्‍यक असलेले आणि नसलेले पदार्थ शिबिराच्या ठिकाणी ठेवण्यात आले होते

संधीवातासाठी हे घ्यापपई, गोबी, भात, साखर, ब्रेड, मेथी, गाजर, पत्तागोबी, आलू, पालक, केळी, संत्रा, निंबू, पोळी

संधीवातासाठी हे टाळातूरदाळ, बदाम, मोट, अंडे, रसगुल्ला, खवा, शितपेये, मासे, मासाहार, चने, शेंगा, मद्य, चॉकलेट, चारोळी 
 

शनिवार, 15 अक्टूबर 2011

हेही वाचायला हवं

 










नेक अडचणींवरील एक उपाय म्हणून योगाभ्यासाकडे पाहिले जाते मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यासाठी दररोज योगाभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे, पण धावपळीच्या युगात अनेकांना योग करण्यासाठी पुरेसा वेळही मिळत नाही अशा व्यक्तींसाठी कमी वेळेत करण्याजोगे सोपे योगाचे प्रकार ‘धावपळीच्या जीवनात योग’ या पुस्तकात देण्यात आले आहेत या पुस्तकात अर्धा तास दररोज सहज करता येण्याजोग्या निवडक योग प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे अत्यावश्यक पण रोज करण्यास सोपी असणारी काही योगासने, प्राणायाम, मुद्रा, बंध, स्वयंसूचना, ध्यान आणि मुख्य म्हणजे काही सोप्या मंत्रांचाही समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे पाठदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी, स्थूलपणा, मधुमेह, रक्तदाब, निद्रानाश, स्त्रियांचे आजार इत्यादी अनेक समस्यांवर या पुस्तकातील योग प्रकार उपयोगी ठरणारे आहेत 





- लेखक : प्रा डॉ रवी रा जवळगेकर.
- प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन.
- किंमत : 80 रुपये.

fly