फिट येणे - उपाय.
1) स्नायु एकदम घट्ट आणि कडक होतात, व त्यानेतर झटके येऊ लागतात. रुग्ण जिभ चावु शकतो वा श्वास घेणे थांबवु शकतो. तोंड किंवा ओठ निळे पडु शकतात खुग जास्त प्रमाणात लाळ गळु लागते वा तोंडातुन फेस येवु लागतो.
जर रुग्णाने श्वासोश्वास थांबविला तर ते चांगले लक्षण नाही. अशा वेळी, ताबडतोब डाँक्टर कडे धाव घ्या.
त्वारीत ऊपचारासाठी काही पद्धती -
1) रुग्णा जवळचे सगळ्या वस्तु दुर करा व त्याच्या डोक्याखाली काहीतरी मऊ द्या.
2) रुग्णाने श्वास घेणे थांबविले तर,त्याला वाचविण्याचा प्रयत्न करा व त्याचा श्वसन मार्ग ऊघडण्याचा प्रयत्न करा.
3) शांत रहा व रुग्णाला दक्षता मिळे पर्यंत मदत करा.
4) दारं-खिडक्या उघडून पेशंटला मोकळी हवा मिळू द्या.
5) पेशंटच्या तोंडातून गळणारी लाळ टिपून घ्या.
6) बहुतेक फिट ही थांबुन थांबुन परत परत येते किंवा नंतर बेशुद्धावस्था येते.
काय करू नये...
1) पेशंटच्या अवतीभवती गर्दी करू नका.
2) पेशंटला पाणी पाजू नका. पाणी श्वासनलिकेत जाऊन पेशंट गुदमरू शकतो.
3) कांदा चप्पल नाकाला लावू नये. तो पूर्णपणे गैर्समज आहे.
4) फीटमुळे होणारी त्याच्या हाता पायाची थरथर जबरदश्तीने थांबवू नका.
थोड्या वेळाने फीट थांबेल. एपिलेप्सी ही व्याधी असलेल्या व्यक्तीला फीट आल्यावर दर वेळी डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची गरज नसते. परंतु पाच मिनिटात न थांबल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.