चांगली उंची असणं हा प्रभावी व्यक्तिमत्वाचा भाग असतं, साहजिकच उंची वाढवण्यासाठी वाट्टेल ते प्रयोग स्वत:वर करून घ्यायला लोक तयार असतात. उंची कोणत्या घटकांवर अवलंबून असते आणि उंची न वाढण्याची कारणं काय असू शकतात याचा उहापोह.
प्रत्येक मनुष्याच्या लांबीतील किंवा उंचीतील वाढ ही अनेक वषेर् सुरू राहणारी एक गतिशील प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया गर्भावस्थेत सुरू होऊन पौंगडावस्थेत थांबते. गर्भावस्थेत आणि जन्मानंतर मूल उभे राहायला लागेपर्यंत होणाऱ्या वाढीला लांबीतील वाढ म्हणतात. त्यानंतर होणाऱ्या वाढीला उंचीतील वाढ म्हणतात. जन्मापूवीर् गर्भावस्थेत होणारी आणि जन्मापासून पौगंडावस्थेपर्यंत होणारी अशा दोन टप्प्यात वाढ होते.
आयुष्यातील सर्वाधिक वेगवान वाढ गर्भावस्थेत होते. गर्भावस्थेतील विविध टप्प्यात वाढीचा वेग भिन्न असला तीर गर्भावस्थेतील सरासरी वाढ दर आठवड्याला १.२ ते १.५ सेंमी असते. सर्वाधिक म्हणजे दर आठवड्याला २.५ सेंमी वाढ गर्भावस्थेच्या मध्यकाळात होते. प्रसुतीअगोदर हा वेग दर आठवड्याला ०.५ सेमी इतका कमी होतो. गर्भावस्थेत आणि जन्मानंतर होणाऱ्या वाढीवर भिन्न घटक काम करतात. गर्भावस्थेतील वाढीवर आईशी किंवा गर्भाशी संबंधित असलेल्या घटकांचा प्रभाव असतो. गरोदर स्त्रीला मिळणाऱ्या पोषणाला तिच्या गर्भाच्या वाढीवर विशेष परिणाम होतो. हा परिणाम जन्मानंतर पहिल्या वर्षापर्यंत टिकतो. किंबहुना मातेच्या गदोदरावस्थेतील पोषणाचा तिच्या बालकाला त्याच्या मोठेपणी होणाऱ्या मधुमेह, स्थूलपणा, हृदयविकार या विकारांशी असल्याचे सिद्ध झाले आहे. गरोदर स्त्रीच्या पोषणाचे तिच्या मुलावर दूरगामी परिणाम होतात हे लक्षात घेता या घटकावर विशेष भर दिला पाहिजे. गरोदर स्त्रीला वारंवार इन्फेक्शन झाले किंवा तिला क्षयरोग, अनियंत्रित मधुमेह किंवा अतिरक्तदाब असल्यास तिच्या गर्भाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. गरोदर स्त्रीने धुम्रपान, मद्यपान किंवा मादक पदार्थांचे सेवन केल्यास तिच्या गर्भाची वाढ खुंटते. आईची उंची आणि तिच्या गर्भाशयाच्या आकारावरही गर्भाची लांबी ठरते. या दोन गोष्टी कमी असल्यास नवजात अर्भकाची लांबी साधारणपणे कमी असते. गर्भात अॅबनॉर्मल जीन्स असल्यास, त्याला इन्फेक्शन झाल्यास गर्भाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. या नवजात अर्भकांना कमी लांबीच्या जोडीला मतिमंदता किंवा डोळे, हाड किंवा हृदय यांचे जन्मजात विकार असतात. त्यांची उंची सामान्यत: आयुष्यभर कमी राहते. अकालिक जन्मलेली अर्भकं (प्रीमॅच्युर बेबी) लांबीला कमी असतात पण त्यांची लांबी झपाट्याने वाढून शेवटी सामान्य होते. वारेच्या अपुऱ्या कामामुळे (प्लॅसेण्टल इनसफिश्यंसी) देखील गर्भाची वाढ कमी होते. गर्भामधील हॉमोर्न्सच्या त्याच्या वाढीवर तुलनेते कमी परिणाम होतो हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे नवजात अर्भकाची लांबी कमी असल्यास हॉमोर्न्सचे विकार त्याला कारणीभूत नसतात. गर्भाच्या किंवा नवजात अर्भकाच्या कमी लांबीचे कारण दरवेळेस सापडतेच असे नाही. जन्माच्या वेळी असलेली लांबी आणि प्रौढावस्थेतील उंचीचा संबंध नसतो हे समजून घेतले पाहिजे. जन्मानंतर उंचीच्या वाढीवर काम करणारे घटक भिन्न असतात. निरोगी बालकाची दोन-अडीच वर्षाला असणारी उंची त्यांच्या अंतिम प्रौढ उंचीच्या साधारणत: अर्धी असते.
जन्मानंतर
निरोगी
अर्भकाची
लांबी
साधारणपणे ५०
सेंमी असते.
पहिल्या
वर्षात ती ७६
सेेंमी होते.
याच काळात
अर्भकाचे वजन
तिप्पट वाढते.
दुसऱ्या
वर्षात लांबी
साधारण ८-२०
सेंमीने
वाढते.
त्यानंतर
पौंगडावस्था
सुरू
होईपर्यंत
वाढीचा वेग
कमी म्हणजे
साधारण दर
वषीर् ४-७
सेंमीे वाटते.
विशिष्ट
बालकामध्ये
या काळातील
वाढीचा वेग
साधारणपणे
कायम राहतो.
पौंगडावस्था
सुरू
होण्यापूवीर्
वाढीचा हा
ठराविक वेग
बदल्यास
तज्ज्ञाचा
सल्ला द्यावा.
प्रत्येक
बालकाच्या
उंचीची नोंद
जन्मानंतर
वर्षातून
किमान एकदा
ठेवणे अत्यंत
महत्त्वाचे
आहे. अचूकपणे
आणि नियमित
ठेवलेल्या
नोंदीचे
मूल्य
कोणत्याही
महाग हॉमोर्न
चाचणीपेक्षा
अधिक
असते.
बाल्यावस्थेकडून प्रौढावस्थेत जाणारा संक्रमण काळ म्हणजे पौगंडावस्था! या अवस्थेत उंचीच्या वाढीत उदेक होऊन दरवषीर् उंची ९-१० सेंमीने वाढते. मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये वाढीचा उदेक सुमारे दोन वषेर् अगोदर व कमी तीव्र असतो. त्यामुळे समान वंशाच्या, आनुवंशिक घटक असलेल्या आणि समान बाह्य घटक (जसे पोषण) लाभलेल्या स्त्री-पुरुषांच्या अंतिम प्रौढ उंचीत सुमारे १३ सेंमीचा फरक असतो. वाढीच्या उदेकाबरोबर पौगंडावस्थेत बाह्य लैंगिक वैशिष्ट्ये दिसून लागतात. स्तनवाढ सुरू झाल्यापासून पहिली पाळी येईपर्यंत मुलींची उंची दरवषीर् सुमारे ९ सेंमीने वाढते पहिली पाळी आल्यावर तिची उंची आणखी १-७ सेंमी (सरासरी २.५ सेंमी) वाढते आणि मग कायमची थांबते. कमी उंची असलेल्या अनेक मुलींच्या पालकांना पाळी सुरू झाल्यावर आपल्या मुलीची उंची वाढेल असे वाटते. हा समज निराधार आहे.
बालकाच्या उंचीतील वाढीवर अनेक घटक प्रभावी असतात. आई-वडिलांची उंची या संदर्भात महत्त्वाची असते. आई-वडिलांच्या सरासरी उंचीचा त्यांच्या मुलांच्या अंतिम प्रौढ उंचीशी घनिष्ठ संबंध असतो. कुपोषण हे आपल्या देशात बुटकेपणाचे महत्त्वाचे कारण आहे.
दीर्घकालीन आजारांमुळे उदा. रक्तक्षय (अॅनिमिया), क्षयरोग, लहान आतड्याचे विकार, यकृत, मूत्रपिंड, हृदय किंवा फुफ्फुसांचे विकार, अनियंत्रित मधुमेह तसंच तीव्र व सतच्या मानसिक तणावामुळे उंचीवर प्रतिकूल परिणाम होतो. दम्यासारख्या किंवा त्वचेच्या विकारांसाठी देण्यात येणाऱ्या स्टेरॉइड गटाच्या मौखिक औषधांमुळेही उंचीवर प्रतिकूल परिणाम होतो. थायरॉइड हॉमोर्न्सच्या कमतरतेमुळे मुलांची उंची वाढायची जवळजवळ थांबते. या मुलांना थायरॉइड हॉमोर्न्सच्या कमतरतेची इतर लक्षणे, उदा. सूज, मंदपणा, कोरडी त्वचा, थकवा, गळ्याची सूज असू शकतात. मेंदूच्या तळाशी असलेल्या पिच्युटरी (ब्रह्मा) ग्रंदीतून ग्रोथ (वृद्धि) हॉमोर्न निर्माण होतो. त्याच्या कमतरतेमुळे उंची नेहमीपेक्षा संथ गतीेने वाढते.
उंचीच्या दीर्घकाळावर ठेवलेल्या उंचीच्या नोंदी बुटकेपणाचे कारण शोधण्यास महत्त्वाच्या ठरतात. मूल वयानुसार योग्य वेगाने वाढत नसल्यास चालढकल न करता तज्ज्ञाचा सल्ला घेणं आवश्यक असते. रक्ताच्या व लघवीच्या विशिष्ट चाचण्या करून बुटकेपणाचे कारण बहुतेकवेळा निश्चित करता येते. आतुवंशिकतेचे कारण सोडल्यास बहुतेक कारणांना प्रभावी उपचार उपलब्ध आहेत.
या लेखात आपण उंचीची वाढ कशी होते हे पाहिले. पौंगडावस्थेत मुला-मुलींमध्ये बाह्य लैंगिक वैशिष्ट्ये कधी व कशाप्रकारे दिसू लागतात हे पाहू