| ||||
मनातंल..मनासाठी...
अर्थपूर्ण जीवनाचा आधार भावनिक बुद्धिमत्ता ही आज काळाची गरज बनते आहे. समाजात वावरताना, मोठ्या पदांवर काम करताना तसेच इतरही अनेक परिस्थितींमध्ये ही बुद्धिमत्ता उपयोगी पडते. अनेक दोलायमान स्थितींमध्ये निर्णय घेण्यास यामुळे मदतच होते. एखाद्या घटनेतून किंवा परिस्थितीतून सावरण्याची क्षमता अंगी बाणवणे किती गरजेचे आहे, हे आपण पाहिले. आता आपल्याकडे ही क्षमता किती प्रमाणात आहे, हे ओळखून ती वाढविण्यासाठी प्रयत्न कसे करावेत, हे पाहुया. त्यासाठी दैनंदिन आयुष्यातील घटनांचा आढावा घेऊन त्यातून शिकण्याची वृत्ती ठेवली पाहिजे. पुढे एक प्रश्नावली दिली आहे. प्रत्येक विधानासमोर तुमच्या बाबतीत हे विधान किती लागू पडते किंवा कसे, याचा प्रामाणिक शोध घ्या. जर विधान मुळीच मान्य नसेल किंवा तुम्हाला मुळीच लागू पडत नसेल, तर 1 गुण घ्या व पूर्णपणे लागू पडत असेल, तर 5 गुण घ्या. 1) कोणत्याही आपत्तीत किंवा संकटात मी फार काळ अस्वस्थ होत नाही. 2) माझ्या भावना मी नेहमीच व्यक्त करतो. माझ्या मनात आकस नसतो. मी सहसा खचून जात नाही. 3) मी सर्वसाधारणपणे आत्मविश्वास व आत्मसन्मान बाळगून असतो. Read More »
मनातलं... मनासाठी...
नम्रता, विनयशीलता जीवनमूल्यांपैकीच काही मूल्ये म्हणजे नम्रता व धैर्यशीलता. शिक्षणामुळे अंगात विनयशीलता येते. ती अधिक जोपासण्याचे प्रयत्न करायला हवेत. कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी धैर्य हवे. त्यामुळे भावनिक बुद्धिमत्ता जोपासण्यास मदतच होते.   लोकांनी तुमच्याबद्दल चांगले बोलावे असे तुम्हाला वाटते का? तर मग तुम्ही स्वतःबद्दल चांगले बोलू नका! भावनिक बुद्धिमत्तेचा संबंध नम्रता व विनयशीलता यांच्याशी आहे. स्वतःबद्दल भलत्याच कल्पना नसलेली व्यक्ती विनम्र समजली जाते. आपण कोणीतरी फार महान व्यक्ती आहोत, असा गैरसमज असणे आणि त्याच्या पुष्ठ्यर्थ विचार व वर्तणूक असणे भावनिक बुद्धिमत्तेच्या चौकटीत बसत नाही. स्वतःबद्दलची माफक जाणीव व त्याचबरोबर कोणताही बढाईखोरपणा किंवा अहंमन्यता नसणे म्हणजेच विनयशीलता! एक प्रकारचा हळूवारपणा, लीनता याचबरोबर स्वतःची यथार्थ जाणीव म्हणजेच विनयशीलता होय. मात्र, लाजाळूपणा, भित्रेपणा, बुजरेपणा आणि विनयशीलता यांची सहज गल्लत होणे शक्य असते. स्वतःचे गुण, कर्तृत्व याचा अभिमान जरूर असावा पण त्याला अहंमन्यतेचा किंवा उर्मटपणाचा वास नसावा. Read More »
मनातलं..मनासाठी...
जीवनमूल्यांचा विचार जीवन अर्थपूर्ण करण्यात तत्त्व आणि जीवनमूल्ये यांचा मोठा हातभार असतो. ही जीवनमूल्ये कशी आत्मसात करायची, त्याचा योग्य उपयोग कसा करायचा हे जाणून घेतल्यास भावनिक बुद्धिमत्ता प्रगल्भ होण्यास मदत होते. आ पली तत्त्वे किंवा जीवनमूल्ये खरोखरच खूप महत्त्वाची असतात. गेल्या भागात सचोटी व प्रामाणिकपणा या पहिल्या जीवनमूल्यांविषयी माहिती घेतली. यानंतरचे महत्त्वाचे जीवनमूल्य म्हणजे जबाबदारी. जबाबदारी स्वीकारणे स्वतःच्या वागण्याची किंवा कृतीची जबाबदारी स्वीकारणे हे आद्य कर्तव्य असते. "हा काही माझा दोष नाही,' "याला मी जबाबदार नाही,' अशी वाक्य आपल्या कानांवर पडतात. ही वाक्ये म्हणजे जबाबदारी नाकारणाऱ्यांचे उद्गार असतात. अनेकदा असे प्रसंग येतात, जेव्हा स्वतःचीच कीव करावीशी वाटते. ही गोष्ट कबूल करणे, समजावून घेणे आणि ती बदलण्याचा प्रयत्न करणे हे भावनिक बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. वैयक्तिक जबाबदारी स्वीकारणे म्हणजेच, 1. आपल्या आयुष्यातील सर्व निर्णयांची जबाबदारी केवळ आपलीच आहे, हे मान्य करून वागणे. 2. आपण काय विचार करतो किंवा आपल्याला कसे वाटते, याचीही जबाबदारी आपलीच असते. 3. Read More »
नकारात्मक समजुतींचे परिणाम
मनातलं..मनासाठी... मनात तयार झालेल्या समजुतींमुळे कधीकधी वास्तवाकडे दुर्लक्ष होते. नकारात्मक विचार मनात घोळू लागतात. त्यातूनच काही चुकीच्या कृती हातून घडतात, तर कधी जीवनाची दिशा चुकते. म्हणूनच भावनिक बुद्धिमत्ता जोपासणे महत्त्वाचे ठरते. आपल्या मनातील समजुती व श्रद्धा कशा तयार होतात, याचा आढावा घेतल्यानंतर आता जीवनविषयक गृहिते दैनंदिन विचारांवर कसा प्रभाव पाडतात, ते समजून घेतले पाहिजे. आपल्या मनातील नकारात्मक विचार बाजूला सारून भावनिक बुद्धिमत्ता वापरून त्या जागी अधिक विधायक विचार कसे आणायचे, हा खरा प्रश्न आहे. काही नकारात्मक घटना व त्यामुळे निर्माण झालेले नकारात्मक विचार हेच वास्तव ग्राह्य धरण्यात येते. अशा वेळी स्वतःलाच विचारा, ""याला काय पुरावा आहे?'' सारासार विचार करा! शेखरला अलीकडे कामाचे फारच प्रेशर यायला लागले होते. काय करावे ते त्याला काही सुचत नव्हते. त्याने हे सगळे त्याच्या सहकाऱ्याला म्हणजे विकासला सांगितले. विकास यावर म्हणाला, की तुझ्या बॉसशी याद्दल चर्चा करायलाच हवीस. यावर शेखर म्हणाला, की या परिस्थितीचा फायदाच माझा बॉस घेण्याची शक्यता आहे तो कारणच शोधतोय. Read More »
मनातलं..मनासाठी...
मनाचा आरसा स्वतःच्या भावभावनांचा अभ्यास करताना त्याचे इतरांवर होणारे परिणामही लक्षात घेणे गरजेचे असते. त्यासाठी अधिक खोलपणे स्वतःच्या अंतरंगात शिरले पाहिजे. त्यामुळे अनेक क्लिष्ट प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळू शकतील. प्रा. कालिदास देशपांडे भा वनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्याच भावभावनांचे आकलन. आपल्या भावना ओळखून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे कसब मिळवणे, म्हणजेच एका अर्थी भावनिक बुद्धिमत्ता संपादन करणे. आपल्या भावना ओळखल्यानंतर त्याचा इतरांवर काय परिणाम होतो, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या वागण्याचा इतरांवर काय परिणाम होईल, याचा अचूक अंदाज असेल, तर आपले बोलणे किंवा वागणे बदलण्याची संधी आपल्याला मिळते. या सर्वांसाठी आत्मपरीक्षण हवे. म्हणून आपण काय बोलतो, याऐवजी लोकांना काय ऐकू जाते हे सर्वांत महत्त्वाचे. वागण्याबोलण्याचा परिणाम बॅग खरेदी करण्यासाठी विजय आणि सतीश दोघे मित्र एका दुकानात गेले. विजय सिंगापूरला जाणार असल्याने त्याला एक मोठी बॅग हवी होती. दुकानात प्रवेश केल्याबरोबर एका स्मार्ट सेल्सगर्लने त्यांचे स्वागत केले. छोटे स्मित करून काय हवे आहे? असे तिने नम्रपणे विचारले. Read More »
सांगलीचा विस्तार लक्षणीय
सांगली, मिरज आणि कुपवाड यांचे मिळून सांगली शहर झपाट्याने विकसित होत आहे. बांधकाम क्षेत्राशी निगडित सर्वच व्यवसाय येथे प्रगतिपथावर आहेत. बहुमजली इमारतींना परवानगी मिळण्याच्या शक्यतेने जमिनी, फ्लॅट्सचे दर वाढत आहेत. हॉटेल व्यवसाय आणि आरोग्यसुविधा तसेच शैक्षणिकदृष्ट्याही सांगलीची वाढ लक्षणीय आहे. सहा गल्ल्यांची म्हणून ओळखली जाणारी सांगली "आस्तेकदम' वाढते आहे. अकरा वर्षांपूर्वी मिरज आणि कुपवाड या शहरांसह सांगलीची महापालिका झाली. एखाद्या नदीला उपनद्या येऊन मिळाव्यात आणि त्या नदीचा विस्तार वाढावा तशीच स्थिती या शहराची झाली. सांगली, मिरज, कुपवाड ही शहरे प्रशासकीय, राजकीय आणि आता भौगोलिक पातळीवरही एकजीव झाली आहेत. हा त्रिवेणी संगम विकासाला पूरक ठरतोय. मिरज हे ऐतिहासिक शहर वैद्यकीय नगरी म्हणून परिचित आहे. कुपवाडची औद्योगिक शहर म्हणून वेगळी ओळख आहे. सांगली शहराचा इतिहास दोनशे वर्षांचा आहे. कृष्णा नदीकाठी हे शहर वसले आहे. या तिन्ही छोट्या-छोट्या शहरांची एकत्रित महापालिका झाल्याने वाढीला गती आली आहे. जेमतेम चार पेठा असलेल्या सांगलीचा विस्तार झपाट्याने होऊ लागला आहे. Read More »
बेळगावची वाढ अस्ताव्यस्त
शहरीकरणाचा, लोकसंख्यावाढीचा मोठा वेग, जागांचे वाढते दर, बेशिस्त वाहतूक आणि प्रशासकीय दुर्लक्ष यामुळे बेळगाव शहराचा विस्तार अस्ताव्यस्तपणे झाला आहे. शहर आणि उपनगरातील सर्वच यंत्रणांमध्ये नियोजनाची नितांत गरज आहे. गे ल्या दहा वर्षांत बेळगाव शहराची लोकसंख्या दीडपटीने वाढली असून, विस्तारही वाढत चालला आहे मात्र, ही वाढ सुनियोजित नसून अस्ताव्यस्तपणे होत असल्याने शहरापुढे बकालपणाचा मोठा धोका आहे. शहरात सध्या जागांचे दर गगनाला भिडले आहेत. शहर व उपनगरांमध्ये प्रतिगुंठा 8 ते 45 लाख रुपये दराने जागेची विक्री होत आहे. परिणामी शहराबाहेर जागा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतजमिनींना मोठी किंमत आली असून, दर प्रति एकर 40 लाख ते 2 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. जागेची अनुपलब्धता आणि दरवाढीमुळे जागा घेऊन घर बांधण्याचे प्रमाण कमी झाले असून, फ्लॅट किंवा तयार घरे घेण्याकडे वाढता कल आहे. परिणामी फ्लॅटस्च्या मागणीत व किमतीतही वाढ झाली आहे. एक-दोन वर्षांपूर्वी प्रति चौरस फूट 1500 पर्यंत असलेले फ्लॅटस्चे दर आता 2000 ते 3000 रुपयांवर पोहोचले आहेत. 30 बाय 40 आकारातील घरांच्या किमती किमान 35 लाख रुपयांपर्यंत आहेत. Read More »
कार्यसंस्कृती, नेतृत्वावरच भवितव्य अवलंबून नेतृत्व
नेतृत्वगुण हे सर्वत्र सारखेच असतात. चांगल्या माणसाला ओळखता येणे ही नेतृत्वाची खूप मोठी कसोटी असते. नेत्याने कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली, की त्याला माणसांना अजमावीता येते. वेगवेगळ्या क्षेत्रात कामाचे स्वरूप बदलल्यामुळे नेतृत्व गुणांमध्ये, काम करण्याच्या पद्धतींमध्ये फरक दिसतो. 1. उद्योजकांची मालकी असणाऱ्या काही कंपन्यांमध्ये मालकाच्या लहरीप्रमाणे कर्मचाऱ्यांना वागावे लागते. अशा ठिकाणी कर्मचारी पुढाकार घेऊन कुठलीही जोखीम पत्करत नाहीत. "ओ नाम्या, सांग काम्या' या वृत्तीने नोकरी कशी टिकेल, याचाच फक्त विचार करतात. अशांना संस्थेबद्दल आपुलकी वाटणे असंभव. 2. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्ट 1947 रोजी सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले होते, ""आपण जर चांगले राज्य चालविले नाही, तर तो कोणा एकट्या दुकट्या व्यक्तीचा नाकर्तेपणा असणार नाही, सबंध देशाचा असेल.'' सध्याच्या सर्व प्रकारच्या संस्थांना हे किती चपखलपणे लागू पडते. नेत्याने कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली, की त्याला माणसांना अजमावता येते. माणसांना असे आजमावणे हे प्रत्येकाचे व्यक्तिगत वैशिष्ट्य असते. Read More »
कार्यसंस्कृती
संस्थाप्रमुख हा कंपनीचा मुख्य असतो. त्याच्याकडे कर्मचारी आदर्श म्हणून पाहतात. कर्मचाऱ्यांच्या हितासोबतच संस्थेचे हित पाहणे हे त्याचे कर्तव्य असते. त्यामुळे कंपनीत काम करताना संस्थाप्रमुखाने काही गोष्टींचे पालन केले पाहिजे, जेणेकरून दोन्ही गोष्टी साध्य होतील. बोले तैसा चाले नेत्याने स्वतःच्या वागणुकीतून दुसऱ्यांना धडा घालून द्यायचा असतो. मुख्य म्हणजे बोलल्याप्रमाणे त्याने वागले पाहिजे. संस्थाप्रमुखांना पुष्कळदा आपल्या कर्मचाऱ्यांना मोठमोठ्या बाता करून भुलवण्याची सवय असते. आश्वासने पाळली नाहीत, तर त्यांचा परिणाम नीतिधैर्य खचण्यात होतो. याहून महत्त्वाचे म्हणजे दिलेला शब्द न पाळणारा नेता भावनिक आपुलकीच्या मुळावरच घाव घालतो. "बोले तैसा चाले' हा जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग आहे. गुणवत्तेच्या व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या व्यवस्थापकाने केवळ कारखान्यातल्या कामाची गुणवत्ता बघावी, एवढेच अपेक्षित नसते, तर तो जे जे काम करेल, मग ते घरातले असो किंवा सहकारी गृहसंकुलाचे, ते त्याने गुणवत्तापूर्ण करावे, अशी स्वाभाविक अपेक्षा असते. थोडक्यात गुणवत्तेने काम करणे हा त्याचा स्थायीभाव असावा परंतु असे क्वचितच आढळते. Read More »
बॉस कसा असावा?
बॉस या व्यक्तिमत्त्वाचे नाव उच्चारताच ऑफिसमधल्या सर्वांच्या कपाळावर आठ्या पडतात. असे का होते? कोणत्याही पातळीवरील बॉसने आपल्या हाताखालच्या सहकाऱ्यांशी कसे वागले पाहिजे याचा आदर्श काही बड्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी घालून दिला आहे. त्यांच्यासारख्या कर्मचाऱ्यांचा विचार करणाऱ्या नेत्यांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. कोणत्याही कंपनीत काम करताना सहकारी आणि वरिष्ठ यांच्यामध्ये खेळीमेळीचे वातावरण निर्माण होणे गरजेचे असते. कर्मचारी हे त्या कंपनीत नवीन असतात, त्यांच्या पदानुसार त्यांना अधिकारही कमी असतात मात्र त्यांचे वरिष्ठ अनुभवाने आणि अधिकारानेही त्यांच्यापेक्षा मोठे असतात. त्यामुळे हे वातावरण निर्माण होण्यासाठी वरिष्ठांकडून प्रयत्न होणे गरजेचे असते. त्याउलट जर आपल्या सहकाऱ्यांवर त्यांनी बॉसिंग केले, तर कर्मचाऱ्यांवर याचा उलटा परिणाम होतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा कामातील रस कमी होऊ शकतो आणि कामाबद्दल प्रेरित कर्मचाऱ्यालाच संस्थेविषयी व कामाविषयी भावनिक आपुलकी वाटू शकते, हे आत्तापर्यंत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रेरणा देत राहणे हे कोणत्याही प्रकारच्या संस्थेतील नेतृत्वाचे आद्य कर्तव्य आहे. Read More » | ||||
मनातंल लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
मनातंल लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
रविवार, 19 मई 2013
कार्यसंस्कृती
सदस्यता लें
संदेश (Atom)