मराठी उखाणे 11 लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
मराठी उखाणे 11 लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

बुधवार, 19 अक्टूबर 2011

मराठी उखाणे 11

------रावांचं नांव घेतें अखंड चुडा भरा आज.
प्राथमिक शाळेंत ज्ञानाची वाहते सरिता
------रावांचं नांव घेतें मैत्रिणींच्या आग्रहाकरितां.
रुणझुण जातें, खिडकीवाटे पाहतें, खिडकीला तीन तारा,
आडकित्त्याला घुंगरं बारा, पान खातें तेरा तेरा, घाम आला दरादरा
------राव बसले पलंगावर तर मी घालतें वारा.
रातराणीच्या सुगंधानं निशिगंध झाला मोहित
------रावांना आयुष्य मागतें सासुसासर्यारसहित.
उभी होतें मळ्यांत, नजर गेली तळ्यांत, पांचशेंची कंठी
------रावांच्या गळ्यांत.
वेणीफणीच्या पेटीला बिलवरी आरसा
------रावांना घास घालतें अनारसा.
अनुसया, सीता, सावित्री होऊन गेल्या जगीं सती तीन
------रावांच्या चरणीं बाई मी असतें सदा लीन.
गळ्यांत सरी वाकूं कशी, पायांत पैंजण चालूं कशी
------राव बसले मित्रापाशीं तर मोठयानं मी बोलूं कशी ?
पिकलेल्या पानांत बदाम घातले किसून
------रावांना विडा देतें पलंगावर बसून .
चहा केला, चिवडा केला, कॉफी केली ताजी
------रावांचं नांव घेतें सर्वांची होती म्हणून मर्जी.
मोठमोठया आकाराचे मोतीं वेचून काढले बारा
------रावांचे नांव घेतें माझं नांव तारा.
सोन्याची बुगडी, मोत्यांचा कळस
------रावांचं नांव घेण्याला मला नाहीं आळस.
आले राम सीता न्‌ लक्ष्मण दीर,
------रावांचं नांव घेतें मंडळींनो व्हा स्थीर.
काळ्या गाईचें लोणी, कड कड कढविलें,
------रावांचे महालांत कारंजें उडविलें.
हापूस आंबा पायरी, त्याच्या केल्या फोडी,
------रावांच्या आंगठीवर राधाकृष्णाची जोडी.
दारीं होती तुळस, तिला घालते पळी पळी पाणी, पहिली होती आईबापांची
तान्ही आतां झालें ------रावांची राणी.
मी होतें मळ्यांत, चंद्र दिसतो तळ्यांत
------रावांच्या नांवानें मंगळसूत्र बांधतें गळ्यांत.
समुद्रात आली भरती, नदीला आला पूर
------रावांच्यासाठीं आईबाप केले दूर.
गणपतीच्या डोक्यावर ठेवलें हिरेमाणकांचें छत्र
------रावांच्या नांवानें बांधतें मंगळसूत्र.
सोळा वर्षांपर्यंत होतें माहेरच्या मायेंत
------रावंच्यासाठीं जाईन सासरच्या छायेंत.
विद्येचा नसावा अभिमान, श्रीमंतीचा नसावा गर्व
------रावांचं नांव घेतें ऐकत आहेत सर्व.
द्वारकेचा राजा, पाठीराखा द्रोपदीचा
------रावांना मी घांस देतें साखरभाताचा.
आप्तांची भेट प्रेमाला येते भरती

fly